✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

< थेट्रातली मज्जा >

य
यसवायजी यांनी
Wed, 09/17/2014 - 19:47  ·  लेख
लेख
आमचे प्रेर्नास्तान ------------------ बारका हुतो तवा आज्जाबरबर चंद्रमा थेट्रात जायला मला कद्दीच आवडलं न्हाई, पण त्यो वडत मला घेऊन जायचा. दर शुक्करवारी बच्च्चनचा पिच्चर हमखास लागायचा. दोन-तीन तास तर बसायचं हाय तिथं, पर आज्जाला आधी एवढा वेळ का लागायचा मला त्या टायमाला कद्दीच समजलं न्हाई. त्यो आधी आसपासची जागा बघायचा, कुठं थुकलंय का? *गून्, *तून ठेवलंय का बघायचा. मग रुप्पयाचा एक बंदा घेऊन लाकडी शीटच्या पट्ट्यामधनं फिरवायचा. भौतेक ढेकनं मारत हुता. मग तरुनभारत पेपर शीटवर हातरायचा तवा कुठं तेच्याच शीटवर मला जर्रा जागा मिळायची टेकवायला. इंटर्वेलला मुतारीत लै वास मारतो म्हणत मग आमी एका झाडाखालीच जायचो. मला हे समदं त्या टायमाला कसंतरीच वाटायचं. काल सिटी प्राईडमधे असाच एक थोडा वेगळ्या रूपातील आजोबा मला पाहायला मिळाला. आजोबा म्हणतोय कारण एक चिमुरडा त्याच्या आजूबाजूला फिरत होता. थ्री-फोर्थ, फंकी टी-शर्ट अशा रूपात तो मल्टीप्लेक्सच्या एका टिकीट काउंटरवर उभा होता. हेडफोन कानात घालून डोलणं चालू होते आणि त्याच्या पर्सनॅलीटीला शोभेल अशा स्मार्टफोनवर, मोठे नख असलेल्या तर्जनीने टचस्क्रिनशी चाळा करत त्याने टिकीटाचा रेफरंन्स नंबर दिला, टिकिटं घेतली. मग फूड काउंटरवर जाउन ओर्डर दिली "३ चीज बर्गर, २ बटर पॉपकॉर्न आणी २ कोक". आणी थेट ऐटीत जाउन बसला आत मौ-मौ सीटवर. पिच्चर संपला.. हल्ली पाश्चात्यांच्या या असल्या थेरांमुळे थेट्रातली मजाच गेलीय, पण पिच्चर बघताना तसा माहोल आता का नाही याचे उत्तर काल मिळाले मला. multi
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
विडंबन
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7350 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

मस्त विडंबन पण ते फंकी टी

शिद
Wed, 09/17/2014 - 20:04 नवीन
मस्त विडंबन पण ते फंकी टी-शर्ट सैल होते की घट्ट ह्याचा उलगडा काही झाला नाही. बाकी, पहील्यांदाच "मी पयला".
  • Log in or register to post comments

खी खी खी

प्रचेतस
Wed, 09/17/2014 - 20:11 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments

शिर्शक वाचुन लैच अपेक्शेने

पिंपातला उंदीर
Wed, 09/17/2014 - 20:15 नवीन
शिर्शक वाचुन लैच अपेक्शेने धागा उघडला होता
  • Log in or register to post comments

आज्जा असल्यामुळे टिशर्ट,

सूड
Wed, 09/17/2014 - 20:16 नवीन
आज्जा असल्यामुळे टिशर्ट, जीन्सचा तपशील विचारत नाही. * आज्जी असती तर विचारला असतात का असे विचारायला येऊ नये, अपमान केला जाईल.
  • Log in or register to post comments

भारतातले आणि डॉइशलांड (आपलं

कंजूस
Wed, 09/17/2014 - 20:21 नवीन
भारतातले आणि डॉइशलांड (आपलं जर्मनी हो) मधील मुलंमुलीच अजून आयच्या अन बापाच्या बापाला मानतात. आणि त्यांच्याकडून लाड करून घेतात. आज्जोबा बागेतली हिरवळ पाहता पाहता नातवंडांबरोबर आख्खा कॉर्नेटो खातात. नशिबवान लेकाचे.
  • Log in or register to post comments

गंडलय.

जेपी
Wed, 09/17/2014 - 20:22 नवीन
गंडलय. यसवाजी आयडी कडुन हुच्च अपेक्षा होत्या.
  • Log in or register to post comments

थोडासा गंडल्यासारखा मला पण

टवाळ कार्टा
Wed, 09/17/2014 - 21:04 नवीन
थोडासा गंडल्यासारखा मला पण वाटला...पण मला काहिच लिहीता येत नाही...त्यापेक्शा हे बरेच चांगले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हो. गंडल्या लॉजिकनंच लिवलंय.

यसवायजी
Wed, 09/17/2014 - 22:22 नवीन
हो. गंडल्या लॉजिकनंच लिवलंय. रोज तेच तेच संस्कृती-भारतीय्-वेस्टर्न वाचून वैताग आलाय. म्हटलं करा मज्जा. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/18/2014 - 09:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

बटर पॉपकॉर्न आणि कोक

साती
Wed, 09/17/2014 - 20:36 नवीन
बटर पॉप्कॉर्न आणि कोक वरून आठवलं. हे टी शर्ट आणि थ्री फोर्थ वाले आजोबाच डायरेक्ट टिनला तोंड लावून कोक पिताना सर्रास दिसतात. धोतरातले किंवा पंच्यातले आजोबा असे करताना दिसणारच नाहीत. आमचे कोंकणातले आजोबा संध्याकाळी सहा वाजले की पाटलाच्या टावरानावर जात.(टॅवर्न हा शहरी शब्दं) दोनचार चणे तोंडात टाकत काचेच्या ग्लासातल्या पांढर्याशुभ्र माडीत आपली दोन बोटे बुडवत. आणि मग टिचक्या मारून आपल्या पूर्वजाना माडीचे तुषार अर्पण करत. कोकणी संस्कृती टिकवली ती अश्या पंचातल्या, पूर्वजांनाही माडीचे अर्घ्य वाहणार्या आजोबांमुळे. म्हणजे खरा दोष त्या कोकच्या टिनचा आणि थ्री फोर्थचा. आजही आजोबांनी पंचे किंवा धोतर नेसले असते तर खरी भारतीय संस्कृती टिकली असती असे मला वाटते. प्रा डॉ साती काळे.
  • Log in or register to post comments

दोनचार चणे तोंडात टाकत

शिद
Wed, 09/17/2014 - 20:37 नवीन
दोनचार चणे तोंडात टाकत काचेच्या ग्लासातल्या पांढर्याशुभ्र माडीत आपली दोन बोटे बुडवत. आणि मग टिचक्या मारून आपल्या पूर्वजाना माडीचे तुषार अर्पण करत.
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

,

टवाळ कार्टा
Wed, 09/17/2014 - 21:04 नवीन
, =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मस्त!

प्रदीप
गुरुवार, 09/18/2014 - 14:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

नखाने टचस्क्रीन??

आदूबाळ
Wed, 09/17/2014 - 20:44 नवीन
नखाने टचस्क्रीन??
  • Log in or register to post comments

तेच ना!! मी सुद्धा एकदा

सूड
Wed, 09/17/2014 - 20:52 नवीन
तेच ना!! मी सुद्धा एकदा मॅनीक्युअर केलेल्या नखात टचस्क्रीन बुडवून बुडवून भाजी खायचा प्रयत्न केला होता. पण मॅनीक्युअरमध्ये मीठ जास्त पडल्याने भाजी खारट झाली. -सुजया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मीही हल्ली मल्टीप्लेक्स / मॉल

आदूबाळ
Wed, 09/17/2014 - 21:05 नवीन
मीही हल्ली मल्टीप्लेक्स / मॉल मधे थ्री-फोर्थ, फंकी टी-शर्ट घातलेल्या अनेक आजोब्यांना पाहतो, तो किती तरी लांबलचक हेडफोन आणि नातवंडांना दोनच चीज बर्गरांमध्ये कटवायची मानसिकता. मला तर असे आजोबे सहनच होत नै. हे सर्व होतंय मराठी सिनेमांना दिलेल्या शास्कीय अनुदानामुळे. बाकी कै नै. - फिलीप करू-ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

अजया
Wed, 09/17/2014 - 21:19 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जीन्स घातली होती का? नायतर

अजया
गुरुवार, 09/18/2014 - 08:21 नवीन
जीन्स घातली होती का? नायतर फाऊल आहे. नुस्ती म्यानिक्यूर्ड नखं असून काय उपेग? -खुदुखुदु बाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

बॅटमॅन
गुरुवार, 09/18/2014 - 14:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आमच्याकडे आजोबा कध्धीच

मार्क ट्वेन
Wed, 09/17/2014 - 21:32 नवीन
आमच्याकडे आजोबा कध्धीच थेट्रात न्यायचे नाहीत. नेहमी आजीच न्यायची. या चिमुरड्याची आजी का बरे थेट्रात नेत नाहीये? किती बर त्या आजोबांनी करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावते सेक्सी आजोबा हवे असतात. त्यांनी गचाळ राहुन चालत नाही. वर त्यांनी कमवुन आणलेले पैसे स्वतःच थेटरात जाउन उडवायचे. आजी काय बरे करत असतील? कोठे मैत्रिणींबरोबर अड्डा जमवला असेल? की सांस-बहू बघत बसली असेल? घरी रामरक्षा वगैरे संस्कार या आज्यालोक करत असतील का? पिक्चर बघताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी त्याच्या आजीने घेउ नये? कोणी सांगितलय वाती वळायला?
  • Log in or register to post comments

त्या आज्याही तसल्याच!!

स्पंदना
गुरुवार, 09/18/2014 - 08:21 नवीन
त्या आज्याही तसल्याच!! आजकाल बसल्या असतील सिरियली लावुन. मग नको असतात त्यांना आजोबा अन नातवंडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्क ट्वेन

येस!

पिवळा डांबिस
Wed, 09/17/2014 - 21:57 नवीन
येस! आय अ‍ॅम अ‍ॅन आजोबा! आय हॅव अ फंकी टी-शर्ट! आय हॅव अ थ्री-फोर्थ!! मिपा हॅज अ प्रॉब्लेम? -डांबिस नैतरकोण :)
  • Log in or register to post comments

एक नंबर!

आदूबाळ
Wed, 09/17/2014 - 22:07 नवीन
:)) एक नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

डांबिस नैतरकोण>>> _/\_

बॅटमॅन
गुरुवार, 09/18/2014 - 00:51 नवीन
डांबिस नैतरकोण>>> =)) _/\_ सौ सोनार की एक लोहार की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सॉलिड डांबिस प्रतिसाद. _/\_

शिद
गुरुवार, 09/18/2014 - 01:34 नवीन
सॉलिड डांबिस प्रतिसाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पि.प.

तिमा
गुरुवार, 09/18/2014 - 13:55 नवीन
डांबिस नैतरकोण 'पिवळा पडुकोणीस' अशी सही हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पाडुकोणास?

यसवायजी
गुरुवार, 09/18/2014 - 19:28 नवीन
पाडुकोणास? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

एक मिपाकर म्हणून मला शरम

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 23:04 नवीन
एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.
  • Log in or register to post comments

तुम्ही कशाला शरमताय?

पैसा
गुरुवार, 09/18/2014 - 14:08 नवीन
आजोबाची थ्री फोर्थ लो वेस्ट होती का? ती गळून पडली तर तो शरमेल. तुम्ही कशाला शरमताय? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

(प्रा.डाँ.ची माफी मागून असं

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 23:18 नवीन
(प्रा.डाँ.ची माफी मागून असं कसं चालु दे.... नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय) अजोबा एक नाव असतं मल्टिप्लेक्शच्या मल्टिप्लेक्शमधे थ्रीफोर्थ घातलेलं थेटर असतं ! पिच्चर पहायला जातो टचस्क्रीन सह तेव्हा पहावत नाही, सीट असली कुठंही तरीही बसवत नाही ३ चीज बर्गर २ बटर पॉपकॉर्न मौ-मौ सीटवर २ कोक ढोसले जातात. अजोबा असतो एक हेडफोन चा स्पीकर चिमुरड्यासह पहाणारा हमशकल्स वाला पिच्चर अजोबानं कसं आज्जासारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
  • Log in or register to post comments

हा हा हा

बॅटमॅन
गुरुवार, 09/18/2014 - 14:09 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments

आजोबा आणि नातू

चित्रगुप्त
Fri, 09/19/2014 - 23:20 नवीन
असाच एक आजोबा आणि नातू: Image removed. नातवाबरोबर अस्मादिक.
  • Log in or register to post comments

आजोबा, फोटो दिसत नाही.

यसवायजी
Sat, 09/20/2014 - 17:25 नवीन
आजोबा, फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चित्रगुप्त.... फोटो "गुप्त"

१००मित्र
Sun, 09/21/2014 - 09:10 नवीन
चित्रगुप्त.... फोटो "गुप्त" की "लुप्त" ...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सही विडंबन !

चौथा कोनाडा
Sat, 09/20/2014 - 22:41 नवीन
सही विडंबन ! फर्मास ! मजा आ गया !
  • Log in or register to post comments

थोडस्सं अजून लांब चाल्लं अस्तं राव

१००मित्र
Sun, 09/21/2014 - 09:08 नवीन
मज्जा येत होती वाचायला. अजून लांब भारी वाटलं असतं नक्की. पण खराय.तसं सगळं कंडीशनल झालंय खरं हल्ली. पण आपण जे भोगायचो, ते पण पूर्वीच्या मंडळींना बोअर वाटत असेलच की. चेंज इस द नेम ऑफ द गेम बॉस ! पर लिवलंय लय भारी. फकस्त सिटी प्राईड च्या ऐवजी "शिटी" कसं वाटेल ? (काहितरी सूचना करणे हा खरा पुणेकराचा धर्म आहे.... कळलें ?)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा