Skip to main content

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 14/10/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे. बहुमताने क्र. १: स्पा 1 क्र. २: विलासराव 2 क्र. ३: इशा१२३ 3 विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनि करत आहोत. मात्र यापुढची म्हणजे चौथी स्पर्धा जरा विश्रांती घेऊन दिवाळीच्या दिवसांत घेऊया. विषय प्रकाश, उत्सव, प्रकाशाचा उत्सव असा काहीसा असावा अशी कल्पना आहे. तुमच्याही कल्पना येऊ द्यात. त्या स्पर्धेलाही आधीच्या स्पर्धांप्रमाणेच तुमचा हातभार लावा ही विनंती! विजेत्यांचे आणि इतर सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि धन्यवाद! चित्रे निवडणार्‍या आणि चित्रांचे कौतुक करणार्‍या सर्व वाचक सदस्यांचेही आभार!

वाचने 9605
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

विजेत्यांचे हार्दिक हबिणंदण बाकीची छायाचित्रे सुध्दा सुंदरच होती. त्या धाग्याची वाखु साठवलेली आहे. चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा खरं सांगायचं तर हा फोटो मीच काढलाय पण आपलं एक स्पेशल तंत्र आहे. ३-४ फोटो काढायचे आन जो चांगला वाटला तो ठेवायचा. त्यामूळे माझा नंबर बघुन तर मी चक्रावलोच. मी कुठलाही अँगल वगैरे घेउन फोटो काढलेला नाही. जो आलाय तो सहजपणे आलाय एवढेच. तरीही सर्वांचे आभार. धन्यवाद.

विजेत्यांचे अभिन्ंदन. पुढच्या स्पर्धेसाठी पुढील विषय सुचवु इच्छितो : १. प्राणी, पक्षी २. जलाशय (तळे, नदी, विहीर, ओढा, समुद्र..)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पक्षी आल्यास 'हुकमीएक्का' हा आय डी विजेता असू शकतो. भारी काम केलेय त्याने एकाच वर्षात.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by अजया

अनाहिता जोरात दिसतायत सगळीकडे. जयंत कुलकर्णीनी पण 'नथ' (भाग ४) मध्ये मानाचे स्थान दिले आहे अनाहिताना
अफगाणिस्तानमधील नाव होते ‘‘अनाहिताबेगम‘‘
:)

विजेत्यांचे अभिनंदन http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-happy-smiley-emoticon.gif मान्यवरांचे आभार. http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-hands-above-head-smiley-emoticon.gif ============ पां डुब्बा...आता पार्टी पायजेन! http://www.sherv.net/cm/emoticons/party/surprise-party-smiley-emoticon.gif

तिन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. छाया-प्रकाश उत्सव हा विषय (तोच असेल तर) चांगला आहे. छायाचित्रकारांना कौशल्य वापर करण्यास भरपूर वाव आहे. नविन स्पर्धेस शुभेच्छा...!

हि छायाचित्रे जणू छायाचित्रकाराने फोटोसेन्सर वर रंगवली आहेत असा भास होतो. हा प्रकार किती कठीण आहे हे ज्यांनी ज्यांनी क्लिक केले असेल त्यांना चांगलेच माहिती आहे. अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे दणकून हार्दिक अभिनंदन,,

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढील स्पर्धेच्या प्रतिक्षेत :-) .

सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.. सणासुदीमुळे माझी स्पर्धा चुकली, पण फोटोची मजा उशीरा का होइना, पुरेपुर घेतली

सर्व फोटो अतिशय सुंदर आहेत. विजेत्यांचे तसेच स्पर्धकांचे अभिनंदन.