Skip to main content

देव पूजा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 06/09/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक सधन श्रद्धाळू ब्राह्मण राहतं होता.. त्याला मुलगा व सून असते पण मुलगा आळशी अन वाया गेलेला असतो.. वडील म्हातारे झाल्याने देवपूजा कर असे ते त्याला कानी कपाळी ओरडून सांगत असायचे पण हा आळशी असल्याने त्याला त्याचा कंटाळा यायचा व तो वडिलांचे ऐकत नसे. एके दिवशी वडीलांना कामानिमित्त आठवडा भर बाहेर गावी जायचे असल्याने निदान हा आठवडा तरी तू देव पुजा कर असे वडील बजावतात व कामासाठी बाहेर जातात.. मुलगा वैतागतो अन पुजा टाळण्यासाठी सासुरवाडीला जातो. चहा पाणी होते व तो विचारतो की सासरे बुवा दिसत नाहीत? यावर सासूबाई म्हणतात काम असल्याने ते सकाळीच बाहेर गावी गेले आहेत २-३ दिवसात परत येतीलच.. व म्हणतात की "उद्या तुम्हाला माझे एक काम करवे लागेल" उद्या मला पुजा करायची नाही परवा अंघोळ झाली की मी पुजा करू शकेल तेव्हा उद्याच्या दिवस तुम्ही तेव्हढे सांभाळून घ्या.. यावर तो मनातल्या मनात कपाळावर हात मारतो व टाळण्या साठी सबब देतो की" सासुमां आमची पुजा खूपं खर्चिक असते त्याला २ हजार रुपये लागतील" या वर सासूबाई म्हणतात २ काय ४ हजार लागू देत पण पुजा झालीच पाहिजे.. हे ऐकल्यावर त्या आळश्याचा नाईलाज होतो व २ हजार घेऊन तो बाजारात जातो व थोडे पूजेचे सामान आणून बाकी पैसे पॉकेट करतो.. दुस~या दिवशी तो पूजेला बसतो त्याच वेळी शेजारची बाई येते व ति पुजा पाहते..व विचारले असता सासू सांगते हि स्पेशल पुजा आहे २ हजार खर्च केला आहे.. त्यावर ति बाई त्या आळश्याला ३ हजार घे पण आमच्या घरी अशी पुजा कर असा आग्रह धरते..सासू बाई पण मध्यस्थी करतात व याला पुजा करण्यास राजी करतात.. जे टाळण्या साठी आपण सासुरवाडीला आलो होतो ते टळत तर नाही उलट पुजा मानगुटीस बसते हे पाहून तो ब्राह्मण वैतागतो. पण पैसे घेतले असल्याने दुस~या दिवशी शेजारी पूजेस जातो..पाहतो तो काय तिथे पण बरेच लोक जमलेले असतात व ति पुजा पाहून त्याला पुजा करण्याचे आमंत्रण देतात.. या सा~याला वैतागून तो जीव द्यायला निघतो व एक दोरखंड घेऊन शेताकडे कुच करतो.. शेतात एका झाडाला दोरखंड टांगतो व फास गळ्यात घालून जीव देणार इतक्यात शेतात काम करणारा शेतकरी धावत येतो व त्याच्या गळ्यातला फास काढतो. व त्याला आत्महत्या पाप आहे जीवन एकदाच मिळते असे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत करीत त्याला सांगतो "की मी सधन शेतकरी आहे तू जीव देऊ नकोस माझ्या घरी राहा तुला २ वेळाजेवण चहा नाष्टा मी देत जाईन काही काम करू नकोस...पण जीव देऊ नकोस..मात्र तु ब्राह्मण असल्याने माझे एकच काम तुला करावे लागेल माझ्या घरी जे देव आहेत त्याची पुजा तुला नियमाने करावी लागे बस्स इतकेच.." यावर ब्राह्मणास आपल्या नशिबावर हसू येते व तो हसू लागतो.. मात्र शेतक~यास हा का हसतो याचा बोध होत नाही......
लेखनविषय:

वाचने 4886
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

मी पयला! कथा आवडली हो अकुकाका!

'गाव बदललं तरी नशिब बदलत नाही.' - इति वपु.

In reply to by प्रभाकर पेठकर

नांव बदललं तरी 'जीमो' टच बदलत नाही.

गोष्ट आवडली काका! अशाच चांदोबा गोष्टी लिहा हो. नायतर तुम्ही पूजा लिहिलंत की मी घाबरते, पूजा बेदी, पूजा बात्रा, पूजा भट्ट इ. पुरंध्रींबद्दल लेख आहे की काय म्हणून!

मस्त.

टक्कर देणारं तितक्याच तोडिचं कुणी आलं तर!!! आनंदि आनंद गडे....अकुंच्याच कथा चोहिकडे!!!

In reply to by बॅटमॅन

लिंक बघीतली. ईतकं कूछ कूछ असेल माहित नव्हतं. भारी लींक हो ब्याट्या. मग ह्या गाण्याचा अर्थ काय..."हम है मताई कुचा बाजार कि तराह...."