✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विधानसभा मतदान: १५ ऑक्टोबर २०१४ - आपले अनुभव

प
प्रचेतस यांनी
Wed, 10/15/2014 - 08:27  ·  लेख
लेख
आज १५ ऑक्टोबर २०१४, विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा दिवस. आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते. तेव्हा सकाळी लवकर उठून ६.५०लाच मतदान केंद्रावर गेलो. चिंचवडच्या माटे शाळेत माझे मतदान केंद्र होते. वोटर्स स्लिप मिळाली नव्हतीच मात्र निवडणूक आयोगाच्या संस्थळावरुन अगोदरच माहिती घेतल्यामुळे मतदान केंद्र, विभाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादी तपशील घेऊन ठेवला होताच. इतक्या लवकर जाऊनही केंद्रावर माझ्याहीआधी २/३ लोक उभे होते. लगेचच माझ्यामागे १५/२० जणांची रांग उभी राहिली. एकंदरीत मतदान सुरु व्हायच्या आधीपासूनच उत्साह दिसत होता. मतदान सुरु झाल्यावर माझ्या पुढच्या दोघा तिघांचा क्र. दुसर्‍या खोलीत असल्याचे कळाले त्यामुळे पहिला नंबर माझा लागला. स्लिप नसल्यामुळे केंद्र अधिकार्‍याने फोटो आयडी पुरावा तपासून पाहिला व त्याच्या यादीतील माझ्या नावापुढे लाल रंगाने रेघ ओढली व माझी सही घेतली. त्याच्या पुढच्या अधिकार्‍याने पावती दिली व बोटाला शाई लावली व मला पुढच्या अधिकार्‍याकडे पाठवले. पुढील अधिकार्‍याने पावती जमा करून मतदानाचे यंत्र कार्यान्वित केले व मी मतदान करून बाहेर आलो. मतदान हा आपला हक्क नसून कर्तव्य आहे. आपणही आजच्या दिवशी मतदानाचे कर्तव्य पार पाडाल याची खात्री आहेच. आपले आजच्या दिवसातील मतदानाचे अनुभव आपण येथे अवश्य लिहावेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
15270 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

एक गोष्ट सांगायची राहिलीच ती

टवाळ कार्टा
Wed, 10/15/2014 - 20:06 नवीन
एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही." अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.
याच्यातून स्त्रीयांचा उपमर्द कसा होईल???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

वेळीच काळजी घेतलेली बरी

धर्मराजमुटके
Wed, 10/15/2014 - 20:16 नवीन
मी एक गरीब मध्यमवर्गीय विवाहीत पुरुष आहे हो. स्त्रियांचा विषय हा अतिशय संवेदनाशील आहे. त्याच्या चुकूनही कोठे उल्लेख आला की मी शक्यतो त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. चुकून प्रतिक्रिया दिलीच तर फारच तोलून मापून देतो. प्रतिक्रिया दिलीच तर अगोदरच माफी मागून मोकळा होतो किंवा माझा हेतू प्रामाणिक आहे असे जाहिर करतो. काये ना की आपला उगाच आरारा बाबा होऊ नये. म्हणजे वागणे चांगले पण बोलण्यात मार खायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पण बायकांना विचार करता येत

टवाळ कार्टा
Wed, 10/15/2014 - 20:37 नवीन
पण बायकांना विचार करता येत नाही का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

बाकी +१

असंका
गुरुवार, 10/16/2014 - 13:01 नवीन
:-)) बाकी +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

स्त्रियांचा उप'मर्द' करायचा

बॅटमॅन
गुरुवार, 10/16/2014 - 15:35 नवीन
स्त्रियांचा उप'मर्द' करायचा तर ते तूर्तास फक्त वैद्यकशास्त्र आणि तेही अंशतःच करू शकते असे वाटते. चूभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

केले मतदान!

एस
Wed, 10/15/2014 - 19:49 नवीन
केले मतदान!
  • Log in or register to post comments

आमचे नाव अंबरनाथला आहे. मतदान

विलासराव
गुरुवार, 10/16/2014 - 01:44 नवीन
आमचे नाव अंबरनाथला आहे. मतदान करायचेच होते. पण आता अंबरनाथला जायचे आहेच तर कोणी मिपाकर आहेत कालच तपासल.आपले भटक्या खेडवाले आहेत तिथे. त्यांचा नंबर कट्टासम्राट मुवींना मागीतला. त्याच्याकडे नंबर नव्हता मग त्यांनी ४-५ मध्यस्थांचे नंबर दिले , त्यांच्याकडुन भटक्यांचा नंबर मिळवला. तर मुवींचा रात्रीच डायरे़क्ट फोनच आला. त्यांनी शनिवारच्या डोंबोली कट्ट्याच आमंत्रणच दिलं. मग आज सकाळीच लवकर उठुन अंबरनाथला. भटक्यांना फोन केला तर ते १० मिनीटात घ्यायला स्टेशनला हजर. मग त्यांच्याघरी त्यांच्या आईअवडीलांची भेट झाली. योगा आनी विपश्यनेवर एक सेशन झाले. नाष्टा करुन एका मित्राकडे त्यांनी मला सोडले. तिथे आनी इतर ३-४ जुन्या दोस्तांच्या घरी चहापानी घेत २ ला बहीणीच्या घरी पोहोचलो. तीथे मेनु होता डोसे चटणीसहीत आनी मिसळपाव. मग चापुन हाणल्यावर तासभर आडवाच झालो. ४-३० ला चहापानी घेउन केंद्रावर हजर. नेटवरुन स्लीप प्रिंट मारली होती पण त्यात फक्त यादी नंबर होता. नाव सापडेना. मग मी अंदाजे १०६४ नंबर पहायला सांगीतले. तिथे दुसर्याचे नाव. मग मी १६४ पहा म्हणालो तर तो संशयानेच पाहु लागला. पण विनंती केल्यावर त्याने पाहीले तर हा मटका बरोबर लागला होता. पॅनकार्ड दाखवले तर त्यांना नावच वाचता येईना जुने असल्याने. ते म्हनाले की दुसरा आडी आहे का काही. मी म्हणालो आहे पण लालबागला. मग त्यांनी परवानगी दिली. खरतर होता माझ्याकडे वाहन चालवायचा परवाना पण म्हणलं बघु काय म्हणतात ते. पण झालं एकदाचं मतदान. ४-५ लोक माझ्यापुढे होते २-३ मागे. नंतर परत २-३ स्नेह्यांच्या भेटीगाठी घेउन लालबागला परत. येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवर.
  • Log in or register to post comments

येताना ठाण्याच्या मिपा

किसन शिंदे
गुरुवार, 10/16/2014 - 16:32 नवीन
येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवर
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

मालक, ९:१० ला तुमचा फोन आला

विलासराव
गुरुवार, 10/16/2014 - 18:10 नवीन
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा! अर्थातच.बेशर्त सहमती!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

काही नोंदी..

नाखु
गुरुवार, 10/16/2014 - 09:04 नवीन
कंपनीतून दुपारी घरी पोहोचल्याबरोबर म्हटलं आधी मतदान करू जेवण नंतर्.गेलो केंद्रावर.
  1. मनपाच्या निवडणूकी ईतका राजकीय गोतवळा दिसला नाही (२०० मीटर अलिकडे) गर्दी पाहून दुपारची वेळ निवडल्याचे थोडे वाईट वाटले पण ईतके आले आहेत तर निकाल चांगलाच लागेल म्हणून मनाची समजूत घातली. यादी-क्रमांक शोधण्यासाठी "मांडी-सगणक" महोदय तयार होतेच पण त्यांच्या भवती गराडा पडला होता (तुळशीबाग्+आठवडी बाजार्+देवस्थान जत्रा) असे काहीसे स्वरूप होते. काही वेचक संवाद झाले:
  • "माझ नाव ईथे आहे तर मग बहिणीचे का नाहे एक "जागरूक" काकु".
  • माझे आणि माझ्या मिस्टरांचे नाव वेग्वेगळ्या यादीत का? माझ्या मय्रत्र्णीचे नाव शोधायचे ईलेक्शण कार्ड नसलं तर चालतय का? लाईनीत या म्हटल्याबरोबर प्रत्येक मतदाराला आपलीच रांग अधीकृत आहे असा साक्षात्कार झाला आणि एक्मेकांची "आस्थेवाईक विचारपूस" करणार्या लोकशाहीचे प्रत्यंतर आले.
यथावकाश दालन क्रमांक समज्ल्यावर आमची वरात दालनाच्या दाराशी पोहोचली. तिथेही काही शंकासूरांनी दालन क्रमांकवरून परस्पर विरोधी माहीती देवून पहिल्यांदाच मतदानाला आलेल्या "नवमतदारांना" सजग्-संभ्रम्-निरकारण्-पुन्हा संभ्रम" अशा दिव्य अवथेत पोहोच्वण्यास हात भार लावला. दालनात पोहोचल्या-पोहोचल्या पडताळणी अधिकारी आणि जागरूक मतदार यांच्यातील संवादः "माझ नाव आहे का बघा ना जरा!" "अहो नाव-दालन क्र्मांक बाहेर बघा!" "अहो तिथे फार गर्दी आहे ना म्हणून डायरेक तुमच्याकडं आलोय" "बाबा कुनाचही नाव नंबर अस्ल्याबिगर नाही शोधता येणार" "असं काय करताय मला बाहेर लाईनित उभं र्हाव लागेल. ईथे पण लाईनीतून्च आलोयना" "नाही अगदी माझ्या पोराचे असले तरी नंबर शिवाय नाही नाव शोधता येणार !!!" "छ्या तुम्ही सरकारी लोक अजिबात कोप्रेट करीत न्हाई" ===================================== त्यानंतर एका आजीबाईंनी मशिनचा आवाज झाला का माझे मत झाले याची मतदान मदतनीसाकडून दोन्-तीन्दा खात्री करून घेतली.आणि मगच पुढच्या माणसाला मतदान "आडोसा खोक्यात" जावू दिले. बाकी आमच्या भागात ही एकाच नावाचे २-३ उमेदवार उभे करून गंमत आणली आहे.
  • Log in or register to post comments

शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला मत द्यावे हे ठरत नव्हते.

कलंत्री
गुरुवार, 10/16/2014 - 11:29 नवीन
माझ्या मागील दोघांना आपण अगोदर मत द्या असे सांगितले आणि विचारासाठी थोडा वेळ घेतला. कोणाला मत द्यावे हेच समजत नव्हते. क्षणोक्षणी मनात विचार येत होता, सगळ्यात कोण बरे कमी वाईट असेल बरे?
  • Log in or register to post comments

सालाबादाप्रमाणे यंदाही मतदान

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 10/16/2014 - 12:43 नवीन
सालाबादाप्रमाणे यंदाही मतदान करता आले नाही.
  • Log in or register to post comments

काल मतदान करुन आलो.

सौंदाळा
गुरुवार, 10/16/2014 - 15:59 नवीन
काल मतदान करुन आलो. या धाग्याच्या निमित्ताने १० वर्षापुर्वीचा किस्सा आठवला. विधानसभेच्या मतदानाला गेलो होतो. कॉलनीतलीच एक परिचित सुशिक्षित (?) महिला पुढे उभी होती. नावपडताळणी, सही वगैरे झाल्यावर ती गेली वोटींग मशिनकडे आणि तिकडुनच ओरडुन निवडणुक कर्मचार्‍याला अंगठा दाखवुन विचारु लागली डावा की उजवा? कर्मचारी मुळचा पुणेकर नसावा त्याने सांगितले तुम्हाला पाहिजे ते कोणतेही बटण दाबा. तर परत हिचे तेच डावा की उजवा? लोक हसायला लागले. शेवटी मत दिल्याचा बीप आला. डाव्या अंगठ्याने बटण दाबले का उजव्या देव जाणे पण परत जाताना त्या निवड्णुक कर्मचार्‍याला ती रागाने काहीतरी बोलली. त्यानंतर मात्र तो पिसाळला आणि निवडणुकिच्या प्रचारात उडाला नसेल एवढा धुरळा १० मिनिटात उडाला. अजुनही प्रत्येक मतदानाच्या दिवशी हा किस्सा आठवतोच. (आणि त्यावेळी माझ्या मागेच उभ्या असणर्‍या मित्राने हलक्याच आवाजात केलेली चावट कॉमेंट्सुद्धा)
  • Log in or register to post comments

एक शंका:

आदूबाळ
गुरुवार, 10/16/2014 - 18:23 नवीन
एक शंका: दहा वर्षांपूर्वी बटण दाबून मतं द्यायची सोय कुठे होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

२००४ साली लोकसभा / विधानसभेला

दुश्यन्त
गुरुवार, 10/16/2014 - 18:52 नवीन
२००४ साली लोकसभा / विधानसभेला मतदानासाठी इवीएमच वापरात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मतदान

कपिलमुनी
गुरुवार, 10/16/2014 - 16:10 नवीन
सालाबादप्रमाणे मतदान केला !
  • Log in or register to post comments

अर्धा दिवस काम करुन घरी आलो..

मदनबाण
गुरुवार, 10/16/2014 - 16:16 नवीन
अर्धा दिवस काम करुन घरी आलो... बॅग ठेवली. बायडीला तय्रार रहा म्हणुन हापिसातुन निघण्या आधीच सुचना केलेली होती. मग बाईकवर बसुन दोघो मतदान केंद्रात गेलो. १५ मिनीटात मतदानाचा हक्क बजावुन बाहेर आलो. आल्यावर शाई लावलेल्या बोटोचा फोटु मिपा व्हॉट्सअप ग्रुपवर शेउर केला... बाकीचा वेळ पिल्ला बरोबर दंगा-मस्ती करण्यात घालवला. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा