Skip to main content

भाजपला मत देण्याअगोदर

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 04/10/2014 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..?? वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे. १) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता .. >> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ? २) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ? >> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर. ३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..? >>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते. ४) नसेल तर मग युती का तोडली.. ? >> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली. ५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत) >>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही. ६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ? >>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे. >>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या. >>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या. >>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या. >>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या. ७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत.. >>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या. -- एक सामान्य नागरिक

वाचने 30672
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

In reply to by उदयन

लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही उदयना दादा लोकसभे आणि विधासभा यातला फरक कळतो का तुम्हाला? तो केंद्राच्या निवडणुकांचा प्रचार होता. तिथे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. हा महाराष्ट्राचा प्रचार आहे. इथे स्थानिक पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुण्याचे विषय चर्चिले जातील. तिथे काश्मीरच्या रस्त्यांची दुरावस्था या विषयावर व्याख्यान झोडुन काय उपयोग. असो. आजचा तुमचा गृहपाठ: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास करणे आणि दहा वेळ पाटीवर लिहुन काढणे. अवांतरः नानासाहेबांची मदत घेउ नका. ते खोटे बोलतात. ते तुम्हाला कदाचित सांगतील की मोदींनी सग्ळ्या शाळा गुजरातेत नेल्या.

In reply to by उदयन

मग त्यांनी बंदुका घेउन सीमेवर जावे की काय? चोख प्रत्त्युत्तर द्यायला सांगितले आहे सेनेला आणि लागणारा सगळा सपोर्ट देत आहेत. नुसतेच निषेध खलिते नाही पाठवलेले.

महारष्ट्रात आघाडी ची १५ वर्षे सत्ता होती आणि गुजरात मध्ये बीजेपी ची होती, जर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योग्धन्द्यांना आमंत्रण दिल्यावर ते जर तिकडे जात असतील तर ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारचा दोष आहे. उद्योगपती काय गुजरातला फिरायला चालले आहेत का ? मुख्यामात्र्यांचे आमंत्रण आले आहे. जाऊन येतो गुजरातला. असे थोडीच चालले आहे. गुजरात मध्ये उद्योग सुरु करण्याची processs सोपी आहे. आणि त्याना करांमध्ये खूप सवलत दिली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये आघाडीची १५ वर्षे सत्ता असून त्यांनी ह्या गोष्टींमध्ये खूप बदल नाहीत केले. त्यामुळे इथून उद्योगधंदे गुजरात मध्ये चालले आहेत ह्यात आपल्या राजकारण्याचा दोष आहे

In reply to by मोग्याम्बो

पण इथे येणार्या उद्द्योगधंध्यांना विरोध कोण करते ? प्रकल्पांना जमिनी देताना गावकर्यांना चुकिची माहीती सांगुन विरोधात कोण उभे करते. ? जेव्हा महाराष्ट्राला वीजेची आवश्यकता होती तेव्हा एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात कोणी बुडवलेला ? नंतर तीच वीज महाग दराने कोणी घेतली ? जैतापुर प्रकल्पाला विरोध कोण करत आहे ? सरकार उद्योगधंद्यांना राज्यात आणते परंतु विरोधी पक्षात असणार्यांना राज्याची प्रगती झालेली पाहवली जात नाही म्हणुन प्रत्येक प्रकल्पांना विरोध करायचे चुकिचा प्रचार करायचे आनि प्रकल्पांना त्रास द्यायचा आनि दुसर्या बाजुने गुजरात मधुन त्याच प्रकल्पांना मदतीचा हात द्यायचा मग तो उद्योग जातो गुजरात मधे. हेच चालु आहे गेले १० वर्ष. राज्यातील प्रकल्प उद्योगधंदे कसे बाहेर जातील हेच विरोधी पक्षाचे काम होते.

