खेळ मांडला !!
लेखनप्रकार
लहानपणी आम्ही भावंड (मी ,मोठा भाऊ ,दोन चुलत बहिणी ) दुपारच्या वेळी घरात लपाछुपी खेळायचो . घरात शक्य होईल तितका गोंधळ घालणे , हा त्या मागचा उद्देश असायचा. घरातील मोठयांना आमच्या आवाजाचा त्रास व्हायचा . पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. मग खेळात आणखी मजा यावी म्हणून आम्ही दोघादोघांचे दोन गट तयार केले. आपल्या सोयीसाठी माझ्या आणि चुलत बहिणीच्या गटाला आपण "आघाडी" असं नाव देऊ . आणि मोठा भाऊ व दुसर्या बहिणीच्या गटाला "युती" म्हणुया. एकदा आघाडीने युतीला शोधायचं मग युतीने आघाडीला शोधायचं असं ठरलं . आणि खरंच आम्हाला खेळण्यात जास्त मजा येऊ लागली . पण घरातला गोंधळ वाढला होता कारण आता आमच्यातली स्पर्धा वाढली होती. पण नेहमीप्रमाणे आम्हाला त्याची पर्वा नव्हती.
पण एके दिवशी अघटित घडलं . आमच्या आघाडीत भांडण झालं. कारण तसं किरकोळ होतं पण शब्दावरुन शब्द वाढत गेला . आघाडीचं भांडण बघुन युती हसतं होती . "आम्ही जिंकलो … आम्ही जिंकलो " असं म्हणुन नाचत होती. नाचता नाचता काय झालं कोणास ठाऊक पण युतीसुद्धा आपसात भांडायला लागली लपाछुपीचा खेळ बंद झाला . कारण आता लपायचं कोणी आणि शोधायचं कोणी ? घरातलं वातावरण पूर्ण बदललं . फक्त एकच गोष्ट कायम होती . ती म्हणजे , घरातला गोंधळ वाढतंच होता !!
अलीकडल्या काही घडामोडींवरून मला हा प्रसंग आठवला. आज कित्येक वर्षांनी मला घरातील मोठयांची अवस्था आणि आमच्यातील भांडणाच खरं कारण उमगलंय.
बरबाद ए गुलिस्ता करनेको बस्सं एक ही उल्लु काफी था ,
हर शाखं पे उल्लु बैठा हैं , अंजाम ए गुलिस्ता क्या होगा ??
-- चिनार
वाचने
2940
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
उत्तम !
हर शाखं पे उल्लु बैठा हैं , अंजाम ए गुलिस्ता क्या होगा ??
उफ ये गालिब