Skip to main content

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 24/09/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

वाचने 82875
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

Fall Colours in Michigan Camera DSC-H10 Lens - Focal Length 11.4mm Exposure 1/160 F Number f/9 ISO 125 Camera make SONY Flash Not used मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !

In reply to by किसन शिंदे

धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by किसन शिंदे

धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by पैसा

काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :( वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.

एक सांगावेसे वाटते. छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते. महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.

In reply to by मदनबाण

हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....

नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. एकदम सहमत

1

fgf Camera निकोन डि३१०० Lens - ५५-२०० Focal Length १००मिमि Exposure १/३२० F Number f/७ ISO १००

In reply to by स्पा

खल्लास च्यामारी, बेष्ट स्पर्धेची वाट बघु नको रे. एक धागा काढुन आम्हाला मेजवानी दे एकदम

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दोन्ही फोटो एकदम मस्त!!

In reply to by खटपट्या

@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>> निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)

सॉल्लीड आहे रे फोटो. कुठलं ठिकाण आहे हे?

In reply to by स्पा

जायचं का पुढल्या वर्षी आल्यावर?? जुन-जुलै मधेच येणं होणार आहे.

पहिलाच ऑटम्न चा फोटो नेत्रसुखद. स्पा यांची एन्ट्रीही दणदणीत. वा ! उत्तम स्पर्धा.

सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.

In reply to by अनिता ठाकूर

+१

ग्रीष्म पेडगावच्या बहादूरगडात a

s पर्णहिन झाड...ग्रीष्मातील दाहकता दाखवणारा मावळतीचा सुर्य.. राजा सिट्,कुर्ग

वाह काय एकसे एक फोटो आहेत. एकादिवसाच्या मुदतीत हे असं तर १२-१५ दिवसांची पुर्वसुचना दिली तर काय होईल राव.

शरद (पानगळ) ऋतू... .  कॅमेरा : Sony Exmor 10.2 MP DSC-TX7 स्विट्झरलंडमधल्या शरद ऋतुमध्ये रेल्वे प्रवासात टिपलेला एक क्षण.

या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?

In reply to by पैसा

इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)). सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

मी माझ्या नवर्‍याचं पण कधी "नाव घेतलं" नाही! (त्याच्या नावाने फक्त शंख करते!) तर आणखी कुणाचं घेणार? :P

In reply to by पैसा

यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात. आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?

खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील.. पहाटावारा

हे सगळे फोटू तर बोलती बंद स्वरुपाचे आहेत. यावेळी मी मतदानाचा हक्क वापरला तर मलाच वाईट वाटेल.

1

In reply to by स्पा

अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.

In reply to by स्पा

धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोVinchu Kata सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,

सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

माझी पण entry... a नवीन धागा काधणार होतो, तुर्तास एवढेच..

In reply to by सुखी

जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/60633036297… मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.

a

सगळेच फोटो सुरेख आहेत, मत कोणाला द्यायचे खरचं कठीण होणारं. सं.मं विषय एकदम सही आहे.