मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवीन महाराष्ट्र

जानु · · पाककृती
नुकतीच युती आणि आघाडी तुटल्याची बातमी आली आहे. नवीन संभावित सरकार माझ्या मता प्रमाणे असे असु शकते. भाजपा + राष्ट्रवादी + इतर (मनसे+रिपाई+स्वाभिमानी+शेतकरी) असल्यास. कारण भाजपा केंद्रात असल्याने व मोदींचे बळ व जनतेची भाकरी फिरवायची ईच्छा. तसेच शिवसेनेचा आजवरचा वरचष्मा मोडीत काढ्ण्याची सुयोग्य संधी. त्यामुळे भाजपा आनंदाने एकटी लढणार. राष्ट्रवादीला माहित आहे की आपण सत्तेत येण्याची संधी फारच कमी आहे. मग आताच एकटे लढ्लो तर निकाला नंतर जो जिंकेल त्या सोबत पाट मांडायला मोकळे. महत्वाचे म्हणजे राष्ट्र्वादी सत्तेशिवाय टिकु शकत नाही हे मान्यच करावे लागेल. काँग्रेस ला वाली नाही हे नक्की दिसते. शिवसेनेला लोकसभेसारखी कामगिरी आज तरी अशक्य दिसते कारण ती निवडणुक मोदी केंद्रीत होती. राष्ट्रवादी ने भाजपा सेनेची युती तुटल्यावरच आघाडी तोडली. जर युती राहिली असती तर आघाडी तोडली नसती.

वाचने 10493 वाचनखूण प्रतिक्रिया 25

जानु गुरुवार, 09/25/2014 - 23:08
पाकक्रुती टंकावयास घेतली पण अचानक बातमी वाचल्यावर परवाच चर्चा झाल्याप्रमाणे लिहुन टाकले. प्रकाशित केल्यावर चुक लक्षात आली. तरी क्षमस्व....

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 23:46
=)) =)) =)) चुकून बरोबर जागी पोचलात! ही पाकृ पाच स्वैपाकिणी मिळून भांडत भांडत करणार असल्याने हमखास बिघडणारे!

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/25/2014 - 23:59
हा आमचा मग महाराष्ट्र आहे इथे आम्ही झुणका भाकरच खाणार :smile: . ढोकळा फाफडा खाण्यासाठी पलिकडे जा... *lol* .

In reply to by धन्या

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 20:43
सध्या एकच आहे नं, भविष्यात वेगळे झाले तरी समान मातॄभाषा व संस्कृतीमुळे दोन्हीकडच्यांना परकेपणा जाणवणार नाही यावर पूर्ण विश्वास आहे.

छान पाकृ. कृती: १. प्रथम सगळे पदार्थ वेगळे वेगळे 'निवडून' घ्या. २. निकालानंतर सत्तेवर येण्यासाठी त्यांची 'मिसळ' बनवा. ३. सत्तेवर आलेल्यानी एकमेकाशी जमवून घेउन ५ वर्षे चवीने 'खा'. ४. मिसळ पाच वर्षे पुरली नाही तर पूरक अन्न म्हणून 'मध्यावधी' चिवडा बनविण्याचा प्रघात आहे. ५. जनतेच्या तोंडाला पाने पुसा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पोटे Fri, 09/26/2014 - 02:44
अच्छे दिन येणार म्हणुन मनात मांडे खा.

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:45
अय्या, मस्तच पाककृती! या वीकांताला नक्की करून बघीन!!! पण काय्ये की आमच्या इथे ती 'राष्ट्रवादी' मिळत नाही... त्याऐवजी 'ग्रीन पार्टी' घालून करून बघीन!!! :)

विजुभाऊ Fri, 09/26/2014 - 11:56
पिडां काका ग्रीन पार्टीसाठी आता उसा स्टॉर्स मधे जाणे आलं एक शंका : उत्तर भारतातील तथाकथीत बलाढ्य पार्ट्या जसे की " हत्ती पार्टी , सायकल पार्टी . कंदील पार्टी " या महाराष्ट्रात कुठेच दिसत नाहीत?

विवेकपटाईत Fri, 09/26/2014 - 20:35
महाराष्ट्रात सत्ता रुपी अमृतासाठी समुद्र मंथन सुरु झाले आहे. देव-देव, दानव-दानव सर्व वेगवेगळ्या तऱ्हेने वासुकी नागाला पिळून काढतील हे नक्कीच.

In reply to by विवेकपटाईत

आयुर्हित Sun, 10/05/2014 - 01:03
जनतारूपी मन्दार पर्वताला गरागरा फिरवतील! एकदा का अमृत हाती आले कि (जनतारूपी)मन्दार पर्वताला समुद्रात फेकून देतील.