मला नाना पाटेकरचा एक जुना हिंदी चित्रपट आठवतो दूरदर्शनवर बघितलेला. रविवारी दुपारी चुकून हिंदीच लावला होता.
नाना एका हवेलीमध्ये रहात असतो. जुना संस्थानिक वगैरे काही. वैतागलेला, चिडलेला असा नेहमीचाच. मरतो काही कारणानं. मेल्यानंतर त्याचा आत्मा तिथं राहून येणारांना पळवून लावत असतो. भंडावून सोडून, घाबरवून, चिडचिड करुन.
एक कुटुंब येतं तिथं. मुलं आणि आईवडील. नाना सातत्यानं चिरडीला येऊन ह्यांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात. कधी नुसतं शरीर तर कधी नुसतं डोकं दाखवून वगैरे. पण त्या कुटूंबातली एक चिमुरडी धीट असते, अजिबात न घाबरणारी.
ती त्याला महाराज वगैरे म्हणायला लागते. का चिडचिड करतोस म्हणे.
हा म्हणे मी चिडचिड केली नाही, माझा अहं सोडून दिला तर माझं अस्तित्व संपेल.
ती म्हणते मी कधी कुणावर चिडत नाही, कुणावर आवाज चढवून बोलत नाही, अकारण वाद घालत नाही... मग मी नाही???? आहे ना? मग? कुणासाठी स्वतःला प्रूव्ह करायचं? काय गरज आहे स्वतःचं अस्तित्व सातत्यानं दाखवून द्यायची? ह्या विश्वामध्ये अगदी मुंगीपासून सगळ्यांनाच आपापलं अस्तित्व आहे आणि स्वतःसाठी दुसर्याची रेघ कमी करण्याची काही एक गरज नाही. असं बरं काही ऐकून नानाचा आत्मा आपली तडफड थांबवून शांतपणं आपला सूडाचा विचार सोडून देऊन चिरनिद्रा घेतो.
हल्ली मिपावर वाचताना सातत्यानं आपण ह्या राणासारखं तर करत नाही ना हा विचार प्रकर्षानं वर आला. चित्रपटातलं बाकी काहीच आठवत नाही. य वर्षं झाली बघून. थोडा शोध घेतल्यानंतर विकीपिडीया वर http://en.wikipedia.org/wiki/Abhay_%28The_Fearless%29 हे सापडलं. ते वाचून तार जुळली नि नंतर शीर्षक टंकलं.
(ज्याला मी वर महाराज म्हणत होतो तो खरा राजस्थानी राणा आहे असं वरच्या लिंकमध्ये वाचताना समजलं)
जर कुणाला हा चित्रपट आंतरजालावर सापडला तर कॄपया त्याचा शोध घेऊन बघावा. म्हणायला बालचित्रपट आहे. पण आयुष्यं गेली लोकांची तरी एका बालचित्रपटातला बोध आपल्याला सापडत नाही. अर्थात ह्याचंच कशाला लहानपणी दुसर्याची गोष्ट चोरू नका, खोटं बोलू नका, बाहेरचं काही अचकट विचकट घरात आणू नका ह्या अत्यंत मूलभूत शिकवणुकीचा विचार तरी आपण क रतो का हे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला बघावं लागेल.
असाच एक विचार डोक्यात आला, रिलेट झाला नि आपल्यासमोर मांडला.
डिस्क्लेमरची फार काही गरज न वाटल्यानं टाकला नाही. वाचक सूज्ञ आहेत.
बाकी जोर से बोलो म्हटलात तर उत्तर असेल || जय माता दी||
वाचने
5579
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
बराच चांगला चित्रपट आहे.
अभय........
Helo...............सुन्दर सिनेमा
नाव आठवलं तर व्य.नि. करा.
In reply to Helo...............सुन्दर सिनेमा by विजय१९८१
त्या चित्रपटाचं नाव 'halo'
In reply to नाव आठवलं तर व्य.नि. करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
लैच सुंदर चित्रपट..
In reply to त्या चित्रपटाचं नाव 'halo' by हाडक्या
वर शीर्षकामध्ये लिहीलेलं आहे
In reply to लैच सुंदर चित्रपट.. by चिगो
आमच्या बालपणाच्या मस्त आठवणी
In reply to लैच सुंदर चित्रपट.. by चिगो
खूपच हृदयस्पर्शी चित्रपट!
In reply to आमच्या बालपणाच्या मस्त आठवणी by हाडक्या
छोटेखानी चित्रपट परिचय आवडला.
आवडला
In reply to छोटेखानी चित्रपट परिचय आवडला. by सतिश गावडे
सहमत.. बिल्कुल सही बोल्यो रे
In reply to छोटेखानी चित्रपट परिचय आवडला. by सतिश गावडे
एकदा मी मळ्यात गेले होते
नको ग असे काळजाला घरे पडणारे बोलूस!
In reply to एकदा मी मळ्यात गेले होते by अजया
पण काही असो, नुकत्याच येउन
In reply to एकदा मी मळ्यात गेले होते by अजया
@मी पण सुज्ञ होणार!!!! >>>
In reply to एकदा मी मळ्यात गेले होते by अजया
पायलागू
चित्रपट मिळवून बघावा म्हणतोय.
स्वाम्या
In reply to चित्रपट मिळवून बघावा म्हणतोय. by स्वामी संकेतानंद
अभय १९९४ चा आहे असं वरील
In reply to स्वाम्या by पैसा
व्यक्ती तितक्या प्रक्रुती...
मस्ट प्रटिसाद
In reply to व्यक्ती तितक्या प्रक्रुती... by मुक्त विहारि