Skip to main content

गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 02/10/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी....... काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंदुकीच्या गोळीला हे माहिती नसते रे समोरचा कोन आहे,अथवा तलवारीच्या धारेला वेदना नसते,ती असते जिवंत प्राण्याला.आभासी जगात बाता मारण्यापेक्षा किती जणांनी रस्त्याने अथवा कॉलेजमध्ये आया बहिणींच्या छेडछेडाची विरोध केलाय. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते. दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर..... अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्‍याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते.

वाचने 16227
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले हा प्रश्नच चुकीचा आहे.प्रत्येक घटकाचा - गांधीजी,सुभाषबाबू यांसारख्या नेत्यांपासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यात सहभाग घेतलेला आहे. स्वातंत्र्याचां मक्ता आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसला हवा होता म्हणून त्यांनी गांधींच्या नावाचा वापर केला आणि अशी परिस्थिती निर्माण केली की आज जर गांधी असते तर त्यांनी काँग्रेसवर अब्रूनुकसानीचा दावा केला असता!

प्रती श्री. बाबा पाटील, या धाग्यावर मध्ये पडणार नव्हतो, कारण गांधीजीची माणूस म्हणुन वा नेता म्हणून गौरवी व्यक्त करणारे व्होकल सभासद या संस्थळावर अल्पमतात आहेत... परंतु, त्याहुनही स्वतः शस्त्र धारण करणारे, आणि त्यानुसार येणार्‍या जबाबदार्‍या समजणारे, त्यामुळे येणारा आत्मविश्वास समजू शकणारे सभासद हे त्याहूनही कमी (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच!) आहेत. अनुभवावीण फुकाची वाफ दवडणारेच अधिक!! त्यामुळे माणसाच्या व्यवसायाचा त्याच्या शस्त्रधारणतेशी संबंध नसतो. माणसाला त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य आयुष्य असतं याच्याशी पूर्णतः सहमत!!!

महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून हा कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकातल्या पहिल्या भागाचा सारांश अलिकडेच लिहिला. गेले ५ दिवस बाहेरगावी होतो म्हणून मिपावर २ ऑक्टोबरला प्रकाशित करू शकलो नाही. या लेखातले काही प्रतिसाद वाचनीय वाटले.

In reply to by बाबा पाटील

धन्यवाद डॉक्टर. सदर विचार कुरुंदकरांचे आहेत (शिवरात्र मधले) मी फक्त ते थोडक्यात मांडले आहेत. आणि या पुस्तकावर अतृप्तआत्मा यांनी सुंदर सारांश आधीच लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/20754

मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते. खरे तर वैचारिक दृष्ट्या

In reply to by प्रसाद१९७१

मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास , तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते ( कदाचित जास्तच असेल ). १९०० सालाच्या आधीपासुन च निवड्णुका होउन नगरपालिका होत होती, नंतर राज्य विधी मंडळ पण झाले, नंतर संसद पण होती. कायदे समान होते, शिक्षण, नोकरी करण्यात काही अटकाव नव्हता. जमिन विकत घेण्यात, व्यवसाय चालू करण्यात काही बंधने नव्हती. नक्की स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय प्रॉब्लेम होता? ( सामान्य माणसाच्या दृष्टीने )

In reply to by प्रसाद१९७१

मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.

भारतात बरीच संस्थानं चालू होती, इंग्रज स्वार्थासाठी त्यांच्या मनमानीकडे काहिसे दुर्लक्ष करायचे .खर्या अर्थाने स्वातंत्र्य नव्हते.

In reply to by नानासाहेब नेफळे

ठीक आहे, मी संस्थाने नसलेल्या, इंग्रज अधिपत्याखालच्या भारता बद्दल बोलतोय. अशी २-३ तरी उदाहरणे आहेत का की ज्यात सामान्य माणसाला स्वातंत्र्य नव्हते असे म्हणता येइल १९४७ च्या आधी. जी काही थोडी बंधने होती ती १९१० नंतर कमी कमी होत चालली होती.

वा वा! (इथेच जरा उचकपाचक करून) बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार जन्तेच्या त्याच नेत्याबद्दलच्या बदललेल्या भावना यावर कोणीतरी अभ्यासपूर्ण लेख लिहावा असे सुचवतो :P (तुच लिहि असे म्हणणार्‍यांस आगाऊ क्षमस्व!)

In reply to by ऋषिकेश

तात्याला बोलवा,त्यांच्या इतक परखड कोनी नाही लिहु शकत्,हा प्राणी ब्लड बॉर्न शिवसैनिक आहे त्यामुळे भक्तांना अंमळ जुलाब लागु शकतात्,पण मत फार परखड असतात.