Skip to main content

स्पॅनिश ऑम्लेट (घरगुती)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 08/09/2014 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १. ३ अंडी २. अर्धी सिमला मिर्ची (२*२ सेमी चे चौकोन तुकडे) ३. एक मोठा किंवा २ मध्यम कांदे (चौकोनी तुकडे वरील प्रमाणेच , पाकळ्या सुट्या करुन घेणे) ४. २ मोठे बटाटे, मध्यम पातळसर (जास्त पातळ ही नाही) तुकडे चौकोनी ५. टोमॅटो २ (जास्त पिकलेले असल्यास गर काढुन नाहीतर तसेच, वरील प्रमाणे चौकोनी तुकडे) ६. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन ७. चवी नुसार मीठ - मिरपुड ८. तेल 1. १. सर्वप्रथम थोडे जास्त (एखाद डाव) तेल फ्राईंग पॅन मधे गरम करावे, त्यात बटाटे टाकुन लालसर मऊ शिजे पर्यंत शिजवावेत 2. 3. २.आता बटाट्यात पहिले कांदे अन मग सिमला मिर्ची घालावी , हे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीए, थोडे क्रंची सोडावे (पुढे अंड्यात शिजते हे सगळे, फक्त बटाटे मऊ होईपर्यंत शिजवावेत) 4. ३. हे थोडे शिजल्यावर ह्यात टोमॅटो घालावेत 5. ४. आता ह्यात मीठ अन मिरपुड घालुन फेटलेली ३ अंडी घालावीत 6. हे ऑम्लेट कडे कडेने थोडे सेट करावे 7. आता सर्वात ट्रिकी पार्ट आहे, ह्या फ्राईंग पॅन वर फेस टु फेस बसेल अशी एक चिनी मातीची प्लेट घ्यावी, ती पॅन वर ठेऊन पॅन उलटा करावा, जेणे करुन ऑम्लेट उलटे होऊन फ्लिप होईल. आता ऑम्लेट ची शिजलेली बाजु वर येईल अन कच्ची खाली, ह्या कच्च्या बाजु कडुन ऑम्लेट हळुच परत पॅन मधे सोडावे, बाजुने थोडे तेल (एखादा चमचा) चारी बाजुने सोडावे. 8. दोन्हीकड्न नीट शिजल्यावर प्लेट मधे काढुन घ्यावे, फायनल प्रॉडक्ट असे काहीसे दिसेल, हे वापरलेल्या तेला मुळे जास्त हेल्दी तर नाही म्हणवणार पण भाज्या पोटात जातात सो अगदीच डायट बरबाद आयटम नक्कीच नाही 9. 10. टिप :- माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या ट्रेडीशनल स्पॅनिश ऑम्लेट ला घालतात त्याच आहेत, ह्यात वेरियेशन म्हणजे रंगीत सिमला मिर्ची, सन ड्राईड टोमॅटोज,मश्रुम, विविध प्रकारची चीज पनीर इत्यादी ही वापरता येईल (चीज सगळ्यात शेवटी घालावयाचे अन फ्लिप मारायच्या आधी अलगद छोट्या चमच्याने ढवळुन चीज अन भाज्या एकत्र करायचे.

वाचने 23007
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

हो, तेल फ़क्त थोड़े जास्त वापरले आहे ! तोच एक मुद्दा आहे!! बाकी काही नाही! :)

बापु, त्या त्रिवेणी काकु आणि जे.पी. काकांना धन्यवाद (उपप्रतिसाद) द्यायचे राहिले की पैजारबुवा,

In reply to by दिपक.कुवेत

मी आपली आठवण करुन दिली, विसरले असतील असे वाटले म्हणुन. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आले कि सगळ्या प्रतिसादांची खबर घेतील हो :)

In reply to by दिपक.कुवेत

हो . हो. खोबर घातल तरी चालेल दिपक कुवेत. धन्यवाद.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नाही.नाही. मुळ्ळीच विसरलो नाही ज्ञानोबाचे पैजार. काळजी नसावी. धन्यवाद.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद आठवण करुन दिल्याबद्दल ज्ञानोबाचे पैजार. नक्की धन्यवाद मानेन.

In reply to by स्पंदना

ज्येष्ठ मिपाकरांना वगैरे वगैरे.... एक मिपाकर म्हणून.... वगैरे वगैरे... एवढे बोलून वगैरे वगैरे... धन्यवाद!

आज मी साधं बॅचलर ऑम्लेट केलं होतं. ईनो (तेच हो ते आपल्याकडची लोकं जळजळ झाल्यावर घेतात ते) घातल्यावर काय होतं हे पाहायची ईच्छा झाली. ३ अंडी, अर्धा कांदा, मिरच्या, मीठ, कोथिंबिर मिसळवुन फेटुन घेतलं. त्यानंतर १/२ टी.स्पुन ईनो घालुन परत फेटुन घेतलं. पांढरा फेस तयार झाला आणि चविला किंचित आंबट चव आली. कपाळावर हात मारुन घेतला. पण एवढं मटेरिअल टाकुन द्यायचं जीवावर आलं होत म्हणुन तसचं ऑम्लेट घातलं. आश्चयाची गोष्ट म्हणजे ऑम्लेटच्या चवीमधे कुठलाही फरक नव्हता आणि नेहेमीपेक्षा जास्त फुगलं होतं. =)) ईनो जिंदाबाद.