Skip to main content

प्रकाशाशी जुळावं नातं! .. तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक राघव यांनी शनिवार, 25/10/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज रात्री अन् उद्या सकाळी मी नेटवर येऊ शकणार नाही. म्हणून एक दिवस आधीच हा (कविता) प्रपंच!! प्रकाशाशी जुळावं नातं, अंधारातही प्रकाश व्हावा, क्षितिजावरल्या उषेसमवे, अंधार सारा दूर सरावा! पानांवरले दवबिंदू ते, प्रकाशानं तेजाळावेत, जीवनात तुम्हा सगळ्यांच्या, त्या दवबिंदुंसम, लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!! पणत्यांच्या शांत, संयमी अन् मंगल तेज सगळ्यांस स्फुर्तीदायी-आनंददायी व्हावे हीच सदीच्छा! तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! आपला, मुमुक्षु
लेखनविषय:

वाचने 7932
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

या कवितेच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मीही समस्त मिपावासीयांना तसेच त्यांच्या आप्तस्वकीय परिवारजनांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पणत्यांची,दिव्यांची आरास करू,रांगोळ्या रेखाटू. घराला तोरण लावू, आकाश कंदिल लटकवू, उटणे लावू, अभ्यंगस्नान करू, नवीन कपडे आणि दागिने घालू, अत्तर लावू. समस्त लाडू ,करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेवचिवडा, अनारसे, चिरोटे इ.चा फन्ना उडवू. भुईचक्कर, भुईनळे, फुलबाज्या, पेन्सिली, सुतळी बाँब, लक्ष्मी तोटे, लडी, अग्नीबाण, तुडतुडे, भुंगे, सेव्हन शॉट्स, हंड्रेड शॉट्स यांची आतषबाजी करू. नवीन सोनंनाणं विकत घेऊ. आनंदात राहू, आनंद करू.

In reply to by विसुनाना

बेत छान आहे. कविताही. सर्व मिपाकरांना दिवाळी आनंदाची आणि सुखाची जावो.

मुक्तसंगः अनहंवादि मिपाकरांना तसेच त्यांच्या सुर्हुद व मित्रपरिवारास हार्दिक शुभेच्छा ! ही दीपावली तुम्हा सर्वांची मने स्नेह - प्रेमाने उबदार ठेवणारी तुम्हा सर्वांना आरोग्यसंपन्न व उदंड आयुष्य प्रदान करणारी तुमच्या आयुष्यात सर्व अंगिक्रुत कार्यात उदंड यश देणारी आणि तुम्हा सर्वांना आनंदी व नित्यत्रुप्त ठेवणारी होवो.

समस्त मि पा कराना माझ्या तर्फे दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा!!!!!!!!! ह्या वर्षी कित्येक दिवाळीनंतर मी फटाके घेतलेत. अर्थात आवाज न करणारे आणि नो चाइल्ड लेबर अस मार्किन्ग असलेले. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

माझ्याकडूनपण सर्व मिपाकरांना दिवाळीच्या आणि येणार्‍या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पानांवरले दवबिंदू ते, प्रकाशानं तेजाळावेत, जीवनात तुम्हा सगळ्यांच्या, त्या दवबिंदुंसम, लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!! अप्रतीक ओळी..! दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.. आपला, (मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या.