" पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र"

विटेकर काथ्याकूट
विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो. पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे ! - पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे. ( पुण्यातल्या पुण्यात देखील विविध दर्‍या आहेत, जसे की नदी पलिकडचे आणि अलिकडचे , पण त्याचा विचार नंतर करु) ही दरी आपण मिपावरही अनेक वेळा अनुभवली असेलच. - जे पूण्यात आहे ते इतरत्र नाही आणि जे पुण्यात नाही (पुणे तिथे खरे म्हणजे काय उणे ?) त्याची पुण्याला गरज नाही.जसे की मुंबईची लोकल पुण्याला नको आहे , नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको ) - पुण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. वास्तविक खर्‍या इतिहास हा पुण्याचाच ! बाकीचे सारे इतिहास विषयापुरते !आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - पुणे आज ही ऐतिहासिक शहर आहे ,इथल्या जाज्वल्य परंपरांचा इथल्या लोकांना प्रचंड अभिमाण आहे ! उदा. टांगेवाले गेले आणि रिक्षावाले आले .. पण मग्रुरी? तीच ....! घोडे गेले, सायकली गेल्या , स्वयंचलित आल्या पण रस्त्यावर आपलेच घोडे दामट्ण्याचे पुणेरी रक्त ? अजूनही तेच आहे ! आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - बारभाई गेले पण पुण्याच्या सोसायट्यांमधील कारस्थाने ? .. अजून सुरुच आहे. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? - पुण्यातील बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधील खोल्याखोल्यात " विद्वान" जन्माला येतात, जिज्ञासूनी अधिक माहीती घ्यावी. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ? यांसारखे अजून बरेच मुद्दे आहेत आणि प्रस्ताव पुढे जाईल तसे अधिकाधिक सुचत जातील. तुमचे काय मत आहे या प्रस्तावावर?

114 टिप्पण्या 25,443 दृश्ये

Comments

एस नवीन

पुणे ह्या विषयावर बोलण्याचा आपला वकूब नसताना काही मंडळी उगाचच तसे करून स्वतःचे हसे करून घेत असतात. मिपावरही भरपूर आहेत. चालू द्यात. चालू द्यात!

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by मुक्त विहारि

=)) पा.पो. नै कै....पो.पा. लुनावाले ब्रम्हे, पोतदार-पावसकर मॅडम, सप्तर्षीबैंच मांजर हे सगळे पुण्याचे अलंकार आहेत.

हरकाम्या नवीन

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हे " लुनावाले ब्रम्हे " कोण आणि त्यांची लुना अजुन जिवन्त आहे का ? का ती गेली केळकर संग्रहालयाची शोभा वाढवायला ?

इरसाल नवीन

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी तर तो लेख माझ्या क्रोम मधे बुकमार्क करुन ठेवलाय. जेव्हा पाहिजे तेव्हा वाचता यावा.आणी अजुन एक आहे मांजराचा पण. करमणुक मांजराची असा आहे. ही लिंक http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4612028515630603865

चौकटराजा नवीन

In reply to by काळा पहाड

कोथरूड ला कोण राज्य करतात याच्याशी आम्हाला काही देण घेण नाही पण माझ्या भुसारी कॉलनीत जर कोथरूड वाल्यानो लक्ष घालाल तर गाठ या राज भुसारी शी आहे. कोथ्रूडच्या खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी डाव्या भुसारीच्या उधोदादाला धाडतोच मग ! मायला काय व्हील ते जाईल ! पुण्ययनगरीनियमदीपिका गेली खड्ड्यात !

काळा पहाड नवीन

In reply to by चौकटराजा

- प्रति, राज भुसारी साहेब, डावी भुसारी आमचे उजव्या भुसारी राज्याशी सैनीकी संबंध आहेत हे लक्षात घ्या. तुमच्या पाण्याच्या साठ्यांवर धाड घालायला उजव्या भुसारीचे पंतप्रधान श्री. जानकर तयारच आहेत हे लक्षात ठेवावे. बाणेर देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी (श्री. आठवलेंनी) तिकडची सीमा बंद करायचं मान्य केलं आहे. वारजे राष्ट्राच्या सीमेवर आमच्या फौजा गस्त घालतच आहेत. आणि बावधन देशाशी तुमचं शत्रुत्व आहेच. तेव्हा तुमच्या चतु:सीमा आम्ही बंद केल्या आहेत. आता तुमच्या जनतेला कसा प्रवास करायचा आणि भाजी आणि धान्य कुठून आणायचं ते नीट समजावून सांगा. शिवाय कोथरूड ची सर्व कीलोग्रेड अण्वस्त्रे आम्ही डाव्या भुसारी च्या सीमेवर तैनात केलेली आहेत. नारायणपेठ देशाचे सरसेनापती श्री. राणे यांनी उधोदादांशी दोन हात करायला उत्सुकता दर्शवली आहे आणि गेले काही दिवस ते जोरबैठका काढण्यात मग्न आहेत. उधोदादांना पाठवून द्याच. - आपला, अफजलखान, प्रधानसेवक, कोथरूड.

विटेकर नवीन

In reply to by चौकटराजा

चोक्कस ! येत्या शनिवारी शिवतिर्थनगरचा अनुशेष भरुन काढ्ण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल. लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे.

विटेकर नवीन

In reply to by पैसा

नाही !! तुम्हारा चुक्याच ! नंतरची सभा म्हातोबाच्या डोंगरावर ...... त्या सीमा एकदा निश्चित केल्याच पाहीजेत .

किसन शिंदे नवीन

नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको )
नक्की कुठून ते कुठपर्यंत असणारं पुणे तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अपेक्षित आहे?

रवीराज नवीन

जेथवर नजर जाईल तेथवर..... फक्त उभे कुठे रहायचे, शनिवार वाडा की पर्वती हाच प्रश्न शिल्लक आहे.

रवीराज नवीन

जेथवर नजर जाईल तेथवर..... फक्त उभे कुठे रहायचे, शनिवार वाडा की पर्वती हाच प्रश्न शिल्लक आहे.

पैसा नवीन

स्वातंत्र्य कशाला पाहिजे, प्रत्येक पुणेकर हे एक स्वतंत्र राष्ट्र असते.

सूड नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

साडेतीन वर्षाचं मिपावय जर ल्ल्ल्ल्लू करणारं बाळवय असेल तर साडेचार वर्ष वयोवृद्ध असायला काय्येक हरकत नाही. ;)

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by सूड

@असायला काय्येक हरकत नाही. >>> अच्च होय! :D त्यात फक्त दिडच वर्ष पुरलं! :p चालायचच!!! असो! ;)

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by सूड

ठिक हो.. पण आपल्या वयाचं काय? मी आपलं माप-काढलवतं..(दिड वर्ष वजावटीचं! :p ) ते सोइस्करपणे कसं टाळलंतं? =)) भारीच द्वाड हो सुडुकशेट! =))

सूड नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>मी आपलं माप-काढलवतं..(दिड वर्ष वजावटीचं! ) ते सोइस्करपणे कसं टाळलंतं? छे टाळलं कुठे? मान्य आहे की !! >>भारीच द्वाड हो सुडुकशेट! मिपावर नवीन कुठेय हा द्वाडपणा !! =))

सूड नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>अचानक.. ते नविनच असतं! माझ्या (तुम्ही म्हटल्यानुसार) दीड वर्षाच्या बाळबुद्धीला याचा अर्थ कळलेला नाही. पण 'शेवटचा प्रतिसाद माझाच' हा हट्ट असेल तर चालू देत. ;)

बॅटमॅन नवीन

In reply to by पैसा

ते एक असो, पण मूळ लेखाचा विषय पुणे असूनही त्यातील १/३ शब्द 'पुणे' असे नसल्याबद्दल लेखाला फाऊल धरल्या गेले पाहिजे असा एक प्रस्ताव मांडतो.

रवीराज नवीन

In reply to by पैसा

त्यामुळेच तर दोन पुणेकर हमरी-तुमरी वर आल्याचे दृश्य वरचेवर पहायला मिळते आणि बऱ्याच वेळा शेजारी-शेजारी रहाणाऱ्यामधे भारत पाकिस्तान सारखे संबंध असतात.

