मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं जग

वेल्लाभट · · मिपा कलादालन
नमस्कार, सह्याद्रीत भटकताना काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो शेअर करत आहे. सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं लोकजीवन हे नेहमीच काहीतरी दाखवून, शिकवून जाणारं असतं. आनंद देणारं, शांतता देणारं असतं. फोटोंमधून ते टिपण्याचा केलेला एक प्रयत्न. प्रतिक्रीयांचं, प्रतिसादांचं स्वागत. फोटो लो रेजोल्यूशन आहेत, साईझ कमी ठेवायच्या हेतूने तसे टाकलेत. a ट्रेकला निघालं, की पहिला थांबा असतो तो रस्त्यात जिथं कुठं सूर्योदयाशी गाठ पडेल तिथे a पावसाळ्यानंतर डोंगर, त्याच्या पायथ्याची शेतं नटतात ती अशी a एक लोभस जांभळं फूल a 'विराट' हे विशेषण शोभणारी सर्वात भारी गोष्ट, सह्याद्री a पिवळी धम्मक फुलं 6 आणखी एक वेगळंच फूल 7 हिरवळ दाटे चोहीकडे 8 उन्हं खात बसलेलं एक कोकरू 8 यारीयां 9 चावडी 10 जिथे तिथे दिसणारी ही फुलं 11 वाहते भार जीवनाचा 12 बघत रहावं, बघत रहावं, असं सह्याद्रीचं सौंदर्य......

वाचने 3426 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by वेल्लाभट

प्रचेतस Mon, 10/06/2014 - 18:56
ओह्ह. ओके. मगाशी मोबाईलमधून पाहिल्यामुळे शिखरांची भव्यता नीटशी दिसली नसल्यामुळे ओळखता आले नाही.

स्पंदना Fri, 10/31/2014 - 06:04
मस्त फोटो!! डोळे निवले. रच्याकन ते कोकरु नाही, कोकरु मेंढीचं, हे पालवं, शेळीचं पिल्लु. टण्णा टण उड्या मारतात. फार मस्तवाल. ढुश्या तर अश्या बसतात की काय सांगु?