पोळी पापडी चाट
नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो.
साहित्यः
अ. पापडी साठि:
१. शीळ्या पोळ्या - ४ ते ५
२. तळण्यासाठि तेल
ब. चटण्या:
१. आंबट/गोड चटणी साठि: चिंच, खजुर, चवीनुसार मीठ/गुळ - चींचेचा कोळ, वाफवलेले खजुर मिक्सर मधे मुलायम वाटुन घ्या. त्यात चवीप्रमणे गुळ/मीठ घालुन गोड चटणी तयार करा
२. तिखट हिरव्या चटणी साठि: मुठभर कोथिंबीर/पुदिना, २-३ हिरवी मिरची आणि पेरभर आलं घेउन मिक्सर मधे गरजेपुरतं पाणी टाकुन मुलायम वाटुन घ्या
क. सारण:
१. उकडून कुस्करलेला बटाटा / मोड आलेले वाफवलेले मुग (त्यात चवीपुरतं मीठ घालून)
२. बारीक चीरलेला कांदा / टोमॅटो - १ बाउल प्रत्येकि
ड. ईतर पण महत्वाचे:
१. फेटलेलं दहि
२. बारीक नॉयलान शेव
३. चाट मसाला
कॄती:
अ. पोळी पापडी साठि:
१. शीळ्या पोळ्या एक एक करुन पोळपाट किंवा चॉपींग बोर्ड वर घ्या व त्यांना फोर्क ने टोचे मारुन घ्या जेणे करुन त्या तळताना फुगणार नाहित
२. आता त्यांच्या साईडच्या कडा काढून टाका. त्या फेकून देउ नका त्यासाठि खालील टिप बघा. कडा काढल्यावर उरलेल्या चौकोनाचे बाईट साईज तुकडे करा
३. मंद आचेवर गोल्डन बाउन होईस्त हे तुकडे तळून घ्या. तळलेत कि टिश्यू पेपर वर काढा जेणेकरुन अतीरीक्त तेल शोषलं जाईल. तळण नको असेल तर नॉनस्टिक तव्यावर थोडसं तेल टाकून परतून घ्या. पण त्यात फार वेळ जातो आणि गॅस मंदच ठेवावा लागतो अन्यथा पोळ्या खालून करपतात. बेस्ट म्हणजे ओव्हन असल्यास तुकडे बेक करुन घ्या.
चाटसाठि:
१. सर्विंग डिश/प्लेट मधे तयार पापड्या ठेवा. त्यावर एक ते दिड चमचा बटाटा - मूग मिश्रण घाला. बारीक चीरलेला कांदा / टॉमॅटो घाला
२. आता वरुन चिमुटभर चाट मसाला भुरभुरा
३. आता अनुक्रमे त्यावर तिखट - गोड चटण्या, फेटलेलं दहि घाला
४. वरुन नायलॉन शेव आणि परत हलकसा चाट मसाला भुरभुरवून पोळी पापडी चाट सर्व करा
टिपः पोळ्यांच्या कडा कापल्यात कि त्या सुद्धा तेलात खरपूस तळून घ्या व बाहेर काढल्यात कि त्या गरम असतानाच त्यावरुन मसाला भुरभुरवा. चहा किंवा रंगीत पाण्याबरोबर मस्त साईड चखणा होतो.
मसाला - प्रत्येकि १/२ चमचा चाट मसाला आणि तिखट, चवीनुसार मीठ

याद्या
16405
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
चमचमीत चाट अन तोंपासु फोटो
कमालच आहे.
फोतो दिसत नहि
छानच.
पाकृ आणि फोटो तोंपासु
.
मालक पायाचा फोटु द्या
अशक्य सुंदर आहे. शिळ्या
महामस्त पाकृ !!
आवडली पाककृती.
अहो काका काय फरक पडतो?
In reply to आवडली पाककृती. by प्रभाकर पेठकर
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआ
वा!
लिस्ट वाढतेय बरंका दीपकशेठ!
पाकृ आवडलीच, पण या पाकृचा
आदूबाळा
In reply to पाकृ आवडलीच, पण या पाकृचा by आदूबाळ
मंद आंचेवर तळावेत.
In reply to पाकृ आवडलीच, पण या पाकृचा by आदूबाळ
आता एखादे दिवशी चार
नेहमीप्रमाणेच.... सिंपली
मस्त रे मित्रा!!!
मित्रा राघवा
In reply to मस्त रे मित्रा!!! by राघवेंद्र
धन्स
In reply to मित्रा राघवा by दिपक.कुवेत
किती सुंदर रे दुष्टा!
वॉव.
मस्त !!!
काय जमतील तितक्या पा.क्रु. दे....
हा हा हा मुवि
In reply to काय जमतील तितक्या पा.क्रु. दे.... by मुक्त विहारि
मस्त--------तोपासु
व्वा.
किडनॅप करु या का याला पण?
+++++१११११
In reply to किडनॅप करु या का याला पण? by स्पंदना
मनापासून धन्यवाद मंडळी
मस्तच!
व्होट अ सोय....
लै भारी पाकृ
लई भारी
@ गानू
In reply to लई भारी by ganu
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Arjuna... Arjuna... ;) { Aai (ஏய்) Tamil Movie }