In reply to by उदयन

हेच चालु आहे गेले १० वर्ष. गेली १० वर्षे (गेली सहा महिने सोडुन) राज्यात आणि केंद्रात सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. प्रकल्पांना मंजुरी देणे आणि धडाडीने ते सुरु करणे / करवणे याची जबाबदारी सरकारची असते. विरोधक विरोध करत असतील तरीही जे योग्य असेल त्यावर निर्णय घेउन कारवाई करण्यापासुन सरकारला कोणीही थांबवु शकत नाही. खासकरुन सरकार अल्पमतात नसताना तर नक्कीच नाही. जर सरकार योग्य ती पावले उचलत नसतील तर प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाणारच. प्रकल्प फक्त महाराष्ट्रातुनच दुसर्‍या राज्यात जातात तिकडून इकडे येत नाहित तुमच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता असुनही हे तुमच्या आळशीपणाचे आणि अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. गुजरातमधले कित्येक पॉवर प्लांट्स केंद्रीय पर्यावरण खात्याच्या लालफितीत अडकल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही हे प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेले नाहित कारण मोदी सरकारने वेळोवेळी त्यांना योग्य ते सहकार्य दिले. हे गुजरातमधल्या मोदी सरकारचे यश. महाराष्ट्रातले प्रकल्प फक्त गुजरातमध्ये जातात हा अजुन एक अपप्रचार. ते कर्नाटक, तामिळनाडु आणी आंध्रातही जातात / गेले आहेत. गुजरातमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच प्रकल्प येतात हा अजुन एक अपप्रचार. सगळ्या अकार्यक्षम राज्यांतुन मोदींनी प्रकल्प ओढुन आणले. टाटांनी तर मोदींच्या कार्यक्षमतेचे जाहीर कौतुक केले आणि प. बंगाल सरकारवर जाहीर टीका. मागच्या वर्षी गुजरातमधल्या एका बड्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगार कपात झाली. त्यावर एका आठवड्यात मोदींनी स्वतः कंपनीच्या प्रवर्तकाला फोन करुन त्याचा जाब विचारला आणि राज्यात इतर रोजगार सुरु करण्याची विनंती केली. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा एवढा कर्तव्यदक्ष असतो तेव्हा उद्योजकांच्या मनात देखील विश्वास निर्माण होतो. उद्योजक नफा कमाविण्यासाठी धंदा करत असतो. त्याला जर जेएनपीटीत माल उतरवुन घेणे आधिक फायदेशीर असेल तर तो तसेच करेल आणी गुजरातमध्ये फायदेशीर ठरत असेल तर तिथेच उतरवुन घेइल. कोणीही स्वतःच्या पदराला खार लावुन जे एन पीटी डुबवण्यासाठी मोदींना साथ देणार नाही. जर गुजरात सरकार काही इंसेंटिव्हस देत असेल तर महाराष्ट्र सरकारचेही हात कोणी धरुन ठेवलेले नाहित. पण इथला धंदा बसल्यावरच तुम्ही जागे होणार असाल तर त्यासाठी मोदींना कशाला दोष देता? तुमचे सरकार तरावे म्हणुन गुजरात सरकारने त्यांच्या राज्याचा विकास करु नये की काय? तुमची अकार्यक्षमता विरोधी पक्षांनी झाकावी ही भलतीच अपेक्षा झाली महाराजा. बाकी एन्रॉणसारख्या भ्रष्ट कंपनीला भारतात आवताण दिलेच कशाला ते कळत नाही.

In reply to by मृत्युन्जय

इतके कळले असते तर आज महाराष्ट्रात लोडशेडींग झाली असती का ? आधी विरोध मग सत्तेवर आल्यावर स्वतः काहीच काहीच करायचे नाही हेच तर चालु आहे युतीचे तु गोंधळ घाल मी प्रकल्प पळवतो

दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात? +१ मोदी स्वतः मान्य करतात कि मुंडे असते तर मला प्रचाराला यायची गरज नव्हती.उद्या सत्ता आलीच आणि फडणवीस/खडसे/तावडे/ मूनगुन्तीवर यापैकी कुणाला मुख्यमंत्री केलेच तर तो मोदी-शहांचा पित्तू म्हणूनच काम करेल.

थोड्या वेळापूर्वीच निखिल्च्या आय.बी.एन. लोकमतवर राज ठाकरेंची मुलाखत पाहिली. हा मनुष्य नक्की कोणासाठी काम करतोय काही कळत नाही.उद्योगधंदे गुजरातमध्ये चालले आहेत म्हणून सारखे रडगाणे चालू होते,मोदींवर टिका करत होता पण गेल्या १५ वर्षातल्या राज्यातल्या परिस्थितीबद्दल,भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्दही नाही.

स्वतंत्र विदर्भ करणार आहेत की नाही.. तिथे मोदी मी दिल्लीत असेल पर्यंत अखंड महाराष्ट्र राहिल म्हणुन वचने देत फिरत आहे आणि फडणवीस हे स्वतंत्र विदर्भ होणारच म्हणुन ओरडत फिरत आहे ( उगाच आरडाओरडा करणे ही त्यांची फॅशन आहे ) पक्षातच विरोधाभास आहे तर राज्य देश काय चालवणार हे

देवेंद्र फडणवीस हा मला बेभरवशाचा माणूस वाटतो. शिवसेना,मनसे विरोधी पक्ष असेल तर स्वतंत्र विदर्भ ते होवू देणार नाहीत हे नक्की. ते महाराष्ट्र नक्की पेटवतील जे नरेंद्रला महागात पडेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारताचे पंतप्रधान लहान असताना गोटया खेळायला यायचेत का माई तुझ्याबरोबर्...आपला पगार किति आपण बोलतो किति

In reply to by होबासराव

होबासराव. भुमिकेचं बेअरिंग साम्भाळायचे म्हणजे असले बोलावेच लागते. त्या माईसाहेब, नानासाहेब आणि आणखी काही अशी बरीच पात्रे एकाच वेळेस भजवत असतात. हे ही कसब वाखाणण्याजोगेच आहे.

In reply to by विजुभाऊ

माईसाहेब, नानासाहेब हे आता जुने आयडी झाले. गेल्या २-३ दिवसांपासून त्यांचा अजून एक डुआय निवडणुकांच्या धाग्यांवर धुमाकूळ घालत फिरतोय. नाना/माईला प्रतिसाद दिला तरी त्यांच्याऐवजी हाच उत्तर देतोय. पूर्ण दुर्लक्ष केलं तरी लोचटासारखा पुन्हापुन्हा प्रतिसाद खरडतोय.

In reply to by श्रीगुरुजी

जे प्रतिसाद आपणास आवडत नाहीत त्या प्रतिसादकर्त्यांना डुप्लिकेट म्हणायचे,वैयक्तिक हल्ले करायचे....स्वतःची संकुचित विचारसरणी दुसर्याच्या गळी उतरवायला बघायची.. श्रीगुरुजी, मिसळपाव हे व्यासपीठ आहे.संघाचे शिबिर नव्हे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी अगदी. त्यांच्या विरोधी मत मांडल की लगेच ग्रेट थिंकर, नानासाहेब म्हणायचं.

In reply to by दुश्यन्त

ते खडसे,गडकरी,मुंडे कन्या ह्यांविषयी माहिती वाचली इंटरनेटवर. आपापल्या जिल्ह्यात हे लोक सम्राट आहेत,बर्यापैकी पैसे जमवून आहेत लेकाचे.एकेकाची दोन कॉलेजेस, दोन चार शाळा, एखादी सहकारी बॅन्क.. आणि काय काय...

मी काही नाही बोलत आहे, हे फ़ैज़साहेब बोलत आहेत.. आता यात तुम्हाला राज'कारण दिसले तर मी काही करू शकत नाही ;) नसीब आज़माने के दिन आ रहे हैं क़रीब उन के आने के दिन आ रहे हैं जो दिल से कहा है जो दिल से सुना है सब उनको सुनाने के दिन आ रहे हैं अभी से दिल-ओ-जाँ सर-ए-राह रख दो केः लुटने-लुटाने के दिन आ रहे हैं टपकने लगी उन निगाहों से मस्ती निगाहें चुराने के दिन आ रहे हैं सबा फिर हमें पूछती फिर रही है चमन को सजाने के दिन आ रहे हैं चलो ’फ़ैज़’ फिर से कहीं दिल लगायें सुना है ठिकाने के दिन आ रहे हैं -फ़ैज़ अहमद फ़ैज़

दिलय ना जनतेने निवडुन.. मग आता हे बाकीचे पोकळ विरोध करुन स्वतःची ** उपटुन का लाल करुन घेत आहेत. ह्यांच्या इथे उपटण्याने मोदींना काय फरक पडणार आहे का ? माम्हमाला ;)

मृत्युंजय हे विष्णुच्या, सुळ्यावर पृथ्वी तोलुन धरणार्‍या अवताराशी कमलजननीत मल्लयुद्ध खेळत असल्याचा "फील" येत आहे

'भाजपाला मत देण्या अगोदर...' च्या पुढे 'मतदार यादीत आपली नावे आहेत का ते चेक करा' हा उत्तरार्ध कसा वाटतो?