Skip to main content

भविष्य......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 03/09/2014 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे, मी काय म्हणतो.उद्या मला यायला काही जमणार नाही" "कारे" "उद्या, काही मंडळी, भविष्य जाणून घ्यायला येणार आहेत.आता आपण म्हणजे काय? एक नंबरचे ज्योतिषी." "बरं ठीक आहे.ती तर रात्री येणार नाहीत ना?मग आपल्या कार्यक्रमांत खंड नको.मी असेनच इथे." "तरी पण जमणार नाही.कारण उद्या आपले आय.पी.एल. नाही का? उद्या आपले महाराज खेळणार बघ.आपले भविष्य काय वाया जाणार नाही.बेट लावतो का?" "ओ.के. तू बघ आय.पी.एल. मी आपला एल.पी. झिंदाबाद." -------- "काय रे! तू तर येणार नाही म्हणालास.मग." "अरे नेमकी ती मंडळी आलीच नाहीत आणि आज नेमका त्या आय.पी.एल.च्या मॅचच्या शहरावर पावूस कोसळला.बोंबला तिच्यायला आणि हे काय्?तू अजून सुरुवात नाही केलीस? मग हे २ ग्लास आणि बाटली कशाला?" "जावू दे रे. आपण काय १ नं. ज्योतिषी नाय. पण तू यावेस आणि आपण मस्त गप्पा हाणाव्या असे मनापासून वाटत होते.शेवटी तुमच्या त्या ज्योतिषा पेक्षा आमची मनाची ताकद मोठी आहे."

वाचने 4508
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by प्रभाकर पेठकर

हो ना ! एक नंबरचा बेवडा आहे... त्याला बोलावणे लागत नाही ! =)) . =)) . =))

In reply to by प्रभाकर पेठकर

'पाहतो भजी, मागतो जिलेबी' या न्यायाने चकणा दुसर्‍याच घरात शिरला तर पंचाईत. :-)

पंच सही होता. मजा आली. :-) अजून येऊ द्या... बाकी ज्योतिष वगैरे थोतांडच आहे सगळं हे खरं. मी स्वतः अनुभव घेतला आहे.

In reply to by मुक्त विहारि

बहोत नाइन्साफी है ये ! फक्त आभार ? म्हन्जे आमचा ग्लास तुम्ही मांडनार नाही तर ? पायजेल तर आमचा चकणा आमी घिउन येवू