विटेकर नवीन

संपादित ??? मिपावरील कायदा आणि सुव्यवस्था पार ढासळली आहे. लगेच राष्ट्रपती राजवट सुरु होते !

गणपा नवीन

In reply to by विटेकर

काय्ये ना काका, आपल्या लोकांना कुठं थांबायचं कळत नाही. आपली ती मस्करी अन दुसर्‍याची ती कुस्करी असं वाटतं. तेव्हा वेळीच खबरदारी घेतलेली बरी. ;)

मुक्त विहारि नवीन

लूना वाले ब्रह्मे पण पुण्याचेच आणि पा.पो. मॅडम पण पुण्याच्याच... म्हणूनच मी शक्यतो पुण्याला यायचे टाळतो...

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

आणखी येवू द्यात प्रतिसाद-सिंहगड रस्ता,पिंपरी,स्वारगेट्,विमाननगर्,कर्वे रस्ता, पर्वती... मिपाकर आहेत तिकडे..

विवेक्पूजा नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई काञज का विसरलात हो?

पिशी अबोली नवीन

लुनावाल्या ब्रह्म्यांचं एवढं का कौतुक कळत नाही. ४००० रुपये असे मूर्खपणाने घालवून वर ते असं जाहीररित्या सांगणारा माणूस पुण्याच्या सरहद्दीत पाऊल तरी ठेवायच्या लायकीचा आहे का?

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by पिशी अबोली

मलाही ब्रह्मेंचं कौतुक आहेच. का ते मात्र ठाऊक नाही. कदाचित पुरूष वाचक कधी काळी स्वतःचे'महागात पडलेले स्त्रिदाक्षिण्य' ब्रह्मेंच्या अनुभवाबरोबर जोडत असतील अन अप आपला एवढाही 'ब्रह्मे' झाला नाही असे समजून समाधान पावत असतील :-) . ज्युनिअर ब्रह्मेंचा तर मी चाहता आहे.

बॅटमॅन नवीन

In reply to by पिशी अबोली

-एक तर लुनावाल्या ब्रह्म्यांचा इन्शिडेंट झाला युनवरशिटी रोडावर. म्हणजे प्रॉपर पुण्यात नव्हेच. भांबुर्ड्याच्याही पलीकडे. -जर गुज्जू समाजात त्यागाचे महत्त्व सांगणारे गांधी होऊ शकतात अन त्यांचं कौतुकही होऊ शकतं तर पुण्यात ब्रह्मेंनी काय लूना मारलीये? -तुम्ही गोवेकर उगीच अस्मिता घेऊन बसता पुण्याची. (आता पळतो) आपला, पुणकदेशस्थ प्रौढमिरजकर.

पिशी अबोली नवीन

In reply to by बॅटमॅन

-म्हंजे पुणे राष्ट्रात उच्च शिक्षण घेणार्‍या लोकांनी काय विसा घेऊन जायचं का युनिवरशिटीत? शेजारी राष्ट्रातील मिरजकर हा कुटील डाव खेळत असतील, तर आम्ही ग्लोबल शांतता नांदवण्यासाठी या प्रश्नात हस्तक्षेप करू.. -गुज्जू वेगळे, पुणेकर वेगळे. -तुमची अस्मिता तुम्हालाच लखलाभ. पण पुण्याची टिळकीय, आगरकरीय आयडेंटिटी पुसून तिला ब्रह्मीय आयडेंटिटी देण्याचे कारस्थान चालू असेल, तर मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने आम्ही हस्तक्षेप करु.. ;)

बॅटमॅन नवीन

In reply to by पिशी अबोली

-व्हिसा घ्यावयाचा किंवा नाही, याचा निर्णय यथावकाश घेतल्या जाईलच. परंतु तो किस्सा 'पुण्या' त घडला नव्हता, हे नमूद करणे अवश्य वाटले. -हो वेगळेच, परंतु उपमेपुरते समजून घ्यावे. मीनाक्षी म्हटल्यावर पर अन शेपूट कुठाय ते विचारू नये. -पुण्याची आयडेंटिटी एका अर्थाने नेहमी 'ब्रह्मीय'च राहिलेली आहे की ओ ;)

पैसा नवीन

In reply to by बॅटमॅन

पुणकराष्ट्राला मित्र पण असतात? मला वाटले सगळ्या शत्रुराष्ट्रांनी घेरलेल्या भारतमातेची अवस्था असावी बिचार्‍यांची.

बॅटमॅन नवीन

In reply to by पैसा

सर्वांची नसली तरी पुणकराष्ट्रातल्या काही राज्यांची तशी अवस्था असेलही. ;) विशेषतः सदाशिविस्तान प्रांताची तशी अवस्था आहे असे कळते. (नावातला श्लेष अभावितपणे चपखल जमून गेला खरा.)

विटेकर नवीन

In reply to by बॅटमॅन

सदा-शिवि-स्तान श्लेष... मस्तच हो ब्याटमन भौ ! ( "बॅ" लिहायला शिकायचे ! हे " बॅ " चोप्य -पेस्त केलयं , नाहीतरी आमचे स्वराष्ट्र बान्धव लगेच विचारतील... ह्या ह्या ह्या , हे कसे लिहलेन म्हणून ? ( उपशन्का- सानुअनासिक लिपीत असे लिहितात? ) तेव्हा हा अगाऊ - म्हण्जे आडवान्स खुलासा केला आहे ) (पानपतोत्तर काळात पुण्यकराष्ट्रातील काही घराणी दक्षिणेकडे ( "रमणा"नव्हे हो... दक्षिण दिशा ) सरकली... बहुधा मिरज प्रांतात .. तिथली पूर्वापार पुण्यकीय तैल बुद्धी अजून शाबूत आहे .. याचे समाधान वाटले )

बॅटमॅन नवीन

In reply to by विटेकर

हाहाहा, धन्यवाद विटेकरजी :) [ बॅ = bE ] बाकी पानपतोत्तर काळात पटवर्धनांनी मिरजेवर राज्य केले खरे...पण पुणकराष्ट्राबरोबरच दक्षिणेकडून कर्नाटराष्ट्रातूनही कैक घराणी तिकडे स्थायिक झाली. तेव्हा तैलबुद्धीसोबतच सांबारबुद्धीही तिथे आहे. :)

रमेश आठवले नवीन

१७६० साली असलेल्या पुणे राष्ट्राची चतु:सीमा दाखविणारा नकाशा या लेखात सापडेल. http://en.wikipedia.org/wiki/Maratha_Empire

विजुभाऊ नवीन

पुणे राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......

विटेकर नवीन

सर्वांचे चितळे पोटभरी चितळे कुणाचे ही पोट भरत नाहीत .... स्वतः चे सोडून ! दमड्या टिचवल्या शिवाय बाकरवडीचा चुराच काय वास देखील घेऊ देत नाहीत ते !

सुबोध खरे नवीन

लष्कर भाग पुण्यात येतो काय? म्हणजे आम्ही ११ वर्षे लष्करात काढली तेंव्हा किंचित पुणेकर म्हणवून घेता येईल काय असा विचार मनात आला.

काळा पहाड नवीन

In reply to by सुबोध खरे

त्यासाठी तुम्हाला कुणाचा तरी किंचितसा तरी अपमान करण्याची कला साधली पाहिजे (रेफरन्सः पु.ल.) आणि अपमान म्हणजे भांडण नव्हे. शालजोडीतले देणे ही एक कला आहे. सध्याचं उदाहरण द्यायचं तर उधोकाका करतात तो अपमान नव्हे, तो थयथयाट. थोरले काका करतात तो अपमान.

श्रीगुरुजी नवीन

पुणे या देशात आम्ही जन्माने परकीय असेलेल्यांना (म्हणजे बारामती, इंदापूर इ. भागातले) आम्ही अजिबात पंतप्रधान होऊन देणार नाही.

विजुभाऊ नवीन

पुणे या देशात आम्ही जन्माने परकीय असेलेल्यांना (म्हणजे बारामती, इंदापूर इ. भागातले) आम्ही अजिबात पंतप्रधान होऊन देणार नाही.
ह्या ह्या ह्या. श्रीगुरुजी भलतेच विनोदी बॉ तुम्ही. तुम्ही इतके हुकुमी अन जबरदस्त कस्से काय हो विनोदता?

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by विजुभाऊ

@तुम्ही इतके हुकुमी अन जबरदस्त कस्से काय हो विनोदता?>> =)) अंतरीच्या कळा हो त्या....! =)) दुसरे कै नै! =))

काळा पहाड नवीन

In reply to by बॅटमॅन

ओ तो चांदणी चौक पुण्यात हे का? पुण्यात शगुन चौक किंवा कुंटे चौकाला तो मान मिळायला हवा. संसद भवन सध्याच्या मंडईच्या ठिकाणी भरवता येईल. नाही तरी तिथेही खासदारांची खरेदी विक्रीच चालते नं? बाकी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीला रहावं लागतं. शनवार्वाड्यात भूत असताना कुठला राष्ट्रपती तिथं राहील? तेव्हा दुसरी जागा शोधा.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by बॅटमॅन

@लाल महाल आहेच म्हणा. चांदणी चौकही आहे.>>> छ्छे! ते पर्वतीवर हवं. आणि पायर्‍यांनी चढून येणार्‍यांनाच वेंट्री असेल..अश्या नि'यमासह! :p

बॅटमॅन नवीन

In reply to by विजुभाऊ

आयला हो की. अन दिल्लीत औरंगजेब रोड, लोधी रोड, अकबर रोड आहे तसा इकडे शिवाजी रोड, बाजीराव रोड आहे.

बॅटमॅन नवीन

In reply to by विजुभाऊ

रायसीना हिल सारखी पर्वती हिल, चतु:शृंगी हिल अशा कैक हिला आहेत. पराठे वाली गली सारखी खाऊगल्लीसुद्धा आहे. (नाव ते नस्ले म्हणून काय झाले) घंटेवाला हलवाईप्रमाणे चितळे व काका हलवाई आहे. कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ हवेचा मीनार आहे. काय नाही पुण्यात?

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by बॅटमॅन

@ कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ हवेचा मीनार आहे. काय नाही पुण्यात?>>> मेल्या..क्यांपातलं लाल देऊळ विसरलास की! =))

विटेकर नवीन

माझ्या मिपावरील अखंड कारकिर्दीत आत्तापर्यन्तच्या कोणत्याच धाग्याला ९१ प्रतिसाद मिळाले नव्हते . मागचा उच्च्चांक ८९ होता !!! आणि ते सुद्धा दुष्ट संपादकीय कारवाई नंतर ! सर्व प्रतिसादकांचे मनः पूर्वक आभार ! . . . . . . माताय , गुणपूर्णता आणि लोकप्रियता यांचा काडिमात्र संबंध नाही !!

बॅटमॅन नवीन

In reply to by विटेकर

विटेकरजी, विषयाचा धिक्कार किती जरी केला असला तरी त्याचे महत्त्व तुम्हांला आता चांगलेच समजले असेल. ;) विषयच असा ड्राम्याटिक हाये, चरचा तर होनारच.

यसवायजी नवीन

In reply to by बॅटमॅन

च्यामारी, एकादमात ३-४ धागे आलेत पुण्यावर. मी तर वरचं न वाचताच प्रतिसाद देत सुटलोय :)) चरचा तर होनारच्च्च.

यसवायजी नवीन

In reply to by बॅटमॅन

च्यामारी, एकादमात ३-४ धागे आलेत पुण्यावर. मी तर वरचं न वाचताच प्रतिसाद देत सुटलोय :)) चरचा तर होनारच्च्च.

चौकटराजा नवीन

या सर्व पोष्टी जेंव्हा तो मराठी चानलचा राजू श्रीवास्तव ( उर्फ राज अवास्तव ) वाचेल त्यावेळी ह ह पु वा होऊन त्याचा निवडणुकीचा सर्व ताण खलास होईल. याचे सारे श्रेय मिपावरील पुण्याच्या शत्रूना आहे. हा शिलालेख इ स २०१४ मधे लिहिला असे.

कंजूस नवीन

पुढच्या कटट्याला जेव्हा पुण्याबाहेरचे(?) पुणेकरां(?)समोर येतील तेव्हा खरा बाका प्रसंग उभा राहील आणि निवाडा करण्यासाठी तीन नावे मला सुचली आहेत (=ट्रॉइका)ओळखा पाहू.

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

ऐतिहासिक विषयावरचा १०० वा प्रतिसाद. बाकी युरोपियन युनिअन सारख आपण पुणे-पिंपरी चिंचवड युनिअन चालु करु. काड्या सारायला आंतराष्ट्रीय सहकार्य मिळेल म्हणजे. =))

अविनाशकुलकर्णी नवीन

काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की " तुम्हाला पुणे का आवडते ?" आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..? आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने , पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही ! उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे , किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे, पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे ( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून ., गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे ( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर .. , सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे, जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे, मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे, पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे , लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे, शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे, अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे, पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे, 'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे , 'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे , इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे , 'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे , नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे , सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे , आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे, SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे , आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे , Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे, चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे, तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे, college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे, Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे , पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,Nike आणि Reebok वाले पण पुणे , खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे, कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे , कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,सोडा शॉप चे पण पुणे,अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे, University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे , कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे ( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. , नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे, खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे, शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे, बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे, सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे,आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे, मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे, पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे , आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे, आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे, Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे, मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defense शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे,तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे, सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे, ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे, फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे , 'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !, ०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे , जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे, शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे, पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे, आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे , भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे, ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे, अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे , जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे पुणे , अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या , अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे, भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे, bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे , काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे , बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे, उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे ,पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे, घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! , शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे ,दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे, कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे, आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे, - नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे, आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे, रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे, गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्र चंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे, लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे, आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे, दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे… आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे, दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे, भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे, ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे, Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे, आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे, जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे, सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे, Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे, पर्वती वर practise करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे !! पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे, Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे, कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे। सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे। घोटाळे बाज खासदारांचे पुणे , नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे , नवीन दादांचे पुणे,जुन्या भाईंचे पुणे, बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !! आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते? आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..? आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने , पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही ! उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे , किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे, पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे ( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून ., गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे ( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर .. , सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे, पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे ,लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे,शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे, अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे , 'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे ,इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे , नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे , सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे , आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे, SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे , आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे , Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे, चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे, तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे, college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे, Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे , पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,Nike आणि Reebok वाले पण पुणे , खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे, कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे , कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,सोडा शॉप चे पण पुणे,अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे, University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे , कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे ( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. , नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे, खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे, शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे, बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे, सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे,आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे, मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे, पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे , आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे, आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे, Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे, मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defense शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे,तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे, सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे, ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे, फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे , 'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !, ०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे , जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे, शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे, पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे, आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे , भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे, ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे, अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे , जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे पुणे , अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या , अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे, भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे, bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे , काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे , बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे, उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे ,पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे, घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! , शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे ,दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे, कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे, आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे, - नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे, आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे, रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे, गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्र चंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे, लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे, आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे, दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे… आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे, दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे, भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे, ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे, Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे, आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे, जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे, सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे, Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे, पर्वती वर practise करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे !! पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे, Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे, कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे। सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे। घोटाळे बाज खासदारांचे पुणे , नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे , नवीन दादांचे पुणे,जुन्या भाईंचे पुणे, बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !! आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?

विटेकर नवीन

पुण्यपत्तन राष्ट्राने एकजूट दाखवून एकाच प़क्षाला पूर्णपणे निवडून दिले आहे. ही राजकीय प्रगल्भता महाराष्ट्रात इतरत्र दिसली का ? म्हणून आम्ही म्हणतो - आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?