गंडलेल्या वाघाची कहाणी
कोमेजून थकलेल्या वाघा येते ग्लानी,
मरमर मरे रोज, कोण विचारींना पाणी,
रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही,
अफझलखानात रमले सम्राट, वाघा स्कोपच नाही
सांगायाचे आहे, या कवितेतून मला,
गंडलेल्या वाघाची कहाणी तुला,
आटपाट बम्बैजंगली गर्दी झाली भारी,
बाहेरच्या जनावरांनी केली घुसखोरी,
रोजरोज सम्राट तेंव्हा त्वेषानिया बोले,
पण कृतीतून दाखवायचे राहूनीया गेले,
जमलेचं नाही त्यावेळी त्यांना जरी,
म्हणे यावेळी न्याय ते देणारच खरी,
ओरबाडलेल्या रस्त्यांवरून मारू मग फेरी,
डेंगूवाल्या मच्छरांच्या त्यात सरीवर सरी
विकेन तो सारे जंगल, लाडक्या कॉनट्राक्टरला
गंडलेल्या वाघाची कहाणी तुला,
असा कसा कागदी सेनापती देव वाघांना देतो,
हा वरून विरोध करी, पण आतून सेटिंग लावून घेतो,
आयुष्य माझे सगळे गेले यातच निसटून ,
पळवे मला नुसता हा पोकळ इतिहासातून,
जरी येते ओठी तुमच्या माझ्यासाठी हसे,
नजरेत तुमच्या काही अनोळखी दिसे,
बम्बैजंगलातून वाघ हरवेल का हो,
नंतर वाघ तुम्हा आठवेल का हो,
दाखविली मी या कवितेतून कला,
गंडलेल्या वाघाची कहाणी तुला... ला ला ला....
प्रतिक्रिया
मस्त !!!
सॉलीड हाणले आहेत. मस्तं!
कोणालाही कमी लेखू नका
>>> पृथ्विबाबा पण महापालिका
आईग्ग.....
या कवितेचे शीर्षक "गंजलेल्या
असे हवे !
जरी येते ओठी तुमच्या माझ्यासाठी हसे
हो बरोबरच, जसे कि विकास आला कि बेगडी अस्मिता दूर होते
(No subject)
नखं नसलेल्या वाघाची कहाणी