Skip to main content

महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 02/10/2014 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील. हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्‍या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय. कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती. महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे. शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्‍याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत. http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hun… कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही. निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल. आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.

वाचने 90938
प्रतिक्रिया 177

प्रतिक्रिया

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

नीट वाचा आधी "दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?" हे विधान मी कुठे केले ????? कैच्याकै ठिगळे लावायचीत..?

जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...

तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .

In reply to by उदयन

ठिक आहे ते तुम्ही नाही दुष्यंत यांनी म्हटलेले आहे. मी लावलेल्या ठिगळांविषयी दिलगिरी. आता तुम्ही लावलेल्या ठिगळांविषयी खुलासा करा--- १. इथे तुम्हीच म्हणता त्याचा अर्थ हा की पंतप्रधानांचे परदेश दौरे ही पिकनिक असते. २. तुम्ही इथे म्हटल्याप्रमाणे मोदी आमची तिजोरी रिकामी आहे असे म्हणत कुठे आणि कधी गेले होते? आहेत काही उत्तरे? नसतील तर स्वतःची लावलेली ठिगळे निमूटपणे मान्य करा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पहिल्या १० दिवसातच सांगितलेले आहे कृपया त्या वेळेचे वर्तमानपत्र वाचुन घ्यावे. मी हवेत कधीच काहीच लिहित नाही हे तुम्ही श्रीगुरुजी यांना देखील विचारु शकतात . सरकारची तिजोरी मोकळी आहे काँग्रेस ने घोटाळे करुन तिजोरी रिकामी आहे मला ती तिजोरी आधी भरावी लागणार मग विकासाची कामे करावी लागणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले आहे. राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते उलट अदानी तिथुन वीज निर्मित करणार होता त्याचे देखील संदर्भ असतील. पण नेपाळवाल्यांनी अडानीला अजुन तरी दाद दिली नाही आहे.. बहुतेक नंतर देखील होउ शकेल ती गोष्ट वेगळी. राहिले अमेरीकन दौरा . तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल. अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते. ज्या एफडीआय ला भाजपाने विरोध केला त्यामुळे मागील सरकार मधे विदेशी गुंतवणुक झाली नाही हवी तितकी . त्याच एफडीआयचे गाजर मोदींनी अमेरिकन कंपन्यांना दाखवले. आणि गुंतवणुक थोडीफार पदरात पाडुन घेतली. जर तेच गाजर दाखवायचे होते ते भारतात बसुन देखील दाखवता आलेच असते . शेवटी त्यांना पैसाच कमवायचा आहे. बहुतेक आता तुम्हाला मी काय सांगतोय ते कळले असे ही शेवटची अपेक्षा ठेवतो :)

In reply to by उदयन

नेपाळसाठी १ बिलिअन डॉलर्स ही मोठी रक्कम असली तरी भारतासाठी ती तितकी मोठी रक्कम नाही हे समजून यायला अडचण येऊ नये. विशेषतः कधीच हवेत न बोलणार्‍यांसाठी. १ बिलिअन डॉलर्स म्हणजे सुमारे ६१०० कोटी रूपये.आणि ही रक्कम मोठी की नेपाळबरोबर संबंध सुधारणे अधिक महत्वाचे हा निर्णय घेण्याची पात्रता तुमच्यापेक्षा कोणाही भारतीय पंतप्रधानाकडे (अगदी चरणसिंग-चंद्रशेखर-देवेगौडा सुध्दा) अधिक आहे/होती याविषयी नक्कीच खात्री आहे.
राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते
उदयन हे काय मानतात यावर भारताची परराष्ट्रनिती अवलंबून नाही ही किती सुदैवाची गोष्ट आहे. तुम्ही काही हवे ते माना हो भारतातल्या जनतेने आपली पसंती मोदींना दिली आहे त्यामुळे तुम्ही काय मानता ही बाब पूर्ण गौण आहे.
तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल.
कमाल आहे.मग या न्यायाने कुठच्याच अमेरिकन अध्यक्षांबरोबर कसलीच चर्चा करू नयेत की कसलेही करारमदारही करू नयेत.मुळात अध्यक्षांच्या टर्ममध्ये पहिल्या २२ महिन्यातच मिड-टर्म निवडणुका होतात. त्यापूर्वीचे दोनेक महिने तरी त्यातच जातात. म्हणजे अध्यक्षांची टर्म सुरू झाल्यापासून मिडटर्म निवडणुकांपर्यंतही तशी दिडेक वर्षच की.मिडटर्म निवडणुका होतात ना होतात तोच आणखी सव्वा-दिड वर्षात अध्यक्षीय निवडणुकांसाठी प्रायमरी सुरू होतात. मग प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणुका.तेव्हा तुम्ही लावत आहात त्याच न्यायाने अमेरिकेत काहीच व्हायला नको. अर्थातच परराष्ट्रसंबंधांमध्ये अमेरिकेत (आणि भारतातही) बर्‍याच अंशी सरकार कोणत्या पक्षाचे आहे त्याचा फार फरक पडत नाही हे तुमच्यासारख्या पिकनिकवाल्यांना कळेल अशी अपेक्षा नाहीच. बिल क्लिंटन आणि बुश वेगळ्या पक्षांचे नेते होते तरीही बुश यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध क्लिंटन यांच्या काळात होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले हे कोण लक्षात घेतो?
अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते
मी म्हणतो की पी.एम.ओ आणि उदयन यांच्यात डायरेक्ट हॉटलाईनच प्रस्थापित करावी.म्हणजे कसे पंतप्रधानांना नक्की काय निर्णय घ्यावा याविषयी तज्ञ मार्गदर्शन डायरेक्ट उदयन यांच्याकडूनच होऊ शकेल. :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही ;) ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी . सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. हेच काय ते अच्छे दिन होते. ( आता लिहु नका की केंद्रा कडुन आदेश आले आहेत की चोख प्रत्युतर द्यावे. सरकार कोणाचे ही असो आपले सैनिक चोख प्रत्युतर देतच असते. केंद्राच्या आदेशाची वाट बघत नाही कारण तो आधीच पब्लिसिटी स्टंट न करता पिएमओ यांनी दिलेलेच असतात ) फक्त आताचे सरकार टिव्हीच्या कॅमेरावर सांगत असते की आदेश दिलेला आहे कैच्याकै बोलायचे म्हणुन बोलतात

In reply to by उदयन

तुम्ही कितीही आक्रस्ताळेपणा केलात तरी २०१९म्पर्यंत मोदीच पंतप्रधान राहणार आहेत. तेव्हा इनो घ्या. बरं असतं प्रकृतीला.

In reply to by उदयन

तुमचे आणि वटवाघुळाचे संवाद वाचले.
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
ब्रिक्स, युनो आणि ईन ऑल आंतरराष्ट्रीय संबध सांभाळायसाठी करायला लागणार्‍या गोष्टी पिकनिकमधे मोडतात? सर्वसमावेशक असा एक मंच हवा म्हणुन जी-ऑल ची मागणी केली तर कुठे काय बिघडलं?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?
फिगर ऑफ स्पीच नावाची गोष्ट सर्व भाषांमधे अस्तित्वात असते. अयोग्य कारणांमधे खाल्ला गेलेला पैसा परत गोळा करायचाय असा अर्थ नसु शकतो?
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही. ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी .
पंतप्रधान भारताचे आहेत का भाजपाचे?
सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत.
मग पंतप्रधानांनी स्वतः बंदुक रणगाडे घेऊन लढायला जावं अशी तुमची अपेक्षा आहे का? पंतप्रधान त्यावर बोलतं नाहीत? मग पाकिस्तानशी आता चर्चा नाही असं कोणं म्हणाल बॉ? सैन्याला फ्री हँडचे आदेश काय आकाशवाणी होऊन मिळाले का? आंतरराष्ट्रिय संबध ही प्रचंड नाजुक गोष्ट असते. एक चुकीचा शब्द प्रचंड मोठा संघर्ष निर्माण करु शकतो. आपलं हित जपतानाच आपले हितचिंतक वाढवणे, आपल्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सहकारी मिळवणे ही काय सोपी गोष्ट वाटली का? त्यासाठी आर्थिक मदत, इन्फ्रस्ट्रक्चर, लष्करी मदत अश्या स्वरुपात मदत करावीच लागते.

In reply to by उदयन

अचं कचं ,अचं कचं उगी हां ! आपन ना पुडच्या वेली ना मोदि अंकल ना भाषन ना तुमच्या कडून लिउन घैला सांगू हां !

In reply to by दुश्यन्त

भक्त मिडीयाने त्या मुद्द्याची चर्चाच केली नाही परंतु युनोत त्या मुद्याची नक्कीच चर्चा होईल समजा तुम्ही मिपावर एक गृप बनवला आणि दुसर्या ग्रुप चे सभासद घ्यायच्या प्रयत्नात आहेत आणि दुसरी कडे मिपाच्याच अ‍ॅडमिन ला सांगत आहे की असे गृप बनने हानिकारक आहे हे बंद करा. आता तुम्ही परत गृप चे सभासद कोणत्या तोंडाने मागायला जाणार आहे.. ते ग्रुपवाले घेतील का ? परराष्ट्रनिती सुषमा स्वराज यांनाच सांभाळु द्यावी ही कळकळीची विनंती मोदीसाहेबांना करत आहे

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला? हे आवडले मागे एकदा एका धाग्यावर लिहिले होते मोदी विरोधकांना कुठून कुठून शोधून मुद्दे काढावे लागतात , पण त्याची अवस्था खोदा पहाड निकाला चुहा , म्हजे म्हणी मध्ये ओरीजनल चुहा असेच आहे , हा शहा ह्यांचा चुहा नाही आहे.

श्रीरंग जोशींशी सहमत! ...या भागांतील शेतकर्‍यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही.+१ उद्धव ठाकरेंनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला होता. उद्धव बोलायला शामळू वाटतात, वक्तृत्व प्रभावी नाही वगैरे चर्चा होतात मात्र संघटन कौशल्य चांगले आहे. एखादा असता तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे झुकून जागावाटपात गप्प राहिला असता मात्र सुरुवातीला १६९ वरून १६० आणि नंतर १५१ अश्या जागा दिल्यावर आता याख्ली येणार नाही असे रंगशारदामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले होते. सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत.

>>> सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत. हो का? पण भाषणातून "मायभवानीची शपथ, मर्दमराठा, शूर मावळे, अमक्याचा कोथळा बाहेर काढला, तमक्याला गाडले" अशीच वाक्ये फक्त ऐकू येतात आणि त्यात वेगळेपण काहीच नाही कारण शिवसेना जन्मापासून हेच बोलत आली आहे.

शिवछत्रपतींची साथ तर आता भाजपला पण घ्यायला लागत आहे. शिवसेनेने व्हिजन डोक्यूमेंट देवून सुरुवात तरी केली आहे.

In reply to by दुश्यन्त

शिवछत्रपतींचे नाव प्रत्येक पक्ष वापरतो. भाजपने वापरले तर त्यात वावगे काय? आणि शिवसेनेचे व्हिजन डॉक्यूमेंट एवढे प्रभावी असेल तर शिवसेनेचे नेते त्यावर बोलण्याऐवजी प्रत्येक भाषणातला ९० टक्क्यांहून अधिक वेळ भाजप व मोदींना शिव्या देण्यात का वाया घालवित आहेत?

वृत्तपत्रात पहिल्याच पानावर मोदींचा चेहरा असलेली भाजपाची जाहीरात पाहण्यात आली "घेउन शिवरायांचा आशिर्वाद चला मोदी संगे" असे काहीतरी होती इतक्या मोठ्या पानावर फक्त मोदीच होते. ज्यांच्यानावाने मत मागत आहेत ते "शिवराय" यांचा छोटासा देखील फोटो कुठेच दिसत नाही ? यावरुन भाजपाची वृत्ती आनि व्यक्तिकेंद्री राजकारण ( जे गांधीं नावावर गावभर ढोल वाजवत होते) दिसुन येते

शिवसेनेच्या काही जाहिराती पाहिल्या. बहुतेक सर्वच पक्षांच्या जाहिराती दिसत असतात. या जाहिरात युद्धात नेमका मेसेज अतिशय मनस्वीपणे व बटबटीतपणा टाळून पोचवणार्‍या शिवसेनेच्या जाहिराती सर्वात प्रभावी वाटत आहेत. ==== एका मुलाखतीत आदित्य ठाकरेचे बोलणे किमान राहुल गांधींपेक्षा नक्कीच उजवे वाटले (आणि उद्धव ठाकरे, तसेच गडकरी-फडणवीस यांच्यापेक्षाही ) मुंबईतील लोकांच्या बोलण्याचा कानोसा घेतला तर तिथे भाजपाला व त्यांच्या समर्थकांना वाटतेय तितकी ही लढाई सोपी जाणार नाहीये. मुंबई (शिवसेना वि काँग्रेस वि भाजपा), प. महाराष्ट्र (राकॉ वि स्वाभिमानी/भाजपा वि काँग्रेस), नाशिक/खानदेश (शिवसेना वि राकॉ वि कॉ वि मनसे), कोकण (शिवसेना वि काँग्रेस) अशा मुख्य लढती होत असताना निव्वळ मराठवाडा (तिथेही मुंडे नाहित पण सिंपथी वेव्ह आहे असे समजु) व विदर्भ (गडकरींचा अर्थपूर्ण सहभाग गृहित धरू) यांच्या जोरावर विधानसभा मिळवता येणार नाही.

राहुल जर नसता तर मोदींना निवडणुक कठिण गेली असती. त्यामुळे राहुलची तुलना कोणत्याच नेत्यांबरोबर करणे चुकिची आहे

d गुरुजी हे घ्या.. जरा बघा तथ्ये काय आहेत ते.

इतका तुमचा गुजरात मागे कसा

. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?

In reply to by उदयन

गायबले ? सत्य परिस्थिती दाखवली की भक्तगण गायब होतात. ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने . उत्तरच नाही त्यावर कुणाचे

In reply to by उदयन

आकडे रँडम आहेत त्या जाहिरातीतले.
ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने
' त्याच गुजरात मॉडेलनी १०पैकी ७ सीटा दिल्या होत्या बहुदा

भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी.

In reply to by प्रसाद१९७१

>>> भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. शिवसेनेच्या वळचणीखालून कधीतरी बाहेर पडणे आवश्यक होते. २०१४ ची विधानसभा निवडणुक ही त्यासाठी सर्वोत्कृष्ट संधी होती. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे शक्य दिसत नाही. पण तरीसुद्धा दोघातला खरोखर मोठा कोण हे निकालानंतर नक्कीच ठरेल आणि भविष्यात परत युती झाली तरी त्यात असमान जागा वाटप होणार नाही हे नक्की. जर दोघे भाऊ एकत्र कुटुंबात राहत असतील आणि एक भाऊ दुसर्‍यापेक्षा वेगाने प्रगती करीत असेल तर ते वेगळे होणे स्वाभाविक आहे आणि वेगळे होणेच योग्य. वेगळे झाल्यामुळे कमी वेगाने जाणार्‍या भावाची वेगाने जाणार्‍या भावाबरोबर फरपट होणार नाही व जास्त वेगाने जाणार्‍या भावाला संथ चालणार्‍या भावामुळे रेंगाळत रहावे लागणार नाही. युतीच्या बाबतीत हेच होणे स्वाभाविक होते. >>> अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी. १९ ऑक्टोबरला ठरेल निर्णय योग्य होता का चुकीचा. युती टिकली असती तर युतीला नक्कीच २०० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या, पण भाजपला शिवसेनेची मुजोरी सहन करीत कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली असती. आता स्वबळावर कोणालाच बहुमत मिळणार नाही, परंतु भाजपचे जे काही आमदार निवडून येतील ते स्वबळावर असतील. त्यामुळे स्वबळाचाही नक्की अंदाज येईल व भविष्यात सेनेच्या मुजोरीसमोर झुकण्याची गरजच नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा विचार आहे का? प्रार्थमिकता शप, अप, छ्भु, नारा ह्यांचे राज्य संपवण्याची ठेवायला पाहीजे होती. ते देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्वाचे होते. भाजप चा मुख्यमंत्री आहे का शिवसेनेचा महत्वाचे नव्हते. देश पक्षाच्या आधी येतो हे कळत नाही का?

In reply to by प्रसाद१९७१

आपली ताकद सेनेपेक्षा जास्त असताना भाजपने का दुय्यम भूमिका घ्यावी हाच मुख्य प्रश्न आहे. नारा, छभु इ. चे राज्य संपवायचे ही प्राथमिकता आहेच, परंतु भाजपने पडते घेऊनच ही प्राथमिकता प्रत्यक्षात येईल आणि भाजपने एकटे लढले तर ही प्राथमिकता प्रत्यक्षात येणारच नाही हे कशावरून? सेनेबरोबर युती तोडल्याचे भाजपला आज हायसं वाटलं असेल. २५ वर्षे ज्या पक्षाबरोबर युती होती त्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात आपल्याविषयी इतका विखार भरलेला असेल याची भाजपला कल्पना नव्हती. आज तर प्रत्यक्ष मोदींच्या वडीलांचा उद्धार करेपर्यन्त सेनेची मजल गेली. आता बहुमत मिळालं नाही तरी सेनेचं जोखड खांद्यावरून कायमचं उतरलं याचा भाजपला नक्कीच आनंद होईल.

In reply to by श्रीगुरुजी

सेनेचे जोखड खरच उतरले का? निवडणुक झाल्यावर त्यांच्याशीच युती करावी लागणार. आणि केंद्रात तो बिनकामाचा मंत्री कशाला ठेवला आहे मोदींनी, त्याला पहीला हाकलून द्यायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून मोदींनी स्वतःची व भाजपची प्रतिमा उंचावली आहे. एकीकडे मोदींना अफझलखानाची उपमा देताना व मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देताना, त्याच मंत्रीमंडळात तुमचा मावळा कसा या अडचणीत आणणार्‍या प्रश्नाला शिवसेनेकडे उत्तर नाही. दुसरीकडे गीते स्वतःहून गेले तर उत्तम अन्यथा त्यांना न काढता आपण सूडबुद्धी ठेवत नाही अशीच मोदींनी प्रतिमा निर्माण केली आहे. गीते मंत्रीमंडळात असल्याने भाजपला काहीच अडचण नाही परंतु शिवसेनेची मात्र अडचण झाली आहे. जर महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळून भाजपचे सरकार स्थापन झाले तर काही काळाने दिल्लीत शिवसेनेत फूट पडून सेनेचे बहुसंख्य खासदार भाजपत सामील होतील किंवा पक्षादेश झुगारून मोदींना पाठिंबा देतील. गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून भाजपने शिवसेनेसाठी आपले दार अजूनही थोडेसे उघडे ठेवलेले आहे.

आता उद्धव ठाकर्‍यांना मोदींचे मंत्रीमंडळ ही अफझलखानाची सेना वाटत आहे. या अफझलखानच्या सैन्यात आपलाही एक मावळा आहे याचे त्यांना विस्मरण झालेले दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला नाही ना झाले विस्मरण? मग काढा ना त्या गितेला मंत्रिमंडाळातून, का भीती वाटतेय मराठी मते जाण्याची?

In reply to by नानासाहेब नेफळे

त्यांना मंत्रीमंडळातून काढल्याने मराठी मते का जातील? गीते एकटेच अखिल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात असा तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय. मंत्रीमंडळात इतर अनेक मराठी मंत्री आहेत. मोदींना शिव्या देताना शिवसेनेचच हसं होतंय. त्यांची जीभ अगदी सैल सुटली आहे, पण सत्तालोभामुळे दिल्लीत व मुंबई/ठाणे महापालिकेत भाजपशी संबंध तोडायची तयारी नाही. मोदींनी अत्यंत प्रगल्भपणा दाखवून, शिवसेनेवर अजिबात बोलणार नाही, असे सांगून केवळ २-३ वाक्यात भाजप आणि शिवसेनेत किती फरक आहे ते दाखवून दिलंय. शिवसेनेचे व मनसेचे सर्व नेते भाजपविरूद्ध कमालीचा थयथयाट व त्रागा करत असताना दोघांनाही मोदींनी अनुल्लेखाने मारून आपली प्रगल्भता दाखवून दिली. अर्थात यातून सेनेच्या व मनसेच्या नेत्यांना प्रगल्भता येण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, एक सल्ला आहे. जॉर्ज बर्नार्ड शाँच एक वाक्य असं आहे: “Never wrestle with pigs. You both get dirty and the pig likes it.” डुकरांशी कुस्ती खेळू नका. तुम्ही दोघेही घाणीने तर माखालच, आणि डुकराला तेच आवडतं. दुसरं जॉर्ज कार्लिनचं एक वाक्य असं आहे: “Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience.” मूर्खाबरोबर वादविवाद करू नका. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर उतरावं लागतं आणि मग ते तुमच्यावर अनुभवाने मात करतात. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

In reply to by काळा पहाड

वरती कला पहाड ह्यांनी इंग्रजी लोकांच्या म्हणी दिल्या आहेत छान आहे पण हा धागा काथ्याकुट मध्ये आहे काथ्याकुट होणारच आपल्या आवडत्या पक्षावर टीका झाली म्हणून खचून जावू नका काळा पहाड.. . चार नेत्यांचे चार समर्थक आपल्या पक्षाची बाजू मांडणारच. आता नेतेच पातळी सोडून एकमेकांवर शिव्यागाळ करतात तर मिपाकरांनी काय घोडे मारलेय... माझ्या मते भाजपला सर्वाधिक जागा मिळतील पण त्या ७० च्या घरात असतील ते राष्ट्रवादीची नि इतर छोट्या मोठ्या पक्षांची मदत घेवून सरकार बनवण्याची शक्यताच जास्त वाटतेय. भाजपा-७०, शिवसेना-४५,कॉंग्रेस-६५ राष्ट्रवादी-५४ मनसे-१५ बाकी इतर.

In reply to by श्रीगुरुजी

अफझल खान हा दिल्लीहून कसा काय आला .....? बर आला तर तो भेट घ्यायला मिठी मारायला आला होता ना ? इथे तर २५ वर्षाची मिठी सैल झालेली दिसतेय.

ही इथली शिवीगाळ बघता क्लिंटनसारखे लोक निवडणुकांबद्दल काही लिहितील असं वाटत नाही! =))

हे अजून एका सर्वेक्षणाचे आकडे, हा त्यावरील सविस्तर लेख http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15959/1/maharashtra-assembly-e… हे आकडे खरे होतील की खोटे यावर माझे काहीही मत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

कालपासून अनेक सर्वेक्षणांचे आकडे आले आहेत. हे कालच्या सर्वेक्षणांचे आकडे आणि हा त्यावरील लेख http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bjpallies-154-seats-elect…

काल 'झी २४ तास' च्या दुसर्‍या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ आताच पाहिलेल्या २ सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. (१) एबीपी-नेल्सन भाजप - १२०, शिवसेना - ६७, काँग्रेस - ४६, राष्ट्रवादी - ३६, मनसे - ८ (२) इंडिया टीव्ही भाजप : १३२-१४२, शिवसेना : ५२-६२, काँग्रेस : ३८-४८, राकॉं : ३३-४३, मनसे : ७-१३ आतापर्यंत जे अंदाज आहेत त्यांच्यामुळे गोंधळ अजूनच वाढलेला आहे. सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल व मनसे हा सर्वात लहान पक्ष असेल हा समान मुद्दा आहे. मात्र एकूण जागांचा अंदाज खूप गोंधळात टाकणारा आहे. भाजपला मिळणार्‍या जागांचा अंदाज ९६-१५४ इतक्या मोठ्या कक्षेमध्ये आहे. शिवसेना ३८-६७ हीदेखील मोठी कक्षा आहे. काँग्रेस २५-६३ आणि राकाँ १६-४३ हा देखील खूप मोठा फरक आहे. सर्वांनीच मनसेला २० च्या आत जागा दिल्यामुळे मनसे अदखलपात्र पक्ष आहे. एकंदरीत महाराष्ट्रात जागांचा अंदाज काढणे अत्यंत अवघड झाले आहे.

हरयाना राज्यासाठी खालील अंदाज आजच प्रसिद्ध झाले आहेत. १) एबीपी-नेल्सन भाजप - ३६, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - ३३, काँग्रेस - १६, इतर - ५ (२) इंडिया टीव्ही भाजप - ३४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २७, काँग्रेस - १९, इतर - १० हरयानात काँग्रेसचा दारूण पराभव निश्चित दिसतो व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. भारालो व भाजप मध्ये कमालीची चुरस दिसते. बहुमतासाठी किमान ४६ जागांची गरज आहे. काँग्रेस, भाजप व भारालो यापैकी कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तर ४६ चा आकडा पार होतो. परंतु असे होण्याची शक्यता शून्य आहे. अगदी अशीच परिस्थिती डिसेंबर २०१३ मध्ये दिल्लीत निर्माण झाली होती. हरयानादेखील दिल्लीप्रमाणे राष्ट्रपती राजवटीकडे निघाला आहे असे दिसत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हरियाणामध्ये भाजपला इतक्या जागा सर्वेक्षण देत आहे याचे खरोखरच आश्चर्य वाटत आहे.महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्ये भाजपपुढचा मोठा प्रश्न म्हणजे राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वाचा अभाव.पूर्वी सूरज भान हे पक्षाचे तसे बऱ्यापैकी मोठे नेते होते तरीही राज्यपातळीवर नेतृत्व देऊ शकत नव्हते.सुषमा स्वराजही अंबाल्यातून हरियाणा विधानसभेवर निवडून जात.त्या राज्यात थांबल्या असत्या तरी राज्यात पक्षाला नेतृत्व मिळाले असते.पण १९९० च्या दशकाच्या सुरवातीलाच त्या केंद्रीय राजकारण्यात गेल्या आणि राज्यापासून दूरच गेल्या.१९९६ मध्ये भाजपने बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पक्षाशी युती करून निवडणुक लढवली होती.त्यावेळी रामविलास शर्मा यांचे नेतृत्व राज्यात येईल असे दिसत होते.पण २००० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव अनेक वर्षे कुठेच नव्हते.मागच्या वर्षी ते प्रदेशाध्यक्ष झाले.वाजपेयी सरकारमधील मंत्री आय.डी.स्वामी २००४ आणि २००९ मध्ये दणकून पराभव झाल्यानंतर आणि वाढत्या वयामुळे सक्रीय नाहीत. बाकी नाव घ्यावा असा कोणीच नेता पटकन डोळ्यासमोर येत नाही. विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरचा चेहरा मतदारांपुढे ठेवावा लागतो.लोकांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावाने मते दिली.परत विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्याच नावाने मते देतील का हा प्रश्नच आहे.

वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे मानले तर खालील शक्यता आहेत. (१) भाजप + शिवसेना असे होण्याची अगदी थोडीशीच शक्यता आहे. या दोन पक्षातील वितुष्ट इतके विकोपाला गेले आहे व विशेषतः शिवसेनेचा अहंकार इतका तीव्र आहे की हे दोघे पुन्हा एकत्र यायचे असतील तर शिवसेना जवळपास अशक्य अशा अटी पुढे ठेवेल व त्यामुळे ते एकत्र येणार नाहीत. (२) भाजप + राष्ट्रवादी किंवा भाजप + काँग्रेस - अशी युती होण्याची शक्यता शून्य आहे. (३) काँग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना - मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार व कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार या मुद्द्यांवरून प्रचंड भांडणे होऊन अशी आघाडी प्रत्यक्षात येणार नाही. तसेच काँग्रेस शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी व अमराठीविरोधी पक्षाबरोबर आघाडी करण्यास नक्कीच कचरेल. विशेषतः शिवसेनेच्या उत्तर भारतीय व बिहारींविरूद्ध असलेल्या भूमिकेमुळे व २०१५ मध्ये होणार्‍या झारखंड व बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस शिवसेनेबरोबर आघाडी करणार नाही. (४) जर भाजप १४५ च्या खूप जवळ पोहोचला (१३० पेक्षा जास्त) व मनसेला १५ च्या आसपास जागा असतील तर कदाचित ते दोघे एकत्र येऊ शकतात. परंतु उद्धवप्रमाणेच राज ठाकरेचा अहंकार अत्यंत तीव्र आहे व तो अत्यंत बेभरवशाचा असल्यामुळे अशी युती झाली तरी ती टिकणार नाही. (५) त्यामुळे जर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन वर्षभरात पुन्हा निवडणुक होईल.

In reply to by श्रीगुरुजी

माझा अंदाज भाजप ९० ९५ शिवसेना ७० ७५ काँग्रेस ५० ५५ राष्ट्रवादी ३५ ४० आरपीआय रासप स्वा शे १५ १७ मनसे १० १५ ईतर १५ २०

वेगवेगळी सर्वेक्षणे भाजपला २८-३०% मते देत आहेत.चौरंगी-पंचरंगी लढतीत २८-३०% मते २८८ पैकी ११०-१२० जागा नक्कीच देऊ शकतील.त्यातही भाजपची मते ही अधिक concentrated असतात त्यामुळे तेवढीच मतांची टक्केवारी असूनही पक्ष जास्त जागा मिळवू शकतो.मला वाटते की शिवसेनेने काही अक्षम्य चुका केल्या आहेत त्याचा फायदा भाजपला मिळून भाजप ११०-१२० जागा मिळवू शकेल. १. युती तुटल्यापासून शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपलाच लक्ष्य बनवत आहे.राज ठाकरेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य बनवित आहेत पण त्याचबरोबर मोदी हे पण टार्गेट आहेतच. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीही शिवसेनेपेक्षा भाजप आणि मोदींवरच टिका करत आहेत. त्यामुळे असे चित्र हळूहळू उभे राहत आहे की ही निवडणुक विधानसभेची असली तरी आघाडी सरकारच्या कामावरील मत यापेक्षा नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे असे स्वरूप येत आहे. असे स्वरूप येणे भाजपसाठी चांगलेच आहे.कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांच्या मतांना एकवटायला भाजप हाच मोठा पर्याय उभा राहिला आहे. इतर पक्षांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही मोदी हे मोठे शत्रू वाटतात असे लोकांना वाटले तर ते चुकीचे ठरू नये. २. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे तुकडे करणार इत्यादी गोष्टी शिवसेनेला दर निवडणुकीच्या वेळी आठवतात तशा यावेळीही आठवल्या आहेत.या सगळ्या गोष्टी बोलायला शिवसेनेबरोबरच राज ठाकरेही आहेतच. इतकेच काय तर नारायण राणेही रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईतून हलविणार इत्यादी गोष्टी बोलत होते. नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे हे धृवीकरण करण्यात या मंडळींनीच हातभार लावला आहे.एकतर स्वत: नरेंद्र मोदींनी तसे होणार नाही असे जाहीरपणे सांगितले.स्वतंत्र विदर्भावर मोदींनी सांगितल्यानंतरही संभ्रम होता.पण पक्षाच्या जाहिरनाम्यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नाही.तसेच गेल्या १-२ दिवसात पक्षाचे स्वतंत्र विदर्भवादी वाचाळवीर थोडे शांत आहेत. या सगळ्यातून एकतर शिवसेनेच्या मुद्द्यातील हवा बरीच कमी झाली आणि या निवडणुकीला विनाकारण मराठी विरूध्द गुजराती असे स्वरूप दिले गेले आहे आणि ते दिले भाजपने नाही तर शिवसेनेने.निदान मुंबईत बोरीवली,पार्ले, घाटकोपर,मुलुंड या भागातून एकगठ्ठा गुजराती मते भाजपला मिळतील याची व्यवस्था शिवसेनेने त्यातून करून ठेवली आहे. ३. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देणे ही उध्दव ठाकरेंची अक्षम्य चूक आहे असे मी म्हणेन.चार-पाच महिन्यांपूर्वीच लोकांनी नरेंद्र मोदी या एका नावावर भरभरून मते दिली होती.कदाचित एप्रिल-मे इतका नसेल पण नरेंद्र मोदी या नावाचा दबदबा अजूनही लोकांमध्ये आहेच.त्यामुळे खास शिवसेना स्टाईल शिवराळ भाषेत नरेंद्र मोदींना अशी उपमा दिल्यामुळे मोदींविषयी सद्भावना असलेल्या निदान काही लोकांची मते भाजपलाच मिळतील अशी व्यवस्थाही उध्दव ठाकरेंनी करून ठेवली आहे. ४. निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार अशा स्वरूपाच्या बातम्या कालपरवापासून येऊ लागल्या आहेत.यातून शिवसेना-मनसेच्या पारंपारिक मराठी मतदारांमध्ये संभ्रम वाढणार आहे हे नक्की.मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी थोडेफार "तगडे" उमेदवार दिले आहेत. उदाहरणार्थ दहिसरमध्ये मनसेकडून माजी महापौर शुभा राऊळ विरूध्द शिवसेनेकडून विनोद घोसाळकर, मागाठाणेमधून मनसेकडून प्रवीण दरेकर विरूध्द शिवसेनेकडून (२००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दरेकरांना चांगली टक्कर दिलेले) प्रकाश सुर्वे, दिंडोशीत मनसेकडून शालिनी ठाकरे विरूध्द शिवसेनेकडून महापौर सुनील प्रभू, वांद्रे पूर्व मधून मनसेकडून शिल्पा सरपोतदार विरूध्द शिवसेनेकडून प्रकाश (बाळा) सावंत इत्यादी.मुळातच या दोन तुल्यबळ उमेदवारांमधील निवडणुक आणि त्यात हे नंतर एकत्र आले तर काय हा संभ्रम. अशा वेळी या दोन पक्षांना मानणाऱ्या मराठी मतांमध्ये उभी फूट पडून त्याचा फायदा इतरांना मिळायची शक्यता जास्त. तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त.राज ठाकरेंचा उत्तर भारतीय विरोध आणि शिवसेनेचा गुजराती विरोध यातून हे दोन समुदाय हे दोन्ही पक्ष ज्याला विरोध करत आहेत त्या पक्षाकडे--भाजपकडे वळायची शक्यता जास्त. मुंबई परिसरात अमराठी मतांची संख्या बरीच आहे आणि या परिसरात शिवसेना-मनसे यांच्यात मतविभागणी होणार असेल तर भाजपची वाट आणखी सोपी होईल.काही प्रमाणात कॉंग्रेसलाही याचा फायदा होईलच. ५. सीमेवर गोळीबार चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात काय करत आहेत म्हणून हाकाटी इतर सगळ्या पक्षांनी केली.अशा प्रकारचा प्रचार ही एक दुधारी तलवार असते. कालपासून सीमेवरील गोळीबार थंडावला आहे, भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे--त्यांनी एक गोळी मारली तर तुम्ही तीन गोळ्या मारा हे आदेश होते हे महाराष्ट्र टाईम्समध्ये आले आहे. तसेच लंडनमधील एका वर्तमानपत्रात असेही आले आहे---"The volume and intensity of India’s return fire is much higher than the usual calibrated response the Pakistanis have come to expect." याचा अर्थ आजपर्यंत भारत अशा आगळिकींना हातचे राखून प्रत्युत्तर देत असे पण यावेळी आपण जोरदार उत्तर दिले आहे. अर्थातच सामान्य मतदार मत देण्यापूर्वी लंडनमधील वर्तमानपत्रे वाचायला जाणार नाही.पण सीमेवर शांतता किमान मतदानापर्यंत टिकत असेल आणि पाकिस्तानकडून गोळीबार बंद होत असेल (एका अर्थी पाकिस्तानने माघार घेतली असेल) तर ते मतदारांना नक्कीच समजते. हा मुद्दा विधानसभा निवडणुकांमध्ये यायची खरं म्हणजे फारशी गरज नव्हती.पण तो आणला कोणी? शिवसेना-मनसे आणि कॉंग्रेसने.बदललेल्या परिस्थितीचा फायदा भाजपला नाही झाला (किंवा असा फायदा उठवायचा प्रयत्न भाजपकडून झाला नाही) तर नवलच. एकूणच काय की विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवायला स्थानिक चेहरा लागतो हा माझा अत्यंत आवडता hypothesis आहे. या फ्रंटवर निवडणुक लढविली गेली असती तर भाजप नक्कीच अडचणीत आला असता. पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. अर्थातच भाजपला लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यश मिळेल असे मला स्वत:ला नक्कीच वाटत नाही.तरीही ११०-१२० जागांपर्यंत जायला हरकत नसावी.

In reply to by सव्यसाची

+१०० क्लिंटन साहेब, तुमच्याकडून देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अंदाजांवर एखादा लेख येऊ द्या.

In reply to by क्लिंटन

विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! शिवसेनेच्या मनात भाजपविषयी इतका विखार भरला असेल याची २५ सप्टेंबर पूर्वी अजिबात कल्पना नव्हती. आपले वाढते सामर्थ्य ओळखल्यामुळेच भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा लढवायच्या होत्या. त्यामुळेच सुरवातीला भाजपने १३५+१३५+१८ असे सूत्र आणले होते. कालांतराने भाजप १३०+१४०+१८ इतका खाली आला. शेवटी १२५+१४५+१८ या सूत्रावर भाजप तडजोडीला तयार झाला असता. परंतु उद्धमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. १५१ च्या पेक्षा खाली यायची सेनेची तयारीच नव्हती. मोदींची लोकप्रियता, भाजपचे वाढलेले सामर्थ्य, भाजपच्या बाजूने वळलेले जनमत, भाजपच्या बाजूने असलेला सर्व मित्रपक्षांचा कल, आपले घटलेली ताकद या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपला १५१ जागांचा हेका सेनेने चालूच ठेवला व त्यामुळे शेवटी भाजपला वेगळा मार्ग धरावा लागला. युती तुटली ही संधी समजून त्यानुसार आपली ताकद वाढवायची संधी सोडून सेनानेते भाजप व मोदींवर आणि मोदींचा उजवा हात असलेल्या अमित शहांवर तुटुन पडले. त्यांच्याविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून रोज त्यांचा उद्धार सुरू झाला. स्वत:ची व्हिजन, आघाडी सरकारची अकार्यक्षमता व भ्रष्टाचार, स्वतःच्या विकासाच्या योजना इ. वर जनतेला सांगण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचे वर्णन करण्यात व त्या घटनांची सांगड भाजपशी घालून त्यांना व्हिलन ठरविण्यातच सेनेचे बहुतांशी वेळ वाया घालविला. निव्वळ भाजप नव्हे तर इतर मित्रपक्षांवरही सेनेने तोंडसुख घेऊन भविष्यात ते आपल्याला मदत करणार नाहीत अशीच व्यवस्था करून ठेवली. त्याचे परीणाम सेनेला भोगावे लागणार आहेत. वास्तविक १२५+१४५+१८ हे सूत्र भाजपवर उपकार केल्यासारखे व आपण फार मोठा त्याग करत असल्यासारखे दाखवून सेनेने स्वीकारायला हवे होते. या सूत्रात सेनेची मोठ्या भावाची भूमिका कायम राहिली असती व स्वतःच्या ताकदीची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. तसेच भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवत असल्याने कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा मिळविण्याची संधी देखील मिळाली असती. कमी जागांवर तडजोड करताना महत्त्वाची मंत्रीपदे सेनेला घेता आली असती. परंतु आता स्वबळावर लढताना जर भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या (सर्वेक्षणाचे हेच अंदाज आहेत), तर आमची ताकद जास्त आहे हेच आम्ही सांगत होतो हे भाजपला सांगण्याची संधी मिळेल आणि आपल्या मोठ्या भावाची भूमिका सेना कायमची घालवून बसेल. >>> पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. युती तुटल्यापासून सेनेने व्हाट्सअ‍ॅप व इतर माध्यमातून "मुंबई केंद्रशासित करणार, विदर्भ तोडणार, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुम्बईतून हलविले, इतर अनेक संस्था मुम्बईतून हलविणार" इ. अफवा सोडायला सुरूवात केली. त्या अफवांचे निराकरण करायला राज्यातील नव्हे तर केंद्रातील कणखर नेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे प्रत्यक्ष मोदींनाच महाराष्ट्रात येऊन या अफवांचे निराकरण करावे लागले. त्यात भर म्हणून मोदींची तुलना अफझलखानाशी, अमित शहांची तुलना आदिलशहाशी करून सेनेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवून ठेवली. सेनेने सुरवातीपासूनच अत्यंत चुकीची पावले टाकली. भविष्यात पश्चाताप करून उपयोग होणार नाही. भाजपने सुरवातीपासूनच अत्यंत प्रगल्भ व संयमी धोरण ठेवून आपली मोट व्यवस्थित बांधली. सेनेचा व्यक्तिगत अहंकार, स्वतःच्या ताकदीविषयी अत्यंत अवास्तव व भ्रामक कल्पना, प्रचाराची असभ्य पातळी इ. मुळे सेनेला जोरदार फटका बसणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खोटे बोलायचं सोडा गुरुजी, मोदींनी राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत त्याविषयी चकार शब्द काढलेला नाही .गुजरातच्या सीएम आनंदीबेन इथे येऊन महाराष्ट्र भिकारी करणार्याची भाषा करतात त्यावर नरेंद्र मोदींनी एकही शब्द काढलेला नाही .विदर्भाविषयी भाजपच्या नेत्यांची एकवाक्यता नाही, एकंदर भाजपच्या सत्तापिपासु भुमिकेला साजेसं त्यांचं वर्तन चालू आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

पूर्वी (म्हणजे ह्याच एकदोन धाग्यांच्या दरम्यान) तुम्ही अनेक आस्थापने (उदा. रिझर्व बँकेची काही खाती), काही सध्या कार्यरत असलेल्या गैर सरकारी कंपन्या, तसेच काही इथे होऊ घातलेली सरकारी आस्थापने महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहेत, अशी हाकाटी केली होतीत. बराच आग्रह श्रीगुरूजींनी केल्यावर एकदोन भुरकट दुवे दर्शवलेत, ज्यातून असे काहीच सिद्ध झाले नाही. गैरसरकारी कंपन्यांचे म्हणाल तर, काही ठोस माहिती द्यावी. आणि मुख्य म्हणजे, जिथे असणे फायदेशीर आणि/अथवा कमी कटकटीचे असेल, तिथे ती जातील. त्यात गैर काय आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्याचे हित बघतो असे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य ह्याबाबतीत मागे होते. पण पुढे ते बदलू शकेल. पण मुंबई व अन्य शहरे उद्योगाची केंद्रे आहेत. बाकी राज्यांनी इथे येऊन ह्या उद्योगांना आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण देणे, त्याकरता लालूच दाखवणे हे काही भाजपाप्रणित नाही. बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांनी असे मार्केटिंग केले आहे. त्यात काही चूक नाही. निरोगी स्पर्धा असेल तर प्रत्येक राज्य आपापल्या परीने त्या स्पर्धेत उतरणारच. आणि त्यात जो उत्तम सेवा, सुखसोयी पुरवेल तो जिंकणार हा जगाचा नियम आहे. भाजपाने ह्याविरुद्ध काही करावे अशी अपेक्षा चुकीची आहे. गुजराथचे मुख्यमंत्री उद्योगांनी आपल्या राज्यात यावे म्हणून आमिषे दाखवत असतील तर त्यांची इच्छा महाराष्ट्र भिकारी व्हावा हा जावईशोध कसा लावला बुवा? एखाद्या बँकेने गिर्‍हाईक पटवायला एखादी चमकदार जाहिरात केली तर त्यांची अशी इच्छा असते का की त्यांच्या प्रतिस्पर्धी बँकेने भिकारी व्हावे? नाही, दुसर्‍या बँकेने तोडीस तोड उत्तर दिले तर तसे होणार नाही. विदर्भ वेगळा असावा अशी भाजपाची भूमिका आहे. भारताच्या इतिहासात मोठी राज्ये तोडून छोटी राज्ये बनवण्याची अनेक उदाहरणे दिसतात. उलट उदाहरण एकही नाही तेव्हा भाजपाने वेगळ्या विदर्भाला समर्थन दिले तर काही आकाश कोसळत नाही. विदर्भ वेगळा करणे म्हणजे भारताचा लचका तोडून पाकिस्तान बनवला तशातला काही प्रकार नाही. छोट्या राज्याचे फायदे आहेतच. जनतेचा कल विचारात घेऊन तसे केले तर काही बिघडत नाही. निदान भाजपाचे लोक (फडणवीस वगैरे) उघडपणे "होय, आम्ही वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहोत" असे सांगत आहेत. त्यात पाठीत खंजीर खुपसण्याचा काही प्रकार नाही. ह्या भूमिका खुल्या आहेत. लोकांना ते इतके खुपले तर त्यांना मते मिळणार नाहीत. अर्थात हा त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल असे वाटत नाही. बाकी बर्‍याच समस्या आहेत ज्याबद्दल ते काय करणार हे लोकांना जास्त जिव्हाळ्याचे असेल. शिवसेना वा बाकी पक्षांनी त्याविरुद्ध आकांडतांडव करु नये.

In reply to by क्लिंटन

तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त. सचाचा पहिला सिक्सर !

क्लिंटनसाहेब, बर्‍याच दिवसांनी तुमचे सविस्तर विश्लेषण वाचायला मिळाले. त्याबद्दल आभार! आता निवडणुक संपेपर्यंत नियमित लिहित चला. तुमच्या स्वतःच्या अंदाजाची अजूनही वाट पहात आहे.

काल अजून २ मतदानपूर्व सर्वेक्षणांचे निकाल प्रसिद्ध झाले. (१) दैनिक "सकाळ्"च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. भाजप - ९४, शिवसेना - ६१, राष्ट्रवादी काँग्रेस - ५९, काँग्रेस - ५१, मनसे व इतर - २३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात खालील परिस्थिती असेल. भाजप - १२०-१२५, शिवसेना - ५८-६३, राष्ट्रवादी काँग्रेस - ३५-४०, काँग्रेस - ३८-४३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार हरयानात खालील परिस्थिती असेल. भाजप - ३८-४४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २८-३४, काँग्रेस - १२-१६

सॉरी माझं निवडणुकांविषयी वाचन फार कमी आहे. मुळचे नौटंकी पळपुटे झाडुवाले विधानसभा लढवणार आहेत का? नसतील तर ठिके उगाचं मतं खाऊन जायचे.

बाकी यंदा युती आणि आघाडी दोन्ही गंडल्यामुळे त्रिशंकु परिस्थिती होणार असं वाटतयं.

काल झी-२४ तास/तालिम चे तिसरे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांच्या पहिल्या दोन सर्वेक्षणांची व तिसर्‍याची तुलना करूया. (१) सर्वेक्षण क्र. १, प्रसिद्धीची तारीख - ०२/१०/२०१४ भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१. (२) सर्वेक्षण क्र. २, प्रसिद्धीची तारीख - ०९/१०/२०१४ - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ (३) सर्वेक्षण क्र. ३, प्रसिद्धीची तारीख - १२/१०/२०१४ - भाजप : ११०, शिवसेना : ५२, काँग्रेस : ६८, राकाँ : ३९, मनसे : ७, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : १२ १० दिवसांत भाजपच्या जागा ९० वरून ११० झालेल्या दिसताहेत, तर काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ७२, नंतर ६३ आणि आता ६८ असा वरखाली होताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ३८, नंतर ४० आणि आता ३९ असा वरखाली होताना दिसतोय, पण आकडे जवळपास स्थिर आहेत. शिवसेनेच्या बाबतीत सुरवातीच्या ६१ जागांवरून ५७ आणि आता ५२ जागांचा अंदाज आहे. तीनही सर्वेक्षणात मनसेला एक आकडी जागा (६-९) दर्शविल्या आहेत. डिस्क्लेमरः हे आकडे खरे आहेत की खोटे, चुकीचे ठरतील का बरोबर, पक्षपाती आहेत का निष्पक्षपाती याविषयी माझे काहीही मत नाही.

गेल्या ३-४ दिवसात अनेक वाहिन्यांनी आपापल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्याचा सारांश, - भाजपला दैनिक "सकाळ" ने ९४ जागांचा अंदाज दिला आहे. इतर दोन सर्वेक्षणांमध्ये भाजपला १५२-१५४ जागांचा अंदाज दिला आहे. यांच्याव्यतिरिक्त इतर ७ सर्वेक्षणांमध्ये भाजप १०५-१४२ च्या दरम्यान जागा मिळवेल असा अंदाज आहे. - शिवसेनेला एका सर्वेक्षणात ३८, इतर २ सर्वेक्षणात ४५-४७, एका सर्वेक्षणात ६७ व इतर ६ सर्वेक्षणात ५०-६३ जागा दाखविल्या आहेत. - राष्ट्रवादी काँग्रेसला २ सर्वेक्षणात १६-१७, एका सर्वेक्षणात ५९, एका सर्वेक्षणात ४५-५० व इतर ६ सर्वेक्षणात ३३-४३ जागा दाखविल्या आहेत. - काँग्रेसला २ सर्वेक्षणात २५-३०, एका सर्वेक्षणात ६८ व इतर ७ सर्वेक्षणात ३८-५२ जागा दाखविल्या आहेत. - मनसेला सर्वाधिक २१, सर्वात कमी ७ व इतर सर्वेक्षणात १०-२० जागा दिल्या आहेत. ढोबळमानाने बहुतेक सर्वेक्षणांनुसार खालील अंदाज दिसतो. भाजपः १०५-१४२, शिवसेना: ५०-६३, काँग्रेसः ३८-६२, राष्ट्रवादी काँग्रेसः ३३-४३, मनसे: १०-१२

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज कोण कोण असावेत या निवडणुकीला? राणे पिता/पुत्र, पृथ्वीराजबाबा??

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

राणे पितापुत्रांपैकी पुत्र धोक्यात आहेत. पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार. अजितदादा, भुजबळ, राणे हे नक्कीच निवडून येणार. आघाडी सरकारमधील बहुतेक हेवीवेट निवडून येतील, परंतु लाईटवेट धोक्यात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. हे सर्वजण आपापल्या मतदारसंघातून आरामात निवडून येतील. वाहिन्यांनी फक्त मोदी, राज व उद्धव यांचीच भाषणे बहुतेक वेळ दाखविली. त्यामुळे इतर जण वाहिन्यांवर फारसे दिसलेच नाहीत. >>> गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल. गडकरी कशाला तोंड लपवतील? ते उघडउघड प्रचार करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र जवळपास ८० हून अधिक सभा घेतलेल्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी, राज आणि उद्धव, शरद पवारच नाहीत, तर अनेक पक्षातले दुसर्या फळीतले नेते जसे की अजीत पवार सुप्रीया सुळे छगन भुजबळ पृथ्वीराज चव्हाण आर आर पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्याही सभा झाल्या आणि त्या लक्षणीय ठरल्या परंतु भाजपचे दुसर्या फळीतले नेते गायब होते ,कारण त्यांच्याकडे बघुन भाजपचे मतदान घटेल अशी भीती भाजपला वाटते. तावडे खडसे निवडुन येतील का याविषयी साशंकताच आहे .हे म्हणे राज्यात सक्षम सरकार देणार...

In reply to by श्रीगुरुजी

पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार
याबद्दल सध्या थोडी ५०/५० अवस्था म्हणता येईल. कारण राष्ट्रवादीने आपला उमेदवार खाली बसवला आहे आणि उंडाळकरांना (कॉ. चे गेल्या वेळचे आमदार, या वेळी अपक्ष ) पाठिंबा जाहीर केला आहे. याला काटशह म्हणून पृथ्वीराजबाबा यांनी स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारास (अघोषित) माघार घेण्यास तयार केले आहे. थोडक्यात, काँग्रेसच्याच दोन (आजी-माजी) नेत्यांमध्ये दुरंगी लढत आहे आणि राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे काही सांगता येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी , हा धागा आपण भाजपाच्या प्रचारासाठी काढला होता अशी प्रत्येक पदो-पदी जाणीव होते आहे !! बाकी चालु द्यात ..