पाकीट हरवते तेव्हा ......
लेखनप्रकार
दि. १४ सप्टे. ला टि.म.वि. गुलटेकडी येथे काही कामानिमित्त गेलो होतो . दुपारी २ वाजता घरी आलो तर आपले पाकीट पडले आहे असा साक्षात्कार झाला ! पाकीटात ४-५०० रुपये , २ क्रेडिट कार्डे , २ डेबीट कार्डे आणि ड्रायविंग लायसेन्स असा ऐवज होता.
भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा जेवायला बसलो , जेवत असताना विटुकाकूने जे काही ऐकवले तेही निमूटपणाने गिळले. तिच्या मते मी ताबडतोब कार्डे रद्द करायला हवीत. मी शांतच होतो आणि पाकीट ज्याला सापडले ती व्यक्ती नक्की फोन करेल हा विश्वास होता. ( अशावेळी मी शांत असलो की विटुकाकू भयानक चिडते असा अनुभव असल्याने फक्त अस्वस्थ असल्याचे नाटक केले ) .. ब्यांकेचा फोन नम्बर सापडत नाही , फोन उचलत नाहीत असा काही टैमपास केला. थोड्यावेळाने विटुकाकूने "मरु दे" म्हणून फालोअप घेणे बन्द केले. ( तिची तेवढीच चिकाटी असते , त्यामुळे माझा दम अजून टिकून आहे ) पण माझा एक डोळा सतत फोनवर होता. कोणीतरी फोन करेल किंवा आणखी एक दुष्ट शंका - कार्डावर व्यवहार झाला की समस येईल ! अर्थात नवीन सुरु झालेली पिन ची अनिवार्यता माझ्या पथ्यावर होती.
संध्याकाळी बिग बाजारला जायचे होते पण पाकीट्च नाही म्हणत टाळाटाळ केली, पण विटुकाकूने जोर धरला, तिलाही पिशव्या उचलायला माणूस हवे होते, आणि मी तरी घरी बसून काय करणार होतो ? नुस्त्याच पिशव्या उचलायच्या, पैसे द्यायचे नाहीत हाच त्यातल्या आनंदाचा भाग होता !
कशीबशी रात्र काढली , रात्रीत ही २-३ दा मोबाईल चेक केला , कुणाचा मिस कॉल नाहे ना ? कार्डावर व्यवहार झाला नाही ना ? याचसाठी !
सगळ्या उठल्यावर विटुकाकूने पुन्हा पिळायला सुरुवात केली, सकाळच्या चहाबरोबर ती मौक्तिके गिळली. खरेतर आता माझाही धीर खचू लागला होता. पाकीट हरवून आता १८ तासापेक्षा जास्त कालावधी गेला होता. गुलटेकडी ते कोथरुड या रस्त्यावर जर पा़कीट पडले असेल तर ते इतका वेळ रस्त्यावर पडून राहाणार नाही. आता एक वेगळीच शंका आली, मी विड्यापीठात जाताना खरेच पाकीट नेले होते का ? (असले संदेह निर्माण करण्यात विटुकाकूचा हात कुणी कुणी धरु शकणार नाही , भल्या- भल्यांच्या आत्माविश्वासाला ती पाणी पाजू शकते!) तिच्याच मदतीने सारी कपाटे उपसली,सगळ्या प्यांटा चेक केल्या , त्यातल्या एका प्यांट्चा खिसा फाटल होता , त्यावरुन पुन्हा एकदा ऐकून घेतले ! असे खिसे असतील तर पाकीट हरवेल नाही तर काय ? वास्तविक जन्मात पहिल्यांदा माझे पाकीट हरवले होते.पण प्रतिवाद करण्याची ही वेळ नव्हती, "पिंजर्यामध्ये वाघ सापडे | बायकां पोरे मारती खडे ||" अशी अवस्था ! एव्हाना मुले उठली होती , त्यांच्याही लक्षात आले की बाबाने पाकीट हरवले आहे,ती ही माझ्याकडे सहानुभूतीने पाहू लागली आणि कपाटे उपसायला मदत (?) करु लागली ( ती उपसलेली कपाटे अजून लावायचीत, या विकान्ताच्या यादीत हे एक काम आहे ) पार्किन्ग मध्ये जाउन कार चेक करुन आलो.
मग ठरवून टाकले , हरवले ते हरवले ! पुढे आणिक मेळवावे, तेव्हा चलो हापिस ! आणि हापिसात गेल्या- गेल्या पहिले काम कार्डे रद्द करुन टा़कू. ज्याला मिळाले त्याला लखलाभ ! मनातल्या या विचाराचे प्रकटीकरण केल्याबरोब्बर , तरी मी तुला कालच सांगत होते .. हा अपरिहार्य डायलॉग आलाच !
