मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मँगो मलई लड्डू/लाडू

दिपक.कुवेत · · पाककृती
डिस्क्लेमरः पाकृत टिन्ड मँगो पल्प/प्युरे वापरलाय. हापुस आंब्याचा सीजन निदान आता तरी संपलाय. ladoo 1 वेल खरं तर बाप्पाच्या आगमनाआधी हि पाकॄ द्यायची होती पण राहून गेली. पण हरकत नाय...एकदा ट्रायल बेसीस वर करुन बघा. जमली/आवडली तर पुढल्या वेळेस करुन दणक्यात पेश करा. वेल हे लाडू म्हणुन छान तर लागतातच पण हेच सारण मोदकात भरुन मँगो मलई मोदक करुन बाप्पाला जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक पेश करा. साहित्यः १. पनीर - ४०० ग्रॅम २. आंब्याचा रस/पल्प - १ बाउल ३. बदाम स्लाईस/पिस्ता काप/पिस्ता पावडर - २ चमचे प्रत्येकि ४. नेस्ले मिल्कमेड - आवडिनुसार कमी/जास्त ५. खायचा कलर - २ ते ३ थेंब ६. केवडा किंवा रोझ ईसेन्स - १/२ चमचा (ते हि नसेल तर आपली वेलची पुड) ७. साजुक तुप - २ चमचे (पनीर पॅन मधे लागु नये म्हणुन) ladoo 2 कॄती: १. फ्रोजन पनीर क्युब्स वापरणार असाल तर थोडया वेळ गरम पाण्यात घालुन ठेवा जेणेकरुन मउ होतील. आता हलक्या हाताने एक साधारण ८-१० मि. पनीर मळुन घ्या जेणेकरुन त्यात असणार्‍या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील ladoo 3 २. आता मंद आचेवर एका नॉन्स्टिक पॅन/वोक/कढईत साजुक तुप तापलं कि पनीर, मँगो पल्प आणि मिल्कमेड एकत्र करुन हळुवार सतत ढवळत रहा. एक ७-८ मि. त्यात खायचा रंग, केवडा ईसेन्स, बदाम-पिस्ता काप घाला. बदामाचे काप हलकेच हाताने चुरडून घ्या. ladoo 4 ladoo 5 ३. आता कडेने तुप सुटुन मिश्रणाचा गोळा झाला कि ताटात काढुन गार करत ठेवा. ladoo 6 ladoo 7 ४. एक ५ मि. मिश्रणावरुन १ चमचा पिस्ता पुड घाला ladoo 8 ladoo 9 ५. गोळा पुर्ण थंड झाला कि हव्या त्या आकारात लाडू वळा ladoo 10 ६. वरुन चिमुट चिमुट पिस्ता पावडर घालुन मँगो मलई लड्डू पेश करा ladoo 11 टिपः पनीर असल्यामुळे हे लाडू सतत फ्रिज मधेच ठेवा आणि खायला द्यायच्या आधी एक १५-२० मि. बाहेर काढुन, रुम टेम्परेचरला येउन द्या. माओ मधे हलके गरम करुन देणार असाल तर उरलेले लाडू परत फ्रिज मधे शक्यतो ठेवु नका. कदाचीत चव उतरेल. (अर्थात ह्या सगळ्या शक्यता लाडू उरले तर :D

वाचने 30571 वाचनखूण प्रतिक्रिया 49

प्यारे१ Mon, 09/08/2014 - 14:47
दीपकबाबा पनीरवाले, मस्तच. जीव जाता जाता राहिला त्या पिस्त्याच्या अस्ताव्यस्त पडलेल्या पावडरीमुळं. ती नीट पसरवली असती तर नक्कीच गेला असता. (शेफ लोक्स, क्षमस्व. पण तुम्हाला छान छान म्हणायला हात आखडतो. खुस्पटं काढावीशी वाटतात. मुख्य कारण जळजळ ) मात्र लाडू खाऊन बघितल्यावर थेट स्वर्ग ह्यात शंकाच नाही.

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Mon, 09/08/2014 - 21:21
पण आपल्या कुवैत कट्ट्याचे फोटो मिपावर नको टाकायला... आमची बायको, घरांत घेणार नाही. आणि बिना फोटो कट्टा आपल्याला जमत नाही. त्यामुळे मी आणि माझी बायको, दोघेही येतो. तसा कुवैतचा विसा लगेच मिळतो, असे ऐकिवात आहे...

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्त विहारि Tue, 09/09/2014 - 21:36
ऑक्टोबर मध्ये अजिबात शक्य नाही तर फेब्रुवारी मध्ये थालंडला जायचे असल्याने, ह्या ६ महिन्यांत तरी शक्य नाही. पुढच्या वर्षी बघू.

प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 15:53
अतिशय देखणे आहेत हे लाडू. चविष्ट तर असणारच. करून खाऊ घालेन कोणाला तरी. खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत Mon, 09/08/2014 - 16:56
केशर नक्किच चव वाढवेल पण केशर भिजत घालुनहि म्हणावा तसा रंग उतरत नाहि अर्थात केशर क्वालीटिवर पण अवलंबुन असतं म्हणा.

In reply to by प्रभाकर पेठकर

खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.
असेच म्हणतेय. केशराचा रंग छान खुलतो मी पण केशराचा वापर रंगासाठी व स्वादासाठी करतेच. बाकी मँगो मलई लाडूबद्दल काय बोलायचे ते तर अप्रतिम दिसत आहेतचं, तोंपासु :) साधारण संदेश सारखा प्रकार वाटतो, पनीर शिजवून घेतले आहे ना म्हणून.

भिंगरी Mon, 09/08/2014 - 16:34
हे असं दाखवून जीव जाळता राव तुम्ही. हे टीन मधले पल्प काही आम्हाला पचनी पडत नाहीत आणि आम्ही काही 'मोदी'नाही की आम्हाला पाकिस्तान मधुन आंबे येतील.

त्रिवेणी Mon, 09/08/2014 - 17:46
मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून पूर्ण आटेपर्यंत साधारण किती वेळ लागतो. साधारण वडी, पाक आणि लाडू करायची अजुनही हिम्मत नाही होत. जर करताना बिघडवलीच पाककृती तर काय करावे हे सांगुन ठेवा म्हणजे आयत्यावेळेस धावपळ होणार नाही.

In reply to by त्रिवेणी

दिपक.कुवेत Mon, 09/08/2014 - 18:24
साखरेच्या पाकाची वगैरे भानगड नसल्यामुळे मिश्रणाचा गोळा एक साधारण १५-२० मि. होतो (गॅसवर ठेवल्यापासुन) आणि गरम असताना लाडू कदाचीत वळले जाणार नाहित सो गार झाल्यावरच वळा. एवढं करुनहि जर वळले गेले नाहि तर "मँगो मलई हलवा" म्हणुन वरुन अजुन ड्राय फ्रुट्स घालुन/चांदिचा वर्ख वगैरे लावुन सर्व करा.

In reply to by अनन्न्या

दिपक.कुवेत Mon, 09/08/2014 - 18:30
साखर हि असतेच म्हणुन मिल्कमेड असुन शक्यतो साखरेची गरज भासत नाहि. शीवाय ताजा आब्यांच्या रसाची गोडि + प्रचंड गोड असलेलं मिल्कमेड ह्याने साखरेस आपोआप फाटा मिळतो. हां पण ताजा रस एकदा मिक्सर मधे फिरवुन गाळुन घे जेणेकरुन खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहित.

सखी Mon, 09/08/2014 - 21:18
भारीच दिसतात लाडु. याचप्रमाणे वड्या वगैरे पण चांगलच लागेल/दिसेल असं वाटतयं.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत Wed, 09/10/2014 - 10:47
मग फिकिर नॉट.....पळता पळता हे लाडू खा म्हणजे खायचाहि आनंद आणि कॅलरी बर्न (जळणं शब्द अरा अतीरंजीत वाटतो) केल्याचं समाधान......हाकानाका!!!