केमिकल लोच्या
कोण रे तू?
मासाच्या गोळ्यात अडकलेला तू ,
त्या मांसाच्या फ्रेशनेस वर अवलंबून आहेत तुझी इथली वर्ष ,
बाकी नियती वगैरे सगळेच खेळ मासातल्या काही सूक्ष्म तंतूंचे
अशाच दोन मांसाच्या गोळ्यांच्या असंख्य अदृश्य शक्तीपैकी एक सूक्ष्म अंश तू ,
कसल्या भ्रमाचे ,कल्पनांचे मनोरे नाचवायला निघालाहेस??
विश्व वगैरे अस काही नसत तुझ्या कवटीच्या बाहेर....
येडा कुठला .... साक्षात्कार म्हणे ....आत्मिक विचारचक्र गरगर फिरतात...
बरळून घे बरळून घे.....हेच आहे हक्काचं व्यासपीठ ...
तुझ्या येड्झवेगीरीला समजणार ...मोकळ करणार ..
आतल्या खलबताशी गद्दारी करू नकोस...
विचार ,भावना शब्दात नेमक लिहिण जमलं नाही कुणाच्या बापाला ....
लिहिणारे लिहोत त्यांच्या भावना....
चार चौघांना पटणाऱ्या असतीलही ....
तू कशा आणणार रे चार चौघांना पटणाऱ्या भावना ,विचार
उगाच खदखदत राहत हे अतरंगी अंतरंग ...
खोदायला घ्याव तर आडवी येते सामाजिक बांधिलकी वगैरे....
साला सब केमिकल लोच्या है...
या मांसाच्या गोळ्यात ....
.......!
विचार ,भावना शब्दात नेमक
भा.पो.
धन्यवाद
मुक्तछंदातला स्वसंवाद आवडला..
>>>बरळून घे बरळून घे.....हेच