मँगो मलई लड्डू/लाडू
डिस्क्लेमरः पाकृत टिन्ड मँगो पल्प/प्युरे वापरलाय. हापुस आंब्याचा सीजन निदान आता तरी संपलाय.
वेल खरं तर बाप्पाच्या आगमनाआधी हि पाकॄ द्यायची होती पण राहून गेली. पण हरकत नाय...एकदा ट्रायल बेसीस वर करुन बघा. जमली/आवडली तर पुढल्या वेळेस करुन दणक्यात पेश करा. वेल हे लाडू म्हणुन छान तर लागतातच पण हेच सारण मोदकात भरुन मँगो मलई मोदक करुन बाप्पाला जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक पेश करा.
साहित्यः
१. पनीर - ४०० ग्रॅम
२. आंब्याचा रस/पल्प - १ बाउल
३. बदाम स्लाईस/पिस्ता काप/पिस्ता पावडर - २ चमचे प्रत्येकि
४. नेस्ले मिल्कमेड - आवडिनुसार कमी/जास्त
५. खायचा कलर - २ ते ३ थेंब
६. केवडा किंवा रोझ ईसेन्स - १/२ चमचा (ते हि नसेल तर आपली वेलची पुड)
७. साजुक तुप - २ चमचे (पनीर पॅन मधे लागु नये म्हणुन)
कॄती:
१. फ्रोजन पनीर क्युब्स वापरणार असाल तर थोडया वेळ गरम पाण्यात घालुन ठेवा जेणेकरुन मउ होतील. आता हलक्या हाताने एक साधारण ८-१० मि. पनीर मळुन घ्या जेणेकरुन त्यात असणार्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील
२. आता मंद आचेवर एका नॉन्स्टिक पॅन/वोक/कढईत साजुक तुप तापलं कि पनीर, मँगो पल्प आणि मिल्कमेड एकत्र करुन हळुवार सतत ढवळत रहा. एक ७-८ मि. त्यात खायचा रंग, केवडा ईसेन्स, बदाम-पिस्ता काप घाला. बदामाचे काप हलकेच हाताने चुरडून घ्या.
३. आता कडेने तुप सुटुन मिश्रणाचा गोळा झाला कि ताटात काढुन गार करत ठेवा.
४. एक ५ मि. मिश्रणावरुन १ चमचा पिस्ता पुड घाला
५. गोळा पुर्ण थंड झाला कि हव्या त्या आकारात लाडू वळा
६. वरुन चिमुट चिमुट पिस्ता पावडर घालुन मँगो मलई लड्डू पेश करा
टिपः पनीर असल्यामुळे हे लाडू सतत फ्रिज मधेच ठेवा आणि खायला द्यायच्या आधी एक १५-२० मि. बाहेर काढुन, रुम टेम्परेचरला येउन द्या. माओ मधे हलके गरम करुन देणार असाल तर उरलेले लाडू परत फ्रिज मधे शक्यतो ठेवु नका. कदाचीत चव उतरेल. (अर्थात ह्या सगळ्या शक्यता लाडू उरले तर :D
वाचने
30571
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
ल य भा री.....
आहाहा...सहीच फोटो
दीपकबाबा पनीरवाले,
शिच्या, जमेल तितका मानसिक त्रास दे...
In reply to शिच्या, जमेल तितका मानसिक त्रास दे... by मुक्त विहारि
मुवि अहो डोंबोलीत भेटुच
In reply to मुवि अहो डोंबोलीत भेटुच by दिपक.कुवेत
आयडीया बुरा नहीं है...
In reply to मुवि अहो डोंबोलीत भेटुच by दिपक.कुवेत
कट्टा नाही.....कट्टी तुमच्याशी.
In reply to कट्टा नाही.....कट्टी तुमच्याशी. by प्रभाकर पेठकर
अहो काका
In reply to अहो काका by दिपक.कुवेत
अरे व्वा!
In reply to अरे व्वा! by प्रभाकर पेठकर
@ दिपक आणि प्रभाकर दादा,
फार दिवसांनी पनीरला चान्स
फोटो आणि पाकृ दोन्ही अप्रतिम.
सुंदर.
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
अलबत काका
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
असेच म्हणतेय
ही पाकू आमच्यासाठी. धन्यवाद .
मस्तच
खल्लास !!!
जीव जाळता
In reply to जीव जाळता by भिंगरी
अहो भिंगरीतै
In reply to अहो भिंगरीतै by दिपक.कुवेत
फोटू पाहून
In reply to फोटू पाहून by भिंगरी
ओह मग त्या
In reply to ओह मग त्या by दिपक.कुवेत
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
ज ब रा ट! _/\_
आह्ह...
मदनबाण.....
आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Komमिश्रण गॅसवर ठेवल्यापासून
In reply to मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून by त्रिवेणी
ह्या लाडवांचं एक बरं आहे
टीन मँगोपल्पमध्ये साखर असेल ना?
In reply to टीन मँगोपल्पमध्ये साखर असेल ना? by अनन्न्या
हो पल्प मधल्या टिन मधे
वाह! एकदम भारी फोटू आहेत.
भारीच
In reply to भारीच by सखी
हो मागे एकदा आंबा - पनीर बर्फिहि केलेली
मस्त!!!
पाणी सुटलं तोंडाला.
In reply to पाणी सुटलं तोंडाला. by स्पंदना
अरे वा ग्रेट
हुम्म्म
वेल हे लाडू खायला घातलेस तरच
In reply to वेल हे लाडू खायला घातलेस तरच by किसन शिंदे
लाडू खायला...
मस्त, मस्त, मस्त
स्त्रिच्त नो तो स्वीत्स!!
In reply to स्त्रिच्त नो तो स्वीत्स!! by सूड
अच्छा
सुप्पर....
डेझर्ट सम्राट दीपक भाऊ की ..
अरे दुष्टा!
In reply to अरे दुष्टा! by पैसा
@अरे दुष्टा!>>> .. ..
In reply to अरे दुष्टा! by पैसा
हात्तीच्या एवढचं ना....
दिकु च्या रेशीपी मी वाचतच नाय
मिपा आंबा महोत्सवाच्या निमित्ताने....
अरे, अरे! काय हे दुष्टा!