मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पोळी पापडी चाट

दिपक.कुवेत · · पाककृती
नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो. chat 1 साहित्यः अ. पापडी साठि: १. शीळ्या पोळ्या - ४ ते ५ २. तळण्यासाठि तेल ब. चटण्या: १. आंबट/गोड चटणी साठि: चिंच, खजुर, चवीनुसार मीठ/गुळ - चींचेचा कोळ, वाफवलेले खजुर मिक्सर मधे मुलायम वाटुन घ्या. त्यात चवीप्रमणे गुळ/मीठ घालुन गोड चटणी तयार करा २. तिखट हिरव्या चटणी साठि: मुठभर कोथिंबीर/पुदिना, २-३ हिरवी मिरची आणि पेरभर आलं घेउन मिक्सर मधे गरजेपुरतं पाणी टाकुन मुलायम वाटुन घ्या क. सारण: १. उकडून कुस्करलेला बटाटा / मोड आलेले वाफवलेले मुग (त्यात चवीपुरतं मीठ घालून) २. बारीक चीरलेला कांदा / टोमॅटो - १ बाउल प्रत्येकि ड. ईतर पण महत्वाचे: १. फेटलेलं दहि २. बारीक नॉयलान शेव ३. चाट मसाला chat 2 कॄती: अ. पोळी पापडी साठि: १. शीळ्या पोळ्या एक एक करुन पोळपाट किंवा चॉपींग बोर्ड वर घ्या व त्यांना फोर्क ने टोचे मारुन घ्या जेणे करुन त्या तळताना फुगणार नाहित Chat 3 २. आता त्यांच्या साईडच्या कडा काढून टाका. त्या फेकून देउ नका त्यासाठि खालील टिप बघा. कडा काढल्यावर उरलेल्या चौकोनाचे बाईट साईज तुकडे करा chat 4 chat 5 ३. मंद आचेवर गोल्डन बाउन होईस्त हे तुकडे तळून घ्या. तळलेत कि टिश्यू पेपर वर काढा जेणेकरुन अतीरीक्त तेल शोषलं जाईल. तळण नको असेल तर नॉनस्टिक तव्यावर थोडसं तेल टाकून परतून घ्या. पण त्यात फार वेळ जातो आणि गॅस मंदच ठेवावा लागतो अन्यथा पोळ्या खालून करपतात. बेस्ट म्हणजे ओव्हन असल्यास तुकडे बेक करुन घ्या. chat 6 chat 7 चाटसाठि: १. सर्विंग डिश/प्लेट मधे तयार पापड्या ठेवा. त्यावर एक ते दिड चमचा बटाटा - मूग मिश्रण घाला. बारीक चीरलेला कांदा / टॉमॅटो घाला २. आता वरुन चिमुटभर चाट मसाला भुरभुरा ३. आता अनुक्रमे त्यावर तिखट - गोड चटण्या, फेटलेलं दहि घाला ४. वरुन नायलॉन शेव आणि परत हलकसा चाट मसाला भुरभुरवून पोळी पापडी चाट सर्व करा टिपः पोळ्यांच्या कडा कापल्यात कि त्या सुद्धा तेलात खरपूस तळून घ्या व बाहेर काढल्यात कि त्या गरम असतानाच त्यावरुन मसाला भुरभुरवा. चहा किंवा रंगीत पाण्याबरोबर मस्त साईड चखणा होतो. मसाला - प्रत्येकि १/२ चमचा चाट मसाला आणि तिखट, चवीनुसार मीठ chat 8

वाचने 16401 वाचनखूण प्रतिक्रिया 38

मृत्युन्जय गुरुवार, 09/18/2014 - 15:46
अशक्य सुंदर आहे. शिळ्या पोळ्यांची फोडणीची पोळी आम्हाला खुपच प्रिय आहे. पण या पदार्थासाठी कधीतरी त्याचाही त्याग करायला मी तयार आहे :)

सुहास.. गुरुवार, 09/18/2014 - 15:48
महामस्त पाकृ !! ( स्वगत : वाश्या , लेका उपासाच्या दिवशी रेसीपी चा विभाग उघडत जावु नकोस )

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 16:12
मस्त. एक वेगळीच पाककृती. >>>>रंगीत पाण्याबरोबर मस्त साईड चखणा होतो. अरे दारू म्हण की मर्दा! इथे स्तनाग्रांवर निसंकोच चर्चा होत असताना, 'दारू' शब्द उच्चारायलाही तुला लाज वाटते? ह्हात्त्तुला काय म्हणू?

आदूबाळ गुरुवार, 09/18/2014 - 17:48
पाकृ आवडलीच, पण या पाकृचा "टॉलरन्स झोन" छोटा आहे. म्हणजे तुकडे तळताना ते कमी/जास्त तळले गेले तर पूर्ण चाटचा विचका होईल. "हैद्राबादी मिरची का सालन" आणि "तवा पुलाव" मध्ये टॉलरन्स झोन कसा मोठा होता. थोडं इकडे तिकडे झालं तरी चालत होतं.

In reply to by आदूबाळ

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/18/2014 - 21:34
तुकडे मंद आंचेवर तळावेत. फक्त तेल व्यवस्थित तापल्यावर (आधी एक तुकडा तेलात सोडून कसा तळला जातोय ते पाहावे) थोडे थोडे करून सर्व तुकडे तळून घेतल्यास कमी/जास्त न होता व्यवस्थित तळले जातील.

In reply to by राघवेंद्र

दिपक.कुवेत गुरुवार, 09/18/2014 - 18:59
तो पर्याय मी आधीच दिला आहे (जरा पाकॄ डिट्टेल वाच बरं) पण ते एक एक तुकडे भाजायला फार वेळ जाईल. निदान माझ्यात तरी तेवढा धीर नाहिये....चाट डोळ्यासमोर असल्यावर :)

चित्रगुप्त Fri, 09/19/2014 - 06:01
व्वा. शिळ्या पोळ्यांचे लाडू आणी फोडणीचा कुस्करा खात आलोय, आता यात आणखी एक मस्त भर पडली.

ganu Sat, 09/20/2014 - 23:09
हेच तुकडे जर तेल,लाल तिखट आणि मीठ लावून मंद अग्नी ठेऊन तव्यावर खरपूस आणि कडक भाजून घेतले तर अजून चवदार लागतील.चूक भूल द्यावी घ्यावी.