✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राम गोपाल वर्माने लावलेली आग!

ह
हुप्प्या यांनी
Sat, 08/30/2014 - 21:08  ·  लेख
लेख
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे. ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे. काही नमुने इथे आहेत. http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ram-gopal-verma-sparks-another-controversy-tweets-ganesh ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती. असो.) ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा. हे घडताच काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तोही मुसलमान राम गोपालाबद्दल तक्रार करतो तेही विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हाही एक अजब योगायोग म्हणायचा! असो. कॉग्रेसचे हिंदू धर्मावरील प्रेम जगजाहीर असल्यामुळे असल्या फिल्मी प्रकाराला किती हिंदू भुलतील ह्याविषयी मला तरी शंका वाटते. हा योगायोग आहे का हे सगळे ठरवून केले आहे हेही सांगणे अवघड आहे. २६/११ नंतर लगेचच विलासराव देशमुखांनी वर्माला जिथे अतिरेकी हल्ले झाले तिथे नेऊन त्याच्या पुढच्या सिनेमाकरता मदत केली होती. त्यावरुन बरेच रान उठले होते. कदाचित ह्या उपकाराला जागून वर्मासाहेबांनी ही काडी सारली असेल. आत्ताच गणपती बसला आहे त्यामुळे आल्या आल्या पाहुण्याला खजिल करता कामा नये. पण वर्माजींनी उल्लेखलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नाहीत. असो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16065 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

राम्गोपाल्वर्मा.. हं नाव

काळा पहाड
Sat, 08/30/2014 - 22:18 नवीन
राम्गोपाल्वर्मा.. हं नाव ऐकल्यासारखं वाटतय खरं..
  • Log in or register to post comments

बुद्धी की श्रद्धा

चिऊकाऊ
Sun, 08/31/2014 - 07:08 नवीन
गणपती बाप्पा असोत की ईतर कोणतेही देव. पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे. पण या देवांच्या कथा लिहिणारेसुद्धा मनुष्यप्राणीच होते. देव ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असल्याने पुराणातील कथा बुद्धीच्या निकषावर घासून बघावे अथवा नाही हा सुद्धा व्यक्तीगत निर्णय असावा. पण भूत, फूंक यासारखे भुताळी चित्रपट काढतांना मात्र राम गोपाल वर्मांना असे बुद्धिवादी प्रश्ण पडले नाहीत का?
  • Log in or register to post comments

रामू नेहमी लोकांच्या वर्मावर

नानासाहेब नेफळे
Sun, 08/31/2014 - 07:27 नवीन
रामू नेहमी लोकांच्या वर्मावर बोट ठेवतो.(पुल्श्टाईल)
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ... रामुला आता कोणी

मदनबाण
Sun, 08/31/2014 - 09:57 नवीन
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी विचारणारे राहिले नाही असं दिसतय ! कुठुन तरी लाईम लाईट मध्ये येण्याची धडपड दिसते ! असो... बर्‍याच दिवसांनी रामु आणि सत्या याच्यामुळे गोली मार भेजे मे हे गाणं मात्र आठवलं....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया
  • Log in or register to post comments

गोली मार रामू के भेजे मे .....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/31/2014 - 13:14 नवीन
भेजे की सुनेगा तो मरेगा रामू …वर्मा …. रामुवर्मा…धिश्क्याव
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 08/31/2014 - 14:02 नवीन
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ram-Gopal-Verma-apologizes-for-his-unwarranted-tweet-on-Ganesh-Chaturthi/articleshow/41247904.cms आगीत तेल ओतून प्रश्न पेटवत ठेवायचाच असा निर्धार केला असेल तर चालू द्या.
  • Log in or register to post comments

इकडे माफी मागितली आहे.

धर्मराजमुटके
Sun, 08/31/2014 - 22:14 नवीन
काहिही झाले की माझा तो हेतू नव्हता असे बोलून मोकळे व्हायचे. मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आग लावायची आणि मग माफी

काळा पहाड
Sun, 08/31/2014 - 22:15 नवीन
आग लावायची आणि मग माफी मागायची हे आता विसरा. "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

ही धमकी वगैरे आहे का?

नितिन थत्ते
Mon, 09/01/2014 - 07:46 नवीन
ही धमकी वगैरे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सातत्याने हिंदूंच्या धार्मिक

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 13:16 नवीन
सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या असतील तर धमकीच समजा. कायदेशीर फटके बसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

फटक्यांची शिक्षा

सुनील
Mon, 09/01/2014 - 13:30 नवीन
फटक्यांची शिक्षा कायदेशीर झाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

आहो फटके म्हणजे पोलीस केस,

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 13:37 नवीन
आहो फटके म्हणजे पोलीस केस, खटला वगैरे. त्या हुसेनला नैका पळवून लावला होता परदेशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

एम एफ हुसेन भारतातले एक थोर

नानासाहेब नेफळे
Mon, 09/01/2014 - 13:46 नवीन
एम एफ हुसेन भारतातले एक थोर चित्रकार होते, त्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच

मृत्युन्जय
Mon, 09/01/2014 - 13:55 नवीन
मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच टाळावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

करेक्ट

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 13:59 नवीन
करेक्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हाहा, सहमत.

बॅटमॅन
Mon, 09/01/2014 - 16:49 नवीन
हाहा, सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कसाबलासुध्धा त्याच्या देशात

टवाळ कार्टा
Mon, 09/01/2014 - 15:53 नवीन
कसाबलासुध्धा त्याच्या देशात हुतत्मा वगैरे म्हटले जात असेल हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

इकडे

तिमा
Mon, 09/01/2014 - 17:43 नवीन
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला- इकडून माफी मागितली आहे, असं घाईने वाचलं. सदस्य नामामुळे घोटाळा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

विवाद + नाव = प्रसिद्धी

विवेकपटाईत
Mon, 09/01/2014 - 11:19 नवीन
विवाद + नाव = प्रसिद्धी (अप्रसिद्धी)= पैसा एक चित्रकार हेच करून प्रसिध्द झाला आणि अमाप पैसा मिळविला. राम गोपाल वर्माचे सिनेमे चालत नाही. सध्या रिकामटेकडे आहे. हिंदू धर्माच्या प्रतीकांना शिव्या दिल्या तर प्रसिद्धी मिळते आणि नुकसान ही काही होत नाही. म्हणूनच मी गणपती पूजे मागची अवधारणा हा लेख लिहिला होता जेणे करून लोकांना आपण गणपतीची पूजा का करतो हे समजावे. http://vivekpatait.blogspot.in/2014/08/blog-post_29.html
  • Log in or register to post comments

हिंदूद्वेष = प्रसिद्धी, दुसरे

बॅटमॅन
Mon, 09/01/2014 - 12:48 नवीन
हिंदूद्वेष = प्रसिद्धी, दुसरे काय? चालू फ्याषन आहे ही, त्याला इलाज नाही.
  • Log in or register to post comments

जातिभेदाविरुद्ध लढणार्‍या एका

मृत्युन्जय
Mon, 09/01/2014 - 13:43 नवीन
जातिभेदाविरुद्ध लढणार्‍या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.
  • Log in or register to post comments

रामगोपाल वर्माने इतर कोणते

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 14:00 नवीन
रामगोपाल वर्माने इतर कोणते समाजकार्य केले आहे? ते कार्य महान असेल तर ठीक नैतर लायकी शून्य आणि उगाचच आगपाखड याला काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सत्या, कौन यांसारखे अप्रतिम

मृत्युन्जय
Mon, 09/01/2014 - 17:26 नवीन
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम चित्रपट देउन त्यांनीही समाजोपयोगी कामच केले आहे. तरी नशीब त्यांनी गणपतीला शेंबड्या नाही म्हटलेले. बादवे एखाद्या महान लोकोत्तर समाजसेवकाला धार्मिक भावना भडकवणारे आणि जातिय पातळीवर उतरणारे विधान करण्यास परवानगी असते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

सरळ सरळ लिहा न तुम्हाला

प्रतापराव
Mon, 09/01/2014 - 18:36 नवीन
सरळ सरळ लिहा न तुम्हाला महात्मा फुले ह्यांच्या बद्दल बोलायचे आहे.महात्मा फुलेंनी गणपतीवर टीका केली त्याबद्दल वाईट वाटते पण आस्तिक विरुद्ध नास्तिक हा संघर्ष आपल्या देशातच नव्हे तर जगातही सतत चालूच असतो त्यात नवे काही नाही..काही लोकांना देवांबद्दल कोणी आक्षेपार्ह लिहिले तर चीड येते तर काही लोकांना समाजातील जातीभेद, गरिबी, धर्माच्या नावाने लुटमार ह्याबद्दल चीड येते. देव हा समर्थ असतो परंतु समाजातील अन्यायग्रस्त पिडीत हे समर्थ नसतात. देवावर कोणी टीका केली तर देव त्याचे बघण्यास समर्थ असतो पण पीडितांचे तसे नसते त्यांना कोणी वाली नसते. एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही.परंतु एखादी व्यक्ती नास्तिक असेल देवधर्माशी त्याला काही घेणे देणे नसेल परंतु त्याला समाजातील वंचिताबद्दल जर तळमळ वाटत असेल तर ती व्यक्ती माझ्या दृष्टीने श्रेष्ठ होय. देवाची भक्ती करणे सोपे असते हो पण असे समाजकार्य शतकातून एखादीच व्यक्ती करू शकते.महात्मा फुले जरी नास्तिक होते देवांवर कठोर टीका करत तरी त्यांनी केलेले समाजकार्य हे थोरच राहील. मी गणेश भक्त आहे त्याची पूजा अर्चा करतो परंतु महात्मा फुलेंनी जे स्त्री वर्गासाठी, अस्पृश्यांसाठी समाजसुधारणेचे कार्य केले त्याला माझा मानाचा मुजरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

प्रतापराव, माझ्या मनातले

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 18:47 नवीन
प्रतापराव, माझ्या मनातले बोललात (जे मला शब्दात मांडता येत नव्हते ते). मृत्युंजयराव, हेच माझेही उत्तर आहे असे समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला

प्रसाद१९७१
Tue, 09/02/2014 - 11:28 नवीन
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला मोठेच कोडे आहे. माझ्या माहीतीत ब्राहम्णांच्या स्त्रिया पूर्वी पासुनच लिहीत वाचित होत्या, अगदी १००% नाही पण बर्‍याच. फुलेंच्या आधी पण पुण्यात ब्राम्हण मुलींना शिकवण्याच्या अगदी शाळा म्हणता येतील अशा नाही पण सोयी होत्या. ते शिक्षण पण त्या वेळेस अनुसरुन लिहीणे वाचणे पाठांतर असेच होते. बंगाल , पंजाब मधे पण मुलींना शिकवण्याची पद्धत त्याच सुमारास हळु हळु का होइना चालू झाली. बंगाल मधे तर कदाचित बरीच आधी. मग हे फुले म्हणजे स्त्री शिक्षण हे कुठुन आले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

.

पोटे
Tue, 09/02/2014 - 11:42 नवीन
नुस्ते ब्राह्मण म्हणजे समाज नव्हे. बहुजन समाजात स्त्रीशिक्षणाची प्४अथा सुधारकांनी सुरु केली. ब्राह्मणच कशाला, मोघल स्त्रीयादेखील लिहिण्या वाचण्यात पारंगत होत्या.. शायरी, इतिहास , पाककला याबाबतीत मोघल स्त्रीयांनी विपुल लेखन केलेले आहे. तरीही सामान्य बहुसंख्य जनात स्त्री शिक्षण नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

माझ्या बंगाल आणि पंजाब च्या

प्रसाद१९७१
Tue, 09/02/2014 - 12:30 नवीन
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या स्त्री शिक्षणाच्या बद्दल च्या मताचे काय? त्याबद्दल काही माहीती आहे का? बहुजन समाजात स्त्री शिक्षण नव्हते त्या मागे अडवणुकीची भुमिका ब्राह्मणांची होती का? मी तर ऐकले आहे की फुल्यांच्या शाळे साठी वाडा एका ब्राह्मणानीच दीला होता आणि दगडे पडायची ती पण त्याच वाड्यावर. दुर्दैवानी कींवा मुद्दामुनच त्या वाडा देणार्‍या आणि दगडाचा मार खाणार्‍या ब्राहमणाचे नाव मात्र इतिहासातुन पुसुन टाकलय कोणी तरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे

महात्मा फुले नास्तिक नव्हते.

विवेकपटाईत
Tue, 09/02/2014 - 11:57 नवीन
महात्मा फुले नास्तिक नव्हते. केवळ धर्माच्या नावावर चाललेल्या अत्याचारांचा विरोध होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

मृत्युंजयसेठ,

प्यारे१
Mon, 09/01/2014 - 18:12 नवीन
मृत्युंजयसेठ, नया हय वह. बक्ष दो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका

नानासाहेब नेफळे
Mon, 09/01/2014 - 20:24 नवीन
जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.
खरंय हो ,ह्या महात्म्याने हिंदुंच्या भावना फार दुखावल्या, नवरा मेल्यावर विशिष्ट जातीत केशवपन करुन, आलवण नेसवून बायकांचा उद्धार करायची पद्धत होती, जर या बायका तारुण्यात विधवा झाल्यास पुढील आयुश्य आलवणात फार सुखात जायचे, नवर्यामाघारी नातातल्याच एखाद्याच्या'कृपेने' यांना मुले व्हायची, मग श्रेष्ठ धर्म सांगायचा कि मुले फेकुन द्या ,पण या महात्म्याने व त्याच्या बायकोने अशा स्त्रीयांना व त्यांच्या अनौरस मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम काढून चक्क धर्म बुडवला हो! काय हे पाप!! कुठे फेडले असेल!!! स्त्रीया शिकल्या तर पुरषांना अश्लील पत्र लिहतील" असा स्पष्ट इशारा धर्ममार्तंडांनी देऊनही या जोडप्याने आशिया खंडातली मुलींसाठीची पहीली शाळा उघडून धर्म बुडवला, शिवाजींची समाधी शोधुन, तिथे दिवाबत्तीची सोय करुन या माणसाने काय साधले? आणि थेट गणपतीवर टीका केली..... लंबोदराकडे पाठ करुन, पोट खपाटीला गेलेल्यांची काळजी करण्याची औदसा फक्त हिंदू धर्मातल्या महात्मांनाच आठवते, आपले दुर्दैव! दुसरे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अगदी खरे.

पोटे
Mon, 09/01/2014 - 21:01 नवीन
आणि त्यांच्या बायकोने पहा काय लिहिले आहे.. पुढे पेशवाई तिने राज्य केले अनाचार देखी अतिशूद्र भ्याले स्वथुकी थुकाया मडके गळी ते खुणा पुसाया ढुंगणी झाप होते... १७ तुला बोलवी बाजी शौरी धनी गं स्वपत्नीस धाडे निलाजरा पती गं अशा ब्राह्मणीला छळे स्त्रेणशाही मुखा बोलती त्या जळो पेशवाई.. १९ ..बावनकशी सुबोध रत्नाकर ... सा. फु. .. ०७.११.१८९२

संपादित

रामू खरेच बोलला की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

वोक्के. म्हणजे काही चांगले

मृत्युन्जय
Mon, 09/01/2014 - 22:37 नवीन
वोक्के. म्हणजे काही चांगले काम केल्यावर असलं काहीबाही लिहिता येते. उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

काहीबाही लिहा. फायदाच होतो.

पोटे
Tue, 09/02/2014 - 10:35 नवीन
विद्येच्या गावात विद्येच्या देवाबद्दल काहीबाही लिहुनही विद्येच्या विद्यापीठाला त्यांचेच नाव मिळाले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कोण रामगोपाल वर्मा? धन्यवाद.

शिद
Mon, 09/01/2014 - 15:09 नवीन
कोण रामगोपाल वर्मा? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल

ऋषिकेश
Mon, 09/01/2014 - 15:19 नवीन
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
सहमत आहे!
  • Log in or register to post comments

रामू जे बोलला त्याचा निषेध.

प्रतापराव
Mon, 09/01/2014 - 17:10 नवीन
रामू जे बोलला त्याचा निषेध. त्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल झालीय. परंतु त्याविरुद्ध धमक्या देणे, फटके पडतील असे शब्द वापरणे चुकीचे आहे. पाकिस्तानातील अशाच मनोवृत्तीच्या लोकांमुळे आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments

पूर्ण सहमत!!!!!

बॅटमॅन
Mon, 09/01/2014 - 17:12 नवीन
पूर्ण सहमत!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

संपूर्ण असहमत. असल्या लोकांना

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 17:14 नवीन
संपूर्ण असहमत. असल्या लोकांना फटकेच द्यायला हवेत. अर्थात कायदेशीररित्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

त्यासाठि

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 09/01/2014 - 17:37 नवीन
"तुमची लोकशाही घाला चुलीत' असे म्हणणार्या दिवंगत ह्रुदयसम्राटाविरुद्ध असे लिहायची हिंमत झाली असती का रे मंदिजो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

त्याचा इथे काय संबंध?

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 17:41 नवीन
त्याचा इथे काय संबंध? बाय द वे, बाईचा आयडी घेऊन काय बोलतोस? पडद्याबाहेर ये रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वरती काळा पहाड ह्यांनी "मां

काळा पहाड
Mon, 09/01/2014 - 17:40 नवीन
वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.
अच्छा म्हणजे तुम्ही दुसर्‍याला मूर्ख म्हटलं तर ते चालेल. पण एखाद्या सरकारला देशद्रोही म्हणणं म्हणजे मूर्खपणा. १. मला वाटतं तुम्हाला भाषेमध्ये सिव्हिलिटी हवी होती. ती तुम्ही स्वतः का वापरली नाही? २. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? "फटका" शब्दाबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव

जबरदस्त थुत्तरफोड उत्तर

मंदार दिलीप जोशी
Mon, 09/01/2014 - 17:42 नवीन
जबरदस्त थुत्तरफोड उत्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

+२,०००%

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/01/2014 - 17:49 नवीन
२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्‍यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ? भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

झापड मनोवृत्ती

llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/01/2014 - 17:57 नवीन
सहमत. झापडमनोवृत्तीच्या लोकांना फटका पचनी पडणार नाही. बाकी अनंत फंदी या काळात झाले असते तर त्यांच्या फटक्यांपायी त्यानाही लोकशाही विरोधी ठरवले असते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

देशद्रोह हा शब्द फार मोठा

प्रतापराव
Wed, 09/03/2014 - 12:49 नवीन
देशद्रोह हा शब्द फार मोठा झाला काळा पहाड. जर ते सरकार देशद्रोही होते असे तुमचे मत आहे तर त्यांच्यावर सध्याच्या देशप्रेमी सरकारने काय कृती करावी असे तुमचे मत आहे. आणि जर हे देशप्रेमी सरकार आधीच्या देशद्रोही सरकारवर जर त्यांनी केलेल्या देश्द्रोहाबद्दल काहीहि कृती करणार नसेल तर हे सरकारही देशद्रोही असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

राम गोपाल वर्माने लावलेली आग

शिद
Mon, 09/01/2014 - 17:56 नवीन
राम गोपाल वर्माने लावलेली आग मिपावर बरीच फोफवलेली दिसतेय. ;) चालू द्या.
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Mon, 09/01/2014 - 17:57 नवीन
हुप्प्यारावांना काँपिटिशन नाही वर्तमानपत्रे चिकटवण्यात...
  • Log in or register to post comments

+१

सौंदाळा
Mon, 09/01/2014 - 17:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

उगाच वैयक्तिक शेरेबाजी का?

हुप्प्या
Wed, 09/03/2014 - 19:58 नवीन
वर्तमानपत्रे चिकटवणे वगैरे गलिच्छ भाषा वापरायचे प्रयोजन कळले नाही. लेखाच्या विषयात बातमी असे स्पष्ट लिहिले आहे. घडणार्‍या बातम्यांवर चर्चा करायला मला आवडते. तुम्हाला असला उहापोह वर्ज्य वा त्याज्य असेल तर इथून निघा. लेख न वाचण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. उगाच वैयक्तिक शेरेबाजी करून ह्या चर्चेत चिखल का फेकत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा