मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपवासाचा पौष्टिक चिवडा

मीराताई · · पाककृती
उपवासाचा पौष्टिक चिवडा 1 साहित्यः नायलॉन साबूदाणा डिंक शेंगदाणे सुक्या खोबर्‍याचे काप काजू-बेदाणे बटाट्याचा खिस (वाळवलेला) (वरील सर्व एक-एक वाटी) तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे) 2 कृती: तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत. सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्यावर मीठ, पिठीसाखर, तिखट भुरभुरून एकत्र करावे. 3 हा चिवडा उपासाला चालतोच, शिवाय बाळंतिणींना पारंपारिक पद्धतीच्या डिंकाच्या लाडूंऐवजी, पौष्टिक पदार्थ म्हणून उपयोगी होउ शकतो.

वाचने 10362 वाचनखूण प्रतिक्रिया 19

मुक्त विहारि Mon, 09/29/2014 - 00:17
पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली.. पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

स्मिता चौगुले Tue, 09/30/2014 - 12:22
लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

मदनबाण Fri, 10/03/2014 - 20:57
मस्त ! अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}