✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अभिनव विचार संग्रह - (१)

न
निमिष सोनार यांनी
Wed, 10/01/2014 - 12:39  ·  लेख
लेख
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य! पण तीला देवत्व देताना तीला माणूस म्हणून समजुन घेणे आणि स्वीकारणे जास्त महत्वाचे आहे, नाही का? (५) स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो. आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक. दोन्ही एकमेकांचे नाही स्पर्धक. दोन्ही एकमेकांना आहे पूरक. (६) नेहेमीची वाट: बऱ्याच तथाकथित आणि स्वयंघोषित बंडखोराना वाटते की जन्म, बालपण, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, मुले, त्याना मोठे करणे वगैरे गृहस्थाश्रम ही नेहेमीची आणि सोपी वाटचाल आहे. त्यात काय मोठे? मग हे बंडखोर वेगळी वाट चोखाळतात: कुणी लग्न करायचे नाही म्हणतो तर कुणाला मुले नको असतात. कुणी हा "सरळ" रस्ता सोडून देतात आणि बंडखोरीचा आव आणत स्वत: ला हिम्मतवान म्हणवतात. त्याना वाटते की आपण ही नेहेमीची सोपी वाट तोडली, समाजाचे नियम तोडले आणि "हिम्मत" केली.... बाकी त्या वाटेवर चालणारे भित्रे आहेत!! पण तसे नसते!! ही नेहेमीची वाटणारी वाटच बिकट वाट असते. त्यातच जास्त कसोटी असते. ही नेहेमीची वाट चालणे कधीच सोपे नसते. हे या बंडखोरांना माहित असते. म्हणून ते या वाटेला जात नाहीत कारण त्यांच्यात हिम्मत नसते. मग कुणी सन्यास घेतो आणि या वाटेपासून बचाव करतो तर कुणी काही दुसरे करतो आणि बचाव करतो.... या "सरळ" वाटणाऱ्या पण "कठीण" असणाऱ्या वाटेवर हिमतीने चालणाऱ्या सर्वांना माझा प्रणाम!! (७) || निंदकांचे घर असावे शेजारी || स्तुतकांची फौज असावी बाजारी || || निंदकांना बसवावे शेजारी || स्तुतकांना वळवावे माघारी || (८) समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना. तलवार बनलात तर वार होईल. ढाल बनलात तरी वार होईल. म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल. (९) जाता जाता - आज ज्येष्ठ नागरिक दिन: अनुभवांचा चालता बोलता खजिना असलेल्या सर्व ज्येष्ठ (आणि अर्थातच श्रेष्ठ) नागरिकांना शुभेच्छा!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
सुभाषिते
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
9413 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

मी पयला

टवाळ कार्टा
Wed, 10/01/2014 - 12:44 नवीन
मी पयला \m/
  • Log in or register to post comments

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकल्या बद्दल आज

काउबॉय
Wed, 10/01/2014 - 12:54 नवीन
मेरी कॉम चे जाहिर हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

+१

खेडूत
Wed, 10/01/2014 - 14:23 नवीन
असेच म्हणतो! ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

+४

आदूबाळ
Wed, 10/01/2014 - 14:42 नवीन
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

-४

अजया
Wed, 10/01/2014 - 15:24 नवीन
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

होम्योपदी हाय की मग.

यसवायजी
Wed, 10/01/2014 - 15:55 नवीन
होम्योपदी हाय की मग. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

-१

योगी९००
Wed, 10/01/2014 - 14:47 नवीन
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

+१००

विटेकर
Wed, 10/01/2014 - 15:55 नवीन
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हो. पण बाळ्या गुरवाच्या बापानी....

बबन ताम्बे
Wed, 10/01/2014 - 16:14 नवीन
हो. पण बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून कोप-यात पाचकन पिचकारी मारली त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

त्यात काय एव्हढं....

धन्या
Wed, 10/01/2014 - 16:22 नवीन
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

गुरवाच्या बापानी तंबाखूचा

अजया
Wed, 10/01/2014 - 16:55 नवीन
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तोल सांभाळून घसरण्याचे, भय

धन्या
Wed, 10/01/2014 - 17:09 नवीन
तोल सांभाळून घसरण्याचे, भय इथले संपत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

होय

विटेकर
Wed, 10/01/2014 - 17:12 नवीन
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

+११११११११ सॉल्लिड लिवलेय. :-)

बबन ताम्बे
Wed, 10/01/2014 - 17:51 नवीन
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

निमिष, लवकर बरे व्हा.

दिनेश सायगल
Wed, 10/01/2014 - 14:12 नवीन
निमिष, लवकर बरे व्हा.
  • Log in or register to post comments

धाग्याचे काश्मीर

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 10/01/2014 - 15:31 नवीन
आणि डोक्याची भजी व्हायच्या आत निघतो ईथुन.. लेखकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

विचार संग्रह? विचार मोती

नाव आडनाव
Wed, 10/01/2014 - 15:33 नवीन
विचार संग्रह? विचार मोती म्हणा. विचार मोती.
  • Log in or register to post comments

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव

प्रमोद देर्देकर
Wed, 10/01/2014 - 16:04 नवीन
हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.
  • Log in or register to post comments

ह्यातनं बाहेर पडायला...

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/01/2014 - 16:56 नवीन
उरलेली सगळी सुट्टी जाणार....
  • Log in or register to post comments

@€$£§%¥*+#¿¡¤¢«»®©°.,-!?@~_\/

जेपी
Wed, 10/01/2014 - 17:05 नवीन
@€$£§%¥*+#¿¡¤¢«»®©°.,-!?@~_\/&;"':^|`()<{}>[]=
  • Log in or register to post comments

+१

विटेकर
Wed, 10/01/2014 - 17:20 नवीन
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

काय ह्ये ? येका दमात यितक्या

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/01/2014 - 17:45 नवीन
काय ह्ये ? येका दमात यितक्या श्या देवूने. ठेवा की थोड्या फुडच्या येळेसाटी ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

Your connection is not

नावातकायआहे
Wed, 10/01/2014 - 17:16 नवीन
Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....
  • Log in or register to post comments

मी रस्ता चुकलोय. वाट सापडत

प्यारे१
Wed, 10/01/2014 - 17:50 नवीन
मी रस्ता चुकलोय. वाट सापडत नाहीये. मदत करा कुणीतरी!
  • Log in or register to post comments

@ मी रस्ता चुकलोय....

निराकार गाढव
Wed, 10/01/2014 - 18:49 नवीन
मी रस्ता चुकलोय. वाट सापडत नाहीये. मदत करा कुणीतरी!
काय वो. म्या काय म्हनतो, मदत कराया येऊ का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मदत करायला जायचा आणि वेगळा

विजुभाऊ
Wed, 10/01/2014 - 17:54 नवीन
मदत करायला जायचा आणि वेगळा विदर्भ व्हायचा........
  • Log in or register to post comments

वेगळा विदर्भ व्हायलाच पायजे.

जेपी
Wed, 10/01/2014 - 18:14 नवीन
वेगळा विदर्भ व्हायलाच पायजे.
  • Log in or register to post comments

नागपुर, अमरावती आणि

तुषार काळभोर
गुरुवार, 10/02/2014 - 11:44 नवीन
भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

वेगळा विदर्भासाठी गडकरीना

विजुभाऊ
Wed, 10/01/2014 - 18:27 नवीन
वेगळा विदर्भासाठी गडकरीना बबनशी बोलावं लागेल
  • Log in or register to post comments

निमीषदा ..कधी आलात मंगळावरुन

सुहास..
Wed, 10/01/2014 - 18:36 नवीन
निमीषदा ..कधी आलात मंगळावरुन परत ;)
  • Log in or register to post comments

अभिनव विचार संग्रह - (आध्याय २)

संजय क्षीरसागर
Wed, 10/01/2014 - 18:41 नवीन
रोज सकाळ संध्याकाळ रिवर्समधे चालण्यानं अल्झायमरची शक्यता शून्य होते.
  • Log in or register to post comments

ता ना पि ही नि पा जा...

मुक्त विहारि
Wed, 10/01/2014 - 23:19 नवीन
जीवनाचे आरसपानी दर्शन
  • Log in or register to post comments

आरसपानी = आ रस पानी ?

धन्या
गुरुवार, 10/02/2014 - 11:20 नवीन
आरसपानी = आ रस पानी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

योग्य....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/02/2014 - 22:56 नवीन
चिंचेच्या चटणीतल्या वड्यांसारखे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/01/2014 - 23:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एकुण किती भागाची लेखमालिका

शिद
गुरुवार, 10/02/2014 - 00:36 नवीन
एकुण किती भागाची लेखमालिका आहे? ;)
  • Log in or register to post comments

ते धाग्याला कोण किती ढील देतो

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/02/2014 - 10:21 नवीन
यावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

अवो...

काउबॉय
गुरुवार, 10/02/2014 - 11:51 नवीन
ते "भय इथले संपत नाही भाग xxx" बद्दल विचारणा करत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वा!

भृशुंडी
गुरुवार, 10/02/2014 - 00:42 नवीन
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!! +१

असंका
गुरुवार, 10/02/2014 - 16:59 नवीन
अगदी अगदी!! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

पुढे चालू ...

विटेकर
गुरुवार, 10/02/2014 - 12:04 नवीन
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.
  • Log in or register to post comments

संक्षी

विटेकर
गुरुवार, 10/02/2014 - 12:06 नवीन
मागणी प्रमाणे ढील दिली आहे .... खेचा रे खेचा .. खच्चून खेचा !
  • Log in or register to post comments

आमच्या धाग्याला मिळते ती दाद

धन्या
गुरुवार, 10/02/2014 - 12:29 नवीन
आमच्या धाग्याला मिळते ती दाद आणि इतरांच्या धाग्यांना मिळते ती ढील. :)
  • Log in or register to post comments

>>आमच्या धाग्याला मिळते ती

अन्या दातार
गुरुवार, 10/02/2014 - 16:50 नवीन
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मस्त टोला आहे!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/02/2014 - 23:59 नवीन
मान गये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

भाग २ कधी येणार?

आदूबाळ
गुरुवार, 10/02/2014 - 17:48 नवीन
भाग २ कधी येणार?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा