मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रनिंग फ़्रॉम लिंचींग

मारवा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
१२ डीसेंबर १७१२ हा दिवस व्हर्जीनीयातील जंटलमेन्स साठी फ़ार महत्वाचा होता. कारण त्यांच्याइतकाच जेंटल (इंग्रजी तील ) असणारा मॅन Willie Lynch त्यांना त्याच्या मेहनतीने व कल्पकतेने डेव्हलप केलेली. गुलाम बनविण्याची रेसीपी शेअर करायला येणार होता. हा पाहुणा दयाळु इश्वराचा अर्थातच मोठा भक्त होता राजा जेम्स ची ही त्याने आवर्जुन आठवण भाषणाच्या सुरुवातीला च काढली. (बायबल वाला जेम्स ) प्राचीन रोमन्स ही माझ्या गुलाम बनविण्याच्या मेथड चा हेवा करतील हे ही ठणकावुन सांगुन भाषणाला सुरुवात केली. या भाषणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा लिंच ची अप्रतिम इंग्रजी भाषा. अतिशय आखीव रेखीव अत्यंत नीटनेटकी. जणु एखादा संशोधक आपल्या अनेक वर्षांच्या अथक परीश्रमाने बनविलेली व अप्लाइड थेअरी टु द पॉइंट एखाद्या रीसर्च पेपर मध्ये आपल्या सहकारय़ां समोर वाचतोय. अतिशय मोजक्या शब्दात पुर्ण फ़ाफ़टपसारा टाळुन नो नॉनसेन्स टाइप लिंच सरळ मुद्याला भिडतो. यामधील लिंच ची आपल्या व्यावसायिक बंधु प्रति असलेली निष्ठा प्रेम व त्यांच्या व्यवसायातील अडचणी विषयीची कळकळ ही अर्थातच पदोपदी जाणवते. त्याचा अनुभवातुन आलेला आत्मविश्वास व मानवी सायकॉलॉजी चे इतके सखोल ज्ञान त्या काळात जेव्हा फ़्रॉइड ही जन्मला नव्हता बघुन आश्चर्य वाटते. Lynching हा शब्द याच विली लिंच च्या आडनावावरुन इंग्रजीत प्रचलित झालेला आहे. तर या भाषणात तो हॉर्स ब्रेकींग मागील थेअरी अत्यंत यशस्वी रीतीने चांगला निग्रो गुलाम बनविण्या साठी कशी वापरता येते हे समजावुन सांगतो यात चार च पानात तो क्रोर्य कीती सोफ़ेस्टीकेड असु शकते हे केवळ चार च पानात सिद्ध करुन दाखवतो.माझ्या पद्धतीने निग्रो गुलाम बनविलेत तर हे गुलाम कमीत कमी ३०० वर्ष आपण कंट्रोल करु शकु अशी ग्वाही देखिल लिंच आपल्या भाषणात देतो. हे चार पानी भाषण मुळातुन वाचण्यासारखे आहे. www.iupui.edu/~blacksu/PDF%20Documents/.../WillieLynchLetter.pdf तर लिंच च्या दुर्देवाने हे प्रत्यक्षात होउ शकले नाही. ३०० वर्षात पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले. अनेकांच्या असीम त्यागाने आणि संघर्षाने काळ्यांच्या गुलामीचा संपुर्ण नाही तरी मोठ्या प्रमाणात अंत झाला. आज ते स्वतंत्र आहेत व प्रगती करीत आहेत. संघर्ष अजुन संपला नाही. वरील भाषण वाचल्या नंतर मी आश्चर्य चकीत झालो. त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते. मागे एकदा रुट्स नावाची एक अद्वितीय कादंबरी जी एलेक्स हॅली( जो स्वत: गुलाम असलेल्या व्यक्तीचा वंशज होता) या लेखकाची होती ती तीव्रतेने आठवली. अतिशय मार्मीकतेने व संवेदनशीलतेने यात त्याने या काळ्या गुलामांचे जीवन यात रेखाटलेले आहे. यात क्लायमॅक्स ला आपल्याला कळते की एलेक्स त्याच्या प्रत्यक्ष कुटुंबाची च सत्यकथा आपल्याला आतापर्यंत सांगत होता. या धक्क्याने गलबलायला होते. मला वाटत यावर चित्रपट ही बनलेला आहे व मराठीत याचा अनुवाद ही झालाय. अत्यंत वाचनीय असे हे पुस्तक आहे. यात कोंबड्या झुंजवण्याच्या खेळाविषयी अनेक वर्णने येतात. तो त्या काळातील एक लोकप्रीय असा खेळ होता. मात्र त्या वर्णना ची नाळ लेखक त्या गुलांमाच्या जीवनाशी ज्या कलात्मक रीतीने जोडुन दाखवितो ते खरोखर मुळातुन वाचण्यासारखे आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही कादंबरी आहे. तुर्तास सध्या ची एक न्युज मला फ़ार विलक्षण सुखावुन गेली. ज्यांना जखडुन ठेवण्याचा इतका क्रुर प्रयत्न केला गेला ते आता मुक्त झालेत आणि सुसाट सुटलेत आणि कीती सुसाट तर बघा युसेन बोल्ट ला. या महान रनर ने नुकताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय ( अगोदर च्या अनेक रेकॉर्ड्स मध्ये) ९.९८ सेकंदात १०० मीटर अंतर धावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ! काही खास नसेल वाटल यात तर एक काम करा थोड कॅल्क्युलेशन करुन बघा. जनरली हे सर्व रनर्स जमैकन असतात व बहुतांशी काळे च असतात. म्हणजे अगदे दुसरे तिसरी दहावे आलेले ही हेच असतात. तर यांचा वेळ असतो १०.३४ १०.५० सेकंद इतका १०० मीटर्स साठी सर्वसाधारण पणे. आता एक मीटर इजीक्वल टु सव्वा तीन फ़ुट १०० मीटर इजीक्वल टु ३२५ फ़ुट वरील २५ फ़ुट सोडुन द्या फ़क्त ३०० फ़ुट च धरुया आणि दहा च्या च आसपास सेकंद असतात म्हणुन १० सेकंद धरुयात. तर याच हीशोबाने १० सेकंद = ३०० फ़ुट म्हणजेच १ सेकंद = ३० फ़ुट एका सेकंदात तुम्ही कीती फ़ुट धाउ शकता भाउ ? देखो देखे ये जमाना पंछी उडा जाये रे !!!

वाचने 3146 वाचनखूण प्रतिक्रिया 8

स्पंदना Tue, 09/02/2014 - 04:12
किती भयानक! किती घाणेरडी विचारसरणी. मला दुसर्‍याचा छळ करुन सुख भोगणे ही कल्पनाच उमजत नाही.

एस Wed, 09/03/2014 - 13:01
त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते.
मानवी समाजातल्या अशा विकृती पूर्णपणे संपल्या आहेत असे अजूनही म्हणता येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. तूर्तास लेखाबद्दल आणि 'रुट्स' या कादंबरीच्या ओळखीबद्दल धन्यवाद.

पैसा Wed, 09/03/2014 - 17:17
रूट्स वाचायची आहे. माणसाने माणसाला गुलाम करणे हेच फार भयानक आहे.

In reply to by पैसा

मुक्त विहारि गुरुवार, 09/04/2014 - 00:10
नक्की वाचा... भयानक पुस्तक आहे.मी सहज म्हणून वाचायला घेतली आणि पुर्ण रात्र वाचत बसलो होतो.दुसर्‍या दिवशी कामावर पण गेलो नाही.