मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोळाच्या शेंगा

दिपक.कुवेत · · पाककृती
मागे जसे कोळ-पोहे दिलेले त्याच कोळातल्या ह्या शेंगा. जीरा राईस किंवा साध्या वाफाळणार्‍या भाताबरोबर अप्रतिम लागतात. सोबत पापड आणि लोणचं/खारातली मिरची द्यायला विसरू नका. Shenga 1 साहित्यः १. उकडलेल्या शेंगा - १ बाउल २. अर्ध्या नारळाचं घट्ट दुध ३. चिंचेचा कोळ - पाव वाटि ४. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे ५. तुप, जीरं, हिंग - फोडणीसाठि ६. चवीनुसार गुळ, मीठ कॄती: १. नारळाच्या घट्ट दुधात चिंचेचा कोळ, वाटलेली पेस्ट, चवीनुसार गूळ व मीठ घालुन एकजीव करा २. कढईत तुप, हिंग - जिर्‍याची फोडणी तयार करा ३. त्यात उकडलेल्या शेंगा अगदि १/२ मि. परता ४. नारळाचं दूध घालून एक हलकिशी उकळि आणा ५. बारीक चीरलेली कोथींबीर पेरुन सर्व करा तर मंडळी, या जेवायला. पान वाढलयं....साधा भात, बटाटाच्या काचर्‍या, कोळाच्या शेंगा, खारातली मिरची आणि पापड Shenga 2 टिपा: १. ह्या शेंगा रश्श्यातल्या करायच्या नसल्यास नारळाच्या दुधाएवजी ओलं खोबरं आणि बाकि साहित्य घालून भाजी टाईप बनवु शकतो. आवडत असल्यास जोडिला भोपळ्याच्या फोडिहि चालतील. पण सुख्या भाजीत मजा येत नाहि म्हणजे शेंगा पोळीशी नीट खाता येत नाहित. गरमागरम भाताबरोबर भुरके मारत, जोडिला खारातली मिरची तोंडि लावत जेवण्यातच खरी मजा आहे. २. गुळ चवीनुसारच घाला. आंबट-गोड-तिखट नारळाच्या दुधातल्या ह्या शेंगा मस्त लागतात.

वाचन 16731 प्रतिक्रिया 0