✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बयो !!!!

ख
खटपट्या यांनी
Tue, 10/14/2014 - 05:56  ·  लेख
लेख
(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९) बयो !!!! बऱ्याच तात्पुरत्या नोकऱ्या झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत राम वाटत नव्हता. आणि पगारातपण म्हणावी तशी वाढ होत नव्हती. काय करावे काळत नव्हते. स्वतः चा व्यवसाय करायचे डोक्यात होते पण आपल्याला जमेल का ?, भांडवल कुठून आणायचे?, तोटा झाला तर काय ?, असे असंख्य प्रश्न भंडावत होते. घरी सर्वांना माझी अस्वस्थता जाणवत होती. आईला माहित होते कि याचे काही ठीक चालले नाहीये. तिने सरळच विचारले, "काय रे काही प्रोब्लेम आहे का?" "नाही, काही नाही". "मग असा का घुम्यासारखा बसून असतोस? कसला विचार करतोस एवढा?" "काही नाही, हे असंच चालू राहिलं तर कठीण आहे. काहीतरी स्वतःच हवं." "म्हणजे" "जाऊ दे ना" आईला माझी घालमेल बघवेना "किती पैसे लागणार आहेत?" "माहित नाही" मी तेव्हा माहित नाही म्हणालो पण मनात जुळवाजुळव सुरु झाली. करून करून करणार काय. छोटंसं कॉम्पुटर शॉप सुरु करायचा विचार होता. भाड्याचा गाळा., सामानसुमान, कमीतकमी दोन माणसांचा पहिल्या ६ महिन्याचा पगार असे सर्व मिळून ६०/८० हजार तरी लागणार होते. एक दिवस घाबरत घाबरत आईला आकडा सांगितला. वर हेही सांगितले कि पैसे परत मिळतील याची खात्री नाही. तिने शांतपणे ऐकून घेतले आणि सांगते म्हणाली. अचानक एके सकाळी आईने पैसे हातावर ठेवले आणे म्हणाली "काय करतोयस ते मन लावून कर" मला काय बोलावे कळेना. माझे डोळे पाणावले. मग म्हणाली "जास्त विचार करू नकोस" मी कामाला लागलो, मस्त मोक्यावरचा गाळा बघितला, शोसाठी कि बोर्ड, माउस, कॅबिनेट असे सामन उधारीवर आणून लावले. सामान संपले नाहीतर परत देणार हे सुद्धा सांगून ठेवले. आधीचे फर्निचर होतेच. मनासारखा सेटअप झाल्यावर चांगला दिवस बघून नारळ फोडून सुरवात केली. एक डेस्कटोप इंजिनिअर विलास आणि स्वागतिका कोमल असे आम्ही तिघे दुकान कम ऑफिस मध्ये बसू लागलो. सुरवातीला अतिशय थंड प्रतिसाद होता. घाबरगुंडी उडाली होती. पण स्थानिक पेपरविक्रेत्याकडे हैण्ड्बिले वाटायला दिल्यावर चांगला प्रतिसाद मिळू लागला. कोमल - दिसायला सुंदर, स्वत:ला टापटीप ठेवणारी व मला हवी होती तशीच मुलगी होती. थोड्याच दिवसात तिला व्यवसायातील खाचाखोचा समजल्या. कोण कशासाठी फोन करतंय, पेमेंटसाठी येणारा फोन कोणता, क्लायण्ट चा फोन कोणता आणि त्यांना कसे प्रतिसाद द्यायचे वगैरे. कोमलला एक लहान बहिण होती,जी कोलेजला होती. या दोघीच होत्या. पहिल्या सहा महिन्यामध्ये दोघांचा पगार आणि भाडे जाउन आईचे पैसे परत करू शकलो. आणि डोक्यावरचा भार बराच कमी झाला. कोमल जवळच रहायची व तिच्या घरची लोक निच्यावर नजर ठेवून असायचे. वडिलांच्या सहज म्हणून समोरच्या रस्त्यावरून एक दोन फेऱ्या असायच्या.(बहुतेक लक्ष ठेवण्यासाठी) कारण दिवसाचा बहुतांश वेळ मी आणि कोमल दोघच दुकानात असायचो. आमच्या दुकानाला काचेचे पार्टिशन असल्यामुळे जाता येता दुकानात काय चालू आहे हे रस्त्यावरून सहज दिसायचे. कोमलची कामाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७. साडेसात नंतरसुद्धा ती घरी पोहोचली नसल्यास तिचे बाबा दुकानात हजर होत असत. कधी कधी कोमल उशिरा थांबून आम्हाला असेम्ब्लीसाठी मदत करत असे. बाबा येवून बघायचे कितीजण आहेत. :) मला कळायचे कि ते का येतात पण मी दुर्लक्ष करीत असे. तरण्या मुलीचे वडील काळजी करणारच. एकदा एका क्लायण्ट ने घरी बोलाऊन घेतले. ते एका सोफ़्ट्वेअर कंपनी मध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्या घरातील पीसीचे काम आम्हिच केल्यामुळे ते मला व्यक्तिश: ओळखत होते. मला म्हणाले "२०० डेस्कटोप हवेत, १५ दिवसात देऊ शकशील? "का नाही सर?" "ऐड्वान्स मिळणार नाही आणि पेमेंट ३ महिन्याने मिळेल, वर तुमचा एक माणूस आमच्याकडे एक वर्ष ठेवावा लागेल" "चालेल सर" मी आल्यावर कोमलला हि बातमी सांगितली, तिने तर आनंदाने उडीच मारली. खरं तर तिला एवढे आनंदित होण्यासारखे काहीच नव्हते. पण खूप खुश होती. मी म्हणालो "कोमल, काही दिवस तुला उशिरापर्यंत थांबावे लागेल" "चालेल" "घरी विचारून घे बाबांना" "ते मी बघते रे" "ठीक आहे उद्या दुपारी सर्व समान येईल, उद्यापासून सुरवात करू" "पण मी काय म्हणते विवेक" "काय?" "त्या गृहस्थांवर आपण नको तेव्हढा विश्वास तर टाकत नाही ना" "आपण?" ती ओशाळली, हा सर्व व्यवसाय ती स्वत:चा समजत होती. एका अर्थाने ते चांगलंच होतं "आपण म्हणजे तू रे" "हम्म, बघू, काय होईल फार तर? पैसे उशिरा मिळतील. आपण मार्जिन पण तशीच ठेवू ना. "हम्म" "या डील चे पैसे आल्यावर मी तुझे पेमेंट वाढवणार आहे." "मी माझ्या पेमेंट बद्दल तुला कधी बोललेय का?" "ठीक आहे, उद्यापासून सुरवात करू त्याआधी एक कोटेशन टाइप कर, त्यांना आजच नेउन द्यावे लागेल." "ओके" काम चालू झाले. पहिल्याच दिवशी हिचे बाबा साडेसातला हजर. हलायचे नाव घेइनात. बहुतेक कोमल ला सोबतच घेऊन जाणार. मी म्हणालो, "काय काका?" "नाही सहजच आलो, म्हटले काय चाललय बघून जावे, कोमल म्हणाली कि खूप मोठी ओर्डर आली आहे." "बघूया कसं जमतंय ते. चहा घेणार?" "नको" "घ्या हो, कोमल, आपल्या सर्वांना चहा सांगतेस प्लीज?" "चांगलाच जम बसलाय तुमचा" "हो सद्यातरी चांगलं चालू आहे. पण धंदा बेभरवशाचा आहे." बाबा चहा पिउन निघून गेले. दुसऱ्या दिवशी साडेसातला बाबा परत हजर. मी म्हणालो, "काय काका?" "नाही सहजच. तरी किती दिवस काम चालेल?" "माहित नाही. अजून कमीतकमी १५ दिवस तरी लागतील" (आयला म्हणजे हे रोज येणार कि काय? एवढाही विश्वास नाही? आमच्या दोघांबरोबर संध्याकाळी विलासहि असायचा दुकानात) "ओके निघतो मी" इति बाबा "अहो चहा घेऊन जा ना" "नको" "ठीक आहे, येत जा कधी कधी" (कधी कधीच येत जा,) ती ओर्डर व्यवस्थित पार पडली. पैसेही वेळेवर मिळाले. ठरल्याप्रमाणे मी कोमलचे पेमेंट वाढवले. तीसुद्धा खुश होती. एकदा दुकानात दोघेच असताना मी म्हणालो, "कोमल, तुला एक विचारायचे आहे" तिने चमकून माझ्याकडे पहिले आणि विचारले "काय?" "एवढे दचकायला काय झाले?" "नाही विचार ना" "मी विचार करत होतो कि आपण आपला स्वतःचा ब्रांड काढला तर?" "ओह, हे विचारायचे होते?" "मग, तुला काय वाटले?" "काही नाही जाउदे" (आयला हिपण तोच विचार करतेय का जो मी करतोय?) हल्ली कोमलचे माझ्यावर बारीक लक्ष असायचे. मला कोणते फोन येतात, त्यात मुलींचे फोन कोणते, कधी कधी तर सरळ विचारायची, "अरे सोनल म्हणून फोन आला होता तुझ्यासाठी, कोण आहेत ती?" "हा ती मार्केटिंग डिपार्ट्मेण्ट ला आहे त्या साहेबांच्या कंपनी मध्ये" "ओके" "का ग?" "नाही सहजच" नेहमीप्रमाणे एकदा बाबा साडेसातला हजर. मी म्हणालो, "काका कोमल तर आत्ताच निघाली" "हो मी पाहिली, मला तुमच्याशी बोलायचे आहे." "बोलाना" "तुम्ही पाटील म्हणजे नक्की कोण?" "………. ?" (काय विचारायचे आहे नक्की यांना? जात?) मी गप्प "म्हणजे कुठले पाटील?" "आम्ही सौन्दळ चे पाटील. का हो?" "नाही सहजच" "चहा घेणार?" "नको पुन्हा कधीतरी" मी विचार करत होतो, यांचा विचार तरी काय आहे? मला कोमलच्या वागण्याबोलण्यातून संकेत मिळत होते. एखाद्या महिलेचा फोन असले तर तर तिचे कान टवकारलेले असत. मी जरा जास्त वेळ फोन वर बोलतोय असे वाटले कि ती अस्वस्थ होत असे. आजकाल तिचा टापटीपपणा कमालीचा वाढला होता. एक वेगळेच अत्तर वापरू लागली होती. अगदी धुंद करणारे. एकदा विचारले, "काय ग, कोणता सेंट वापरतेस?" "कारे तुला आवडला?" "हम्म" "देईन तुला आणून" "माझ्यासाठी नको आणूस पण तू मात्र रोज हाच सेंट मारून येत जा" यावर ती गोड गालातल्या गालात हसली एकदा नेहमीप्रमाणे कोमल ऑफिस मध्ये नसताना तिचे बाबा आले. मी म्हणालो, "काय काका?" "काही नाही सहजच. मी काय म्हणत होतो…" "काय?" "आमची बयो ग्रजुएट झालेली आहे" (बहुतेक कोमलला घरी बयो म्हणत असावेत) "हो माहित आहे मला" "दिसायला हि सुंदर आहे" "…………" (आता हे नवीन काहीतरी सान्गीतल्यासारखे काय सान्गताय? काय ते विचारा) "तर मी म्हणत होतो कि…… " "काय?" (मला आता धडकी भरली. एखाद्या गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात असेल आणि आता ती मिळण्याची वेळ जवळ आल्यावर जसा माणूस नर्वस होतो तसे झाले. अजून किती वेळ घेणार आहेत हे?) "आम्ही परब, कणकवलीजवळ आमचे गाव आहे" "ओके(????)" "मी बयोसाठी स्थळ शोधत होतो" "ओके" (अहो विचारा काय ते लवकर) "तुम्ही एकदा बयोला घरी येउन बघून गेलात तर बरे होईल." "अहो रोजच तर बघतो मी तिला इथे" "अहो बयो, कोमलची धाकटी बहिण" "काय??????" (क्रमशः)
  • बयो !! - भाग २
  • बयो !! - भाग ३ (अंतिम)

Book traversal links for बयो !!!!

  • बयो !! - भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
15597 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

अंम्म्म!

स्पंदना
Tue, 10/14/2014 - 06:12 नवीन
अंम्म्म! असा कसा असतो ह्या वडिल माणसांचा विचका करायचा स्वभाव?
  • Log in or register to post comments

छान, पुढचा भाग लवकर येउ द्या.

कविता१९७८
Tue, 10/14/2014 - 07:03 नवीन
छान, पुढचा भाग लवकर येउ द्या.
  • Log in or register to post comments

आईग्ग! बिचारा कथानायक!

रेवती
Tue, 10/14/2014 - 07:07 नवीन
आईग्ग! बिचारा कथानायक!
  • Log in or register to post comments

.

स्वप्नज
Tue, 10/14/2014 - 07:16 नवीन
एखाद्या मालिकेमध्ये तो तिची वाट पाहतोय.. दारघंटा वाजते....तो आनंदाने दार उघडतो...पण ती व्यक्ती दिसल्यावर त्याच्या चेहर्यावरचे भाव पटकन बदलतात आणि नेमके तिथेच तो भाग संपतो....असे काहीसे.....असो ....... पुभाप्र.....
  • Log in or register to post comments

पुढचा भाग येऊद्या पटकन. आणि

किसन शिंदे
Tue, 10/14/2014 - 07:19 नवीन
पुढचा भाग येऊद्या पटकन. आणि हो त्या बयोला होकार देवू नका लग्नाला
  • Log in or register to post comments

(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९)

अत्रन्गि पाउस
Tue, 10/14/2014 - 07:34 नवीन
हे नक्की का ??? *LO**
  • Log in or register to post comments

हो संपुर्ण काल्पनिकच आहे हो..

खटपट्या
Tue, 10/14/2014 - 07:51 नवीन
हो संपुर्ण काल्पनिकच आहे हो.. !! तुम्हाला खरी वाटतेय हे बघुन बरं वाट्लं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

हरे राम !त्या कोमलला बयो करुन

अजया
Tue, 10/14/2014 - 08:02 नवीन
हरे राम !त्या कोमलला बयो करुन लग्न करुन टाकायचं ना त्याचं,उगा पुढच्या भागाची वाट बघणं अालं.आता लवकर टाका तो भाग!!
  • Log in or register to post comments

कलाटणी ? सुखद शेवट होईल का?

जेपी
Tue, 10/14/2014 - 08:09 नवीन
कलाटणी ? सुखद शेवट होईल का?
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग!

बहुगुणी
Tue, 10/14/2014 - 08:43 नवीन
येऊ द्या पुढचा भाग लवकर.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म्म्म!

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/14/2014 - 08:52 नवीन
हम्म्म्म्म्म!
  • Log in or register to post comments

वाचतोय !

मदनबाण
Tue, 10/14/2014 - 09:23 नवीन
वाचतोय ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात.

प्रचेतस
Tue, 10/14/2014 - 10:04 नवीन
मस्त सुरुवात.
  • Log in or register to post comments

कथा ओघवत्या भाषेत साकारते आहे

मृत्युन्जय
Tue, 10/14/2014 - 10:47 नवीन
कथा ओघवत्या भाषेत साकारते आहे. पुढचा भाग वाचायची उत्कंठा आहे.
  • Log in or register to post comments

+१

सौंदाळा
Tue, 10/14/2014 - 14:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हाहाहा

एस
Tue, 10/14/2014 - 10:54 नवीन
हहपुवा! पुभाप्र!
  • Log in or register to post comments

नायकाची व्यवसायात प्रगती

उमा @ मिपा
Tue, 10/14/2014 - 13:09 नवीन
नायकाची व्यवसायात प्रगती होतेय हे वाचताना खूप बरं वाटत होतं. पण शेवटी बयो मुळे धक्काच बसला. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे. छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments

मस्त

संचित
Tue, 10/14/2014 - 13:25 नवीन
मस्त जमलय...
  • Log in or register to post comments

+१.

शिद
Tue, 10/14/2014 - 14:29 नवीन
+१. पुढचा भाग टाका लवकर. अवांतरः बयोला बाय करा आणि कोमलला हाय करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित

मस्तच!

पैसा
Tue, 10/14/2014 - 14:21 नवीन
पुढे काय झालं असावं?
  • Log in or register to post comments

खट्टु काका

दिपक.कुवेत
Tue, 10/14/2014 - 14:29 नवीन
मस्त जमलय. पुढे वाचण्यास उत्सुक
  • Log in or register to post comments

सौंदळ

वैदेही बेलवलकर
Tue, 10/14/2014 - 16:41 नवीन
तुम्ही खरंच सौंदळ चे का ? माझं गाव सौंदळ आहे म्हणून विचारलं कि फक्त योगायोग.
  • Log in or register to post comments

मी सौन्दळचा नाही. माझ्या

खटपट्या
Tue, 10/14/2014 - 19:36 नवीन
मी सौन्दळचा नाही. माझ्या मित्राचे गाव सौन्दळ. सहज सुचले म्हणून कथेत आले. तुम्ही सौन्दळ च्या आहात हे वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेही बेलवलकर

कुठेतरी वाचल्यासारखे वाटतय !!

सुहास..
Tue, 10/14/2014 - 18:33 नवीन
कुठेतरी वाचल्यासारखे वाटतय !!
  • Log in or register to post comments

नाउमेद होऊ नका.....

प्रभाकर पेठकर
Tue, 10/14/2014 - 19:00 नवीन
मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही. धाकट्या बहीणीत कांही खोट आहे का? तिचे कुठे, घरच्यांना पसंद नसलेले, प्रेमसंबंध वगैरे आहेत की काय ज्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्याला मान्य असलेल्या 'स्थळा'शी उजवून टाकायची घाई आहे? असो. ह्यात नाउमेद होण्यापेक्षा मला तरी सकारात्मक संकेत दिसत आहेत. जावई म्हणून ते तुम्हाला पसंद करीत आहेत. आता, तुम्हाला धाकटीशी नाही मोठीशी लग्न करायचे आहे हे त्यांच्या गळी उतरविणे कठीण नाही. (कारण मोठी मुलगीही तुमच्यात इच्छुक आहे).
  • Log in or register to post comments

काका, हि गोष्ट माझी नाही.

खटपट्या
Tue, 10/14/2014 - 19:34 नवीन
काका, हि गोष्ट माझी नाही. संपूर्ण काल्पनिक आहे. बाकी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात येतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ळोळ :)

पहाटवारा
Wed, 10/15/2014 - 04:34 नवीन
अहो असे प्रतीसाद हि तुमच्या लेखनाच्या यशस्वीतेची पावतीच आहे :) छोटेखानी , मस्त कथानक.. येउ द्या पुढचा भाग लवकर.. -पहाटवारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या

बॅटमॅन
Tue, 10/14/2014 - 19:39 नवीन
मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही.
कथा काल्पनिक आहे असे लेखक म्हणताहेतच. परंतु काल्पनिक असो वा नसो, मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही. हेच भावाभावांबद्दल, तसेच लहान भाऊ- मोठी बहीण आणि मोठा भाऊ-लहान बहीण या जोड्यांबद्दलही म्हणता यावे. कैक कुटुंबांत असे काही झाले की जणू महापाप केल्यागत चेहरा करतात. इतकं भयंकर काय आहे यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

एक प्रथा...

प्रभाकर पेठकर
Tue, 10/14/2014 - 19:53 नवीन
मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही. आता काळ बदलला आहे किंवा बदलतो आहे. पण पूर्वीच्या काळी धाकटीचे लग्न आधी केले तर तिची लग्नाआधी बाहेर कुठे 'भानगड' वगैरे असावी की काय (म्हणून घाईघाईने आणि आपल्याला अंधारात ठेवून लग्न 'उरकताहेत') असा प्रश्न मुलाकडच्या वरिष्ठांना पडायचा. किंवा 'मोठ्या मुलीत कांही खोट असणार' असा विचार करून तिला 'स्थळं' सांगून यायची बंद होतात. शिवाय मोठीच्या मनांत न्यूनगंड निर्माण होण्याचीही शक्यता असते. हा सर्व विचार करून धाकट्या मुलीला स्थळ आधी सांगून आलं तरी त्यांना रोखून धरायची आणि मोठीचे लग्न आधी करण्याची प्रथा होती. भाऊ-बहिणीत लहान बहिणीचं आधी आणि मोठ्या भावाचं नंतर अशी लग्न व्हायची. तरीपण 'मोठ्या भावाचं लग्न अजून का झालं नाही' ह्याची आडून आडून चौकशी व्हायचीच. पण ते तितकेसे गंभीर नसायचे. ह्यात भयंकर कांहीच नाही हा व्यवहार आहे जो पूर्वी कटाक्षाने पाळला जायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कथा आवडली. पुढं काय होतंय

आतिवास
Tue, 10/14/2014 - 20:31 नवीन
कथा आवडली. पुढं काय होतंय याबद्दल उत्सुकता आहे :-)
  • Log in or register to post comments

आवडली. पुभाप्र!

आदूबाळ
Wed, 10/15/2014 - 02:48 नवीन
आवडली. पुभाप्र!
  • Log in or register to post comments

कथा छान रंगली आहे

श्रीरंग_जोशी
Wed, 10/15/2014 - 05:31 नवीन
कथा छान रंगली आहे. खूप आवडली. काल्पनिक आहे असे लिहिले नसते तर खरीच वाटली असती. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा