Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विवेकपटाईत on Fri, 09/05/2014 - 12:26
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न. माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे. सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले. सर्वांचे वर्णन वेगळे असले तरी प्रत्येकाच्या दृष्टीने ते सत्य होते. मला दिसलेले सत्य लोकांना पटले पाहिजे असा माझा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments
  • 13843 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on Fri, 09/05/2014 - 12:33

Permalink

मी पयला..

काही नवीन वाचतां कंडुअतिशमनार्थ लेख तो ल्याहावा | तेहीं नसतां मग प्रतिसादोन काळ काढावा ||
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 09/05/2014 - 22:17

In reply to मी पयला.. by बॅटमॅन

Permalink

या प्रकारचा मूळ श्लोक माहित

या प्रकारचा मूळ श्लोक माहित आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Sat, 09/06/2014 - 22:26

In reply to या प्रकारचा मूळ श्लोक माहित by खटपट्या

Permalink

हो

इथे देण्या जोगा नहि...:)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 09/06/2014 - 23:04

In reply to हो by अत्रन्गि पाउस

Permalink

टाका की...दुसर्या एका

टाका की...दुसर्या एका संस्क्रूत वरील लेखाच्या एका प्रतिसादात होता तो...मिपावरच
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 09/06/2014 - 23:07

In reply to टाका की...दुसर्या एका by टवाळ कार्टा

Permalink

मला वाटत उडवल्या जाइल !!!

मला वाटत उडवल्या जाइल !!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 09/06/2014 - 23:52

In reply to मला वाटत उडवल्या जाइल !!! by खटपट्या

Permalink

आधीचा नव्हता उडाला

आधीचा नव्हता उडाला :)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 09/07/2014 - 08:07

In reply to आधीचा नव्हता उडाला by टवाळ कार्टा

Permalink

व्यनि केलाय !!

व्यनि केलाय !!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 09/06/2014 - 23:05

In reply to हो by अत्रन्गि पाउस

Permalink

बरोब्बर !!

बरोब्बर !! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 09/05/2014 - 12:34

Permalink

(१) व्यक्त होणे ही माझी गरज

(१) व्यक्त होणे ही माझी गरज आहे (या वाक्यात संपतं कारण पण तरी......) (२) अशा संस्थळांवर लिहीले की (अ) आपण लिहीतो त्यातल्या चुका प्रतिसादांमुळे, खरडींमुळे तिथल्यातिथे समजतात. (ब) लिहीणे सुधारते, दिशा मिळते. (३) लिखाणावरच्या प्रतिसादांमुळे ज्ञानवृद्धीही होते - त्याचा उपयोग मग लिखाण सुधारण्यातही होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 09/05/2014 - 12:35

Permalink

बरेच उपमुद्दे आहेत मुख्य दोन

बरेच उपमुद्दे आहेत मुख्य दोन १)का लिहितो आणि २)आंतरजालावरच का लिहितो.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 09/05/2014 - 12:49

Permalink

आंजावर का लिहीतो ?

आंजावर का लिहीतो ? . . . . काय माहित नाय ब्बॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 09/05/2014 - 12:59

Permalink

मी लिहितो

मी लिहितो कारण १ ) टवाळखोर प्रतिसाद : ऑफीसात काम नसते , खरडफळ्यावर गफ्फा मारायला कोणी नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिपावरच्या काही आयडीं ( ब्यॅट्या , सूड , धन्याप्यारे , नेफळे वगैरे ) सोबत बौध्दिक वादावादी करायला लय मजा येते *biggrin* ... नो ऑफेन्स हं फ्रेन्ड्स ! कारण २ )गंभीर प्रतिसाद : फार क्वचितवेळा गंभीर प्रतिसाद लिहिण्याची वेळ येते ( तेव्हा मग ऑफीसात काम असुनही वेळ काढला जातो) जेव्हा एखाद्याविषयावर आपले मत कंप्लीटली ऑर्थोगोनल (मराठी ? संपुर्ण विरोधी ?) असते तेव्हा ते लोकांना कन्व्हे करण्याची प्रॅक्टीस करता येते शिवाय हुशार लोकांशी चर्चा केल्याने जर आपले मत चुकीचे असेल तर बदलता येते किंव्वा बरोबर असेल तर त्यातील लूपहोल्स रिमुव्हता येतात . कारण ३ ) काथ्याकुट धागा : लईच कंटाळा आला असल्यास आणि लईच वादग्रस्त विषय हाती लागल्यास्की काथ्याकुट धागा काढतो ... ( अर्थात आपल्या काथ्याकुटवर कुटाकुटी झाली नाहीतर लई वाईटही वाटते ) कारण ४ ) स्वतंत्र लेखन ( कविता कथा लेख गोष्ट वगैरे ): हे तर फार म्हणजे फार क्वचितवेळा करण्याचा योग येतो ...पण काही काही विषय असे असतात की मला बस्स बोलायचंय ऐकायला कोनी नसलं तरी चालेल मला बस्स बोलायचंय असं जेव्हा वाटतं तेव्हा असे काही लेखन करतो !
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 09/05/2014 - 14:47

In reply to मी लिहितो by प्रसाद गोडबोले

Permalink

आयला मनातलंच बोललास की रे.

आयला मनातलंच बोललास की रे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 09/05/2014 - 16:22

In reply to मी लिहितो by प्रसाद गोडबोले

Permalink

असेच म्हणतो.

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/05/2014 - 13:52

Permalink

खरे खुरे उत्तर असे आहे की

खरे खुरे उत्तर असे आहे की असले आजा वर प्रतिक्रिया वगैरे लिहीण्याचे उद्योग मी ऑफिस मधुनच करतो, घरुन अजिबात नाही. वाचना बद्दल म्हणाल तर, चर्चा आणि प्रतिक्रीया वाचुन नविन काहीच हाती लागत नाही. नेहमीचेच चालू असते. डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो. बाकी नाव घेण्यासारखे फारसे कोणी नाही ( हल्ली लिहीणार्‍यातले ) पर्यटना वरचे वाचुन काढतो आणि फोटो बघतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/05/2014 - 14:11

Permalink

एकुणात निरीक्षण -

एकुणात निरीक्षण - अभिव्यक्तीची हौस खूपच वाढली आहे जनतेत.
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Fri, 09/05/2014 - 14:58

Permalink

सुप्त इछा

लेखनाची सुप्त इछा पुरी होते,आम्हा बुद्धीहीनांची बुद्धीवानांबरोबर गाठ्भेठ होते. मन मोकळे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Fri, 09/05/2014 - 15:01

In reply to सुप्त इछा by भिंगरी

Permalink

इच्छा

इच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Fri, 09/05/2014 - 15:00

Permalink

गाठभेट असे वाचावे

गाठभेट असे वाचावे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 09/05/2014 - 15:04

Permalink

घरबसल्या जगभरच्या लोकांशी

घरबसल्या जगभरच्या लोकांशी संवाद साधता येतो हेच कारण पुरेसे आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Fri, 09/05/2014 - 15:25

In reply to घरबसल्या जगभरच्या लोकांशी by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 09/05/2014 - 15:45

Permalink

खाज.

खाज.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 09/05/2014 - 15:49

Permalink

स्वतःसाठी! मी एकलकोंडी होउ

स्वतःसाठी! मी एकलकोंडी होउ नये म्हणून. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 09/05/2014 - 22:03

In reply to स्वतःसाठी! मी एकलकोंडी होउ by कवितानागेश

Permalink

+१२३४५

असंच म्हणतो. एकलकोंडा होऊ नये म्हणून.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Fri, 09/05/2014 - 16:12

Permalink

सध्या अभिव्यक्तीवरील लेखांचे

सध्या अभिव्यक्तीवरील लेखांचे अगदी पेवच फुटलेले दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 09/05/2014 - 20:16

Permalink

विचार प्रवाही राहतात.

बोलायला, ऐकायला, इतरांचे बोलणे ऐकून घ्यायला, विचारांचे आदानप्रदान करायला आवडते म्हणून. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ! शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार !! आणि वादे वादे जायते तत्व बोधः वगैरे वगैरे सुभाषितांनी माणसाच्या व्यक्तीमत्व विकासाचा मार्ग अधोरेखित केला आहे. जसे वाहते पाणी स्वच्छ असते तसेच प्रवाही विचार स्वच्छ राहतात. जर विचार प्रवाही केले नाहीत तर बुद्धीचेही 'डबके' होते आणि त्यात गाळ साठत राहतो. मिपावर विचार प्रवाही राहण्यासाठी बराच कच्चा (आणि पक्का) माल मिळतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Fri, 09/05/2014 - 20:56

Permalink

लिहावेसे वाटते म्हणून

दुसर काय? नाही वाटल की नाही लिहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 09/05/2014 - 22:54

Permalink

दिसामाजी काहीतरी लिहीत जावे...असे...

वाटते म्हणून लिहीतो...
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 09/06/2014 - 04:18

Permalink

आंजावर का लिहीतो ?

अक्षर सुधारावं म्हणून!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sat, 09/06/2014 - 13:04

In reply to आंजावर का लिहीतो ? by पिवळा डांबिस

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/07/2014 - 11:07

Permalink

का लिहिता?

१) का लिहिता? जेव्हा एखादा लेख आतून बोंब मारतो तेव्हाच लिहिते. फक्त एक लेखमालिका "आमचें गोंय" पब्लिकला गोव्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने प्रीतमोहर आणि मी लिहिली होती. अर्थात तेव्हा आम्हाला ढकलण्याचे कार्य आमचे पुणेस्थित मित्र बिपिनचंद्रजी कार्यकर्ते यांनी केले होते. २) आंजावर का लिहिता? मी लिहिलेलं कोणी छापणार आहे काय! कैतरीच काय! ३)प्रतिक्रिया का लिहिता? टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 09/07/2014 - 12:35

In reply to का लिहिता? by पैसा

Permalink

निषेध....

>>>>टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो. पाककृतींना वगळल्याबद्दल तीव्र निषेध.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/07/2014 - 12:56

In reply to निषेध.... by प्रभाकर पेठकर

Permalink

पाकृ

पाकृ, इतर चांगले लिखाण यांना उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली जातेच! ते सोडून इतर कारणे लिहिली म्या!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 09/07/2014 - 15:48

In reply to पाकृ by पैसा

Permalink

*i-m_so_happy*

*i-m_so_happy* *HAPPY* :happy:
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Sun, 09/07/2014 - 15:32

In reply to का लिहिता? by पैसा

Permalink

म्हणुनच सगळ्यांच्या आवडत्या

म्हणुनच सगळ्यांच्या आवडत्या पैसाताई
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 09/07/2014 - 15:40

In reply to म्हणुनच सगळ्यांच्या आवडत्या by भिंगरी

Permalink

हो हो! आमच्याही. कधीकधी.

हो हो! आमच्याही. कधीकधी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/07/2014 - 18:15

In reply to हो हो! आमच्याही. कधीकधी. by प्यारे१

Permalink

बरं बरं

भिंगरीला नेहमी आणि प्यारे१ ला कधी कधी धन्यवाद! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sun, 09/07/2014 - 11:11

Permalink

जास्तित जास्त प्रतिसाद मिळवेत

जास्तित जास्त प्रतिसाद मिळवेत म्हनुन : )
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 09/07/2014 - 20:52

Permalink

लिहिण्यामुळे होणारे काही फायदे :

१) आपल्याच मनाची विचार करायची पद्धत आपल्यालाच नव्याने कळते २) मनाला त्रास देणाऱ्या घटनांवर लिहिल्याने त्याची आंतरिक टोचणी कमी होते ३) आजपर्यंत जे करू शकलो नाही किवा जिथे जाऊ शकलो नाही त्या काल्पनिक जगात सफर करून आल्यामुळे नवीन चैतन्य येते ४) एकूणच विचारांची समृद्धी येते
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Mon, 09/08/2014 - 00:40

In reply to लिहिण्यामुळे होणारे काही फायदे : by माम्लेदारचा पन्खा

Permalink

एकदम बरोब्बर

नं.२ जास्त पटले,बाकी मुद्देही आमच्या मनातलेच.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com