...........काय बोलू.........
भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो.
इंग्रजी ही जागतिक भाषा आहे.
इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही.
आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच.
इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे...
ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण
इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते
खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते.
असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच...
एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते. कुठली भाषा अधिक सामर्थ्यवान, कशात अधिक चांगले व्यक्त होता येते, त्या भाषेची शब्दसंपत्ती किती आहे... आयात शब्दांपेक्षा...स्वतःचे शब्द किती आहेत ? यावर भाषेचे सामर्थ्य ठरते. इंग्रजांनी भारतातून अनेक गोष्टी नेल्या त्यात अनेक भारतीय शब्दही नेले आणि इंग्रजीला चिकटवले.. पण अशा जोडाजोडीमुळे भाषा सामर्थ्यवान झाली नाही. किचकट मात्र झाली. कारण हे शब्द पटकन एका जातकुळीतले वाटत नाहीत आणि त्यामुळे ते लक्षात ठेवायलाही अवघड जातात. कधीकधी अशा शब्दांचा अर्थ समजावून घेताना तो शब्द मुळात कुठल्या भाषेतून उचलला आहे याचा शोध घेणे आवश्यक ठरते. इंग्लिशमधून सायन्स शिकताना काही वेगळे शब्द पहायला मिळतात. शोध घेतल्यानंतर त्याचा खुलासा होतो. तो शब्द लॅटिन असतो किंवा जर्मन असतो. त्याच्या वेगळेपणामुळे इतर शब्दांबरोबर तो लक्षात ठेवणे अवघड जाते. इंग्रजीने कच्चा पक्का हा शब्द हिंदीतून उचलला आहे. गुरु हा शब्दही हिंदीमधून उचलला आहे. जेव्हा मॅनेजमेंट आणि गुरु एकत्र होवून मॅनेजमेंट-गुरु बनतो तेव्हा तो अगदीच आंतरजातीय विवाह वाटतो.
अर्थ, अर्थपुरवठा, अर्थगृह - सगळे शब्द 'अर्थ' या एका शब्दाशी नाते सांगतात, त्यामुळे डोक्यात कमी मेमरी खातात. पण MONEY, FINANCE, BANK या शब्दांमधे तसे नाते नाही. आता तुम्ही म्हणाल अर्थगृह कुठून आला ? इंडोनेशियामधे खरोखरच हा शब्द रूढ आहे. पहिल्यांदा ऐकल्यावरसुद्धा अर्थगृहचा 'अर्थ' काय हे विचारायची गरज पडत नाही. एकाच क्षेत्रातले शब्द एकमेकांशी असे नाते सांगणारे असतील तर लक्षात ठेवणे निश्चित सोपे जाते.
Song आणि To Sing यामधे असे नाते आहे. पण Music and Song चे काय ? याउलट गीत आणि संगीत लक्षात ठेवायला अत्यंत सोपे. त्यामुळे डोक्यात मेमरीही कमी खातात.
VICTORY DEFEAT - या उलट आपल्याकडे जय पराजय अगदी सहज एकमेकांचे हात धरून येतात. संस्कृत ही संगणकासाठी अतिशय योग्य किंवा सोपी भाषा आहे अशी काही काळापूर्वी चर्चा होती. ती योग्यच असणार. ज्यांनी कंप्युटरसाठी प्रॉग्रॅम लिहीण्याचा अनुभव घेतलाय किंवा त्याहीपलिकडे प्रॉग्रॅमिंग लँग्वेज तयार करण्याचा अनुभव घेतलाय. ते ही गोष्ट नक्की मान्य करतील. संस्कृतमधे कर्ता कर्म क्रियापद यांचे क्रम बदलले तरी अर्थ बदलत नाही. मराठीतही क्रम बदलला तर काही प्रमाणात चालते. कंप्युटरच्या भाषेतही अनेकदा हे स्वातंत्र्य नसते, इंग्रजीमधेही ते नसते.
(संस्कृतचे उदाहरण हे फक्त तुलनेपुरते दिलेले आहे. त्यामुळे तेवढ्याच खुंटीला लोंबकळून झोके घेत बसू नये. विषय इंग्रजी हाच आहे)
राजा, राज्य, राजवाडा, राजप्रासाद, राजपुरोहीत, राजपुत्र आणि इंग्रजीमधे
KING, STATE, PALACE, PRIEST, PRINCE मराठीप्रमाणे हे शब्द एकमेकांशी नाते सांगत नाहीत त्यामुळे ते एका परिवारातले आहेत हे कळतच नाही.
ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान
KNOWLEDGE SCIENCE PHILOSOPHY हेही असेच.
विद्यार्थी विद्यालय हे जितके सहज तसे
STUDENT SCHOOL वाटत नाही.
BIRD WING यामधे काही संबंध आहे का ? TRUNK ELEPHANT यामधे काही संबंध आहे का ? पण पक्ष आणि पक्षी, पंख पाखरू, हस्त हस्तिन, हाथ हाथी, हात हत्ती यामधे तो आहे. एका परिवारातले शब्द एकमेकांशी नाते सांगतात.
मराठीमधे समभुज त्रिकोण कळला की समद्विभुज त्रिकोण सहज कळतो. इंग्रजीमधे मात्र Equilateral triangle कळला तरी isosceles triangle लगेच लक्षात राहील असे नाही
काही वर्षापूर्वी एका प्रकाशनाने कंप्युटरची पुस्तके मराठीत छापली विद्यार्थ्याना त्याचा प्रचंड फायदा झाला. करीयरच्या दृष्टिनेही त्यांना चांगल्या नोकर्या मिळाल्या. मराठी त्यांची स्वभाषा होती हे याचे एकमेव कारण नसून इंग्रजीपेक्षा मराठी अधिक सामर्थ्यवान आहे हेही कारण होते.
"मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही" असे आमच्याकडचे काही मराठी वैज्ञानिक सांगतात.
याउलट "मराठीतून शिकल्यानेच आपले भले झाले" ही शक्यता ते का विचारात घेत नाहीत.
जाणकारांनी सांगावे ! इंग्रजीतून मराठीत भाषांतर सोपे की मराठीतून इंग्रजीत...
Life - या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा ? प्राण की आयुष्य ?
तीच तर्हा उच्चारांची
Cut कट
But बट पण
Put पूट... हे असे का ? म्हणजे स्पेलिंग एकसारखेच असले तरी उच्चार लक्षात ठेवण्याची भानगड आली.
स्पेलिंग तेच पण उच्चार मात्र वेगळे, हे लक्षात ठेवण्यासाठी एक वेगळी शक्ती खर्च होत नाही का !
LIEUTENANT लेफ्टनंट COLONEL कर्नल हे उच्चार लक्षात कसे ठेवायचे ? आणि त्यातच शक्ती खर्च झाली तर पुढे काही मांडणे दूरच. PSYCHOLOGY सायकॉलॉजी. मग हा प सायलेंट का आणि सायलेंट असेल तर मग लिहीण्यात शक्ती का घालवायची आणि हे सगळे अडथळे पार केल्यावर पुढे आम्ही काहीतरी व्यक्त करणार. बाप रे !
सावरकरांनी नवे पारिभाषिक शब्द तयार केले तेव्हा सुरुवातीला त्या शब्दांची टर उडविली गेली. तरी नंतर ते शब्द रूढ झाले, लोकांच्या तोंडी बसले. नवे शब्द स्वीकारायला कुणी इतके वेडे नव्हते पण ते स्वीकारले गेले याचे कारण अर्थाच्या दृष्टिने ते नेमकेपणाचे होते, अर्थवाही होते मुख्य म्हणजे मूळ भाषेशी ते मिळते जुळते होते.
एकूण मथितार्थ- इंग्रजी मातृभाषा असो वा नसो ती कुणालाही अगदी इंग्रजालाही समजायला अवघडच जात असणार. अवघडपणा हा तिचा अंगभूत गुण आहे.
ashu jog
ashujog@gmail.com
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जावू द्या हो...
अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका
+१
आईस आणि स्नो - पक्षी बर्फ आणि हिम!
+१
एकनाथ नव्हे, दासोपंत, हा घ्या संदर्भ !
सुधारणा...
+११
...
या चर्चेवरुन हिमक्रीम आठवले
कर्ता आला....
तसं काय नाना प्रत्येक भाषा
ह्या लेखात एक महत्त्वाचा भाग,
तुलना
अट्टाहास कशासाठी की दोन्ही भाषांतले शब्द interchangeable असावेत?
खादाड सुरेश
अरारारां... गेले ते दिवस..
तुलना अशासाठी करायची की
मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही"
. . .
...........काय बोलू.........
तुलना अशासाठी करायची की
अलिकडे काही कारणामुळे या
मराठीतील एक हिमशिखर वि. वा. शिरवाडकर
अंग्रेजी बडीही भ्रष्ट भाषा है
...
...
अश्या कित्येक उणीवा मराठी
'चप्पल' या मराठी शब्दाचे लिंग
लेख आवडला
...
मला सांगा .मी Mobile या
सायलेंट e
करेक्ट
प्रगो, ३ मुद्दे.
विरुध्द
इंग्लिशचं वैचित्र्य जगजाहीर
+१
...
...
माझं.. या भाषांन्ना एव्ह्ढच
...
कारण...
अजुन एक उदाहरण
सहमत. König = क्योनिश = किंग
मराठी मातृभाषा आहे, मान्य.
लेख आवडला
नाते निर्देश....
एकदम रास्त समस्या.
अहो पेठकर साहेब असाच प्रश्न