पराभूत मानसिकतेतच गाडीत बसलो, अजूनही कोठेतरी आशा वाटत होती, की कुणाचातरी फोन येईल.. पा़कीट हरवले त्यापेक्षा ज्याला सापडले त्याचा फोन येत नव्हता याचा जास्त त्रास होत होता . त्याला कारण ही तसेच होते . बरोब्बर ४ आठवड्यापूर्वी बालशिक्षण समोर आमच्या चिरंजीवाना एक पा़कीट सापडले , त्याने ते घरी आणून माझ्याकडे दिले होते , पाकीटात ४- ५ कार्डे , १७०० रुपये पण ज्याचे पाकिट आहे त्याचे बिजनेस कार्ड नव्हते ! मी कार्डावरील नाव वाचून त्या ब्याण्केला फोन केला ( स्टेट ब्यांक ) त्यांनी सांगितले की हे कार्ड संबंधित ग्राहकाने रद्द केले आहे ! सबब या संदर्भात काहीही करता येणार नाही. फोन कट ! मग आय सी आय सी फोन केला. त्यांचे ही कार्ड रद्द केले होते , आणि त्यांनी ग्राहकाची अशी माहीती देता येणार नाही असे सांगितले, नग मी माझा फोन नम्बर त्या ग्राहकाला द्या असे सान्गितले .. तेव्हा ३-४ मिनिटे होल्ड करुन ठिक आहे आम्ही तुमचा नंबर संबंधित ग्राहकाला देऊ असे सांगतले ! ( प्रत्यक्षात दिला नाहीच !) हे पाकीट त्या सदगृहस्थापर्यन्त पोहोचवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ड्रायविन्ग लायसेन्स ! ते मुंबै चे होते. (ड्रायविन्ग लायसेन्सवर फोन नंबर का लिहित नाहीत राम जाणे ! ) उद्या - परवा त्या पत्त्यावर कुरियर करणे हा एक मार्ग होता. आता मोर्चा त्याच्या प्यान कार्ड कडे वळविला. कल्याण ला माझा एक मित्र इन्कम ट्याक्स मधे आहे , त्याला विचारले की प्यान नंबर वरुन माणूस शोधता येईल का ? असे विचारल्यावर " काय सांगता येणार नाही रे , तू आपला सरळ पोलिसांच्याकडे जा " असा खास सरकारी सल्ला दिला ! आणि मला कोणत्याही परिस्थितीत पोलिसांच्याकडे जायचे नव्हते !
आता ट्रू कोलर वर नाव टाकून पाहीले ! उत्तर इल्ले ! चेपु वर त्याच नावाची / ततसद्रुष्य ४-५ नावे होती , त्यांना " तुमचे पाकीट हरवले आहे का असा फेस्बुक मेसेज टाकला. उत्तराची वाट पाहू लागलो. यात दिवस गेला.
दुसर्या दिवशी सहज गूगल ला नुसते नाव टायपले , पहिल्याच सर्चवर क्लिक केले तर ते नाव एका डिलरशिपचा ग्राहक संपर्क क्रमांकाचे होते . ताबडतोब फोन लावला तर " साहेब मिटिंग मध्ये आहेत" हे उत्तर ! कालपासून वैतागलो होतो , जरा जोरात बोललो , "त्यांच्याशी पर्सनल काम आहे, ताबडतोब फोन द्या " मग महाराज फोन वर आले ! पहिला प्रश विचारला , पाकीट हरवले आहे का ? " हो" ..उत्तर आल्यावर एक दिर्घ श्वास घेतला आणि कालपासूनचे सारे सारे डाऊनलोड केले. संध्याकाळी महाराज सहकुटुंब घरी आले , येताना मिठाई घेऊन आले होते ...!
या सगळ्या पार्श्व्भूमीवर आपले पाकीट मात्र मिळत नाही याचा खूप त्रास होत होता. नुक्ताच इस्पिक एक्काच्या धाग्यावर प्रामाणिक पणा - चारित्र्य , चांगल्या कामाचे चांगले फळ वगैरे ठासून सांगितले होते. पैसे हरविल्याचे दु:ख वेगेळेच पण आपल्या चांगल्या वर्तणुकीचे चांगले फळ आपल्याला का मिळत नाही याचा अधिक त्रास होत होता.
अशा विचारांच्या गर्तेत चांगला हिण्जवडी पर्यन्त आलो आणि फोन वाजला, मिस कोल करुन क्षणात बंदही झाला. ताबडतोब डायल केले,
" सायेब तुमचं पाकीट सापडलयं, हिथचं वर्ग झाडत होतो , बाकाखाली पडलेले सापडलं "
" आपण कोण बोलताय ?"
"मी जयवन्त पवार , हितं प्युन आहे , मी ३ वाजेपर्यन्त असतो , तेज्या अगुदर घिउन जावा " फोन बन्द !
मी गाडी बाजूला लावली , दोन्ही हात वर करुन स्वतः कडे खेचले आणि " या..हू" असा जोरात ओरडलो. ताबडतोब विटुकाकूला फोन लावला, माझ्या उत्साहित स्वरावरुन तिने काय ते ओळखले ! पाकिट आणायला तिलाच पिटाळले ...
श्री. जयवंत पवार यांनी बक्षिशी स्वीकारली नाही .
माझा चांगुलपणवरील विश्वास अधिक दृढ झाला .
( या दोन्ही घटना खर्या आहेत , दिनांक ही खरा आहे आणि श्री. जयवंत पवार ९६०४६०१२७० हे नाव ही !)
वाचने
14984
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
जयंत पवार आणि तुमचेही अभिनंदन
आनंद वाटला.
In reply to आनंद वाटला. by प्रभाकर पेठकर
होय
In reply to होय by विटेकर
लेक्चर चालू असतांना बाकाखाली तुम्ही काय करत होता?
In reply to होय by विटेकर
धन्यवाद.
मस्त लेख
छान अणुभव!
विटेकर बुवा!
आणखी एक ..
In reply to आणखी एक .. by विटेकर
वॉट अॅन ऑबजर्वेशन सर!
In reply to वॉट अॅन ऑबजर्वेशन सर! by संजय क्षीरसागर
म्हणुन जुना अंदाज
शाळेत पडले होते म्हणून मिळाले
In reply to शाळेत पडले होते म्हणून मिळाले by गवि
+१ सहमत
गवींशी सहमत
In reply to गवींशी सहमत by आदिजोशी
हा लेख वाचून पाकिट हरवलेला
चांगला अनुभव.
काका मी जरा लेखन प्रयोजनात शंका प्रस्तुत करतो
चांगुलपणावर भिस्त ठेवुन रीस्क
कदाचित
In reply to कदाचित by विटेकर
नेटवर पिन पुरवण्यासाठी
In reply to नेटवर पिन पुरवण्यासाठी by बाळ सप्रे
हे अवघड वाटतं
In reply to हे अवघड वाटतं by संजय क्षीरसागर
जिथे पिनशिवाय चालते अश्या
In reply to जिथे पिनशिवाय चालते अश्या by गवि
नाही, बँकांचा त्या सर्विस प्रोवायडरशी टाय-अप असतो
In reply to नाही, बँकांचा त्या सर्विस प्रोवायडरशी टाय-अप असतो by संजय क्षीरसागर
नेटबॅंकिंग / डे.कार्ड नाही
In reply to नेटबॅंकिंग / डे.कार्ड नाही by गवि
तरीपण लिंक देतोच उदाहरणार्थ.
In reply to तरीपण लिंक देतोच उदाहरणार्थ. by गवि
पिन ची प्रक्रिया अमलात आल्या
In reply to पिन ची प्रक्रिया अमलात आल्या by मराठी_माणूस
वर सर्व क्रेडिटकार्डविषयी
In reply to वर सर्व क्रेडिटकार्डविषयी by गवि
असा अनुभव नाही
In reply to वर सर्व क्रेडिटकार्डविषयी by गवि
माझा पहीला मुद्दा हा क्रे.
In reply to कदाचित by विटेकर
होय
In reply to कदाचित by विटेकर
नाही!
In reply to नाही! by संजय क्षीरसागर
चिप ॲंड पिन क्रेडिट कार्ड
In reply to चिप ॲंड पिन क्रेडिट कार्ड by गवि
पण अजूनेक धोका आहे. ऑनलैन
In reply to पण अजूनेक धोका आहे. ऑनलैन by बॅटमॅन
माझ्या अनुभवानं कोणत्याही ऑन-लाईन ट्रॅन्झॅक्शनला
In reply to पण अजूनेक धोका आहे. ऑनलैन by बॅटमॅन
भो ब्याट्मना,
In reply to भो ब्याट्मना, by विटेकर
त्यासाठी नेट ब्यांकिन्ग चा पासवर्ड लागतो.
