Skip to main content

गंडलेल्या वाघाची कहाणी

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 11/10/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोमेजून थकलेल्या वाघा येते ग्लानी, मरमर मरे रोज, कोण विचारींना पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही, अफझलखानात रमले सम्राट, वाघा स्कोपच नाही सांगायाचे आहे, या कवितेतून मला, गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, आटपाट बम्बैजंगली गर्दी झाली भारी, बाहेरच्या जनावरांनी केली घुसखोरी, रोजरोज सम्राट तेंव्हा त्वेषानिया बोले, पण कृतीतून दाखवायचे राहूनीया गेले, जमलेचं नाही त्यावेळी त्यांना जरी, म्हणे यावेळी न्याय ते देणारच खरी, ओरबाडलेल्या रस्त्यांवरून मारू मग फेरी, डेंगूवाल्या मच्छरांच्या त्यात सरीवर सरी विकेन तो सारे जंगल, लाडक्या कॉनट्राक्टरला गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, असा कसा कागदी सेनापती देव वाघांना देतो, हा वरून विरोध करी, पण आतून सेटिंग लावून घेतो, आयुष्य माझे सगळे गेले यातच निसटून , पळवे मला नुसता हा पोकळ इतिहासातून, जरी येते ओठी तुमच्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुमच्या काही अनोळखी दिसे, बम्बैजंगलातून वाघ हरवेल का हो, नंतर वाघ तुम्हा आठवेल का हो, दाखविली मी या कवितेतून कला, गंडलेल्या वाघाची कहाणी तुला... ला ला ला....

वाचने 7807
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कोणालाही कमी लेखू नका...महाराष्ट्राचे राजकारण एवढे सोपे नाही...पृथ्विबाबा पण महापालिका निवडणुकी आधी असेच बोलले होते...

या कवितेचे शीर्षक ( इतिहासातच )"रंगलेल्या वाघाची कहाणी" असे हवे होते.

In reply to by होबासराव

हो बरोबरच, जसे कि विकास आला कि बेगडी अस्मिता दूर होते, नोकरी व्यवसायाच्या संधी आल्या प्रादेशिक संकुचितपणा बाजूला पडते, दगडं मारायला हात मिळत नाही. अरे नुसत्या वडापावच्या गाड्या लावून, महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेणार का ? का हफ्ते मागून राज्याचे उत्पन्न वाढवणार सेनापती ?

*OK*