✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

क
कैलासवासी सोन्याबापु यांनी
गुरुवार, 10/02/2014 - 18:26  ·  लेख
लेख
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
148732 वाचन

💬 प्रतिसाद (648)

प्रतिक्रिया

वाचत आहे...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/02/2014 - 22:47 नवीन
जाणकारांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत..
  • Log in or register to post comments

RD-350 Vale dangaa karu

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/02/2014 - 22:51 नवीन
RD-350 Vale dangaa karu shakataat ka ya dhagyaavar :)
  • Log in or register to post comments

एन्फ्लिड वाल्यांचा कायम हेवा

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/02/2014 - 23:18 नवीन
एन्फ्लिड वाल्यांचा कायम हेवा वाटत आलेला आहे.
  • Log in or register to post comments

धाग्यावर लक्ष ठेवणार!

बहुगुणी
गुरुवार, 10/02/2014 - 23:27 नवीन
धाग्यावर नक्की लक्ष ठेवणार! (वाचनखूण का साठवता येत नाहीये?) सासर्‍यांनी १९७० च्या सुमारास घेतलेली आणि दहा वर्षे उत्तम स्थितीत सांभाळलेली Royal Enfield Sherpa मोटरसायकल (175cc, Villiers engine) मी १९८०-१९९० खूप वापरली. त्यानंतर एका विद्यार्थ्याला ती देऊन टाकली. आता ती वापरात आहे की नाही माहीत नाही, पण अनेक आठवणींशी निगडित अशी ती मोटरसायकल होती. आता पुन्हा एकदा बुलेट ३५० घ्यायचा विचार बळावतो आहे. ("बकेट लिस्ट सुरू केलेली दिसतेय", "साठीच्या आधीच बुद्धी नाठी" वगैरे कॉमेंट्स हळू-हळू ऐकायला मिळताहेत :-) ) असो, चांगले डीलर्स कोण, आफ्टर-मार्केट अ‍ॅक्सेसरीज कुठे मिळतील हे सर्व या धाग्यात वाचायला मिळेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम हा धागा

खटपट्या
Fri, 10/03/2014 - 00:53 नवीन
सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल सोन्याबापुंचे लय म्हणजे लय धन्यवाद. गाडी घेण्याचे नक्की झाले आहे. मला जाणकारांकडून हे जाणून घ्यायचे आहे की इलेक्ट्रा आणि क्लासिक मध्ये फरक काय ? मला इलेक्ट्रा आवडली आहे. आन्जावर बरेच शोध घेतला पण मला मिपाकरांचे अनुभव/सल्ले जाणून घ्यायचे आहेत.
  • Log in or register to post comments

क्लासिक

कपिलमुनी
Sat, 10/04/2014 - 18:25 नवीन
घ्या . इंजिन मधे बदल आहेत . बरेच लोक सांगतात सेम इंजिन आहे पण तसा नाहिये डीटेल्स सांगतो मिळवून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

इथे पहा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/05/2014 - 11:30 नवीन
इथे पहा http://www.bikewale.com/comparebikes/royalenfield-classic350-vs-royalenfield-bulletelectratwinspark-vs-royalenfield-bullet350twinspark/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बाईकशी मागे बसण्याइतकाही

कंजूस
Fri, 10/03/2014 - 04:22 नवीन
बाईकशी मागे बसण्याइतकाही संबंध नाही परंतू फार चांगला तंत्रज्ञान विषय म्हणून आवडला. आणि हो या एका खऱ्याखुऱ्या गाडीचे एक देऊळ झालेय पंजाबात .संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे. बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments

संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे....

मुक्त विहारि
Fri, 10/03/2014 - 09:29 नवीन
असेल...असेही असेल... (कळफलक बडवणार होतो, पण.....टाळलेच...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

भाग ३

आयुर्हित
Tue, 10/07/2014 - 02:36 नवीन
कृपया http://www.misalpav.com/comment/520365#comment-520365 वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चांगला धागा!

