Skip to main content

दिवाळी

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 24/10/2008 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
घनदाट तमाच्या तीरी दीपांच्या लक्ष ओळी नाजूक, मोहक ज्योती तेजाने उजळती | सुख, प्रकाश देती आकाशदीप घरोघरी रंग रांगोळीचे खुलती येई आनंदा भरती | फुलांची होई पखरण रंग-गंधां चे मीलन हास्याचा नाद भरे घराघरातून --मनामनातून | येईल प्रकाश पहाट आपल्या या जीवनी दु:ख, दैन्य हरेल सारे ही दिवाळी ... ही दिवाळी | शुभ दीपावली !!!!
लेखनविषय:

वाचने 2462
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान कविता. आवडली. फाँट चा रंग मात्र खूपच फिका झालाय. जरा गडद असता तर वाचायला छान वाटले असते ईश्वरी

मस्त कविता, घरची आठवण आली... 'सकाळ' च्या दिवाळीत सामील व्हा http://www.esakal.com/diwali08/index.html --अथांग सागर (पहिल्यांदा दिवाळीला घरापासून दूर असणारा)

छान कविता !!! आणी सर्वाना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..