In reply to भो ब्याट्मना, by विटेकर
हम्म, रैट्ट विटेकरजी.
In reply to भो ब्याट्मना, by विटेकर
क्रेडिट
In reply to क्रेडिट by कवितानागेश
HDFC च्या क्रेडिट कार्डावर पिनशिवाय खरेदी कर्ता येते?
In reply to क्रेडिट by कवितानागेश
भलं मोठ्ठ हिन्दीतले पत्र
In reply to चिप ॲंड पिन क्रेडिट कार्ड by गवि
आंतरराष्ट्रीय बुकिंग करताना
In reply to आंतरराष्ट्रीय बुकिंग करताना by अनुप ढेरे
+१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हेच म्हणतो पुन्हा परत देणारा शहाणा असेल
In reply to आंतरराष्ट्रीय बुकिंग करताना by अनुप ढेरे
सीवीवी च आठवत नाही.
अनुभव कथन आवडले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेहम्म !
विनंती
In reply to विनंती by विटेकर
जरूर!
In reply to विनंती by विटेकर
उत्तम सुचना !
हं !
विटुकाका मी पण कॉल करतो.
फोन केला.
धन्यवाद जे पी !
चला,बरं झालं! ज्यांनी पाकिट
गैरसमज
In reply to गैरसमज by तिमा
होकार
'विटुकाकू' म्हणजे वीट आणणार्या काकू'प्रामाणिकपणे होकार द्यायला हवा पण त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची पंचाईत होईल.जयवंत पवार नक्कीच अभिनंदनास
In reply to जयवंत पवार नक्कीच अभिनंदनास by कानडाऊ योगेशु
घरी मिठाई घेऊन येणे हे फारच
In reply to घरी मिठाई घेऊन येणे हे फारच by रेवती
(No subject)
In reply to घरी मिठाई घेऊन येणे हे फारच by रेवती
रेवाक्का त्याला परत फोनव आणि
कर भला तो हो भला..
In reply to कर भला तो हो भला.. by आसिफ
लिहा,लिहा हो!
In reply to कर भला तो हो भला.. by आसिफ
माझी ऑफीसबॅग रे-रोड्ला
हाय !
In reply to हाय ! by सस्नेह
हे माझे दोन पै (नसतेस घरी तू जेंव्हा च्या चालीवर)
In reply to हे माझे दोन पै (नसतेस घरी तू जेंव्हा च्या चालीवर) by काउबॉय
हा हा हा
गल्फ एअर - अनुभव.
In reply to गल्फ एअर - अनुभव. by प्रभाकर पेठकर
बघा !
In reply to बघा ! by विटेकर
छे: हो...
भविष्यात आय फोन 6 घेऊन टाका ,
हं
विटुकाकू सारख्या काकू सगळ्याच्याच पाचवीला पूजलेल्या आहेत हे वाचून खूप बर वाटल ..दुसर्याचे दु:ख पाहून माणसाला जरा समाधान वाटते ! म्हणून गर्दित माणूस सुखी होतो ! आणि पाचवी चे काय घेऊन बस्लात ? ती भानगड त्या जन्माची असते ! ही सात जन्माची भानगड आहे , आणि हा चालू आहे तो कितवा माहीत नाही ! घाला बोटे !In reply to हं by विटेकर
आवडले नाही..
In reply to आवडले नाही.. by प्रभाकर पेठकर
__/\__
In reply to आवडले नाही.. by प्रभाकर पेठकर
ह्म्म...
In reply to ह्म्म... by विटेकर
ते 'धर बोटें, मोज!!' असं आहे.
खुमासदार लेख. सहजशैली आवडली.
कार्ड ब्लॉक कसे करतात ?
आजच....
अरे वा वा!
In reply to अरे वा वा! by पैसा
छान अनुभव! असे पैसे बियसे
In reply to छान अनुभव! असे पैसे बियसे by विलासराव
अहो नदी नाय...
In reply to अहो नदी नाय... by विटेकर
तो कॄष्ण .. परमात्मा ,.. कंस
In reply to तो कॄष्ण .. परमात्मा ,.. कंस by विलासराव
आपचा लालबागचा परमात्मा.......
In reply to तो कॄष्ण .. परमात्मा ,.. कंस by विलासराव
ते त्यांचे ते बघून घेतात पैसे
In reply to छान अनुभव! असे पैसे बियसे by विलासराव
बागेत वाळत घातलेले कपडे आत
don't keep wallet in pants
धन्यवाद !
माझा अनुभव
सुंकलं काढून नवी भिकबाळी