एस
Fri, 10/03/2014 - 11:51 नवीन
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत
गुड. तुम्हांला एक शंका विचारू का?
कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ब) त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्‍या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते? ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का? इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का? फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? वरील प्रश्न केवळ बुलेटधारकांनाच नव्हे तर असे करणार्‍या प्रत्येक वाहनचालकास तितकेच लागू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही उत्तर दिले तरी चालेल. इथे जे अपेक्षित आहे त्याच्याशी माझे प्रश्न विसंगत वाटल्यास संमंला विनंती करून हा प्रतिसाद उडवू शकता.
  • Log in or register to post comments

अ) जास्त आवाज करणारा

काउबॉय
Fri, 10/03/2014 - 12:52 नवीन
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ------ -- लोकांचे लक्ष वेधता येते, तसेच असले पावरबाज फायरिंगचे वाहन आपण लीलया नियंत्रित करतो ही भावना आत्मविश्वास दुणावते (प्रत्यक्ष अनुभव हिच खात्री). ब) त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?--- --- यातून वायुप्रदुषण कसे होते ? ध्वनीप्रदुषण एका मर्यादेपर्यंत रिलेटिव कंसेप्ट आहे आणि ती मर्यादा नक्कीच इथे ओलांडली जात नाहिये. क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते?--- --- वाईट वाटते पण याचा सायलेंसरशी सम्बंध नाही ये. ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का?---- -- आम्हाला सविनय कायदेभंग काहीवेळा काही बाबतीत पटतो पण पुन्हा हां वैयक्तिक मामला झाला. इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का?--- --- नाही. तसेही प्रमुख आव्हान दहशतवादाचे आहे त्यावर जास्त मनथन व्हावे. फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? - यप. पर्सनलाइज्ड टच वेगळीच बात आहे. जमाना कस्टमायज़ेशनचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धन्यवाद!

एस
Fri, 10/03/2014 - 14:41 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

हाय कम्बख्त !

सामान्यनागरिक
Tue, 10/07/2014 - 13:06 नवीन
ज्यांच्याकडे १००/१२५ सी सी ची खेळणी आहेत त्यांच्याकडुन आलेला हा मत्सरग्रस्त प्रतिसाद आहे. जाऊ द्या. आकाशाकडे बघुन म्हणावेसे वाटते ' हे आकाशातल्या बापा, यांना माफ कर, हे काय बोलताहेत यांना कळत नाही ! ' बाकी बुलेटचे चाहते-- यांच्याकडे लक्ष देउ नका ! चालु द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

बुलेटसमोर RX-100 म्हणजे

टवाळ कार्टा
Tue, 10/07/2014 - 13:18 नवीन
बुलेटसमोर RX-100 म्हणजे हत्तीसमोर चित्ता \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

हाहाहा

वेल्लाभट
गुरुवार, 11/27/2014 - 12:12 नवीन
लोल प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

जरा अतिसंवेदनशील होतंय का?

आदूबाळ
Fri, 10/03/2014 - 14:52 नवीन
जरा अतिसंवेदनशील होतंय का? बुलेटच्या "दगदगदगदग" आवाजाने ध्वनिप्रदूषण होतं हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. स्वतः बुलेट न वापरल्यास तो आवाज फार तर पाच मिनिटं येईल. जास्तच डोक्यात जायला लागला तर बुलेट ओलांडून पुढे जाणे हा पर्याय असतोच. (बुलेट तशीही पिकपसाठी प्रसिद्ध नाहीये.) यापेक्षा जास्त त्रास जनरेटर, प्रिंटर, एसी आदींच्या आवाजाचा होतो. पाय भाजतात म्हणजे थोडंसं गरम लागतं असं समजतो आहे. एरवी पार सायलेन्सरला चिकटायला गेल्याखेरीज भाजायचं (म्हणजे भाजून त्वचा ब्राऊन व्हायचं) कारणच नाही. बाकी त्रास होण्याचा (आणि करून घेण्याचा) प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असला तरी त्याला गावगुंडी म्हणणं जरा अतिशयोक्त वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धन्यवाद!

एस
Fri, 10/03/2014 - 15:55 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

जरा अतिसंवेदनशील होतंय का

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/04/2014 - 17:24 नवीन
जरा अतिसंवेदनशील होतंय का दवणीय म्हणतात त्येला!!!! "वाहतो हि दुर्वाची जुडी" स्टाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्द

पंतश्री
Fri, 09/18/2015 - 14:45 नवीन
जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि. कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही. काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

एकदम बरोबर

प्रशांत हेबारे
Sat, 09/19/2015 - 12:56 नवीन
आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

रॉयल एनफिल्ड: सर्वोत्तम क्रेझ

आयुर्हित
Fri, 10/03/2014 - 17:53 नवीन
आजकाल लाखात पगार घेणाऱ्या लोकांना जेव्हा अतिशय रहदारी असलेल्या रस्त्यावरून दररोज जावे लागते किंवा पार्किंगचा प्रश्न किंवा कारचा खर्च पेलावयाचा नसतो तेव्हा रॉयल एनफिल्ड कामास तर येतेच सोबत शायनिंगहि करता येते, काश्मीर ते कन्याकुमारी पाहिजे तेथे टूर ही करता येते थोडक्यात काय तर जीवन खऱ्या अर्थाने जगता येते. लगे रहो !! आपली आवड व क्रेझ सर्वोत्तम आहे. भारतीय पब्लिक रॉयल एनफिल्ड सारखा आकर्षक भारतिय मालकीचा प्रोडक्ट डोक्यावर घेते ज्यात जबरदस्त Value ची ताकद आहे म्हणजेच आमची चांदीच चांदीच असते. पाच वर्षात Eicher Motors चा शेअर २५ पट फायदा देवून जातो अजून काय हवे?
  • Log in or register to post comments

@मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/04/2014 - 07:35 नवीन
@मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला >>> किती ते सांगा की!
  • Log in or register to post comments

रॉयल इनफिल्ड ही luxury आहे

आयुर्हित
Sat, 10/04/2014 - 10:50 नवीन
रॉयल इनफिल्ड ही luxury आहे luxury means A state of great comfort or elegance, especially when involving great expense. पण ज्यांना चारचाकी ठेवणे अवघड आहे, परवडत नाही पण छापही पाडायची आहे किंवा रॉयल इनफिल्डची क्रेझ आहे त्यांना पर्याय नाही. मायलेजचे म्हणाल तर २५% मायलेज सहज वाढविता येतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मायलेज ४० चे तर अगदी मिळतेच.

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/13/2014 - 12:50 नवीन
मायलेज ४० चे तर अगदी मिळतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/04/2014 - 10:22 नवीन
अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस ते बेचाळीस च्या मद्गे अन हाईवे ला ४५ पर्यंत देते आहे (अर्थात मी पंचावन ते सत्तर च्या मधे असतो जास्त क५पंचावनचीच स्पीड ठेवतो)
  • Log in or register to post comments

@सोन्याबापु

आयुर्हित
Sun, 10/05/2014 - 00:52 नवीन
@सोन्याबापु: ८० किमी/तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते याचे कारण कदाचित स्पोक्स वाकून व्हीलचा ब्यालेंस गेला असावा. एकदा व्हीलब्यालेंस करून घ्यावा. माझ्या मते साईड स्टेंडला गाडी लावल्यास आणि/किंवा त्या अवस्थेत कोणी त्यावर बसल्यास स्पोक्स लगेच वाकतात. एकदा तपासल्यावर असे आढळ्यास मला जरूर कळवा/कन्फर्म करावे हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अवो आयुर्हीत सायेब, _/\_

खटपट्या
Sun, 10/05/2014 - 04:04 नवीन
अवो आयुर्हीत सायेब, _/\_ स्पोक वाकले असतील तर ४० च्या स्पीड ला पण वायब्रेट होईल. ८० च्या पुढे इंजिन वायब्रेट होते म्हणून गाडी वायब्रेट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

नाही आयुर्हीत सर, मला पण

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/05/2014 - 09:29 नवीन
नाही आयुर्हीत सर, मला पण आगोदर तिच शंका आलेली, चेक केले व्हिल्स पर्फेक्ट आहेत, तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

असे असेल तर माझी आपणास विनंती

आयुर्हित
Tue, 10/07/2014 - 02:46 नवीन
तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे तर कंपनीची technical team काय कामाची? असे असेल तर हा प्रश्न सरळ कंपनीच्या मालकांना कळवावा अशी माझी आपणास विनंती आहे. http://www.eicher.in/eichergroup-board.aspx येथे नाव आहेत. व त्या सर्वांचे email id डे मॅडम देतीलच की! BIDISHA DEY Head - Corporate Communications Eicher Motors Ltd. #96, Sector 32, Gurgaon - 122 001, Haryana, India Phone No.: +91-124-4415600 Mailto: bdey@eicher.in आणि जो पर्यंत आपण १००% खुश होत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरवावाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बुलेट की सवारी......शान की

विजुभाऊ
Sat, 10/04/2014 - 18:11 नवीन
बुलेट की सवारी......शान की सवारी. बुलेट ची जी मजा आहे ती स्प्लेंडर वगैरे मधे नाही
  • Log in or register to post comments

तरूणपणीचे स्वप्न...

प्रभाकर पेठकर
Sun, 10/05/2014 - 09:00 नवीन
माझ्या तरूणपणी रॉयल एन्फिल्ड (३५०) आणि जावा (२५०) हे दोनच पर्याय उपलब्ध होते. रॉयल एन्फिल्ड ही आर्मी बाईक म्हणून प्रसिद्ध होती. (त्यामुळे) रॉयल एन्फिल्ड्शी भावनिक दृष्ट्या 'मर्दानगी' जोडलेली होती. 'जावा' पेक्षा जास्त ताकद, उंच बांधणी, ढक..ढक..ढक असा धीरगंभीर आवाज आणि विशेषतः चढावावर चारचाकी वाहनांना सहज ओलांडून जाण्याची क्षमता ह्या सर्व गुणांमुळे रॉयल एन्फिल्ड ही त्या काळच्या तरूणाईचे एक स्वप्न असायची. जावाचा आवाज खुपच चिरका होता. एखाद्या जवळ साधी सायकल असणं हेही कौतुकाच्या नजरांच कारण असताना (७०च्या दशकात) रॉयल एन्फिल्ड हे श्रीमंतीचं द्योतक होतं. जावा ३५०० ते ४००० ला होती तेंव्हा रॉयल एन्फिल्ड ६५०० हजाराला होती. चारचाकींच्या पंगतीत स्टँडर्ड हेराल्ड १२००० हजाराला तर दणकट अँबॅसॅडर (मार्क टू) १८००० ते २२००० च्या दरम्यान होती. (साठचे दशक). माझा कारकुनाचा पगार ३५० रुपये (१९७३) होता. चारचाकीचं स्वप्नही महाग होतं पण रॉयल एन्फिल्ड अनेकदा स्वप्नात यायची. अगदी नाहीच जमलं तर, निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंडात का होईना, बुलेट घ्यायचीच असा पक्का निर्णय झाला होता. पुढे आखाती प्रदेशात नोकरी निमित्त आलो आणि पहिली बाईक घेतली सुझुकी २५० आणि वाहन सुखाला सुरुवात झाली........
  • Log in or register to post comments

रॉयल एन्फिल्ड मधे बॅटल ग्रीन

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/05/2014 - 09:31 नवीन
रॉयल एन्फिल्ड मधे बॅटल ग्रीन इंडीयात मिळत नाही राव!! बाहेर मिळते ती सिविलिअन्स ना.
  • Log in or register to post comments

फॉरेस्ट ग्रिन मिळते

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/13/2014 - 12:53 नवीन
एलेक्ट्रा फॉरेस्ट ग्रीन मिळते भारतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हां, रॉयल एनफिल्ड!!!

पिवळा डांबिस
Sun, 10/05/2014 - 11:52 नवीन
मस्त गाडी!!! एकेकाळी ही गाडी विकत घ्यायची सॉल्लीड महत्वाकांक्षा होती! नशीबाने ती अपूर्ण राहिली!!!!!!! मी आणि माझे ऑटोमोबाईल इंजिनियर सासरे यांच्यात सहमत होण्याचा हा एकच मुद्दा!! कदाचित त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या लाडक्या लेकीशी विवाह करण्यास संमती दिली असावी असा दाट संशय आहे!!! :) असो. पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!! :)
  • Log in or register to post comments

आधी घरवाली.

प्रभाकर पेठकर
Sun, 10/05/2014 - 12:21 नवीन
पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!! बायकोपेक्षा 'साली' वर प्रेम जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

प्रेम जास्त असंच काही नाही...

पिवळा डांबिस
Sun, 10/05/2014 - 12:27 नवीन
प्रेम जास्त असंच काही नाही... पण हळहळ तर रहातेच ना!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

वाटते नं...

प्रभाकर पेठकर
Sun, 10/05/2014 - 13:54 नवीन
हळहळ तर फारच वाटते हो.... *sad* . *sad*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हम्म्म्म्म्म्म... लेट ही सही

विजुभाऊ
Mon, 10/06/2014 - 13:15 नवीन
हम्म्म्म्म्म्म... लेट ही सही.लेलो ना बुलेट्ट.....
  • Log in or register to post comments

बुलेट! आवाज ही काफी है!

इनिगोय
Tue, 10/07/2014 - 08:38 नवीन
बुलेट! आवाज ही काफी है! बुलेट कुठेही कधीही दिसली तरी नजरेआड होईपर्यंत वळून पाहिल्याखेरीज आणि तिचा तो पेशल आवाज ऎकल्याखेरीज पुढे जाणं होत नाही. एकदाच थोडंसं अंतर चालवून बघितलीय... _/\_ ! बुलेटच्या बाबतीत अमूक पाॅवरच्या इंजिनलाच अमूक रंग असं काॅम्बिनेशन असण्याचं काय कारण असतं? तसंच थंडरबर्ड की इलेक्ट्रा? दोन्हीत काय फरक आहे?
  • Log in or register to post comments

फरक अल्पबुद्धी प्रमाणे

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/13/2014 - 12:57 नवीन
थंडर्बर्ड क्रूझर बाईक आहे. स्टाईल पण क्रूझर सारखी आहे. पुढचा फोर्क खूप उंच. उंच वळून आलेले हँडल. इलेक्ट्रा स्ट्यांडर्ड चे एक सुधारीत रूप. फक्त त्याला बटन स्टार्ट आहे व डिस्क ब्रेक आहेत. जे स्ट्यांडर्ड मधे नाहीत. क्लासिक प्लॅटफॉर्म हा स्टायलिंग आस्पेक्ट १९६०च्या ब्रिटनमधील बाईक नुसार केला आहे. नवीन रीफाईन्ड युसीई इंजिन. झॅपर टायर्स ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

सेल्फ स्टार्ट

कपिलमुनी
Tue, 10/07/2014 - 12:07 नवीन
नवीन गाड्यांमध्ये सेल्फ स्टार्टची सुविधा असते. जुन्या बुलेटना त्या प्रकारची सुविधा बसवता येते का ? माझी AVL इंजिन असलेली थंडरबर्ड आहे.TBTS नाही फक्त TB . तिला सेल्फ स्टार्ट किट बसवण्यासंबंधी कोणास माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments

पैसे वस्सूल !

सामान्यनागरिक
Tue, 10/07/2014 - 13:00 नवीन
हा असला प्रतिसाद मिळाल्यावर पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ! माझ्याकडेही १९७२ सालची एक बुलेट आहे. नुकतेच मी र.५० हजार खर्च करुन तिचा जीर्णोधार करुन घेतला. तिच्यावर स्वार होऊन बाहेर पडलो ना की वळुन वळुन बघणार्क्ष्या माना पाहुन उर भरुन येतो हो ! हो आणि सायलेन्सर बदलुन घेतला आहे. अगदी ' बुलेट आली ! ' हे ओरडुन सांगणारा . ही बुलेट आमची वंशपरंपरागत चालत आलेली कौटुम्बिक मालमत्ता आहे. सुदैवाने पुढच्या पिढीतही तिचे चाहते आहेत !
  • Log in or register to post comments

ही घ्या बुलेट विकायची आहे.

विजुभाऊ
Tue, 10/07/2014 - 13:22 नवीन
ही घ्या बुलेट विकायची आहे.
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद

मोदक
Tue, 10/07/2014 - 13:23 नवीन
सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद. मला रॉयल एन्फिल्डबद्दल असलेली माहिती. (माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड नाहीये, अजून!) भारी गाडी..!!! "BULL" - दुसरे शब्द नाहीत. ३५० CC असल्याचा उघड फायदा - चढ, वेग, वजन वगैरे अडचणीच्या गोष्टींचा लिलया सामना करते. भरपूर अंतर विनासायास कापते आणि गाडीला व चालकाला फारसा त्रास नाही. ३५० CC, २०० किलोच्या आसपास असलेले वजन हे आणि या प्रकारच्या एकंदर वैशिष्ट्यांमुळे माईलेज कमी. ही गाडी घ्यावयाची असल्यास माईलेजचा विचार करायचा नाही. मोठा ऑईल टँक असल्याने ऑईल बदली आणि सर्विसींगच्या वेळेस नेहमीच्या गाडीपेक्षा जास्त खर्च येतो. (पुन्हा तेच - ही गाडी घ्यावयाची असल्यास खर्चाचा विचार करायचा नाही.) रोजच्या शहरातील वापरासाठी घ्यायची असल्यास पुन्हा विचार करावा. आता माझ्या काही शंका.. १) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?
  • Log in or register to post comments

मोदक , सद्ध्या प्रचंड

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/09/2014 - 06:30 नवीन
मोदक , सद्ध्या प्रचंड कार्यबाहुल्यामुळे प्रतिसाद बयाजावर देता येत नाहिए जरा निश्चिंत झालो की डिटेल्स देतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड"

मनराव
गुरुवार, 10/09/2014 - 11:16 नवीन
१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) फार काही फरक नाही...... २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? तुला आवाज कसा हवाय आणि मायलेज किती हवय त्यावर अवलंबुन आहे..... काही सायलेन्सर्स मायलेज कमी करतात पण अवाज दणदणीत असतो...... मि 'ग्लास वूल' लावला आहे.... गाडीला एक वर्ष झाल्या नंतर.... ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? गाडी नविन असेल तर लिहिलेस तेवढे तरी झालेले बरे... ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..? आधी सांग व्यवस्थीत चालवली म्हण्जे कशी चालवणे अपेक्षित आहे.... २१००० फिरवुन झाली अता पर्यंत आजुन तरी काही त्रास नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

१) ओक्के..

मोदक
गुरुवार, 10/09/2014 - 12:49 नवीन
१) ओक्के.. २) कानठळ्या न बसवणारा पण दमदार आवाज आणि माईलेजवर फारसा फरक न करणारा साईलेन्सर कोणता आहे..? ३) ओक्के. ४) व्यवस्थीत म्हणजे ६० च्या आत, वेळच्यावेळी सर्विसींग आणि उगाच "शून्य ते साठ - पांच सेकंदात" असले अत्याचार न करता - असे सुरूवातीचे किमान काही हजार किमी तरी. (माझी पॅशन प्लस या पद्धतीने चालवली आणि सध्या ५०,००० च्या आसपास रनींग होवूनही शहरात ६५ पेक्षा जास्त व हायवेला ६८-७० पेक्षा जास्त माईलेज मिळते.) प्लीज नोट - माझी बुलेट अजून बाजारातच आहे. सध्या केवळ माहिती गोळा करत आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

थोडी भर

कपिलमुनी
गुरुवार, 10/09/2014 - 13:01 नवीन
१. क्लासिकच बरी २. गोल्डस्टार विथ ग्लासवूल ( पाय न भाजणारा कव्हर असेल तर अगदी उत्तम) ( ग्लासवूल हवेच) ३. साधरण १००० किमी गाडी प्रेमानेच चालवावी.. नंतर च्या लाँग रनिंग साठी एक धागा आला होता तो रेफेर करा ;) ४. गाडी चांगली रहायसाठी नवीन असो वा जुनी प्रेमाने चालवा. जास्त वजन लादू नका.. शेल मधला पेट्रोल भरा ..मोटूल चा ऑईल वापरा आणि ऑफिशियल सर्विस सेंटर मधे कधीही सर्विसिंग करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद...

मोदक
गुरुवार, 10/09/2014 - 13:30 नवीन
धन्यवाद... ऑफिशियल सर्विस सेंटर वाईट अनुभव आहे का..? ग्लासवूलचा एखादा फोटो मिळेल का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा