विधानसभा मतदान: १५ ऑक्टोबर २०१४ - आपले अनुभव
आज १५ ऑक्टोबर २०१४, विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा दिवस.
आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते. तेव्हा सकाळी लवकर उठून ६.५०लाच मतदान केंद्रावर गेलो. चिंचवडच्या माटे शाळेत माझे मतदान केंद्र होते. वोटर्स स्लिप मिळाली नव्हतीच मात्र निवडणूक आयोगाच्या संस्थळावरुन अगोदरच माहिती घेतल्यामुळे मतदान केंद्र, विभाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादी तपशील घेऊन ठेवला होताच.
इतक्या लवकर जाऊनही केंद्रावर माझ्याहीआधी २/३ लोक उभे होते. लगेचच माझ्यामागे १५/२० जणांची रांग उभी राहिली. एकंदरीत मतदान सुरु व्हायच्या आधीपासूनच उत्साह दिसत होता. मतदान सुरु झाल्यावर माझ्या पुढच्या दोघा तिघांचा क्र. दुसर्या खोलीत असल्याचे कळाले त्यामुळे पहिला नंबर माझा लागला. स्लिप नसल्यामुळे केंद्र अधिकार्याने फोटो आयडी पुरावा तपासून पाहिला व त्याच्या यादीतील माझ्या नावापुढे लाल रंगाने रेघ ओढली व माझी सही घेतली. त्याच्या पुढच्या अधिकार्याने पावती दिली व बोटाला शाई लावली व मला पुढच्या अधिकार्याकडे पाठवले. पुढील अधिकार्याने पावती जमा करून मतदानाचे यंत्र कार्यान्वित केले व मी मतदान करून बाहेर आलो.
मतदान हा आपला हक्क नसून कर्तव्य आहे. आपणही आजच्या दिवशी मतदानाचे कर्तव्य पार पाडाल याची खात्री आहेच.
आपले आजच्या दिवसातील मतदानाचे अनुभव आपण येथे अवश्य लिहावेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक गोष्ट सांगायची राहिलीच ती
वेळीच काळजी घेतलेली बरी
पण बायकांना विचार करता येत
बाकी +१
स्त्रियांचा उप'मर्द' करायचा
केले मतदान!
आमचे नाव अंबरनाथला आहे. मतदान
येताना ठाण्याच्या मिपा
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला
काही नोंदी..
- "माझ नाव ईथे आहे तर मग बहिणीचे का नाहे एक "जागरूक" काकु".
माझे आणि माझ्या मिस्टरांचे नाव वेग्वेगळ्या यादीत का?
माझ्या मय्रत्र्णीचे नाव शोधायचे ईलेक्शण कार्ड नसलं तर चालतय का?
लाईनीत या म्हटल्याबरोबर प्रत्येक मतदाराला आपलीच रांग अधीकृत आहे असा साक्षात्कार झाला आणि एक्मेकांची "आस्थेवाईक विचारपूस" करणार्या लोकशाहीचे प्रत्यंतर आले.
यथावकाश दालन क्रमांक समज्ल्यावर आमची वरात दालनाच्या दाराशी पोहोचली. तिथेही काही शंकासूरांनी दालन क्रमांकवरून परस्पर विरोधी माहीती देवून पहिल्यांदाच मतदानाला आलेल्या "नवमतदारांना" सजग्-संभ्रम्-निरकारण्-पुन्हा संभ्रम" अशा दिव्य अवथेत पोहोच्वण्यास हात भार लावला. दालनात पोहोचल्या-पोहोचल्या पडताळणी अधिकारी आणि जागरूक मतदार यांच्यातील संवादः "माझ नाव आहे का बघा ना जरा!" "अहो नाव-दालन क्र्मांक बाहेर बघा!" "अहो तिथे फार गर्दी आहे ना म्हणून डायरेक तुमच्याकडं आलोय" "बाबा कुनाचही नाव नंबर अस्ल्याबिगर नाही शोधता येणार" "असं काय करताय मला बाहेर लाईनित उभं र्हाव लागेल. ईथे पण लाईनीतून्च आलोयना" "नाही अगदी माझ्या पोराचे असले तरी नंबर शिवाय नाही नाव शोधता येणार !!!" "छ्या तुम्ही सरकारी लोक अजिबात कोप्रेट करीत न्हाई" ===================================== त्यानंतर एका आजीबाईंनी मशिनचा आवाज झाला का माझे मत झाले याची मतदान मदतनीसाकडून दोन्-तीन्दा खात्री करून घेतली.आणि मगच पुढच्या माणसाला मतदान "आडोसा खोक्यात" जावू दिले. बाकी आमच्या भागात ही एकाच नावाचे २-३ उमेदवार उभे करून गंमत आणली आहे.शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला मत द्यावे हे ठरत नव्हते.
सालाबादाप्रमाणे यंदाही मतदान
काल मतदान करुन आलो.
एक शंका:
२००४ साली लोकसभा / विधानसभेला
मतदान
अर्धा दिवस काम करुन घरी आलो..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण