Skip to main content

याहू!

लेखक विकास यांनी मंगळवार, 28/10/2008 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच याहूच्या संकेत स्थळावर गेलो होतो आणि एक सुखद धक्का बसला! त्यांच्या गृहपर्णावर (होमपेजवर भारतासाठीचे जे .in आहे त्यावर आहेच पण हे जगाचे मुख्य पान...) चक्क याहू या अक्षराच्या अलीकडे दोन लुकलुकत्या पणत्या आणि दुसरीकडे "हॅपी दिवाली" असा संदेश. त्याच्यावर टिचकी मारल्यावर दिवाळीवर विशेष माहीती मिळाली. वास्तवीक अशी रेखाटने मी गुगलच्या प्रमुखपानावर कायम पाहीली आहेत पण दिवाळीसाठी मात्र दिसले नाही... आजही त्यांच्या भारतासाठीच्या गृहपर्णावर एक रेखाटन आहे पण त्यात पणत्या वगैरे न दाखवता आकाशाकंदील वाटणारे पण "स्टार्स" दाखवले आहेत... तेंव्हा किमानपक्षी सामाजीक जाणिवेत भारतीय संस्कृतीचे योग्य प्रदर्शन केल्याबद्दल येथे याहू! वरचढ वाटले... सर्कीटसाहेब, जर आमच्या भावना योग्य ठिकाणी पोचवता आल्या तर अवश्य पोचवा. अर्थात आम्ही (येथील कोणिही) जर तसे कळवावेसे वाटत असेल तर तसेही अवश्य सांगा! धन्यवाद!

वाचने 4083
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

खरच की! बर वाटल पाहून. मीनल.

सकाळी गुगलवर पाहिलं होतं ठिक वाटलं.. पण याहूवरचं चित्र मस्त आहे :) बरं वाटलं -(खुष) ऋषिकेश

अखेर भारतीय संस्क्रतीची दखल घेतली त्यांनी मी आता तसा कोतवाल नाही बरं?

जर आमच्या भावना योग्य ठिकाणी पोचवता आल्या तर अवश्य पोचवा. अर्थात आम्ही (येथील कोणिही) जर तसे कळवावेसे वाटत असेल तर तसेही अवश्य सांगा! नक्की. आपणही येथे मुखपृष्ठाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करू शकता. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

लिंक बद्दल धन्यवाद.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

अरे वा! कौतुक आहे हो याहूचं!

पणत्यासहीत याहूचा लोगो आवडला.

भारतीय संस्कृतीचे योग्य प्रदर्शन केल्याबद्दल येथे याहू! वरचढ वाटले... भारतीय जालीय व्यवहार काबीज करण्यासाठी असे सोंग अनेकांना आणावे लागतील असे वाटते, असे असले तरीही, भारतीय संस्कृतीची दखल घेतल्याचा आनंद आहेच. -दिलीप बिरुटे (रोखठोक)