✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३

प
प्रभाकर पेठकर यांनी
Wed, 10/29/2008 - 21:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6092 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय.

नारायणी
Wed, 10/29/2008 - 22:31 नवीन
खुपचं छान वर्णन. वाचताना मध्ये मध्ये टेन्शनही येत होतं, हसुही येत होतं. शिवाय सलग सगळे भाग वाचता आल्याने परिणामकारक लेख. यापुढे तुम्हाला काहीही त्रास होउ नये , हीचं ईश्वरचरणी प्रार्थना!!
  • Log in or register to post comments

होय

रामदास
Wed, 10/29/2008 - 22:49 नवीन
मलाही असंच वाटतं की आता तब्येत ठिक असेल आणि असावी.हॉस्पीटल चा अनुभव फार भयावह असतो. लेख चांगले आहेतच .कालच मनोगतावर वाचले होते.
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/29/2008 - 23:03 नवीन
काका, मस्तच लिहिलंय. मनोगतावर वाचायचे होते अजून. तुम्ही तुमच्या खास मिश्किल शैलीत मस्त रंगवलाय किस्सा. आणि तब्येत कशी आहे आता? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्तच..

प्राजु
गुरुवार, 10/30/2008 - 02:43 नवीन
मनांत धाकधुक होती थोडी.. पण वाचताना तुमच्या विनोदी शैलीने मजा आली. आवडले तीनही लेख एकदम मस्त जमून आले आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सगळी

रेवती
गुरुवार, 10/30/2008 - 02:43 नवीन
ष्टोरी एकाच दिवशी वाचायला मिळाली म्हणून बरे वाटले. लिहिली आहे छान. अनुभव मात्र त्रासदायक होता म्हणायचा. रेवती
  • Log in or register to post comments

काकाश्री

मदनबाण
गुरुवार, 10/30/2008 - 07:46 नवीन
काकाश्री तब्येतीची काळजी घ्या.. अनुभव कथन छान झालय.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

अत्यंत मनोरंजक

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/30/2008 - 08:58 नवीन
एकूण अनुभव कितीही वेदनादायक असला ( आणि तो नि:शंकपणे वेदनादायक असणारच !) तरी , तुम्ही तुमच्या फाईटींग स्पिरीटने , विनोदी वृत्ती न सोडता, व्यवस्थेचे , व्यवस्थेत असणाआर्‍या माणासांचे नमुने टिपत स्वीकारला आणि आपल्या ओघवत्या शैलीत आमच्यापर्यंत पोचवलात ! काहीकाही प्रसंग भीषण विनोदी ( उदा. "सार्वजनिक नळावरची बादली" , "पब्लिक/प्रायव्हेट पार्टस्" ) तर काही प्रसंग हृदयद्रावक (उदा. आप्तेष्टांसमोर असहायतेची जाणीव झाल्याने आलेले अश्रू , भीषण अपघातात अडकलेल्या व्यक्ती) आहेत. एकंदरीत , अतिशय वाचनीय , मनोरंजक लिखाण. अभिनंदन !
  • Log in or register to post comments

एकदम

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 10/30/2008 - 12:46 नवीन
एकदम सहमत! बाकी पेठकरकाका॑ची ही शैली मला ज्याम आवडते. ग॑भीर प्रस॑गाचे सुद्धा त्या॑नी काय खुसखुशीत वर्णन केल॑य. डॉक्टर म्हणून नेहमीच आयसीयूतल्या वा ऑपरेशन थिएटरमधल्या रूग्णा॑शी स॑पर्क येतो पण त्या॑च्या भावना अश्या कधी कळल्या नव्हत्या. वाचून बराच शहाणा पण झालो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अतिशय परिणामकारक

सहज
गुरुवार, 10/30/2008 - 09:21 नवीन
तीनही भागात योग्य तो वेग, वाचकाला खिळवुन ठेवणारे लेखन. हॉस्पीटलमधील वास्तव्याचा अतिशय जिवंत बोलका अनुभव. व मार्गदर्शक देखील. तुम्हाला नवे वर्ष अत्यंत आरोग्यदायी जावो ह्या मनापासुन शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सहमत !!

अनिल हटेला
गुरुवार, 10/30/2008 - 09:23 नवीन
>>वरून-खालून तपासून मी नॉर्मल असल्याचे निदान झाले होते. सही .... पेठकर साहेब अतीशय छान शब्दबद्ध केलये अनुभव कथन .... +१................... विशेष म्हणजे एकाच दिवशी सर्व वाचता आले म्हणून बरे वाटले. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

पेठकर

विजुभाऊ
गुरुवार, 10/30/2008 - 10:15 नवीन
पेठकर काका हॉस्पिटलचे अनुभव तुम्ही अगदी ट्वेन्टी २० ची मॅच ऑखो देखा हाल सांगावा तशी सांगितलीत. 'बातानुकुलीत' रूम एकदम मस्तच होती. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

वा!

अनिरुध्द
गुरुवार, 10/30/2008 - 10:22 नवीन
प्रसंगाचं गांभिर्य मानायचेच नाही, उलट पेशंटला वेगळीच हुरहूर लावून जायचे एकदम छान. तुम्हीही हा लेख प्रसंगाचं गांभिर्य न जाणवू देता आम्हाला वाचायचा आनंद दिलात. आभार. तब्येतीची काळजी घ्या. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

>> पार अगदी

यशोधरा
गुरुवार, 10/30/2008 - 10:45 नवीन
>> पार अगदी 'दीऽऽऽऽन' आणि 'अनाथ' होऊन बाहेर पडलो! :)) मस्तच लिहिलंत काका!! आवडलं! आता कसे आहात?
  • Log in or register to post comments

जहबह-या.

अभिज्ञ
गुरुवार, 10/30/2008 - 10:47 नवीन
पेठकरकाका, एकाच दिवशी तिनहि भाग देउन एक चांगला पायंडा पाडलात. :) अतिशय खुमासदार लेखनशैली !!! +१. मनापासून अभिनंदन. इस्पितळातील वर्णने खासच. अन शेवटच्या वाक्यातला श्लेष जबरीच. अभिज्ञ. अवांतरः तब्येतिची काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/30/2008 - 11:20 नवीन
नारायणी, रामदास, बिपिन कार्यकर्ते, प्राजु, रेवती, मदनबाण, मुक्तसुनीत, (मुक्तसुनीत), सहज, अनिल हटेला, विजुभाऊ, अनिरुद्ध, यशोधरा आणि अभिज्ञ. मनापासून धन्यवाद. आता तब्येत खणखणीत आहे. आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने ती अशीच कायम खणखणीत राहील अशी आशा आहे. (अर्थात, ती तशी ठेवण्याचा माझ्याकडूनही प्रयत्न असणार आहे.)
  • Log in or register to post comments

सहा

विसोबा खेचर
गुरुवार, 10/30/2008 - 11:37 नवीन
सहा दिवसांच्या वास्तव्यानंतर मी 'दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल' मधून, ६५०००/- रुपये खर्च करून, पार अगदी 'दीऽऽऽऽन' आणि 'अनाथ' होऊन बाहेर पडलो! आयला! ६५००० ला फोडणी? असो, आपली तब्येत आता उत्तम आहे हीच महत्वाची बाब! आणि ईश्वर करो, सर्वांच्याच तब्येती नेहमीच चांगल्या राहोत..! वरील मंडळींशी सहमत, खुमासदार व सहजसोपे अनुभवकथन. आज बर्‍याच दिसांनी आपले लेखन वाचले. अवांतर - १) आपल्याशी फोनवर बोलल्याप्रमाणे आता तीनही भाग दुवे देऊन जोडले आहेत. अवांतर - २) हे लेखन सर्वप्रथम मिपावर आले असते तर आम्हाला अधिक आनंद वाटला असता.. असो. तात्या.
  • Log in or register to post comments

