Skip to main content

निवडणूक उमेद्वाराबाद्द्ल अपेक्षा

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 05/10/2014 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
१. त्याला किमान लिहिता वाचता यावे २. एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी. ३. एखादी तरी परभाषा निदान समजावी ४. रोजचे वर्तमानपत्र वाचत असावा असे किमान शंका यावी असे वर्तन असावे. ५. एक तरी फोटो टिळाविरहित, पांढरे कपडे नसलेला, शर्टाचे वरचे बटण उघडे नसणारा आणि त्यातून सोन्यःची चेन न दाखवणारा असावा ६. आजूबाजूचे समर्थक वरील बाबींशी किमान संबधित असावेत

वाचने 5249
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वरील बाबीबद्दल आपल्याला कायबी आशेप नाय. *wink* उमेदवाराने एकतर नोटा द्याव्या नायतर आमी NOTA वापरु

In reply to by जेपी

"आशेप नाय." ओ पयले जेपी साहेब, अवो सायबाले / मॅडमले आवडत नाय वो असुद्द भासा. असं असुद्द लिवु नका, आन ते बी पयले असतांना :)

एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी म्हंजे ? मह्या डोक्यातनी त ह्या प्रेश्नानंच झाकट पल्डेल हाय भाऊ!!!, मले जरासक खुल्लं करुन सांगजा बरं बयाजवार थुमाले म्हानावचं का व्हय थे . :)

किमान पदविका /पदवी हा निकष लागु व्हायला हवा. हल्ली बहुतेक ज्यांना शिक्षणात गती नाही आणि घरी जमीन विकुन आलेला पैसा आहे ते लोकं स्कॉर्पियो उडवत राजकारणात उतरत आहेत. किमान राजकारणात जायचं म्ह्णुन तरी शिकतील.

कुठल्याही गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसावा. ही पहिली अट. वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचे स्वरूप आणि स्तावर जंगम मालमत्तेत मेळ असावा. अशी माफक अपेक्षा. अशा माहितीचा अंदाज इथून घेता येऊ शकेल. http://103.23.150.139/VSAffidavits/VS2014.aspx

आणखी माफक अपेक्षा........ प्रचार करताना सेनेच्या उमेदवाराने " दळभद्री " हा शब्द वापरू नये भाजप च्या उमेदवाराने " जनादेश" हा शब्द वापरू नये राष्ट्र वादी च्या उमेदवाराने " सहकाराच्या माध्यमातून" हा शब्द वापरू नये कोग्रेस च्या उमेदवाराने " जातीयवादी शक्तिंना दूर ठेवण्यासाठी" हा शब्द वापरू नये मनसे च्या उमेदवाराने " परप्रान्तीय" हा शब्द वापरू नये

In reply to by विजुभाऊ

हे जरा जास्तच होतय बर का विजू. उमेद्वाराच्या भाषणात 'साहेब्,मॅडम्,गांधी,नेहरू,वाजपेयी,सम्राट' हे शब्द असू नयेत असे सुचवते.

आणखी महाराष्ट्र मागे- पुढे, करुन दाखविले-वरुन दाखविले, शिक्षण्-सम्रुद्धी, रस्ते, पाणी, वीज वगैरे पण नको.. वीट आलाय सगळ्याचा..