या गोष्टीवर कदाचित भरपूर वेळा विनोदाच्या अंगानं लिहिलं गेलंय. प्रत्यक्षात डावीकडे सिग्नल देवून उजवीकडे वळणार्या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. पण नुकत्याच घडलेल्या दोन प्रसंगांनी मला याबाबत गंभीर विचार करायला प्रवृत्त केलंय. दुसरा प्रसंग अति-गंभीर असून सुद्धा अपरिचित रहाण्याच्या मर्यादेमुळे तो न सांगता मी एक छोटा प्रसंग सांगतो.
स्थळः चतु:शृंगी चौक, विद्यापीठाजवळ, पुण्यनगरी.
उजवीकडे वळणारा रोड. त्याला डावीकडे फुटलेला छोटा फाटा. मी डावीकडच्या लेन मध्ये. माझ्या कारपाठून लगटून डावीकडून येणारी एक फडकंधारी मुलगी. मी कारचा डावीकडचा सिग्नल अंदाजे १० सेकंद दिला आणि १० च्या स्पीडने वळलो. माझ्या डावीकडून येणारी मुलगी रोडच्या नॉर्मल फ्लो ला म्हणजे उजवीकडे वळली आणि माझ्या कारवर आपटली. लोक जमा झाले. मला कारमधून काय झालंय दिसत नव्हतं. बहुधा लोक तिला उठवायला मदत करत होते. तिला मुळीच लागलं नसावं. कारण ती अर्ध्या मिनिटातच निघून गेली. तत्पूर्वी एक अनाहूत मला 'सॉरी म्हणा आणि मिटवून टाका' म्हणून सल्ला देवून निघून गेला. मी नि:श्वास सोडला. माझ्या गाडीला त्या मुलीच्या स्कूटरमुळे पडलेला एक मोठा स्क्रॅच. जर त्या मुलीला काहीतरी झालं असतं तर मलाच लोकांनी वाईट ठरवलं असतं.
अर्थात असे प्रसंग बरेच आणि रोजचे पण छोटे. मी बर्याचदा मोटरसायकल वापरत असल्यामुळे आपल्याला अचानक वळणार्या महिलेचा अंदाज येवून तो धोका टाळणं सोपं जातं जे कार मध्ये बहुधा शक्य नसावं. बर्याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत. सध्या तर पुढे एखादी महिला स्कूटरवरून जात असेल तर मी शक्य असेल तर मोटरसायकल चा वेग कमी करतो आणि मधलं अंतर वाढवतो किंवा मग तिला ओव्हर्टेक करून पुढे जातो. माझा कमीत कमी एक मित्र तरी असंच करतो हे त्यानंच मला सांगितलेलं आहे. पुढे एखादी महिला स्कूटर चालवत असेल तर माझे कानाचे आणि डोळ्याचे सेन्सेस कुठल्याही क्षणी ब्रेक दाबण्यासाठी ज्यादा तयार असतात (heightened senses).
माझं असं निरिक्षण आहे, की अन-इंटेंशनली पुरूष सर्वसाधारणपणे सुरक्षित गाडी चालवतात आणि त्यांना आपण काय करतोय याचं भान असतं (जे अर्थात इंटेंशनली बेजबाबदारपणे चालवतात त्यांना वगळावंच लागेल) पण अन-इंटेंशनली महिला गाडी चालवताना गोंधळलेल्या असतात आणि त्यांच्यामुळे इतरांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
हे निरिक्षण कितपत बरोबर आहे?
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
वाचने
16010
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
शंभर टक्के बरोबर आहे
शंभर टक्के बरोबर आहे .मनुष्याच्या उत्क्रांतीच्या काळात तो टोळीने राहयचा, शिकार करणे ,अन्न शोधणे, प्रतिस्पर्धी टोळीशी झगडा इत्यादी कामे बरेचदा पुरुष करायचे, साहजिक या कामांसाठी लागणारी नजर, चपळता, झटपट निर्णय घेण्याची क्षमता ,दणकट शरीर अंगे उत्क्रांतीत पुरुशांमध्ये विकसीत झाली वा एनहान्स झाली.
या उलट स्त्रीयांची कामे बरीच पॅसिव्ह असायची ,मुल जन्माला घालणे, पालनपोषण ,अन्न शिजवणे वगैरे. त्यामुळे या क्षमता त्यांच्यात कमी विकसीत झाल्या आहेत, त्याच बरोबर पुरषांच्या तुलनेत त्यांची बुद्धीमत्ताही कमी असते.
https://www.dailymail.co.uk/debate/article-1274952/Men-ARE-brainy-women…
नाने आगे बढो...तुम्हारे पिछे
In reply to शंभर टक्के बरोबर आहे by नानासाहेब नेफळे
नाने आगे बढो...तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय =))
हॅ कायतरीच !
In reply to नाने आगे बढो...तुम्हारे पिछे by टवाळ कार्टा
आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला !
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती
In reply to हॅ कायतरीच ! by सस्नेह
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय >>
आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला >>
आँ? तुम्हीच होय पाशवी शक्ती? मी कालच्यान शोधतोय.. कोण बरं ती? :D
दगडं ???
In reply to हॅ कायतरीच ! by सस्नेह
दगडं ???
+ १००
In reply to हॅ कायतरीच ! by सस्नेह
+ १००
त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे.
घरात, बाहेर, कार्यालयात भरपूर जाणवणारा स्त्रियांचा मल्टीटास्क स्वभाव नेमका व्हील मागे बसल्यावर अचानक लुप्त होतो. घरात प्रत्येकाच्या गरजांकडे बारकाईने लक्ष्य देणारी स्त्री रस्त्यावरच्या मोठ्या गाड्यांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही हे एक कोडेच आहे. माझ्या मते "गाडी चालवणे हा पुरुषांचा प्रांत आहे, त्यासाठी खूप वेगळे कौशल्य लागते" अश्या पुळचट कल्पनांचा पगडा वर्षानुवर्षे बायकांच्या डोक्यावर बसवला जात आहे. गाडी जोरात चालवणे, ष्टयील मारणे, धोकादायक पद्धतीने चालवून उगाच इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे ह्यामुळे एकूणच गाडी चालवणे हे पुरुषी काम आहे असा महिलांना न्यूनगंड होत असावा. त्यामुळे आपले बाइपन जपताना पुरुषांच्या प्रांतात घुस्खोती करताना तिची एकूणच भंबेरी उडत असेल. माझ्या निरीक्षणानुसार गाडी चालवणे स्त्रियांना अजिबात आवडत नाही असे मला आढळून आले आहे, त्या फक्त गैरसोय टाळावी, वेळ वाचवा, मजबुरी म्हणून गाड्या चालवतात. पुरुषांसारखी मस्ती त्यात नसते. मुळात गाडी हाकणे, प्रवासाची दिशा ठरवणे, नवे प्रांत आणि खाण्यापिण्याच्या सोयी शोधणे हि सर्व कामे पुरुषांची होती, त्यात आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि. त्यामुळे खरेच एकतर स्त्रियांच्या मनातून न्यूनगंड काढून त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. आपसूकच सह्प्रवाश्यांबरोबर अनामिक आणि अघोषित सौम्य अशी जी स्पर्धा रस्त्यावर चालू असते त्याचा त्या एक भाग होऊन वाहतूक सुरळीत होईल
परफेक्ट...
In reply to त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. by संदीप डांगे
परफेक्ट...
बर्याच महिला (खास करून
मिसळपाववरचे एक लोकप्रिय, पुरुष सदस्यही अशा प्रकारे मोटरसायकल चालवत असत याची चांगलीच आठवण आहे. कुठेतरी एकत्र जाताना ते आमच्या पुढे चालवून आम्हाला रस्ता दाखणार होते. आणि उजवी-डावीकडचे इंडिकेटर्स त्यांच्या वाहनालाच नसल्यामुळे त्यांच्या मागे स्कूटर चालवणं फार कठीण झालं होतं. नंतर त्यांना त्याबद्दल टोकलं असता आरसे, इंडिकेटर, हेल्मेट वापरणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत असं त्यांचं मत माझ्यापर्यंत पोहोचलं, अशी पुण्यातली एक मनोहारी आठवण मला अजूनही आहे.
अर्थात एक दोन उदाहरणं पाहून सरसकटीकरणं करण्याची सवय मला नसल्यामुळे ते प्रकरण एक मजेशीर किस्सा एवढंच मर्यादित ठेवण्याची मर्यादा माझ्यावर येते.
याबद्दल उत्क्रांतिजन्य मानसशास्त्रज्ञांनी विदा जमा करून अगदी हेच सिद्ध केलं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मुळात आक्रमक चालक नसतात, कदाचित थ्रीडी व्हिज्युअलायझेशनमध्ये स्त्रिया कमी पडत असल्यामुळे बारीक सारीक अपघात स्त्रियांकडून जास्त होत असावेत असा एक अंदाज आहे.
सरसकटीकरण आणि चावूनचोथा झालेल्या पण मुळात दम नसलेल्या विषयात मला काही रस नाही. ज्यांना ही असली आगलावी सरसकटीकरणं मान्य नसतील त्यांनी वेळ असेल तेव्हा हे वाचा -
Gender Based Insurance Premiums
Analysis of accident rates by age, gender and time of day based on the 1990 nationwide personal transportation survey
थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.
थोडक्यात, या लोकांच्या
In reply to बर्याच महिला (खास करून by ३_१४ विक्षिप्त अदिती
कारण जीवघेणे अपघात होण्यासाठी/करण्यासाठी जिथे आणी जसे ड्रायव्हींग करावे लागते तसे करणार्या महिलांची टक्केवारी अगदी कमी आहे.
व्हेरी गुड
In reply to बर्याच महिला (खास करून by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत. अशा धाग्यांचा कंटाऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ळा आलाय!!!!!!!!!!
डोळे जडावलेला!...
ऽ ऽ ऽ ऽ ऽ
कुल रायडर !
In reply to बर्याच महिला (खास करून by ३_१४ विक्षिप्त अदिती
२०० फिक्स!!!
२०० फिक्स!!! ;-)
काश्मिर
काश्मिर होणार नक्की....
चार का एक, चार का एक
In reply to काश्मिर by स्वप्नज
काश्मीरला माझा भरीव पाठिंबा.
वेगळा विदर्भ आणि वेगळा बबन
In reply to काश्मिर by स्वप्नज
वेगळा विदर्भ आणि वेगळा बबन झालेच पाहिजेत.
आता पॉपकॉर्न घेउन बसायचे की
आता पॉपकॉर्न घेउन बसायचे की तेल्/तुप्/घासलेट्/पेट्रोल ;)
नाही दरवेळी कश्मिरच कशाला?
नाही दरवेळी कश्मिरच कशाला? बेळगांव होणार असे म्हणा? तो ही ज्वलंत प्रश्न आहेच की.
हे बरोबरे !!! काश्मीर त्या
In reply to नाही दरवेळी कश्मिरच कशाला? by प्रमोद देर्देकर
हे बरोबरे !!! काश्मीर त्या बिलावलला खेळायला दिलंय !!!
ऐन नवरात्राच्या तोंडावर फटाके
ऐन नवरात्राच्या तोंडावर फटाके फुटणार. =)) १०० नक्की.
आदिमायांनो
जाग्या व्हा.९ रात्र लढण्यासाठी विषय मिळाला आहे.
स्वयंपाक होउ दे.
मग बघा,झाडू लाटणे,पळी,कालथा आणि किल्लीफळा,उंदीर घेऊन कशा सज्ज होऊन येतील सार्याजणी.
लढण्यासाठी तयार रहा लेखक महाशय.
गाडी चालवताना मोबाईल वर
गाडी चालवताना मोबाईल वर बोलणारे सर्वात जास्त पुरुष पाहीले आहेत. नुसते बोलत नाहेत तर बर्याचद ते डाव्या हातात फोन धरुन त्यात काही पहातही असतात . असे चालक पाहीले की मि लगेच सावध होतो. त्यांच्या पासुन नेहमीपेक्षा जास्त सुरक्षीत अंतर ठेवतो.
एक निरि़क्षण असे ही आहे की, एका खाजगी कं चा बस ड्रायव्हर हा एका हाताने मोबाइल धरुन बोलत होता आणि एका हाताने स्टीअरिंग व्हील धरले होते , गीअर बदलताना तो स्टीअरिंग व्हील ही सोडुन देत असे. त्या बस मधील किति तरी लोकांच्या जिवाशी तो खेळत होता.
जितके फेटल अपघात झालेले आहेत त्यात चालक कोण होते महीला कि पुरुष ?
असहमत
पुण्यनगरीत (आम्ही पण थट्टा करू शकतो म्हंटलं!!) चुकीचं ड्र्याव्हिंग करणारे अनेक पुरूष, मग ते टूव्हीलरवाले असोत की फोर व्हीलरवाले की खास करून रिक्षावाले असोत, अनेक पाहिले आहेत!!!
बाकी पुण्यात (सॉरी, सॉरी, पुण्यनगरीत!!) सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आणि त्यांच्यामागे बसणार्यांना हेल्मेट सक्तीचं करून त्यायोगे या फडकाधारी स्त्रियांचे फडके दूर करण्याचा कायदा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे!
हाय अल्ला, क्या नजाकत! क्या खूबसूरती!!! :)
:)
माझ्या मते तरी स्त्रिया फार
माझ्या मते तरी स्त्रिया फार सावधपुर्वक गाडी चालवतात. त्यामानाने पुरुष थोडे बेदरकरारपणे चालवतात. त्यामुळे तसे बघता पुरुष चालका जास्त धोकादायक असतात असे म्हणायला हवे. पण होते असे की स्त्रियांचा सावधपणा हा थोडा आत्मविश्वासाच्या अभावापायी येतो. असे घाबरुन गाडी चालवणारे लोक खुप बिनभरवश्याचे असतात. त्यामुळेच बायका कधीही कुठुनही गाडी वळवणे, मध्येच गाडी थांबवतात कारण आत्मविश्वासाच्या अभावापायी त्यांचे सर्व लक्ष्य केवळ स्वतःच्या गाडीकडे असते. रस्त्यावरच्या रहदारीचीही काळजी करायला पाहिजे हे गाडी चालवताना त्यांच्या गावीही नसते.
अनुभव माझाही असाच आहे की मुलींना नेहमीच सहानूभूती मिळते. त्यात परत त्यांनी गळा काढला की झालेच.
अवांतरः
१. माझे मत साधारणपणे आलेल्या अनुभवांती बनलेले आहे. काही स्त्रिया मायकेल शूमाकरपेक्षा उत्कृष्ट वाहनचालक असू शकतील. त्यांची उदाहरणे घेउन वस्सकन अंगावर येऊ नये.
२. शतकानुशतकांच्या शोषणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे स्य्त्रियांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे आणी त्यामुळे काही बाबतीत स्त्रियांचा आत्मविश्वास कमी पडल्याने स्त्रियांचे ड्रायव्हिंग खराब असते आणि त्याला सर्वतः पुरुषच जबाबदार आहेत असा आपला युक्तिवाद असल्यास मी त्या वादात पडु इच्छित नाही हे कृपया लक्षात घ्यावे.
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये.
४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे)
In reply to माझ्या मते तरी स्त्रिया फार by मृत्युन्जय
हे लिहावे लागले यातच सगळे आले :)
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्या
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्या असंख्य स्त्रिया पाहिल्या आहेत. दुचाकी मधे अगदी स्कुटी पासुन चेतक चालवणारी तर परवाच बुलेट चालवणारी स्त्री पाहिली आहे. ;) मध्यंतरी फ्लायओव्हर जवळपास ८० च्या स्पीड ने दुचाकी हाणणारी महिला देखील होती... ते दॄष्य अगदी गमतीशीर होत ! अर्धा रेनकोट हवेत उडत होता, साडी नेसुन हा प्रवास अगदी भन्नाट चालला होता ! ;) माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. :) अंतराळात झेप घेणार्या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे...
असो...
जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या
जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप
In reply to ४ चाकी आणि २ चाकी चालवणार्या by मदनबाण
हा हा हा...त्यासाठी वेगळा ३००+ काथ्या कुटावा लागेल
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to ४ चाकी आणि २ चाकी चालवणार्या by मदनबाण
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत.
असो. सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे.
चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by विजुभाऊ
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत.
हॅहॅहॅ... स्त्रीया फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेली {म्हणजे तसे समजली जाणारी}आणि तितकची जवाबदारीची आणि किचकट कामे सुद्धा करु शकतात हे दर्शवण्यासाठीच हे टंकनकष्ट घेतेले आहेत. काका हे बिरुद विनाकारण चिकटवल्या बद्धल आपले फक्त श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला आहे, हे मोठ्या मनाने समजुन / मानुन घ्यावे. ;)
सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे.
आम्ही योग्य व्यक्तींनाच त्यांच्या विषयाच्या आकलन क्षमते नुसार जागावाटपात प्राधान्य देतो. आगाऊ आणि विक्षिप्त, वाय-झेड आणि डोक्यावर पडलेल्या नमुन्यानांच्या "जागां बाबतचा निर्णय" पूर्णपणे पक्षश्रेठींवर सोडुन देतो. ;)
चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या
आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का... ;)
जाता जाता :- हल्ली खाणकाम बंद झाले आहे का ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या
आपणास इनोद निर्मीती करता येते
In reply to मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा by मदनबाण
यात काय विनोदलो मी? असो. टवळा आवडे विनोद ;) https://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif
जाता जाता खाण काम बंद केले आहे. पुन्हा जेंव्हा टेन्डरे फुटतील तेंव्हा सुरू करेन. सध्यातरी गौणखनीज उकरणे प्रलंबीत ठेवले आहे. जागा वाटपानंतर पाहु.
छान,
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by विजुभाऊ
छान,
सुहास भाऊ लवकर या............
सुहास भाऊ लवकर या.................
बरं मग?
बरं मग? :)
तर काय!
In reply to बरं मग? by कवितानागेश
तर काय!
हो ना.!
In reply to तर काय! by नानासाहेब नेफळे
हो ना.!
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का?
In reply to बरं मग? by कवितानागेश
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का?
हेच जर व्हाईस व्हर्सा असतं तर टेम्प्लेट बदलली असती असा एक रोचक विचार क्षणभर मनात तरळून गेला.
बरं मग?
In reply to एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का? by बॅटमॅन
बरं मग? ;)
त्याचं काय?
In reply to बरं मग? by कवितानागेश
त्याचं काय?
असंय होय !
In reply to त्याचं काय? by नानासाहेब नेफळे
असंय होय !
रेकॉर्ड अडकलीये. तरी योग्य ती
In reply to बरं मग? by कवितानागेश
रेकॉर्ड अडकलीये. तरी योग्य ती उपाययोजना करणे ;)
बरं मग?
In reply to रेकॉर्ड अडकलीये. तरी योग्य ती by बॅटमॅन
बरं मग?
तुम्हांलाही तोच सल्ला.
In reply to बरं मग? by पैसा
तुम्हांलाही तोच सल्ला.
असं होय!
In reply to तुम्हांलाही तोच सल्ला. by बॅटमॅन
असं होय!
काय हे!
In reply to असं होय! by पैसा
काय हे!
त्याचं काय?
In reply to काय हे! by नानासाहेब नेफळे
त्याचं काय?
काय ते?
In reply to त्याचं काय? by विजुभाऊ
काय ते?
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
अप्रतिम असतो. ड्राइवज मी वाइल्ड.
आडात नसेल तर पोहर्यात कुठून
आडात नसेल तर पोहर्यात कुठून येणार???
बाकी चालु द्या.
आड जर आडबाजूला असेल तर काय
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे? ;)
आड जर आडबाजूला असेल तर काय
In reply to आड जर आडबाजूला असेल तर काय by विजुभाऊ
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे?
आड असो ,नसो, आडबाजुला असो, आपण निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी.
आता काय निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी, हे उत्तर ज्याने-त्याने आपल्यापुरते शोधावे किंवा शोधु नये किंवा कसेही.
स्त्रियांचा ड्रायव्हिंग काय ?
स्त्रि यां चा ड्रा य व्हिंग काय ???
:-)
आचार्याच्या जानव्याला किल्ली
In reply to स्त्रियांचा ड्रायव्हिंग काय ? by गवि
आचार्याच्या जानव्याला किल्ली काय??या 'पट्टीत' नाही बसलं गवी.आचार्याची बायको वेडी काय?
स्त्रि यां चा ड्रा य व्हिं ग सेंSS न्स काSS य??
असं पाहिजे.
बायकांना वाहन चालवण्याची
बायकांना वाहन चालवण्याची काडीमात्र अक्कल नसते आणि या मतावर मी ठाम आहे. ;)
एवढे धाडशी विधाण करून काडी
In reply to बायकांना वाहन चालवण्याची by दशानन
एवढे धाडशी विधाण करून काडी टाकल्याबद्दल फार्फार आभारीहे. :) पॉपकोर्न आणलेत कालच
सरसकटीकरणाबद्दल
In reply to बायकांना वाहन चालवण्याची by दशानन
सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगबद्दल गैरसमज आहेत, माझेही होते. पण बायकांना पुरेसी संधी मिळाली तर ते गैरसमज नक्कीच दुर होतील.
एकूण (अभ्यासपूर्ण) प्रतिसादांचा अभ्यास केला तर मी ह्या निष्कर्षावर आलोय की रस्त्यावरील अपघात एकतर स्त्रियांच्या कमी आत्मविश्वासामुळे होतात किंवा पुरुषांच्या अती आत्मविश्वासामुळे (बेफीकीरीमुळे) होतात. एकूणातच अपघात होतात हे सत्य आहे. स्त्री आणि पुरुष (किंवा प्रत्येक वाहन चालवणार्या प्राण्यांनी) आपण नक्की कोठे चुकतो यावर विचार केला तर ही परिस्थीती टाळता येईल.
साधारण ५ वर्षापुर्वी जागतीक महिला दिनाच्या दिवशी मी चेन्नई वरुन मुंबईला विमानाने येत होतो. जेव्हा ते विमान एक स्त्री पायलट चालविणार आहे अशी घोषणा झाली तेव्हा भीतीने माझ्या पोटात गोळा आला. या बायका रस्त्यावरुन चालताना नीट गाडी चालवत नाहीत तर विमान कशा चालवणार ? पण त्या पायलटने व्यवस्थित विमानाचे सारथ्य करुन सुखरुप मुंबईला पोहोचवून माझ्या शंका दुर केल्या. मी त्या पायलटला भेटून तिचे अभिनंदन केले.
रहदारीत कार चालवण्यास अधिक
In reply to सरसकटीकरणाबद्दल by धर्मराजमुटके
रहदारीत कार चालवण्यास अधिक कौशल्य लागते असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
काय गवि ?
In reply to रहदारीत कार चालवण्यास अधिक by गवि
काय गवि ? सकाळपासून खेचायला मीच भेटलो वाटतं ? :)
दूसर्या महायुद्धात हिटलरच्या
In reply to रहदारीत कार चालवण्यास अधिक by गवि
दूसर्या महायुद्धात हिटलरच्या फौजेने भरती केलेल्या कित्येक पायलटांना कार चालविता येत नव्हती असं कुठेसं वाचल्याचं स्मरतंय.
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र
In reply to सरसकटीकरणाबद्दल by धर्मराजमुटके
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती.
असो, तुमची असहमती मान्य! पण माझे मत ठाम आहे, आणि हे उगाच टाईप करायचे म्हणून टाईप केले वाक्य नाही आहे.. बायकांना गाडी चालवण्याचा सेन्स नसतो. त्यांच्या हातून अपघात होतात. मोठे नसतील.. ज्यांची नोंद होईल पण लहान लहान शेकडो अपघात स्त्रियांच्या हातून वाहन चालवताना होतातच.
>>समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही.
कारण अनेक अपघात, जे अपघात होऊ शकले नसते.. असे अपघात बायकांच्या हातून झालेले मी असंख्यवेळा पाहिले आहे म्हणून. तुम्ही डोळे झाकून चालत असाल तर तो तुमचा प्रश्न ;)
फक्त बायकांनाच का?
In reply to बायकांना वाहन चालवण्याची by दशानन
काही पुरुषांनापण नसते ...पुण्यात एखादा बाईकस्वार पुरुष जर गाडी चालवताना उजवीकडे १० सेकंदापेक्षा जास्त मान वळवुन बघत असेल तर तो उजवीकडे वळणार असे गृहित धरावे (मागे बसलेला असेल तर थुंकणार असे गृहित धरावे).मग तो सिग्नल (गाडीचा किंवा हाताचा) देवो कि न देवो.
एकुणच पुण्यात सिग्नल महत्वाचा नसुन चालवणार्याची बॉडी लँग्वेज ओळखता येणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही गाडी चालवु शकता.
एव्हढे करुनही समोरुन येउन कोणी स्वतःहुन गाडी ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.
बायकांचे दिशाज्ञान, नकाशावाचन
बायकांचे दिशाज्ञान, नकाशावाचन/आकलन आणि वाहन चालविण्याचे कौशल्य हे वादातीत आहे.
दशानन, रामपुरी यांच्याशी
दशानन, रामपुरी यांच्याशी त्रिवार सहमत!!
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ड्रायव्हींग सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूं स्त्रियांमधे रूढ होत आहेत. आता कोणी म्हणतील की राणी लक्ष्मीबाई ई. घोडा चालवायच्या. पण खर म्हणजे ही तुलनाच चुक आहे. कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो.
अहो, धुलाईयंत्रात (Washing Machine मध्ये) कपडे धुतल्यास तेही रज-तमात्मक होतात. मग एवढ्या मोठ्या गाडीत स्त्री बसल्यावर तीपण रज-तमात्मक होणार नाही का? स्त्र्यांकडून सतत होणार्या अपघातांमागे खरे म्हणजे हेच कारण आहे.
एकूणच महाराष्ट्रातले रस्ते
In reply to दशानन, रामपुरी यांच्याशी by स्वप्नांची राणी
एकूणच महाराष्ट्रातले रस्ते पहाता गाडी आणि धुलाईयंत्राची तुलना आवडली.
काळापहाडभाऊ,मुंबई आणि
In reply to एकूणच महाराष्ट्रातले रस्ते by काळा पहाड
काळापहाडभाऊ,मुंबई आणि नाशिकातले रस्ते फारच गुळगुळीत आणि खड्डेविरहीत असल्याने वाहनांना ट्रॅक्शन मिळत नसल्याने अपघात घडतात असा तुमचा गैरसमज आहे काय?
नै ब्वा. का? ही दोन्ही शहरं
In reply to काळापहाडभाऊ,मुंबई आणि by नानासाहेब नेफळे
नै ब्वा. का? ही दोन्ही शहरं पण महाराष्ट्रातच येतात असं मला वाटतं.
खिखिखि!
In reply to दशानन, रामपुरी यांच्याशी by स्वप्नांची राणी
स्वराबाई, आपल्या थोर संस्कृतीच्या रक्षणासाठी माझा तुम्हाला कंपूसह पाठिंबा आहे! घोडा चालवण्याबद्दलचा आक्षेप समजला. पण भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला रथाची सारथी करून संस्कृतीच्या र्हासाला सुरुवात केली, आणि त्याचमुळे घोर कलियुग सुरू झाले हो! प्राचीन काळात रथाचे सारथ्य करणार्या सत्यभामा, कैकेयी आदि नारींचाही यानिमित्ताने लकडी पुलावर सभा घेऊन निषेध करावा काय या विचारात आहे.
पुण्यनगरीत एकेठिकाणी honda
पुण्यनगरीत एकेठिकाणी honda activa चे प्रचंड धूड सांभाळत एक काष्ठांगातूर ललना वाहनांच्या गर्दीतून गाडी हाकत होती, माझी गाडी तिला समांतर जात होती, प्रत्येक वेळी ट्रॅफिक पूढे सरकल्यानंतर ललना वेगाने गाडी पूढे न्यायची व ट्रॅफिक पूढे जायचे थांबल्यास आपल्या काष्ठशिल्प शोभेल अशा एकाच बोटाने ब्रेक दाबत होती, बोटातला दम व गाडीचा दम याचे प्रमाण व्यस्त असल्याने पुढे थांबलेल्या अनेकांच्या गाड्यांच्या मडगार्डला चुंबनाचा (activaच्या) लाभ सहजरित्या होत होता, अनेकांना हा चुंबनवर्षाव लक्षातच आला नाही.ज्यांच्या लक्षात आला,त्यातले काही प्लॅटोनिक ड्रायवर होते ,त्यांनी मागे वळुण जळजळीत कटाक्ष टाकले, त्यांना काष्ठधारी ललने सॉरी हं! असे उत्तर प्रत्येकवेळी दिले.
स्त्रीदाक्षिण्याचा खंदा पुरस्कर्ता असल्याने मी त्या ललनेस चारी बोटे वापरुन ब्रेक दाबा असा सल्ला दिला, त्यावर तुम्ही तुमचे बघा! असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुलीचा खेळ करत निघून गेली.
कहर!!
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
कहर!!
:-))
हाण तेजायला नेफळे रॉक्स!!!!!
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
हाण तेजायला =)) नेफळे रॉक्स!!!!!
(No subject)
In reply to हाण तेजायला नेफळे रॉक्स!!!!! by बॅटमॅन
अगागा
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
=))
"...असा सल्ला देऊन ती ललना
In reply to पुण्यनगरीत एकेठिकाणी honda by नानासाहेब नेफळे
"...असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुली दाखवत निघून गेली..." घोSSSSर कलीयुग..!!!!
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय?
In reply to "...असा सल्ला देऊन ती ललना by स्वप्नांची राणी
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय?
उगाचच ग्रेग चॅपेल आणि विराट कोहली आपापल्या दुखर्या बोटांसकट आठवले. ;)
आमच्याकडं खरंच एकाला 'ते' बोट वाकवता न आल्यानं बर्याचदा त्याचं नेमकं म्हणणं काय ते समजत नाही.
(चेपु वर मित्र यादीमध्ये सुद्धा आहे. इच्छुकांनी व्यनि करावा)
कारण घोडा 'चालवायला' लागत
कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो.
जोक ऑफ द डे ! ;) घोडा जर "चालवायला" लागत नसेल तर मग त्याला "लगाम" आणि "झापडं" लावायची काय गरज ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
घोडा आणि गाडी एकत्र आले तर ते
घोडा आणि गाडी एकत्र आले तर ते चालवायला लागतात.
घोड्याला जन्मतःच लगाम आणि झापडे नसतात.
गाडीला जन्मतःच ब्रेक आणि मिरर असतात
मुद्दलातच घोळ आहे ...
म्हणजे "सशाचे शिंग " किन्वा " वंध्यापुत्र"
(एवढे बोलून मी माझे टंकन कष्ट वाचवितो.)
(आज सकाळी आठ वाजता चांद्णी चौकात एक बाला असंख्य चुंबने घेतलेल्या कारमध्ये ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली... अजून त्या धक्क्यातून सावरतोय.).
चुकुन " असंख्य चुंबने घेत
In reply to मुद्दलातच घोळ आहे ... by विटेकर
चुकुन " असंख्य चुंबने घेत कारमध्ये ड्रायविंग करताना " असे वाचले. म्हटले विटुकाका खपले बहुधा आज :)
चुंबने , कार आणि बाला
In reply to चुकुन " असंख्य चुंबने घेत by मृत्युन्जय
चुंबने , कार आणि बाला
या तिन गोष्टी परस्परांपासून समान अंतरावर आहेत , हा त्रिकोण नीट समजून घ्यावा. गल्लत करु नये !
तशी गल्लत तिथेच ( म्हणजे चांदणी चौकात ) पाहायला मिळू शकते , पण ते रात्री आठ वाजता !
.
.
.
.
पन खोटं कशाला बोला , आपुन काय पाय्लं नाय बाबा !
( लोकं लगेच विचारतील , तुम्ही तिथे काय करीत होतात ? .... देणं ना घेणं फुकटच कंदील लावणं)
ड्रायविंग करताना एका हाताने
In reply to मुद्दलातच घोळ आहे ... by विटेकर
आम्ही हे दृष्य रोज बर्याच वेळा पहातो, फरक एकच , महीलेच्या जागी पुरुष असतो
म्हणून
In reply to ड्रायविंग करताना एका हाताने by मराठी_माणूस
म्हणून तर त्यांना धक्का बसला ना ! जी गोष्ट रोज घडते त्याचा धक्का कसा बसेल ?
व्यर्थ विचारणा
In reply to मुद्दलातच घोळ आहे ... by विटेकर
तो श्लोक आठवला.
काकस्य कति वा दन्ता: मेषाण्डस्य कियत् पलम् |
गर्दभे कति रोमाणि व्यर्थैषा तु विचारणा ||
ही गाडी मात्र काश्मीर ला
ही गाडी मात्र काश्मीर ला चालली आहे ..
भारी विषय आहे धाग्याच्या!
भारी विषय आहे धाग्याच्या!
अगदी सहमत!
काही नमुने !!