✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

केमिकल लोच्या

फ — फुंटी, Wed, 09/03/2014 - 02:45
कोण रे तू? मासाच्या गोळ्यात अडकलेला तू , त्या मांसाच्या फ्रेशनेस वर अवलंबून आहेत तुझी इथली वर्ष , बाकी नियती वगैरे सगळेच खेळ मासातल्या काही सूक्ष्म तंतूंचे अशाच दोन मांसाच्या गोळ्यांच्या असंख्य अदृश्य शक्तीपैकी एक सूक्ष्म अंश तू , कसल्या भ्रमाचे ,कल्पनांचे मनोरे नाचवायला निघालाहेस?? विश्व वगैरे अस काही नसत तुझ्या कवटीच्या बाहेर.... येडा कुठला .... साक्षात्कार म्हणे ....आत्मिक विचारचक्र गरगर फिरतात... बरळून घे बरळून घे.....हेच आहे हक्काचं व्यासपीठ ... तुझ्या येड्झवेगीरीला समजणार ...मोकळ करणार .. आतल्या खलबताशी गद्दारी करू नकोस... विचार ,भावना शब्दात नेमक लिहिण जमलं नाही कुणाच्या बापाला .... लिहिणारे लिहोत त्यांच्या भावना.... चार चौघांना पटणाऱ्या असतीलही .... तू कशा आणणार रे चार चौघांना पटणाऱ्या भावना ,विचार उगाच खदखदत राहत हे अतरंगी अंतरंग ... खोदायला घ्याव तर आडवी येते सामाजिक बांधिलकी वगैरे.... साला सब केमिकल लोच्या है... या मांसाच्या गोळ्यात ....

प्रतिक्रिया द्या
1725 वाचन

💬 प्रतिसाद (6)

.......!

स्पंदना
Wed, 09/03/2014 - 05:13 नवीन
.......!
  • Log in or register to post comments

विचार ,भावना शब्दात नेमक

कवितानागेश
Wed, 09/03/2014 - 09:36 नवीन
विचार ,भावना शब्दात नेमक लिहिण जमलं नाही कुणाच्या बापाला .... लिहिणारे लिहोत त्यांच्या भावना.... चार चौघांना पटणाऱ्या असतीलही .... तू कशा आणणार रे चार चौघांना पटणाऱ्या भावना ,विचार >> हे आवडलं.
  • Log in or register to post comments

भा.पो.

भिंगरी
Wed, 09/03/2014 - 10:27 नवीन
विचार ,भावना शब्दात नेमक लिहिण जमलं नाही कुणाच्या बापाला .... लिहिणारे लिहोत त्यांच्या भावना.... साला सब केमिकल लोच्या है... या मांसाच्या गोळ्यात .... पण मात्र आपण नेमक्याच शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. मनाला स्पर्श करणाऱ्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

फुंटी
Wed, 09/03/2014 - 13:01 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

मुक्तछंदातला स्वसंवाद आवडला..

वेल्लाभट
गुरुवार, 09/04/2014 - 14:10 नवीन
मुक्तछंदातला स्वसंवाद आवडला.. सुरेख !
  • Log in or register to post comments

>>>बरळून घे बरळून घे.....हेच

सूड
गुरुवार, 09/04/2014 - 16:34 नवीन
>>>बरळून घे बरळून घे.....हेच आहे हक्काचं व्यासपीठ ... तुझ्या येड्झवेगीरीला समजणार ...मोकळ करणार .. हे वाचून कोणता डुआयडी असावा की काय अशी शंका येऊन गेली, बाकी मस्त जमलंय मुक्तक!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा