मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पोहे

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
फार दिवसा पुर्वि एक कविता मीपा वर वाचली निट आठवत नाहि पण ति कल्पना जाम आवडली व त्या नुसार कविता ्लिहावि असे वाटत होते "येथे उपासाच्या कचोर्‍या मिळतील..असे काहिसे शब्द होते कविता आवडल्यास त्याचे श्रेय त्या अज्ञात कविस व त्याच्या कल्पना शक्तिस. ========================================= पोहे पृथ्वीच्या अर्धगोलाकार आकाराची कढई... खाली सहस्र सूर्य ओकतोय अशी आग तापलेलेल्या रिफाइंड तेलाच्या डोहात मोहरीचे, ब्रह्मांडात अणू रेणूचे चालते तसे तडतड नर्तन साथीला हिरव्या मिरच्या व कढीपत्त्याचा व्योमास भेदणारा चर्र्र्र असा नाद कांदे व बटाट्याचे काप व रुद्राचा हळदीचा भंडारा सूर्याच्या रक्तिमा सारखे लाल तिखट व हिंग उलथण्याने सारे मिश्रण हालतं राहते आत पडतो मग भिजवलेल्या पोह्यांचा डोंगर व कोथिंबीर चवीनुसार मीठ व साखर ब्रह्मांडात चालणा~या उलथा पालथीसारखे ते उलथले जाते कढईत.. पोह्याचा एक कण हि न सांडता आणी झाकले जाते ते झाकणा खाली.. जेम्स वॅट च्या सहस्र इंजिनांनी उश्वास टाकल्यावर जशी वाफ बाहेर येते तशी वाफ झाकण काढल्यावर येते.. अन पूर्णब्रह्माचा तो खमंग स्वाद सा~या ब्रह्मांडात दरवळू लागतो डोळे मिटून तो अनुभवत असतो व मिसळतो आत्म्यात व घुमू लागतो तो सोहम अनाघत नाद अन...अन्नपुर्णेची मंजुळ आवाजात हाक येते.. "अहो..नाश्त्याला येता ना ..पोहे तयार आहेत." आज नाश्त्याला गरमागरम पोहे व फक्कड चहा चा बेत आहे.. आपणही या ..आपले स्वागत आहे.

वाचने 3733 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्यारे१ 13/10/2014 - 18:44
चान चान! पोह्यांवरुन 'सनई चौघडे' नावाच्या चित्रपटातलं (का कांदेपोहे असं नाव होतं?) 'आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे' हे जीवनविषयक सूत्र सांगणारं हृदयस्पर्शी पद्य आठवलं. अर्थ काय हवा तसा काढू नैतर 'ऊसका रस' निकालू. है क्या अन नै क्या?