मी, ग्रेस आणि १० रुपये
लेखनप्रकार
मी, ग्रेस आणि दहा रुपये
काय ? ग्रेसच्या कवितेसारखेच दुर्बोध वाटते की नाही ? आता ग्रेस म्हटले की दुर्बोधता आलीच. म्हणजे ग्रेसच्या आधीही मर्ढेकरांनी आपला क्लेम लावला होता पण त्यांचे "पिंपातले ओले उंदीर" आम्ही समीक्षकांच्या मदतीने केंव्हाच समजावून घेतले होते (पचविले म्हणणार होतो पण ओले उंदीर व पचवणे एकत्र आणण्याइतके सत्यकथेचे लेखक नव्हतो ना ! ते जावू दे, सांगत काय होतो
४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कंपनीत नोकरीला होतो व कंपनीच्या गाडीतून फॅक्टरीत जात येत होतो. दिवाळीच्या आधी प्रत्येक जण एकेक दिवाळी अंक खरेदी करावयाचा व मग गाडीत त्याची अदलाबदल व्हावयाची. मी सत्यकथा घेत असे. (तो पर्यंत कवितांची गोडी लागलेली होती व त्यामुळे तीस-चाळीस कवितासंग्रह घरी होते महानोरांच्या "रानातील कविता " बरोबर ग्रेसचा " संध्याकाळच्या कविता" ही सुखेनैव नांदत होता. अर्थात त्यात तरतम होतेच. वसंत-मंगेश यांच्या पंगतीत महानोरांनी आपला पाट टाकला होता. कुणाच्या २५ तर कुणाच्या २० कविता पाठ एवढाच फरक. ग्रेस मात्र कधीच तेथे आपले पळीपंचपात्र टाकू शकले नाहीत. म्हणजे माझ्याकडून कमी प्रयत्न झाला असे नव्हे. निष्ठेने सत्यकथा वाचणारा "कविता" समजावून घेण्याचा प्रयत्न कर
णारच. त्या मुळे मर्ढेकर जसे कुलकर्ण्यांनी (अलिकडे वा.ल. टाका वा द.भि., काय फरक पडतो ?). समजावून सांगितले तसे ग्रेसही कोणी तरी सांगेल अशा अपेक्षेने वाचत राहिलो. पण खरे म्हणजे कोरडाच राहिलो.) हां, तर सत्यकथेच्या अंकात ग्रेसच्या कवितांवर एक टीकालेख होता. दोनदा वाचूनही काहीच कळले नाही. कविता व समीक्षा, दोन्हीही. वैताग आला. मग विचार केला, " आपण एकटेच का त्रास करून घेतो ? इतरांनाही सहभागी करून घ्यावे. " दुसरे दिवशी गाडीत सांगितले " हा ७-८ पानांचा लेख, जो कोणी संपूर्ण वाचेल, त्याला १० रुपये देईन. कळला पाहिजे असे नाही, फक्त पहिल्या पासून शेवट पर्यंत वाचला पाहिजे." बस. त्या वेळी १० रुपये ही मोठी रक्कम होती. दोघा-तिचांच्या हॉटेलचे बील सह्ज भागायचे. लोकांनी " मी पहिला " म्हणत अंक घेतला. पण मित्र हो, एकानेही १० रुपये मागितले नाहीत ! ग्रेस, त्याची कविता, कविता कळली, आवडली म्हणणारे वाचक व टीकाकार,,,,, सर्वच जिंदावाद ! (अर्थात मी, व माझे मित्र मुर्दाबाद )
काही वर्षे गेली. "चंद्रमाधवीच्या देशात " (हा ही ग्रेसचा एक संग्रह) विकत घेतला होता. त्यातल्या काही कविता कळल्या (सगळ्या कळल्या म्हणण्या इतका मूर्ख नव्हतो) या आनंदात होतो..पण हा आनंदही फार दिवस टिकणार नव्हता. मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला होता, त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नव्हता. मी चक्क ६० रुपये रोख मोजून जयंत परां जपे यांचे "ग्रेस आणि दुर्बोधता" हे पुस्तक विकत घेतले. १० रुपयांचे गाजर दाखवूनही कोणी ८ पानांचा लेख वाचत नाही हे माहीत असतांना २४६ पानांचे पुस्तक घेण्याची काय गरज होती ? साठ रुपयांचे सोडा पण आपल्याला "५-६ कविता कळल्या" हा आनंद गमावण्याची बला कशाला घेतली ? तेव्हा ह्या माणसाचे नावही माहीत नव्हते. म्हटले ’चला, आपल्यासारखाच कविताप्रेमी असेल, थोडेफार समजावून सांगेल" पण हे परांजपे तर समस्त कुलकर्णी (पक्षी टीकाकार) परिवाराचे गुर्जीच निघाले.
आता बघा, ग्रेसचे "ती गेली तेव्हा रिमज़िम पाउस निनादत होता " ते ग्रेसचे एक "लॅंडमार्क" गीत आहे हे गीत तसे पॉप्युलर म्हणावयास हरकत नाही. निवडुंग सिनेमात हृदयनाथ यांनी गायले म्हणूनही असेल ! पोरटोरही टी.व्ही. वर गातात. (पाठ्यपुस्तकातही लागले आहे म्हणे) तर काय आहे.... सिनेमात एकुण पाच कडव्यातली दोन गाळूनच टाकली आहेत. तशी ही यांची जूनी सवय. ज्ञानेश्वरीतील ओव्या गाळतांना यांना काही खंत वाटली नाही. इथे तर ही मित्राचीच कविता. त्यामुळे झाले काय "गेली" याचा अर्थ "वारली" असा घेऊन सगळ्यांनी ग्रेस कळला असा आनंद व्यक्त केला. आता सर्व कविता पहा.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता
सिनेमात यातले २ रे व ५ वे कडवे गाळले आहे. आता दुसरे कडवे कवितेत ठेवा. चार कडव्यांची एकसंघ कविता होते व "वारली" हा अर्थ घेऊनही अर्थ जुळवता येतो. मीही त्या आनंदात होतो. पाचवे कडवे संपूर्णत: अनाकलनीय होते. दुर्गाबाईंचे "व्यासपर्व" चांगल्यापैकी वाचनात असल्याने द्रौपदी-कृष्ण यांच्यातील भ्रातृभावा पलिकडील एका अनोख्या भावसंबंधा विषयी दूर्गाबाईंना सुचित करावयाचा अर्थ माहीत होता. पण कवितेशी सांधा जुळवण्यास तो पुरेसा नव्हता. गुरुवर्य जयंतरावजी आले व त्यांनी आपल्याला एका कवितेचा (मोठा भाग तरी) अर्थ लागला या आनंदावर एक भली मोठ्ठी फुली मारली इतकेच नव्हे तर आपण जाणीवपूर्वक कविता वाचतो या फुग्याला टाचणी लावली
प्रथम त्यांनी "गेली" म्हनजे "वारली" हा अर्थच बाद केला. गेली म्हणजे घराबाहेर गेली असा सरळ अर्थ लावून त्यांनी संपूर्ण कविता उलगडवून दाखविली आहे. ग्रेसच्या समग्र कवितांमध्ये "आई" कशी येते त्याची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी आपली मते मांडली आहेत. हा सगळा भाग येथे देणे शक्य नसल्याने आपण थोडक्यात त्यांच्या विचाराची दिशा पाहू.
(१) फ़्राईडचा मदर फ़िक्सेशनचा सिद्धांत
(२) ग्रेसची ’आई"विषयी संकल्पना.
(३) कवितांमध्ये दिसणारे आईचे स्वैर वर्तन
(४) तिचे बाहेर जाण्यासंबंचीचे क्लेषकारक उल्लेख
(५) स्त्री" संबंधी ग्रेसची विचारसरणी
(६) कवितेतील लैंगीक उल्लेख
(७) आई संध्याकाळी घरी नसल्यामुळे वात्सल्यात कमतरता
(८) निरनिराळ्या टीकाकारांची या संबंधीची मते इत्यादि
मग ५ व्या कडव्याचा संबंध जुळवणे सोपे होते.
हुश्य...खरे सांगू ? मी ग्रेस वाचणेच बंद केले. चंद्रमाधवीच्या देशांत मित्राने नेले व परत केले नाही, मी त्याला धन्यवादच दिले.
परत एकदा, ग्रेस, ग्रेसच्या कविता, कविता वाचणारे, त्या समजल्या म्हणणारे "मेरा सलाम "
शरद
वाचने
9095
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
मस्त!
In reply to मस्त! by समीरसूर
बरोब्बर
In reply to बरोब्बर by एस
+१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX"चंद्रमाधवीच्या देशात"
मी हेच आधी च्या संक्षींच्या
In reply to मी हेच आधी च्या संक्षींच्या by प्रसाद१९७१
@ ससु - तुम्हाला "झरे
In reply to @ ससु - तुम्हाला "झरे by प्रसाद१९७१
"झरे चंद्रसजणांचे"
खरं तर निवांत प्रतिसाद
In reply to खरं तर निवांत प्रतिसाद by अस्वस्थामा
बर्याचदा कविता कळणे हा
In reply to बर्याचदा कविता कळणे हा by बॅटमॅन
+१
In reply to खरं तर निवांत प्रतिसाद by अस्वस्थामा
नेमका प्रतिसाद! अावडला.
In reply to खरं तर निवांत प्रतिसाद by अस्वस्थामा
छान प्रतिसाद
In reply to छान प्रतिसाद by समीरसूर
बरं झालं. मला वाटत होते कि
समजायला अवघड आहे हे खरे!
लेख मस्तच. ग्रेस खासच.
आई
In reply to आई by तिमा
>> तरीही लोकांनी त्यांचा
In reply to >> तरीही लोकांनी त्यांचा by धन्या
साईबाबा
खिखिखि!
क्य बात है
_/\_
ग्रेस, यांच्या कवितेचा अर्थ
पटलं पटलं! "डुडूळगावचा
कविता समजली नाही याचा अर्थ
मला समजत नाही
शरद, लेख नेहमीप्रमाणेच चांगला
In reply to शरद, लेख नेहमीप्रमाणेच चांगला by इन्दुसुता
वेगळ्या उत्कट भावना सांगणारे
शरद राव फारच खर्च झाला हो तुमचा या नादात !
In reply to शरद राव फारच खर्च झाला हो तुमचा या नादात ! by मारवा
क्याब्बात! क्याब्बात!!
ग्रेस वरील काही लिंका
@ मारवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण