सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये . कुठल्या एका वाक्याने किंवा शब्दांनी तसा गैरसमज झाल्यास ती माझ्या लिखाणाची मर्यादा :
जेंव्हा तुमच बालपण मुंबई - पुण्याबाहेर आणि सांस्कृतिक - शैक्षणिक राजधानी वैगेरे वैगेरे च्या बाहेर जात तेंव्हा 'जात ' आणि इतर रखरखीत 'वास्तव ' फार लहान वयात कळायला लागतात . जात वैगेरे कस कळायला लागल ? तर लहान असताना आम्ही भाड्याच्या घरात राहायचो . घरमालकीण बाई एकदम धार्मिक - सोवळ्यातल्या वैगेरे वैगेरे . मैदानापासून माझ घर जवळ असल्याने खेळण झाल्यावर माझे मित्र पाणी प्यायला माझ्याकडे यायचे . आमच्या घर मालकीण बाई त्यांच्यावर फार बारीक नजर ठेवून असत . त्या प्रत्येक मित्राला direct आडनाव विचारीत (नाव नाही ) . मित्रांनी आडनाव सांगितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव येत किंवा येत नसत . मग मला बाजूला घेत त्या मला सांगत ," अरे कुणासोबत हि राहतोस का रे ? आपल्या ब्राम्हण पोराना काय धाड भरली आहे का ?" त्यांनी बहुदा माझ्या आईकडे पण माझी तक्रार केली होती पण आईने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि नंतर आम्ही ते घरच बदलल . नंतर सर्व ब्राम्हण मुलांप्रमाणे मी पण शाखेत वैगेरे जायचो . तिथे शाखेवरचे गुरुजी गांधीजी बद्दल कधी टिंगल पूर्वक तर कधी विखारी पणे बोलायचे . तिथे फारसे ब्राह्मणेत्तर मुल नसायची .
नंतर बर्यापैकी हुशार विद्यार्थी असताना पण मी अकरावीला कला शाखा निवडली . एवढ्या मोठ्या वर्गात दोघेच ब्राम्हण . मी आणि अजून एक मुलगी . एव्हाना कुलकर्णी , देशपांडे , आणि आडनावाच्या शेवटी 'कर ' लागणाऱ्या लोकांसोबतच राहिलो होतो . डाके , अंभोरे , नलदे हि आडनाव पण जगात अस्तित्वात आहेत असा शोध मला लागला . बहुजन समाजाशी कॉलेज च्या निम्मिताने आलेला हा पहिला संपर्क . एकदा इतिहासाच्या देशमुख सरांनी पंढरपूर आणि तिथले बडवे यांच्यावर वर्गात काही जहाल विनोदी comments केल्या आणि अख्खा वर्ग जोरजोरात खिदळयला लागला . माझ्या मागच्या पोराने 'च्यायला हि बामन अशीच ' अशी हसता हसता दिलेली प्रतिक्रिया मला पण ऐकू आली . आपली जात बाकीच्या समाजात फार काही लोकप्रिय नाही अशी खुण गाठ मी मनाशी बांधली .
बारावी नंतर पुण्यात एका धार्मिक (का सांस्कृतिक ?) संघटनेचा प्रभाव असणार्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तिथल्या वसतिगृहातच राहत होतो . तिथे बारापगड जातीची मुल राहत . होस्टेल च्या शेवटच्या वर्षाला असणार्या मुलांपैकी एकाला 'Best Hostelite ' चा पुरस्कार दिला जाई . या पुरस्कारासाठी काही कारणाने ब्राम्हण मुल च (काही मोजके अपवाद वगळता ) पात्र ठरत . इतर जातीची मुल त्यामुळे वसतिगृह व्यवस्थापनावर खार खाउन असत . एकदा याच मोठ्या धार्मिक -सांस्कृतिक संघटनेचा एक कार्यक्रम कॉलेज मध्ये होता . त्या कार्यक्रमात एका ख्रिश्चन विद्यार्थ्याने टिळा लावून घेण्यास नकार दिला तेंव्हा होस्टेल मधल्या चित्पावन पोरांनी त्याला (त्याच्या पाठीमागे ) खूप शिव्या दिल्या होत्या . हि चित्पावन पोर माझ्यासारख्या घाटावरून आलेल्या ला पण खिजगणतीत
धरत नसत . त्यामुळे चित्पावन लोक म्हणजे आपल्यापेक्षा भारी हा तेंव्हा पासून आलेला गंड डोक्यातून अजून पण पूर्ण पणे गेलेला नाही . एकदा मी आणि माझा बहुजन समाजातला मित्र एका पेठेत रणरणत्या उन्हात अशाच एका महान धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पत्रिका वाटत असताना आलेला अनुभव तर उच्च श्रेणीतला होता . आम्ही लेले , नेने , देशपांडे यांचे दरवाजे पत्रिका देण्यासाठी वाजवायचो . मग माझा बहुजन साथीदार आपल नाव सांगून आम्ही कुठून व कशासाठी आलो आहोत हे सांगून पत्रिका द्यायचा . मे च उन होत पण कोणी आम्हाला उपचार म्हणून पाणी पण नाही विचारलं . वैतागून माझा मित्र मला म्हणाला , 'आता तू दरवाजा वाजव आणि माहिती दे .' पुढच्या ठिकाणी मी हा सोपस्कार केला . दरवाजा वाजवला आणि नाव सांगितलं . आणि अहो आश्चर्यम . पुढच्या अनेक घरी आम्हाला पाणी आणि काही ठिकाणी तर लिंबू शरबत पण घेण्याचा आग्रह झाला ." नावात आणि त्यातल्या त्यात आडनावात बराच काही असत रे ." खिन्न पणे हसून त्या मित्राने शालजोडीतला दिला . आडनावा वरून आपल्या समाज व्यवस्थेत किती मनांवर चरे उमटले असतील याची अजून गिणती व्हायची आहे .
एक अनुभव तर खासच . एकदा मी ट्रेन ने औरंगाबाद ला जात होतो . तर एका आजोबाना मी त्यांची अडचण ओळखून सामान वैगेरे चढवायला मदत केली . बाजूला जागा पण मिळवून दिली . मग आम्ही बर्यापैकी गप्पा पण मारल्या .त्यांनी स्वतहा बद्दल सांगितलं . त्यांनी काय करतोस असे विचारले . त्यावेळेस मी काहीच करत नसल्याने तोंडात येईल ते उत्तर देत असे . मी त्याना काही तरी द्यायचे म्हणून उत्तर दिल ,"मी मिलिंद कॉलेज मध्ये शिकतो ." आजोबांचा नूर एकदम पालटला . आजोबा एकदम बोलायचे थांबलेच . ट्रेन औरंगाबादला पोहोंचल्यावर ''बराय . बाझारात भेट होईल च कधीतरी ." म्हणून आजोबांनी कलटि मारली . दलित असणे म्हणजे काय असू शकते याची बारीकशी चुणूक मला त्या दिवशी मिळाली .
हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या . इथे ब्राम्हण समाज म्हणजे आय टी मध्ये नौकरी करणारा आणि देशाबाहेर राहणारा समाज असे अजून एक generalization नाही केले तर अजूनच चांगल . ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
जाता जाता - हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे . कुठल्या जाणकाराच किंवा एखाद्या बहुजन समाजतल्या आय डी च यावरच Social Analysis वाचायला मला आवडेल .
खूप शिव्या खायला लागणार आहेत पण हरकत नाही . पण चांगली चर्चा घडण्यासाठी हि दिलेली किंमत असे समजू .
वाचने
22706
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणाला कसला अभिमान असला तर तो
एक प्रांजळ मत
७८-३८ चा फॉर्म्युला
In reply to एक प्रांजळ मत by वेल्लाभट
ते अॅडमिशनच्या
In reply to ७८-३८ चा फॉर्म्युला by आदूबाळ
अहो, वरती 'भाते' यांचा
In reply to ७८-३८ चा फॉर्म्युला by आदूबाळ
ओह ओके. मला वाटलं काही
In reply to अहो, वरती 'भाते' यांचा by वेल्लाभट
लेख आवडला !!
लेख आवडला असे म्हणून आपण
In reply to लेख आवडला !! by बाळ सप्रे
संशयास्पद उद्देश....
पुर्णपणे सहमत..
In reply to संशयास्पद उद्देश.... by प्रभाकर पेठकर
तुमची इच्छा असो किंवा नसो.
तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून
+१
In reply to तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून by सूड
अलेलेले अशं झालं कां? बरं बरं
ह्म्म !
ज्या बहुजन समाजाच्या नावाने
धाडसी विषय.
फायदे?
व्वा. सुंदर प्रतिसाद.
In reply to फायदे? by समीरसूर
+१
In reply to फायदे? by समीरसूर
फुलेंच्या शाळे साठी आपला वाडा
In reply to फायदे? by समीरसूर
खरे आहे
In reply to फुलेंच्या शाळे साठी आपला वाडा by प्रसाद१९७१
ब्राह्मणांना झोडा आणि समाधान मिळवा..
In reply to खरे आहे by समीरसूर
माझ्या बाबांनी गेल्या ४५
In reply to फायदे? by समीरसूर
खरे आहे
In reply to माझ्या बाबांनी गेल्या ४५ by रेवती
नाही हो.
In reply to खरे आहे by समीरसूर
एकूणात काय ...
माझ
गोट्या खेळायला
इथले
ब्राह्मणांना आरक्षण देण्याची
गपा हो!ब्राह्मणांना आरक्षणाची
In reply to ब्राह्मणांना आरक्षण देण्याची by रामपुरी
+९९९
In reply to गपा हो!ब्राह्मणांना आरक्षणाची by काळा पहाड
ब्राह्मण असणं म्हणजे आपलं
माझे एक नेहमीचेच मत आहे.
#१
In reply to माझे एक नेहमीचेच मत आहे. by प्रसाद१९७१
या धर्माचं नाव ब्रह्मधर्म
In reply to #१ by ज्ञानव
अपेक्षित परिणाम झाला
बाकी पुण्यातल्या लोकांनी कसं
In reply to अपेक्षित परिणाम झाला by पुण्याचे वटवाघूळ
जाज्वल्य अभिमान
In reply to बाकी पुण्यातल्या लोकांनी कसं by काळा पहाड
हा तद्दन भपंक व एकांगी लेख
प्रचन्ड सहमत !!
In reply to हा तद्दन भपंक व एकांगी लेख by निनाद मुक्काम …
बाकी काही म्हणा. ब्राह्मण