Skip to main content

कांदा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 01/10/2014 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
कांद्या उगविणारा शेतकरी असो, ग्राहक असो वा व्यापारी, सरकारच्या नित बदलत्या नितींमुळे, सर्वांनाच नुकसान होते शेतकऱ्याला रडवितो कांदा ग्राहकाला लुबाडीतो कांदा व्यापारीला फसवितो कांदा नेत्यांना मात्र हसवितो कांदा
लेखनविषय:

वाचने 3416
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मस्त पाकृ. मी बटाटा घालुन करुन बघितली. बरी झाली होती. शेतकऱ्याला रडवितो बटाटा ग्राहकाला लुबाडीतो बटाटा व्यापारीला फसवितो बटाटा नेत्यांना मात्र हसवितो बटाटा!! =))

विवेकपटाईतजी, अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मला यावरून काय वाटले ते लिहितो: विट्यामीन क पुरवितो कांदा बीटा क्यारोटीन पुरवितो कांदा एडीनोसीन पुरवितो कांदा रक्तदाब नियमित करतो कांदा हार्ट अटॅक थांबवितो कांदा तोंडात येणारे फोड थांबवतो कांदा उष्णतेचा त्रास कमी करतो कांदा लघवीची जळजळ कमी करतो कांदा प्रखर उन्हाचा त्रास दुर करतो कांदा उन्हात फिरताना खिशात ठेवा कांदा फुफुसाचा कॅन्सरचा धोका कमी करतो कांदा ताकद व पौरुषत्व वाढवितो कांदा टॉपिंग पिझ्झाची लज्जत वाढवितो कांदा ८ छोट्या तुकड्याची किंमत असते ४०रुपये अशा या कांदयाची किंमत करायला शिका शेतकऱ्यांनी पिकवलाच नाहि तर प्रसंग येईल बाका

पण नांदा....

मीपण .. मीपण .. तोंडाला वास येतो खाल्ल्यावर कांदा ओयाक शी: घाण किती खाता कांदा कच्चाच खातात काहिजण कांदा कचाकचा चावुन गचागचा खातात कांदा .. कसं वाटलं ..??

कुणी निंदा ..... कुणी वंदा पकवणे हाच आमचा धंदा कोणाचा बटाटा... कसला कांदा शंभरी गाठेल का हा धागा यंदा?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सॉलीड जमलं आहे. विठठला आता कोणता कांदा घेउ मी हाती???

श्री राजू शेट्टी यांनी हे वाचले तर आपले काय होईल, बिना कांदा खाता रडण्याची पाळी येऊ शकते.

कोंबडी आणि बोकड, भले आयुष्यभर कांदा खात नसतील, पण त्यांना सद्गती मिळाली तर येतांना कांद्या बरोबरच येतात....

In reply to by कवितानागेश

कांदा-लसूण खावू नये. चातुर्मासात बरीच व्रते-वैकल्ये असल्याने, पुर्वी पुजा सांगणारी मंडळी यजमानाच्या घरी जायचे असेल तर कांदा-लसूण खात नसत.पुढे मग हीच प्रथा पडली. असो, आपल्याला काय? जे ताटात असेल ते खायचे.

In reply to by मुक्त विहारि

मुवी, चातुर्मासात पावसाळी हवामानामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून जडान्न जसे मांस इ. वर्ज्य आहे. कांदा (कच्चा), लसूणाने ह्या कालावधीत वात बळावतो त्यामुळे ते खाऊ नये अशी प्रथा आहे. आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर प्रकाश टाकू शकतील. ऋतुमानानुसार बदलते आहार आरोग्यास हितकर असल्याने वरील प्रथा पडली आहे.

बुक्कीने फोडतात कांदा चिरतात काही सुरीने कांदा | किसणीवर किसतात कांदा खलबत्त्यात ठेचून काढतात कांदा ||

कांदा पोह्यात कांदा कोशिंबीरीत कांदा, भाजीत कांदा, मटणात कांदा नसेल घरात तर होतो वांदा. (कैच्याकै ... हा.हा.हा..)