कळकट कंदील जीवनावरील महाभाष्य
लेखनप्रकार
कंदील कळकट ..जीवनावरील महाभाष्य
कवीवर्य समीरसूर यांच्या या महान कवितेवर लिहावयाचे भाग्य मला लाभले, धन्य, धन्य झालो मी ! ज्यांचे नावच इतके काव्यमय, त्यांचे काव्य महान असणारच. समीरसूर म्हणजे वेळूच्या बनातून वारा वहातो तेव्हा येणारा मधूर आवाज, वाह वाह. वेळू हा शब्द वेणूपासून आला असे म्हटले म्हणजे यमुनाकाठच्या कुंजवनातील बासरीचे मधुर स्वर व त्यावर जीव ओवाळणार्या गोजिर्या गोपी आठवतात. पण आपले समीरसूर हे नवयुगाचे एकांडे शिलेदार ( पहा प्रसिद्ध टीकाकार विष्णुसुत {म्हणजे मीच} यांचे लेख) असल्याने त्यांनी स्वप्नरंजनात गुंतून न जाता आजच्या भीषण वास्तव्यावर महाभाष्य करणारी ही युगप्रवर्तक कविता लिहली.
जालावरील एका लोकप्रिय स्थळावरच्या अभ्यासू, रसिक टीकाकारांच्या लेखावरून असे दिसते की कोणतीही कविता समजावून घ्यावयाची असेल, कवितेतील सौंदर्यस्थळे, बारकावे, अलंकार, इ. कळावयास पाहिजे असतील तर प्रथम कोणा प्रथितयश, लोकप्रिय संगीतकाराने संगीत देऊन, स्वत गायलेले गाणे ऐकले पाहिजे. एकदा गाण्यातला गोडवा, समयोचित आलाप व ताना, मींड. pauses, (अधुनमधुन इंग्रजी शब्द वापरले की बरे असते, काय ? तुमचा अभ्यास दिसतो) वाद्यांचा उपयोग वगैरे गोष्टी कळल्या की कविता "कळलीच". काय उरले ? तेव्हा आपण प्रथम "गाणे" ऐका. खरभास्कर गुंडोबुवा हल्लकल्लोळकर यांनी अडाणी (अडाणा रागाची रागिणी) मध्ये आडव्यातिडव्या तालात (हा त्यांचा एक बेताल ताल आहे) गायलेले हे गाणे. गुंडोबुवा हल्लकल्लोळकर. प्रत्येक "ट" वर तारसप्तकातून तिय्या घेत कसे येऊन आदळतात हे ऐकले की सगळे श्रोते सफाचा"ट" होतात.
: : गाणे इथे ऐका. xxxxxxxxx
काय म्हणता लिन्क उघडत नाही ? नशिब तुमचे. आपण कवितेकडेच वळू.
कंदील कळकट, अनारसे तुपकट
कढई ओशट, चालला तांडा !
सदरा मातकट, कढी आंबट
नेहमीची कटकट, विटका झेंडा !!
अहाहा, किती अर्थगर्भ ! सामान्य लोकांना कळले नाही तर तो त्यांचा दोष. त्यांना (काही तरी) कळावे या करिता तर आम्ही टीकाकार.
प्रथम लक्षात घ्या मानवाच्या नि:सार जीवनावर, शोकांतिकेवर ही सूत्रमय रचना आहे. "चालला तांडा" यातून कवी तुम्हाला इशारा करतो " जीवन सगळ्यांनी मिळून जगायाचे आहे. एकटा माणुस इथे निरर्थक आहे, हतबल आहे .तांडा वाळवंटातून जातो, तसे तुमच्या सभोवती निर्जल, ओसाड जग आहे. प्रवास रात्रीचाच करावयाचा, आजूबाजूच्या तिमीरातून वाट काढावयास बरोबर काय तर कंदील. पण तोही कळकट, या जगात तुम्हाला सामना करावयाचा आहे पण हत्यार मात्र बोथटच ( इथेही "ट" आला की नाही ? समीक्षा कशी कवितेला लगटून पाहिजे.) ह्या कळकट कंदीलातून प्रकाश तो काय पडणार ? असहाय्य माणुस किती लढणार ? तरीही या अर्थहीन जगण्यामध्येही अधुनमधुन काही तरी आमिष दाखविले जाते. फुटकळ देणग्या मोठ्या उदारपणाने दिल्या असे दाखविले जाते. व हा तुपकट अनारसा ज्या झॊळीत पडतो त्या फाटक्या झोळीला म्हटले आहे ओशट कढई. ओशट विशेषण कढईचा जुनाटपणा, अस्वच्छता, दुर्लक्षितपणा दाखवते. जीवनात थोडे तरी चमचमीत मिळावे असे सामान्यालाही वाटत असते पण अशी कढीही आंबट निघते. तोंडाला चव येण्याऐवजी जुन्या, आंबट ताकाचीच चव रेंगाळत रहाते. अन्न-वस्त्र-निवारा पैकी अन्नाची ही गत, तांडा चालतच रहाणार म्हणजे निवारा नाहीच व वस्त्राबद्दल एका शब्दात निकाल लावला आहे, सदरा मातकट. मलीन जीवनात दुसरे काय मिळणार ? निर्मल पाणी पिण्यास मिळणे जेथे दु:प्राप्य तेथे वसन धुण्यास कोठून मिळणार ?या अनादी अनंत क्लेषांना म्हटले आहे नेहमीची कटकट
इतक्या नकोनकोसे करणार्या जीवनाला माणुस कंटाळत का नाही ? तांडा पुढे पुढे का चालला आहे ? या अतूट संघर्षात विटका झालेला झेंडा तो अजून का फडफडवीत आहे ? हा विटका रंग विटकरी आहे. भगव्यात लाल मिळवलेला. भगवा रंग नैराश्याचा असला तरी माणसाने त्यात आपल्या विजिगीषु आकांक्षेचा लाल रंग मिसळला आहे. "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा " असे म्हणत तो वाळवंटात पुढचे पाऊल टाकतच आहे.
कवितेला जीवनावरील महाभाष्य म्हटले आहे कारण नवयुगाची ही ध्वजयात्रा (Flagmarch) समीरसूरांनी नेटक्या शब्दात मांडली आहे. नवकाव्यात न आढळणारा अनुप्रास हा अलंकार येथे मन वेधून घेतो. आज "सत्यकथा" नाही पण असती तर राम पटवर्धनांनी या कवितेला जागा व दाद दिली असती. जिते रहो ! लिखते रहो !
शरद
वाचने
5422
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
ख्या ख्या
ब्रूट्स, यू टू???
:D
हायला...
आहाहा!!
मस्तच! पं शरदबुवांच्या
खि खि खि खि
In reply to खि खि खि खि by रामपुरी
बुवांनी
.
ज्याच्या कवितेवर पोस्टचा डोलारा उभा केलायं
In reply to ज्याच्या कवितेवर पोस्टचा डोलारा उभा केलायं by संजय क्षीरसागर
@डोलारा साफ कोसळलायं>>>
In reply to ज्याच्या कवितेवर पोस्टचा डोलारा उभा केलायं by संजय क्षीरसागर
चालू द्या जाहिराती चालू द्या.
In reply to ज्याच्या कवितेवर पोस्टचा डोलारा उभा केलायं by संजय क्षीरसागर
क्या बात है!
राहू दे शरद सर!!
In reply to राहू दे शरद सर!! by स्पंदना
तुम्ही काय वाट्टेल ते लिहित आहात,
In reply to तुम्ही काय वाट्टेल ते लिहित आहात, by संजय क्षीरसागर
छान प्रतिसाद
In reply to तुम्ही काय वाट्टेल ते लिहित आहात, by संजय क्षीरसागर
बरं
In reply to तुम्ही काय वाट्टेल ते लिहित आहात, by संजय क्षीरसागर
अवांतराबद्दल क्षमस्व, शरद सर.
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व, शरद सर. by कवितानागेश
बाकी सगळं जौ दे, ह्या माऊचं
उठी बा नीलकाण्ता, थांबवी आकान्ता
In reply to उठी बा नीलकाण्ता, थांबवी आकान्ता by विटेकर
___/\___
हॅहॅहॅ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणहाहाहा...
In reply to हाहाहा... by समीरसूर
बस करो
जब्र्रा!