आयला!!!! काका

झकासराव
Fri, 10/31/2008 - 12:31 नवीन
आयला!!!! काका तुम्ही आजारी होता??? तुम्हाला आता बर वाटत असेलच. सर्व वर्णन तुमच्या खास शैलीत केल आहे :) पब्लिक आणि प्रायव्हेट अस काही उरतच नाय की इस्पितळात. ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

छान वर्णन

लिखाळ
Fri, 10/31/2008 - 18:02 नवीन
छान वर्णन ! भेटायला येणारे लोकांत अनेक नमुने असतात.. त्यांची मजा वाचायला आवडली. 'बातानुकुलित' खोली मस्तच ! :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments

पेठकरकाका अंमळ खुसखुशीत वर्णन,

चतुरंग
Fri, 10/31/2008 - 18:45 नवीन
अगदी दिवाळीतल्या खमंग चकलीसारखे! तुम्हाला ह्या दिव्यातनं जावं लागूनही तुमच्यातल्या विनोदबुद्धीनं तो ताण सुसह्य करायला मदत केली. खालून-वरुन तपासणी, बातानुकूलित खोली, अपघातातल्या पेशंटशी कोणताही मुलाहिजा न बाळगता बोलणारे भन्नाट लोक, सार्वजनिक नळावरची बादली असे अफलातून प्रकार वाचून करमणूक झाली! एकदा डॉक्टरांच्या ताब्यात गेलो की मग फक्त बघत रहाणे ह्याखेरीज पर्याय नसतो! काय करतील ते करतील म्हणायचे आणि शांत रहायचे! तुमची तब्बेत ठणठणीत राहो ही सदिच्छा! (खुद के साथ बातां : रंग्या, तू वजन कमी करण्याचा प्रयत्न चालू ठेव! बघितलेस न कसे 'दीन' आणि 'अनाथ' व्हावे लागते ते, आजारी पडू नकोस. फराळ हवाय काय दिवाळीचा? चल जा जिमला. ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

पेठकरशेठ, ए

विसोबा खेचर
Sun, 11/02/2008 - 23:17 नवीन
पेठकरशेठ, एका अर्थी बरंच झालं इथेही हा लेख टाकलात ते! खणखणीत १८ प्रतिसाद..! आपला, (मिपाकरांच्या रसिकतेचा सार्थ अभिमान वाटणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments

:)

पिवळा डांबिस
Mon, 11/03/2008 - 02:16 नवीन
प्रभाकरजी, तुम्हाला सहन कराव्या लागलेल्या शारिरीक (आणि मानसिक!) व्यथेबद्दल दु:ख्ख वाटते.... कुणालाही व्यथा सहन करावी लागली तर आपण हसू नये असे म्हणतात, पण इथे तुम्हीच इतक्या मजेशीरपणे वर्णन केलंय की हसू अनावर झालं.... विशेषतः दुसर्‍या भागातिल एन्डोस्कोपीचे वर्णन वाचताना ह्यापेक्षा कोलिनॉस्कोपीचं वर्णन वाचतांना जास्त मजा आली असती असं वाटून गेलं, आणि लो ऍन्ड बिहोल्ड, तिसर्‍या भागात तुम्ही आम्हाला निराश केलं नाहीत!!!!:) असो, बरेच पैसे खर्च झाले हे तर खरंच पण या सर्व सोपस्कारांतून तुम्ही आपले तोंड (आणि बिंड!!!) सहिसलामत ठेवून निसटलात हेही नसे थोडके, नाही का? आता तब्येतीची काळजी घ्या. आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्रभाकर पेठकर
Mon, 11/03/2008 - 08:26 नवीन
डॉ. प्रसाद दाढे, विसोबा खेचर, झकसराव, लिखाळ, चतुरंग आणि पिवळा डांबिस आपल्या उत्तेजनात्मक प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा