Skip to main content

स्मार्ट्फोन

लेखक vikramaditya यांनी रविवार, 31/08/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे. ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल. आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले. काहि मार्गदर्शन करा की राव.

वाचने 33530
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

धन्यवाद कैप्टन. कुकिजचे समजले. बैटरी काढता येण्यासारखी असेल तर कमी एमेच चालेल. जादा बैटरी जवळ ठेवायची आणि घरी असताना गलुकोज /सेलाइन (चार्जिँग) चालूच ठेवायचे. मोठा लेख मिपावर चढवता आला पाहिजे. त्यासाठी RAM किती पाहिजे?

In reply to by कंजूस

मिपा वापरायला ५१२ लै जास्त झाला :)...!! बॅटरी काढायची सोय ल्युमिआ ला नाही. आणि त्याची आवशकताही नाही. बॅटरी बँक घ्यायची. तसं पण ल्युमिआ ची बॅटरी लाँगॅटिव्हिटी खुप चांगली आहे.

सेल्फी फोटो काढण्यासाठी front camera हवाच हे ठीक आहे. पण जर का कैमरा बटण असेल तर गरज नाही. कारण मागचा चांगल्या कैमराचे शटर दाबणे खरोखरच सोपे आहे. हा माझा अनुभव आहे. कपेसिटिव टच बटण वापरणे फारच त्रासदायक ठरते.

In reply to by कंजूस

कंजूस मामा, अहो फ्रंट कॅमेरा असला की तुम्हाला तुमचा चेहरा मोबल्याच्या स्क्रीनवर पाहता येतो,आणि त्यामुळेच सेल्फीची क्रेझ वाढली आहे. हवे तसे चेहर्‍याचे अविर्भाव करुन फोटो काढणे फ्रंट कॅमेरा असल्यास अधीक सोपे पडते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

लुमिया ५२५मध्ये कैमरा बटण आहे. सेल्फीसाठी योग्य असा २८एमएम फोकल लेंथचा मागचा कैमरा आहे. ऑटोफोकस आहेच. फ्लैश नाही म्हणून फारसे बिघडत नाही कारण सेल्फी फोटो बाहेरच्या उजेडात काढले जातात.

लुमिया ५२५मध्ये कैमरा बटण आहे. सेल्फीसाठी योग्य असा २८एमएम फोकल लेंथचा मागचा कैमरा आहे. ऑटोफोकस आहेच. फ्लैश नाही म्हणून फारसे बिघडत नाही कारण सेल्फी फोटो बाहेरच्या उजेडात काढले जातात.

सेल्फी दोन प्रकारचे असतात असा माझा समज आहे. एकात तोंडं वेडीवाकडी केलेले आणि दुसऱ्यात आपण कुठे आहोत हे दाखवण्याचे.. पहिल्यासाठी पाचपन्नास काढायला भरपूर वेळ मिळतोच परंतू दुसऱ्या प्रकारात स्पोर्ट अडवेंचर(राफ्टींग, स्काय डायविँग, रॉक क्लायमिंग इत्यादी) करतांना चांगल्या आठ एमपिचा फोटो मिळाला तर फार उत्तम आणि वेळ अजिबात दवडून चालत नाही. जर का असाच एक कैमरा फ्रंटलाही पाहिजे तर मोबाइलची किंमत वाढते (लुमिया ७३०) यापेक्षा बटण देणे योग्य आहे. आता नवीन क्रेझ आली आहे. कैमरा आपल्याभोवती फिरवून दहा पंधरा सेकंदाचा व्हिडीओ काढायचा. मला एकल प्रवासात बटणवाला (आणि दोरी लावता येणारा)नोकिआ X2 00 5mp फार उपयोगी पडतो.

गेल्या सहा महिन्यापासून karbonn a18+ वापरतोय. त्यात १.३ ghz dual core processer, 512 mb ram, jellybean ४.२, ५ inch sreen, wifi hotspot, ५ mp camera, ०.३ mp front camera असे फिचर्स आहेत . अगदी उत्तम चालतो . महत्वाचे सर्व अॅप्स सुरळीत चालतात . camera quality avreage आहे पण हा मला फक्त 3000 रूपयांत मिळाल्यामुळे त्या बद्द्ल काही तक्रार नाही . . . .

In reply to by सँम (verified= न पडताळणी केलेला)

कार्बन चे खरेच दणकट फोन आहेत. व्हॅल्यू फॉर मनी. मी परवाच नवीन विंडोज फोन कार्बन टिटानियम विंड डब्लु४ घेतला. २ दिवस झाले. बॅटरी अजून ५०% हून जास्त शिल्लक आहे. सध्या तरी त्याच्यावर प्रयोग चालू आहेत आणि अँड्रॉईडपेक्षा बराच चांगला वाटतोय. http://www.snapdeal.com/product/titanium-wind-w4/1241433329#bcrumbSearc…

In reply to by पैसा

मी परवाच नवीन विंडोज फोन कार्बन टिटानियम विंड डब्लु४ घेतला. २ दिवस झाले. बॅटरी अजून ५०% हून जास्त शिल्लक आहे. सध्या तरी त्याच्यावर प्रयोग चालू आहेत आणि अँड्रॉईडपेक्षा बराच चांगला वाटतोय. मी Nokia Lumia 730 घेतला ! :) फोनचा थोडक्यात रिव्ह्यु देतो :- १} एक्सलंट फोन विथ ब्रिलियंट ओएस २) ग्रेट ओलेड एचडी डिस्प्ले ३}फोन विथ एक्सलंट टच फिल ४} इट्स अ फास्ट फोन विथ नो लॅग ५} गुड बॅटरी सपोर्ट { निदान माझ्या वापराला तरी पुरुन उरते} जाता जाता :- एन्ड्रोइड वरुन विंडोजवर शिफ्ट झाल्यावर मला वाटत नाही की मी परत कधी एन्ड्रोइड वर शिफ्ट करेन. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- धक्कादायक : आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ

७-८ हजारापर्यंतचा एखादा चांगल्या क्वालिटीचा स्मार्टफोन सुचवाल का? मोटो-ई हा एक पर्याय आहे. अजून काही पर्याय आहेत का?

In reply to by श्रीगुरुजी

लेनोवो A seriesचा 536 व 328 बघा.नोकिया ल्युमिआ 535. मायक्रोमॅक्स युनाईट चांगला आहे.पण मोटो Eचे स्पेक्स जास्त चांगलेत.मोटो घेण्यास हरकत नाही.

अँड्रॉइड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे त्याची बाकी Specifications सुद्धा नक्की पहावी. कारण नंतर कळतं की एक Feature कमी पडले. बॅटरी बॅकअप चांगला मिळावा यासाठी शक्यतो जास्त mah ची बॅटरी असलेला फोन घ्यावा. मग तो कोणत्याही ब्रँडचा का असेना. सध्या मार्केटमध्ये Samsung, Karbonn, MOTO, आणि अजून एक कंपनी ZOLO सुद्धा आली आहे. झोलो चे फोन्स पण छान आहेत पण "झोल" पण जास्त आहेत असे वाटते. *biggrin* शक्यतो Sony, Samsung, Micromax या कंपन्यांचे फोन चांगली features देत आहेत.

विंडोज् ओएस वाला फोन घेण्याचा विचार आहे. लावाचा विंडोज्१ फोन बद्दल काय मत आहे. ४०००/- फोन आहे. Specifications चांगले आहे.