"पुरोहिताचे भूत"
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..
स्वभाव भित्रा व कशाची तरी सारखी काळजी करणे असा त्याचा स्वभाव असतो...गरीब असल्याने लग्न हि लांबले होते..
शेवटी ग्रहमान उच्चीचे येते व वयाच्या ४०-४२ वर्षी लग्न होते...३ मुले होतात..
आधीच गरिबी त्यात पोरवाडा या मुळे प्रापंचिक ओढाताणीने तो जेरीस आला असतो..व त्यांतून आपले पुढे कसे होणार या काळजीने तो खंगू लागतो..
त्यातच तो आजारी पडतो..अन बिछान्यावर पडल्या पडल्या व अश्या आजारात जर माझा मृत्यू झाला तर बायका पोरांचे काय होणार या विचाराने त्याच्या काळजात धडकी भरते..आजारातून बरा होतो पण काळजी काही पाठ सोडत नाही.
त्याचा त्याच गावत एक जिवलग मित्र रहात असतो...तो मित्र म्हणजे निडर बिन्धास तिकडम बाज व व्यवहारी असतो..
आपला पुरोहित मित्राला आपली व्यथा सांगतो.पंण मित्र हसतो व असे काही नसते म्हणून त्याला धीर देतो..
पण पुरोहित ला हे काही पटत नाही..त्याचे समाधान होत नाही..शेवटी मित्र एक युक्ती लढवतो व त्याला सांगतो.
आपल्या गावातली नदी ओलांडली की बाजूचे जे गाव लागते तिथे माझे नातेवाईक रहातात..आपण बाजूच्या गावाकडे धर्मकार्या साठी जातो असे तुझ्या घरी सांगू व मी तुझा नदी ओलांडताना पाय घसरला व अपघात झाला व त्यात तुझा मृत्य झाला अशी आवई उठवतो..नदिच्या पाण्यास ओढ असल्याने प्रेत वाहून गेले अशी थाप मारतो..यामुळे तुझ्या मृत्यू नंतर तुझा परिवार कसा चालतो ते पण तुला कळेल..तुझी माझ्या नातेवाई का कडे मी ४-५ महिन्या साठी सोय करतो व ८-१५ दिवसांनी चक्कर मारून तुझ्या परिवाराची हाल हवाल हि तुला सांगत जाईन...
यासाठी आपला पुरोहित तयार झाला तरी हि योजना सफल होईल ना? अशी त्याला काळजी असतेच..
नक्की होईल.मित्र त्याला म्हणाला व हि गोष्ट दोघातच गुप्त ठेवायची अश्या आणाभाका शपता दोघेही घेतात.
दुस~या दिवशी मित्र पुरोहिताच्या घरी येतो व पुरोहित बाजूच गावात धर्मकार्य असल्याने आम्ही जात आहोत ..सायंकाळ पर्यंत येईन असे असे बायकोस सांगितले..व दोघे घराबाहेर पडले....
ठरल्या प्रमाणे मित्राने त्याची सोय नातेवाईका कडे करतो..व मित्र गावाच्या दिशेने कुच करतो
दुपारी मित्र घरी पुरोहिताच्या आला..त्याला एकटाच आल्याने बायको म्हणाली तुम्ही सायंकाळी येणार होता अन असे अचानक दुपारीच कसे परतलात? अन हे कुठे आहेत?
यावर मित्राने रडवे तोंड करीत पुरोहिताचा नदी ओलांडताना पाय घसरला व अपघात झाला व त्यात मृत्य झाला....नदिच्या पाण्यास ओढ असल्याने प्रेत वाहून गेले अशी थाप मारली..
हे ऐकल्यावर पत्नी शोक विव्हल होते व रडण्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी पण जमा होतात..
शेवटी १३ दिवसाचे सुतक संपते..आधिच गरीबी पदरी ३ मुले यामुळे या बाईचे कसे होणार याची चिंता पण होतिचा..
पण गावचा धनी सावकार पुढे येतो व थोरल्या मुलास आपल्या कडे आश्रित म्हणून ठेवून घेण्यास तयार होतो..
गावच किराणा मालाचा दुकानदार बाईस पोळ्या लाटायला या असे सांगून जेवून खावुन काही रक्कम ठरवतो...तर गावचा पटील आपल्या शेतातील भाजी वीक असा प्रस्ताव देतो..
महिन्या भरातच पुरोहिताच्या बायकोची परिस्थिति एकदम सुधारते..
ज्या घरात एक वेळच्या जेवण्याची भ्रांत होती त्या जागी सुग्रास भोजन व भाजी विकून ४ पैसे खुळखुळू लागतात ..
मित्र व बायको दोघांनाही जाणीव असते की केवळ वैधव्य आले म्हणून लोक मागे उभे राहिले व परिस्थिती पालटली..
गावकरी अडचणीच्या वेळी आपल्या मागे उभे राहिले या मुळे तिचे मन भरुन आले...
मात्र त्या गावात पुरोहिताच्या जिवाची घालमेल होत असते..आपल्या बायकोने आत्महत्या तर केली नसेल ना असले विचार त्याच्या मनात येत असतात..
अश्यात त्याचा मित्र गावाकडून येतो व हा आल्या आल्या त्याला परिवाराचा हाल विचारतो..मित्र सारी कथा त्याला सांगतो व आपली बायका पोरे सुखात आहेत हे त्याला कळते..व त्यावर पुरोहित मित्रास गावास येऊन बायको पोरास भेटण्याची मनीषा सांगतो..
पण मित्र व्यवहारी असतो व अजून एक महिना जाऊ दे असे सुचवतो व वेळ मारून नेतो.शेवटी पुरोहित हि हो नाही करीत राजी होतो...
२ महिन्यात त्या बायको व मुलाबाळाची जेवण खाण कपडे लत्ते यात चंगळ सुरू होते...
महिन्या नंतर मित्र पुरोहिताला भेटतो..व सारा हाल हवाल सांगतो..ह्या वेळी मात्र मित्र या वेळी मी बायका पोरांना भेटणारच असा हट्ट धरून बसतो.
मित्र व्यवहारी व हुशार असल्याने विचार करतो की जर पुरोहित गावात आला हा जिवंत आहे कळल्यांवर तर जे लोक मदत करीत आहेत ते करणार नाहीत व बायका पोराना परत विपन्नावस्थेत दिवस काढावे लागतील...या वर तो विचार करतो अन मित्रास सुचवतो की "बघ तू या जगात नाही हे लोकाना माहीत आहे त्यामुळे तू जर असा गेला तर गोंधळ उडेल पण तुला हि बायका पोराना बघण्याची ओढ लागली हे पण मी समजू शकतो..आज पासून ४ दिवसांनी अमावास्या आहे..पूर्णं अंधार असेल तेंव्हा रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान तू घरी जा व भेट घे म्हणजे कुणास कळणार नाही..
पुरोहिताला ते पटते व अमावास्येच्या रात्रीची वेळ नक्की होते व मित्र पुरोहिताचा निरोप घेतो..
दुस~या दिवशी मित्र पुरोहिताच्या घरी जातो व बायकोस सांगतो की" मला काल स्वप्न पडले व स्वप्नात मित्र म्हणजे पुरोहित आला होता..तो भूत झाला असून तो मनुष्य रूप घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे..व इथेच रहाणार आहे....
आपला नवरा भूत झाला या कल्पनेने पुरोहिताच्या बायकोची बोबडी वळते व ति घाबरते..
यावर मित्र सांगतो की तुम्ही असे करा अमावास्येच्या रात्री ११.३०-१२ च्या दरम्यान तो रात्री येणार असे त्याने मला स्वप्नात सांगितले.तुम्ही व मुले दारा आड लपून बसा व तो आला की लाठ्या काठ्या केरसुण्यांनी त्याला बडवून हाकलून लावा..घाबरू नका"
या उपायावर ति राजी होते..
अमावास्येच्या रात्री पुरोहित लपत छ्पत आपल्या घराकडे येतो.व पत्नीस हाका मारू लागतो..
बायका व मुले तयार असतातच ति दार उघडते व पुरोहितास केरसुणी लाठ्यांचा प्रसाद देण्यास सुरवात करते..
आधीच भित्रा व घाबरट पुरोहित ह्या प्रकाराने घाबरतो व मी तुझा नवरा आहे असे सांगू लागतो..पण "माझा नवरा मेला आहे तू भूत बनून आम्हांस छळायला आला आहे असे म्हणत ति बदडायला सुरवात करते..
आरडा ओरडा ऐकून शेजारी पण जागे होतात व ते पण काठ्या घेऊन धावत येतात..
आधीच मार खाऊनं अर्ध मेला झालेला भेदरट पुरोहित शेजारी येत आहेत हे पाहून घाबरतो व पळ काढतो....
दुस~या दिवसापासून त्या बाईचे व मुलाचे जीवन परत आरामात चालू होते..
अमावास्या पौर्णिमा आली की गावात "पुरोहिताचे भूत" या गप्पा रंगतात..
वाचने
15644
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
हायला!! चांगलीच गोची झाली.
हहपुवा
In reply to हहपुवा by सुनील
+१
हा हा हा.
हाहाहाहा.
आधी आपण मोजींच्या कथेचे फॅन
ह्म्म..
In reply to ह्म्म.. by विटेकर
-९९९९९९९९९९९९९९९९
In reply to ह्म्म.. by विटेकर
विटुकाका किती अपवाद दाखवु. 1
In reply to विटुकाका किती अपवाद दाखवु. 1 by जेपी
अपवाद
In reply to अपवाद by विटेकर
जरा ब्राह्मण- ब्राह्मणेतर
In reply to जरा ब्राह्मण- ब्राह्मणेतर by बाळ सप्रे
आपल्या
In reply to आपल्या by विटेकर
(No subject)
In reply to अपवाद by विटेकर
१९४८ चे जळीत फक्त प
In reply to १९४८ चे जळीत फक्त प by नानासाहेब नेफळे
फक्त सांगली-मिरज नाय, सातारा
In reply to फक्त सांगली-मिरज नाय, सातारा by बॅटमॅन
येस्स. अगदी पुण्यात पण.
In reply to येस्स. अगदी पुण्यात पण. by llपुण्याचे पेशवेll
मात्र नथुरामचे गाव -
In reply to मात्र नथुरामचे गाव - by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मात्र नथुरामचे गाव -
.
मला तर आवडली ब्वॉ कथा, छान
कथेतील जातीवाचक तसेच आर्थिक
In reply to कथेतील जातीवाचक तसेच आर्थिक by विजुभाऊ
मला कथेतील नामे, सर्वनामे,
In reply to मला कथेतील नामे, सर्वनामे, by विश्वनाथ मेहेंदळे
(खळ्ळ्ळ्ळ) खट्याक्...
In reply to (खळ्ळ्ळ्ळ) खट्याक्... by एस
एक फार खटकलं
मस्त कथा. एखादी मराठी
त्या भित्र्या कथानायकाचं पुढे
भारीच हो.
चांदोबा मधे अशा गोष्टी
In reply to चांदोबा मधे अशा गोष्टी by मराठे
हाहाहा
In reply to हाहाहा by समीरसूर
या खुदा!
In reply to हाहाहा by समीरसूर
पिक्चर काढायचा की देउळ ??
In reply to पिक्चर काढायचा की देउळ ?? by बाळ सप्रे
अहो ऑटकम महत्वाचा आणि तो
In reply to अहो ऑटकम महत्वाचा आणि तो by डॉ सुहास म्हात्रे
ऑटकम नाय आउटकम, आउटकम !
In reply to ऑटकम नाय आउटकम, आउटकम ! by डॉ सुहास म्हात्रे
औट घटकेचाच असतो तो. असू द्या!
In reply to औट घटकेचाच असतो तो. असू द्या! by प्यारे१
औट घटकेचाच नाय हो. जरा
In reply to पिक्चर काढायचा की देउळ ?? by बाळ सप्रे
डायव्हर्सिफिकेशन
In reply to डायव्हर्सिफिकेशन by समीरसूर
समीरसूर ह्यांनी मिळालेल्या
In reply to समीरसूर ह्यांनी मिळालेल्या by प्यारे१
सुट्टी नाही हो
In reply to डायव्हर्सिफिकेशन by समीरसूर
सायेब, पायाची झेरोस पाठवने.
In reply to डायव्हर्सिफिकेशन by समीरसूर
कहर कहर.
In reply to डायव्हर्सिफिकेशन by समीरसूर
जबरदस्त आहेत मुंगेरीलाल के
In reply to डायव्हर्सिफिकेशन by समीरसूर
_/\_
In reply to हाहाहा by समीरसूर
(No subject)
In reply to हाहाहा by समीरसूर
अफाट! अशीच तडकती भडकती मसाला
In reply to अफाट! अशीच तडकती भडकती मसाला by मराठे
>>> सस्त्यात पडेल.
आम्हाला एक भूत असलेले पुरोहित
In reply to आम्हाला एक भूत असलेले पुरोहित by प्रचेतस
बंदुकात्माआगोबा!
In reply to बंदुकात्माआगोबा! by अत्रुप्त आत्मा
आमाला एका अत्रुप्त पुरोहिताचे
In reply to आमाला एका अत्रुप्त पुरोहिताचे by स्पा
ताकाला जाऊन भांडे लपवून आणि
In reply to ताकाला जाऊन भांडे लपवून आणि by बॅटमॅन
भांडयाबद्द्ल...
In reply to भांडयाबद्द्ल... by नाखु
ते त्या आत्म्यालाच ठाऊक
In reply to आमाला एका अत्रुप्त पुरोहिताचे by स्पा
@मांडी घालुन उडणारे भुत
@ वल्लीदा-त्ये पुण्याला राहते
In reply to @ वल्लीदा-त्ये पुण्याला राहते by जेपी
तुम्हाले कसं काय माहिती वो?
आम्हाला एक पुरोहित असलेले भूत
मस्त कथा....
अकुकाकांची कथा!
मस्त कथा !!
यावर एक पिच्चर काढूया.
मस्तच आहे कथा..
हा जिवलग मित्र सुरवातीला मदत
In reply to हा जिवलग मित्र सुरवातीला मदत by मराठी_माणूस
सगळ्यांना बाईच्या आरामाची चिंता
शेवटी द्रव्येण सर्वे वशः !
कसं काय सुचतं??
हीहीही!
In reply to हीहीही! by पैसा
अकुंचा धागा म्हणून रामाचं नाव घेत घाबरत उघडला होता.....
जियो मेरे अकुअंकल.