शिकार
लेखनप्रकार
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा. घोरपडीची पण शिकार व्हायची पण ती खूप चपळ आणि सहजासहजी हातात न येणारी त्यामुळे शक्यतो आदिवासी लोकंच तिच्या वाट्याला जायचे. हीच गोष्ट साळिंदराच्या बाबतीत एकदा याचे काटे एका शेजारच्या माणसाला लागले होते बिचारा आठवडाभर तळमळत होता. आमच्या गावात एका माणसाचा लहानसा पुतळा उभारलाय. रानडुकराची शिकार करायला गेला आणि स्वतःलाच गोळी लागली. तो रानडुक्कर म्हणजे पिंपळाच्या झाडावरचा वेताळ होता. पण त्या माणसाने आपलं रक्त अजिबात खाली पडू दिलं नाही. नाहीतर त्या रक्ताचा माग काढत तो वेताळ गावापर्यंत आला असता. आता ही भाकड कथा आहे हे माहित असूनसुद्धा अशा गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. आपलं शहरीकरण आणि विज्ञान यांचं बोट त्यांना लावायचं नसतं. आणि त्यातच खरी मजा असते.
असाच मागे गावी गेलो तेव्हा शिकारीला जायचा योग आला. आम्ही चार जण होतो. पहिला म्हणजे मी. आता माझा आणि शिकारीचा संबंध जास्त नव्हता. कधी तरी खेळताना एखाद्या कोंबडीला दगड मारणे आणि अगदी पुढची पायरी म्हणजे बेचकी घेऊन चिमणी कावळ्यावर नेम धरणे बस एव्हडाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी होता. दुसरा माझा मित्र, तो मी जे करायचो ते तर करायचाच पण याला एक खूप विचित्र सवय होती. एखादं गाढव गावात शिरलं की हा गावातले पोरं जमा करायचा आणि त्या गाढवाच्या पाठीमागे पळायचा. मग त्या गाढवाच्या शेपटीला पत्र्याचा डबा बांधून वाजवायचा काय, त्याच्या पाठीवर उड्या काय मार आणि दिवाळीत जर चुकून गाढव आलंच तर त्या बिचाऱ्याची शंभरी भरलीच म्हणून समजा. अर्ध्यापेक्षा जास्त फटाके गाढवाच्या पाठीवरच वाजायचे. त्याचे सर शाळेत सारखे त्याला गाढव म्हणायचे आणि हा राग तो या गाढवांवर काढायचा असं मला समजलं होतं. बाकीचे दोन होते ते आमच्यापेक्षा थोडे वयाने मोठे होते. त्यातल्या एकाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड होती आणि या कुऱ्हाडीची खासियत म्हणजे एकदा का ती उचलली की तिचा वार करावाच लागतो. न वार करता तशीच परत खाली आणली की काहीतर संकट ओढवतं अशी त्याची समजूत होती. एकदा चुकून याने ती वार करण्यासाठी उचलली आणि शेवटी नाईलाजाने स्वतःच्या पायावर वार करावा लागला होता. अजून एक होते त्यांचाकडे छऱ्यांची बंदूक होती आणि त्यातले छर्रे ते सारखे तोंडात ठेवत असत. त्यांच्या आजोबांची आणि वाघाची एकदा जुंपली होती तर यांच्या आजोबांनी पायाच्या अंगठ्याने वाघाची बेंबी फाडून वाघ मारला होता. आता किती खरं किती खोटं देवच जाणे.
असे आम्ही चार चौघे निघालो. आता आम्ही दिवसा ढवळ्या जात होतो, त्यामुळे शिकारीतला श ही आम्हाला मिळणार नव्हता दिसलाच तर एखादा ससा पण ती शक्यता सुद्धा कमीच होती. तरीसुद्धा मी आपला एक बरचा सोबत ठेवला होता. दोन तास जंगलात भटकलो आणि अपेक्षेप्रमाणे काहीच मिळालं नाही. शेवटी दमून नदीजवळ आलो. नदीला लागुनच १०-१२ झोपड्या दिमाखात उभ्या होत्या. बांबूची भिंत आणि वरती सुकलेला गवताचा भारा. मधूनच एखाद दुसरं माणूस दिसत होतं. माझी पावलं नकळत तिकडे वळली जशा जशा त्या झोपड्या जवळ येत होत्या मनात प्रश्नांची वादळ उठत होती. कोण असतील हे? कुठून आले असतील? यांचं राहणीमान कस असेल? किती असतील हे? यांच्या आयुष्यात सुद्धा अडचणी असतील का? शहरीकरणाची झळ यांना सुद्धा लागली असेल का? जवळ गेलो तोच एक म्हातारी आशेने पुढे आली. आणि काही काम आहे का विचारू लागली. साधारण ५०-५५ च्या आसपास असावी वयानी. हिरवी साडी नेसलेली कपाळवर भलं मोठं गंध सुकलेला, सुरकुत्या पडलेला तो कष्टाळू आणि राकट चेहरा माझ्याकडे अपेक्षेने पाहत होता. ती एक आदिवासी जमात होती. गावात काही शेतीची कामं आली की यांना मागणी असते. दिवसाला १०० रुपये घेऊन हे लोकं शेतीची कामं करतात. माझा तसला काही उद्देश नसल्याचं कळल्यावर ती जरा हिरमुसली. मी सहज उत्सुकता म्हणून तिला प्रश्न विचारू लागलो. सुरवातीला जरा संकोचत उत्तरं देत होती पण नंतर एकदम व्यवस्थित संभाषण झालं. तिला चार मुलं होती. आणि याच झोपड्यांमध्ये तिने त्यांना लहानाचं मोठं केलं होतं. शेतीची कामं जेव्हा येतात तेव्हा तर यांचं निभवून जात पण एरवी काय? हा प्रश्न त्यांच्यापुढे सताड आ वासून उभा असतो. प्रार्थमिक गरजा भागवण्यासाठी मग हे मासेमारी करतात कधी कधी जंगलातली लाकडं तोडून त्याची मोळी बाजारात विकतात पण ते ही आता कमी झालं. प्रत्येकाकडे सिलिंडर आले ना. चूल तर केव्हाच हद्दपार झाले.गावात कधी कधी एका दिवसाचं कामं मिळतं पण त्यातून मिळणारा मोबदला गरजा पूर्ण करण्यासाठी फारच तोकडा पडतो. तरीसुद्धा हे मजेत असतात नदीची हे लोकं पूजा करतात कारण यावरच यांचं पोट चालतं. हे सगळे आपल्या शहराच्या गजबजलेल्या जीवनापासून दूर होते. ना लोकल पकडायचं टेन्शन, ना प्रमोशन, ना पगारवाढ कसलंच टेन्शन नव्हता यांना. फक्त आलेला दिवस पुढे ढकलायचा हाच इथला साधा सरळ नियम. अज्ञानात सुख असतं म्हणतात ते हेच. माणूस जेवढा ज्ञानी तेवढ्या त्याच्या गरजा पण जास्त. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती असं तरी कसं म्हणू मी. आर्थिक परिस्थिती खालावणे म्हणजे तरी काय?????? आहे त्याच्यापेक्षा जास्त असण्याची हावं धरणे. त्यांना कशाचीच हाव नव्हती. महागाई किती वाढली, सेन्सेक्स किती अंशावर आहे, या सगळ्या गोष्टींपासून हे खूप दूर होते.
तिच्या बोलण्यातला शब्द अन शब्द मनातल्या विचारांचे पैलू पाडत होता. परतत असताना मन नकळत आपल्या सुख सोयीनी भरलेल्या आयुष्याची तुलना तिच्या आयुष्याशी करू पाहत होतं. ते म्हणतात न चतुर्मिती तलावर आपल्याला समांतर असं विश्व आहे ते हेच. परत येताना मात्र एक रानडुक्कर दिसलं एक मादी होती आणि सोबत ३ लहान पिल्लं. पुन्हा ती आदिवासी बाई डोळ्यासमोर उभी राहिली. छऱ्यांची बंदूक तशीच शांत खाली मान घालून उभी होती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड पात्याचं तोंड दुसरीकडे करू पाहत होती, आणि बरचा पण .........
वाचने
5180
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
वा. एक वेगळ्या मार्गाने जाणरी
In reply to वा. एक वेगळ्या मार्गाने जाणरी by विजुभाऊ
सं तुम्हाला वाटते.. ग्रास इझ
छान सांगड घातली आहे
?
In reply to ? by एस
व्वा छान माझा लेख वाचून
In reply to व्वा छान माझा लेख वाचून by कल्पतरू
+१
In reply to +१ by दशानन
लेखकाला लेखन स्वातंत्र्य नक्कीच दिले पाहिजे.
In reply to लेखकाला लेखन स्वातंत्र्य नक्कीच दिले पाहिजे. by कानडाऊ योगेशु
+२
In reply to व्वा छान माझा लेख वाचून by कल्पतरू
जंगलात शिकार केल्याने
In reply to बौद्धिक पात्रता तर तुमची पण by कल्पतरू
आता कोकणात शिकारीला फार महत्व
In reply to आता कोकणात शिकारीला फार महत्व by टवाळ कार्टा
:-)
In reply to :-) by एस
ह्या ह्या ह्या...मिपाचा
In reply to व्वा छान माझा लेख वाचून by कल्पतरू
ज्या जनावरांनी आपल्याला काहीच
मी ही काहीसा शिकारीच्या विरोधात होतो आधी
In reply to मी ही काहीसा शिकारीच्या विरोधात होतो आधी by लंबूटांग
बर्याच ठिकाणी हरणांच्या
बर्याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो.यातील "नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल" करणारे माहीत झाले तर...शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही.की आहे. ह्याचाही निकाल लागेल. म्हणतात ना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ;)छर्याच्या बंदुकीने रानडुक्कर
In reply to छर्याच्या बंदुकीने रानडुक्कर by नेत्रेश
बाकी रानडुक्कर मारुन कसला
In reply to बाकी रानडुक्कर मारुन कसला by टवाळ कार्टा
+१
लिखाण आवडले
In reply to लिखाण आवडले by पैसा
पण आपल्याकडे भूतांचा विषय
In reply to पण आपल्याकडे भूतांचा विषय by कल्पतरू
कोकणात म्हणजे कुठल्या गावी?
छान लेख आहे आवडला. सुरवात ते