प्रवाही
लेखनविषय:
पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;
पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वहात आहे;
जे झाले, ते गेले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;
तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!
वाचने
2898
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
आवडली...
तरी पाखरे
उत्तम कविता !
एखाद्या शहाण्या माणसाकडुन
छान, तरल.
तरी पाखरे
सुरेख
आभार
छान!
वाह!
In reply to वाह! by एस
कवितेमागील context बद्दल नंतर
कवितेमागील context बद्दल नंतर कधीतरी...सवडीने जरुर लिहा, वाट पाहते.सुरेख आशयपूर्ण कविता .
आवडली कविता.अर्थपूर्ण