✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

स
संदीप डांगे यांनी
गुरुवार, 09/25/2014 - 12:42  ·  लेख
लेख
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. मग अनिस नेमके करते काय? देवालयात रांगा लावणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी, हजारोंच्या संख्येने बोलले जाणारे आणि फेडले जाणारे नवस, स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी, हे सगळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असताना सुद्धा जर वाढतच असेल तर मला असे वाटते अंनिस सपशेल नापास झाली आहे. त्यांची मुल्ये आणि विचार कुठेतरी भलत्याच दिशेला आहेत असे सारखे राहून राहून वाटते. धर्म, कर्मकांडे, पूजाविधी आणि आयुष्यात येणारे बरेवाईट प्रसंग याचा काही सुतराम संबंध नाही असे स्वत:शिवाय कुणालाही पटवून व सिद्ध करून दाखवण्यात कार्यकर्ते कमी पडले आहेत. जर मानसिक आधारासाठी श्रद्धेचा भक्कम चबुतरा आवश्यक आहे आणि तो अंनिस च्या मते चुकीचा आहे तर इतक्या वर्षात त्यास सक्षम व्यवस्था उभी करण्यात इतके प्रकांड पंडित गाठीशी असताना अपयश का यावे? खरच अंनिसचा मूळ उद्देश नक्की अंधश्रद्धा निर्मुलन हाच आहे कि समस्त हिंदुस्तानी जनतेला त्यांच्या श्रद्धा सोडून अधांतरी लोंबकळत ठेवण्याचा आणि नंतर अशा श्रद्धाहीन, हतवीर्य समाजाला आपल्या धर्माच्या जाळ्यात ओढण्याचा काही आंतरराष्ट्रीय कट आहे? सध्या तरी त्यांच्या कामावरून असे काही विधायक आणि भारतीय जनतेशी प्रामाणिक असे वर्तन होताना दिसत नाही. एक प्रकारची हटवादी आणि म्हणूनच एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणून हिंदू अंनिस कडे बघतात. आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे. तुम्हाला काय वाटते? (याआधी हा विषय मिपावर चघळला गेला असेलच, आवश्यकता नसेल तर धागा उडवा. पण मग मला आधीच्या धाग्यांचे काही स्त्रोत जरूर द्या.)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41807 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

???

एस
गुरुवार, 09/25/2014 - 12:52 नवीन
तुम्ही असा फालतू आणि बेसलेस धागा काढण्यापेक्षा तुमच्या व्यवसायात डोके का घालत नाहीत?
  • Log in or register to post comments

पूर्णपणे सहमत.

प्रचेतस
गुरुवार, 09/25/2014 - 12:58 नवीन
पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

काहीसा सहमत काहीसा असहमत.

प्यारे१
गुरुवार, 09/25/2014 - 13:01 नवीन
काहीसा सहमत काहीसा असहमत. व्यवसायामध्ये २४*७ डोकं घालून बसता येणं शक्य नाही. शक्य झालं तरी परिणाम दिसायला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा द्यावा लागणारच. आमच्याकडं '९ महिन्याचं' उदाहरण नेहमी दिलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 13:11 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फारच बॉ लहान तुम्ही !

धर्मराजमुटके
गुरुवार, 09/25/2014 - 22:25 नवीन
मी तर १८ वर्षांचे उदाहरण देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अगदी अगदी.

धन्या
गुरुवार, 09/25/2014 - 13:02 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 13:09 नवीन
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

११११११११११११११११

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/25/2014 - 13:06 नवीन
११११११११११११११११+११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 13:07 नवीन
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अतिशय कुजकट प्रतिसाद भासत असल्याने

काउबॉय
गुरुवार, 09/25/2014 - 21:45 नवीन
त्यामागील विचारास सहमती वा असहमती देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तिच गोष्ट संदीप ची. दाभोलकर टाळुन विचार मांडले असते तर त्याला नक्कीच यथोचित पातळी लाभली असती, असो एकुणच नॉन सेन्स थांबवायचा मला अधिकार नाही त्यामुले चालुद्या असे म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत.

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 22:15 नवीन
काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत. मी स्वत: कुणाचा व्यक्तिश: उपमर्द करणार नाही. "आता दाभोळकर नाहीत" याचा अर्थ तोच आहे. पाहिजे ते हे दोन अर्थ घ्या. १. "ते" नाहीत, त्यामुळे आता तुम्हीच जबाबदारीने पुढचे पाउल उचला २. "ते" नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुका टाळण्याची पूर्ण संधी आहे. पण एकूणच नॉन सेन्स म्हणजे काय आणि यथोचित पातळी काय ते जर स्पष्ट करा दादा! असा चिमटा काढून भागो मत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

नॉन सेन्स म्हणजे महत्वाच्या विषयात अनावश्यक

काउबॉय
गुरुवार, 09/25/2014 - 23:08 नवीन
घटकांची घुसड़..! अशी घुसड़ that really doesn't make any sense. यथोचित पातळि म्हणजे मांडलेला विचाराला न्याय मिळेल आशा उंचीवर न्हेउन त्याला चर्चापूरक बनवणे होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

दुरदई वाने

काउबॉय
गुरुवार, 09/25/2014 - 23:13 नवीन
आपण श्रध्दा अश्रध्दा व अंधश्रदहा सारखी विश्वव्यापक प्रकरणे व्यक्तिसापेक्ष नजरेतुन मर्यादित करुण अनावश्यकरित्या आपल्याच विषयाचे गाम्भीर्य व ऊँची कमी करत आहात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

त्या धाग्यांवर मि.पा. ची

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 09/25/2014 - 13:28 नवीन
त्या धाग्यांवर मि.पा. ची एरव्ही न दिसणारी संवेदनशील बाजु दिसली होती. अश्या धाग्यांवर मात्र मि.पा करांचा नेहेमीचा धुमाकुळ चालणारच एवढेच फक्त लक्षात असु द्या! इथे विशेषतः अश्या धाग्यांवर कधी कोण कुणाला "चपला घालुन ताबडतोब चालु लागा" वा " तुम्हाला फाट्यावर मारण्यात आले आहे" असे म्हणेल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे ट्यार्पी खेचणारे धागे काढताना सगळी तयारी ठेवा. बाकी तुमच्याकडुन असा ट्यार्पी खेचणारा धागा आला ही तुमची मनस्थिती पुन्हा चांगली होत आहे ह्याची खूण आहे असे समजतो आणि असे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments

चालू द्या

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 13:35 नवीन
मिपा आहे सगळ्यांसाठी. प्रत्येकाच्या धाग्यासाठी आणि धाग्यातल्या प्रत्येकासाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

बिनधास्त लिवा हो तुम्ही!

पैसा
गुरुवार, 09/25/2014 - 13:50 नवीन
त्या धाग्यात लिहिलेलं त्या धाग्याबरोबर वाचनमात्र झालं. आज आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते बिनधास्त लिहा आणि चर्चा करा! आज आत्ता तुम्हाला छान वाटतंय ना? बस!
  • Log in or register to post comments

Okay

पगला गजोधर
गुरुवार, 09/25/2014 - 14:38 नवीन
भाऊ, तुमच्या या धाग्यातील विचारांशी मी काडीमात्र सहमत नसलो, तरी मोकळेपणाने तुम्ही तुमचे विचार मांडले, याबद्दल तुमचे अभिनंदन. मिपाचे ऐक यश आहे, कि अतिशय भिन्न विचारांची लोकं मोकळेपणाने विचार मांडू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

"पग" शी अत्यंत सहमत... बाकी

शैलेन्द्र
Sat, 09/27/2014 - 09:38 नवीन
"पग" शी अत्यंत सहमत... बाकी चालुद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा

बाळ सप्रे
गुरुवार, 09/25/2014 - 13:55 नवीन
किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा
बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा
या दोन वाक्यांवरुन तुम्हाला अंधश्रद्धांच वर्गीकरण कसं करायचय ते नक्की समजत नाही. आता एखाद्या शाळेत लिंबू मिरची टांगली तर ती शैक्षणिक अंधश्रद्धा की धार्मिक?? उमेदवारी अर्ज पितृपक्षात न भरणे ही राजकीय की धार्मिक अंधश्रद्धा?? आधी धार्मिक सामाजिक राजकीय अंधश्रद्धा म्हणजे काय ते स्पष्ट करा.. मग फक्त हिंदू धर्मच वगैरे बघु..
  • Log in or register to post comments

असे आहे तर...

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 14:35 नवीन
राजकीय अंधश्रद्धा: लोकशाहीतल्या आपल्या नेमक्या स्थानाबद्दल लोकांना अजूनही नीट अशी माहिती नाही. आपली कामे करणारा राजकीय नेता हा आपला मालक असल्यासारखा वागतो आणि आपण ते खपवून घेतो. त्यांच्या विरुद्ध आपण उभे राहू शकत नाही हि सामान्य जनतेची अंधश्रद्धा, राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला अण्णा हजारे किंवा तत्सम लोकच लागतात हि अंधश्रद्धा. थोडक्यात लोकशाही म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव न ठेवता आपले सगळे चांगले झाले पाहिजे अशी भावना म्हणजे अंधश्रद्धा. शैक्षणिक: शिक्षण घेतल्याने नोकरी लागते आणि पैसा कमावण्यासाठीच शिक्षण घ्यायचे हि एक मोठ्ठी अंधश्रद्धा. शिक्षण घेतल्याने नोकरी लागेलच अशी कुणीही खात्री देऊ शकत नाही. तरीही लोक बावळटपाने कागदाच्या भेंडोळ्या गोळा करण्यात आयुष्य घालवतात. पैसा ओतला कि हुशार होता येते हि एक आणखी अंधश्रद्धा सामाजिक: जात-पात, धर्म, व्यवसाय यांच्यामुळे जी दरी निर्माण होते ती ओलांडून जाऊन आपण जाऊच शकत नाही अशी सर्वसामान्य अंधश्रद्धा. अपवाद आहेत पण म्हणून नियम मोडत नाहीत. लोक अजूनही जुन्या कालबाह्य सामाजिक गोष्टींचा बाऊ करून आपलाच विकास रोखून धरतात. कारण ह्या काही अंधश्रद्धाच. एवढेच काय, वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा आहेतच की. जसे स्टेम सेल बँकिंग वैगेरे वैगेरे. वेश्या, भिखारी आणि अस्वच्छता ह्यात समाजाच्या काही चुकीच्या समजुतीमुळे तयार झालेल्या समस्या आहेत. त्यांच्या मुळाशी असलेल्या अंधश्रद्धा निपटून काढल्यास बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एखादी संघटना जेंव्हा त्यांच्या नावात अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द वापरते आणि कार्यक्षेत्र फक्त विशिष्ट धर्माशी निगडीत असते तेंव्हा हेतू बद्दल संशय निर्माण होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

तुम्ही सगळ्याच समस्या

बाळ सप्रे
गुरुवार, 09/25/2014 - 16:21 नवीन
तुम्ही सगळ्याच समस्या अंधश्रद्धेच्या नावखाली गोळा केल्यायत.. तितकेसे पटत नाही.. उदा. शिक्षणाने नोकरी मिळते. इथे कार्यकारणभाव आहे. नोकरीच्या ठिकाणी पात्रता म्हणून शिक्षणाची अट असते. पण सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं कोणीच म्हणत नाही. मग सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून लोकांनी शिकूच नये का ?? इथे कार्यकारणभाव असल्याने इथे श्रद्धा अंधश्रद्धा शब्द वापरणे योग्य वाटत नाही.. तसेच इतर उदाहरणातही.. कार्यकारणभावाचा अभाव असतो तिथे श्रद्धा हा शब्द वापरता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल,

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 16:42 नवीन
अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, पटलाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यकारणभाव या शब्दाबद्दल माझे काही अज्ञान असू शकते. पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा आणि फणस येईल हि अंधश्रद्धा आहे असे माझे मत आहे. नोकरीसाठी शिक्षण हि अट ठेवणे येथूनच हि अंधश्रद्धा सुरु होते. जर तसे नसते तर नोकरीसाठी मुलाखत, वेगवेगळ्या परीक्षा यांची गरज नसती. एखाद्या कंपनीने सरळ पहिल्या दहा विद्यार्थ्यांना अमुक एका नोकरीचे थेट नेमणूक पाठवले असते. असे होत नाही. इथे कार्यकारणभाव कसा? माझ्या मते शिक्षणक्षेत्रात भयंकर अंधश्रद्धा बोकाळली असून त्याचा गैरफायदा घेऊन सामन्यांची पिळवणूक चालली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

पण आंब्याच्या झाडाला आंबेच

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 16:49 नवीन
पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा
चांगले आंबे येतील ही ना श्रद्धा ना अंधश्रद्धा. ती फक्त "अपेक्षा" किंवा "आशा" ( ते सुद्धा झाड आपले असेल तर ). झाड वैर्‍याचे असेल तर सगळा मोहर गळुन जावा ही "इच्छा".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुम्हाला सगळ्याच गोष्टीला

बाळ सप्रे
गुरुवार, 09/25/2014 - 17:20 नवीन
तुम्हाला सगळ्याच गोष्टीला श्रद्धा म्हणायचे असेल तर म्हणा बुवा .. माझादेखिल काही आग्रह नाही तुम्हाला पटलेच पाहिजे असा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अंनिस व धर्मश्रद्धा हा धागा

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/25/2014 - 13:56 नवीन
अंनिस व धर्मश्रद्धा हा धागा वाचावा.
  • Log in or register to post comments

आणखी एक..

बाळ सप्रे
गुरुवार, 09/25/2014 - 13:56 नवीन
आणखी एक.. भिकारी, वेश्या, अस्व्च्छता हे सामाजिक प्रश्न झाले पण यात अंधश्रद्धा ( किंवा श्रद्धा) काय ??
  • Log in or register to post comments

आत्मपरीक्षण

पैसा
गुरुवार, 09/25/2014 - 14:00 नवीन
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
हे सगळ्यांनीच सर्ववेळ करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

अंनिस

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 09/25/2014 - 14:15 नवीन
अंनिसने अमेरिकेत शाखा उघडली पाहिजे असे शिरिष पूर्वी म्हणायचा. त्यांच्या त्या हिरव्या नोटेवर 'In God we trust' लिहिलेले असते म्हणून. तुमच्या त्या व्हॅटिकन सिटीत्,मक्का-मदिना येथे तोबा गर्दी असते.एवढेच काय, केऱळातल्या काही चर्चेसमध्येही भल्यामोठ्या रांगा असतात.अंनिसवाल्यानी ईतर धर्मातील अंधश्रद्धांबद्दल कधी काही केले आहे का?
स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी
राहू,केतू,वेळ पाहून काम करणारी अनेक मंडळी पाहिली आहेत. ती तसे करतात म्हणजे तीमाणसे निष्क्रिय असतात हा एक मोठा गैरसमज आहे. नविन घरात राहायला जायचे तर होम-हवन हवेच.दक्षिण भारतात तर हे कसोशिने पाळले जाते.त्याला अंधश्र्द्धा म्हणनार असाल तर खुशाल म्हणा.
  • Log in or register to post comments

इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत

गणपा
गुरुवार, 09/25/2014 - 18:49 नवीन
इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत म्हणुन आपल्याही तश्याच राहुद्या असं म्हणायचय का माई? अहो त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

प्रश्न

प्रदीप
गुरुवार, 09/25/2014 - 21:07 नवीन
त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं. 'आपले घर' म्हणजे काय? अंनिस जर 'भारतीय समाजासाठी' कार्यरत आहे असे म्हटले, तर मग त्यात हिंदूंव्यतिरीक्त इतर धर्मीयही आलेच ना? का अंनिसने स्वत: हिंदूधर्मिय आहोत असे जाहीर केले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

दाभोलकरांना स्वताची मोठी

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 14:24 नवीन
दाभोलकरांना स्वताची मोठी अंधश्रद्धा कधी दिसली नाही त्यामुळे ती दुर करण्याचे तर विसराच. भारतीय समाजाला आणि त्याच्या वैचारिक कुवतीला पण दाभोळकर ओळखू शकले नाहीत. अनिस वगैरे काढुन आणि व्याख्याने देवुन भारतातल्या अंधश्रद्धा कमी होतील असे वाटणे म्हणजेच मोठी अंधश्रद्धा आहे. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीवर गुळमुळीत भुमिका घेणे जसे की "आमचा श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला आहे" इत्यादी. दाभोलकरांच्या ३० वर्षाच्या कारकीर्दीतच देवळांच्या रांगा, बुवा, बाबा, महाराज ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यांचा खून झाला म्हणुन नाहीतर ९९ टक्के जनतेला त्यांचे नाव पण माहीती झाले नसते.
  • Log in or register to post comments

या विषयावर कै राजीव दिक्षित

कवितानागेश
गुरुवार, 09/25/2014 - 14:30 नवीन
या विषयावर कै राजीव दिक्षित यांचे एक लेक्चर युट्यूबवर ऐकले आहे
  • Log in or register to post comments

गल्लत करू नका.

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 14:39 नवीन
गल्लत करू नका. श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे. माझ्या कर्तृत्वावर माझी भक्कम श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, आशा. अजून काय सांगायचे. त्याशिवाय का जगात काही करणे शक्य आहे का? माझी जशी श्रद्धा माझ्या कर्तृत्वावर आहे तशी अंनिस ने इतरांची निर्माण करावी. नुसते हे चूक ते चूक करत फिरू नये. आणि दाभोळकर यांच्यासारख्या माननीय व्यक्तींबद्दल भंकस करण्याचा विषय, तर मी संघटनेद्दल बोलत आहे. दाभोळकर काय होते हे निदान त्यांच्या संघटनेला जरी कळले तरी खूप आहे.
  • Log in or register to post comments

श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 14:43 नवीन
श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे
एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग केले की मग "माझी ती श्रद्धा आणि तुझी अंधश्रद्धा" असले प्रकार चालू होतात. हे सर्व फार वैयक्तीक आहे, दुसर्‍यांना त्यात पडुच नये ( जो पर्यंत त्यांना त्याचा त्रास होत नाही ). दाभोळकरांना तेव्हडे पण समजले नाही ह्याचे वाईट वाटते.
  • Log in or register to post comments

धागा काही समजला नाही...पण.....

मुक्त विहारि
गुरुवार, 09/25/2014 - 14:52 नवीन
ह्या धाग्याच्या निमीत्ताने निदान इतके तरी समजले कीए, तुम्ही परत जीवन जगायचा प्रयत्न करत आहात. अजून लिहा. आणि बिंधास्त लिहा.
  • Log in or register to post comments

अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन

मृत्युन्जय
गुरुवार, 09/25/2014 - 14:56 नवीन
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? हे म्हणजे भारताने मार्स मिशन हाती घेण्याच्या ऐवजी भारताने दार्द्र्य निर्मुलन हाती का घेतले नाही असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. या सगळ्या गोष्टी समांतरपणेच हाती घेतल्या पाहिजेत ना. सगळेच महत्वाचे आहे. दाभोळकरांचा अप्रोच कदाचित चुकीचा असु शकेल. पण त्यांनी हेच का केले आणि तेच का केले नाही हा प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल.
  • Log in or register to post comments

तुमचे बरोबर आहे.

संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 15:54 नवीन
प्रश्न अंनिस च्या सर्वांगीण विचारपद्धतीचा आहे. पण एकंदर एखादी संघटना असाच विचार का ठेवते वैगेरे विचारणे चूक असू शकते. मला हेतू बद्दल शंका आहे. म्हणून हे प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मी खरं तर अंधश्रद्धा

सुबोध खरे
गुरुवार, 09/25/2014 - 14:59 नवीन
मी खरं तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सभेला चाललो होतो पण मध्येच मांजर आडवं गेलं मग बेत रहित करावा लागला. आपली अशी परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments

?

आतिवास
गुरुवार, 09/25/2014 - 15:42 नवीन
? अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा १. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे? २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते? ३. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. आणि मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. !! ४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही? ५..... ६. ... ... ... १००. ....
  • Log in or register to post comments

'शत'प्रतिशत प्रतिसाद

प्यारे१
गुरुवार, 09/25/2014 - 15:47 नवीन
'शत'प्रतिशत प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 15:53 नवीन
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?
ना ते विधायक आहे ना ते विघातक आहे. निरर्थक आहे. ज्यांना अंधश्रद्धा सोडायच्या होत्या त्यांन्नी त्या त्यांच्या त्यांच्या सोडल्या. उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या. मनुष्य स्वभाव आहे, कोणाला दुसर्‍याने सांगितलेले आवडत नाही की तू मुर्ख आहेस. त्याचा मूर्खपणा अजुनच घट्ट होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

सहमत.

शिद
गुरुवार, 09/25/2014 - 16:20 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

उलट अनिस वाल्यांच्या बोंब

बाळ सप्रे
गुरुवार, 09/25/2014 - 16:30 नवीन
उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !! सगळे जग बदलेल अशी अपेक्षा अंनिसलाही नव्हती. पण जो थोडाफार बदल ते घडवू शकले तो नक्कीच स्वागतार्ह आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

ज्यांनी खुल्या मनाने विचार

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 16:34 नवीन
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !!
ज्यांनी सोडल्या त्या त्यांच्या त्यांनी, त्यांच्या विचाराने. अनिस चे काही कॉट्रीब्युशन नाही. माझी बहीण एकाच वेळी दाभोलकरांचे खूप कौतुक करते, त्यांची पुस्तके वाचते आणि शक्य असतील त्या सर्व अंधश्रद्धा पाळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अगदी.. अगदी.

गवि
गुरुवार, 09/25/2014 - 16:58 नवीन
अगदी.. अगदी. लोकांना चमत्कारामागची हातचलाखी समजावून सांगणे, प्रात्यक्षिक करुन दाखवणे, भंडाफोड करणे इत्यादि मार्गांनी लोकजागृती करण्याचा काही संस्थांचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी लोकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. मनोरंजन म्हणून लोक पाहतात आणि स्वतःचे बाबा बुवा कोणी असतील त्यांच्याबाबतीत मात्र ही हातचलाखी वगैरे मानायला ते तयार नसतात. श्रद्धा हे एक अत्यंत ताकदवान डिनायल आहे. आमचे बापू, बाबा, महाराज इ इ हे असे जादूगर नाहीच आहेत मुळी.. या घट्ट समजुतीनेच लोक भक्त झालेले असतात. "अ‍ॅक्सिडेंट्स ऑकर टु अदर्स", या तत्वानुसार "भोंदूगिरी इज प्रॅक्टिस्ड बाय अदर बाबाज" अशीच समजूत असल्याने कोणत्याही कार्यक्रमाने त्यांचे मन वळवणे शक्य नाही. कोणाच्यातरी आहारी जाणे ही एक तीव्र ताकदीची गरज आहे (व्यसनाप्रमाणे). अनेक पॅथीज, ज्योतिष आणि कायकाय प्रथा हजारो वर्षे टिकल्या तश्याच अंधश्रद्धाही टिकण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची समाजाला गरज आहे. जी गोष्ट तीव्र गरजेची आहे तीच टिकते. निर्मूलन वगैरे हे वरकरणी आवश्यक दिसतं खरं पण ते अशक्य वाटतं.. मग याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणा किंवा रियल थिंकिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

बर्‍याच अंशी सहमत आहे. परिणाम

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/25/2014 - 17:05 नवीन
बर्‍याच अंशी सहमत आहे. परिणाम होत नाही याबद्दल असहमती. कारण हजारो वर्षे असलेल्या अंधश्रद्धा या काही दशकात दूर होतील ही अपेक्षा योग्य नाही. त्यामुळे परिणामाच वेग अत्यंत सूक्ष्म आहे.पण आहे. अंमलबजावणी नसु द्यात पण विचार करायला लोक प्रवृत्त होतात हे ही नसे थोडके!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

श्रेय द्यायचं की नाही हा

बाळ सप्रे
गुरुवार, 09/25/2014 - 17:22 नवीन
श्रेय द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. माझ्या वैयक्तिक विचारधारा बदलाचं श्रेय मी दाभोलकरांना/ अंनिसला देतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

हे जर खरे असेल तर मी माझे मत

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 17:25 नवीन
हे जर खरे असेल तर मी माझे मत मागे घेतो. एका माणसाचे विचार बदलण्याचे काम जरी अनिसने केले असेल तर Its worth
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे

गवि
गुरुवार, 09/25/2014 - 17:28 नवीन
ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे होते का आणि नेमका काय बदल झाला आणि किती प्रमाणात यावर हे अवलंबून आहे. त्यांचे आजवरचे प्रतिसाद वाचून ते पूर्वी कधीही अंधश्रद्ध असतील असे वाटत नाही. अर्थात हे वरवरचे मत झाले हेही मान्यच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

सप्रे साहेब म्हणतायत तर

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 17:31 नवीन
सप्रे साहेब म्हणतायत तर त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. त्यांनीच नीट विचार करुन सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा